Skip to main content

फरसाण

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 08/10/2014 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
फरसाण हा नमकिन पदार्थ प्रत्येकाच्या घरातल्या डब्यात असतोच... लहान थोर सा-यानाच तो आवडतो.. फरसाण असले कि गृहिणी मिसळ... भेळ आदी चट्पटीत प्रोग्राम करत असतातच फरसाण तयार करणारे अनेक लोक्स आहेत... पण पुण्यात..चितळे ..काका हलवाई.. पुरोहित...हॉट चिप्स..चौधरी तर क्यांप एरियात बुधानी कराची वाला आदी प्रख्यात आहेत.. मला पुरोहितांचे फरसाण आवडते,. या व्यतिरिक्त हळदिराम..बिकानेर असे अनेक ब्र्यांड्स पण आहेत ज्यांची पाकिटे जनरल स्टोर मधे लोंबकळताना दिसतात.. हल्ली तर फरसाण मधे पण बरेच प्रकार आलेले आहेत पुण्यात चितळे ..काका हलवाई तसे नशिक नागपुर आदी शहरात पण फरसांण कुणा हवलवायाची खासियत असणार आपल्या गावात कोणता हलवाई प्रसिद्ध आहे ..फरसाण..नमकिन साठी?? .. ..

वाचने 25852
प्रतिक्रिया 105

प्रतिक्रिया

मला हल्ली नवा धागा म्हटला की धडकीच भरते! धाग्याच्या नावात फरसाण बघून वाटले आता काय गुजरात्यांना शिव्याशाप दिलेत की काय! पण नाही! इतक्या साध्या सरळ धाग्यासाठी अकुंना धन्यवाद! फोटो आवडले. आता कुटा फर्साण! =))

In reply to by पैसा

>>>> आता कुटा फर्साण! फर्सान्कुट. कसं लागंन त्ये चवीला? पार राडाच हुनार की.

In reply to by सुहास..

अरे सुहास काय विचारतोयस? तुला माहित नाही का अकुकाकांची खासीयत. एकदा का धागा टाकला के की ते परत त्या धाग्यावर येत नाहीत.

लहाणपणी वाण्याच्या दुकानातील काचेच्या बरण्यांमधले फरसाण एखाद्यावेळेसच खरेदी केले जायचे. आमच्या शहरातील सर्वात मोठ्या भारतीय दुकानात रांजणांमध्ये फरसाणाचे विविध पदार्थ ठेवलेले असतात. हवं तसं मिश्रण एकत्र करून विकत घ्या. पूर्वी मी जंक फूड म्हणून टाळायचो. एकदा खाऊन पाहिल्यावर आता नियमीतपणे विकत आणतो.

फरसाणमध्ये भरपूर कांदा कापून, जमल्यास चवीनुसार टॉमेटोही चिरा जरा, असे ते मिश्रण पावात भरून कच्छी दाबेली सारखे खायचे.. बेस्ट .. सुका मिसळपाव सुद्धा बोलू शकतो याला :)

In reply to by रेवती

आमच्याइथे मागल्यावर्षीपासून चितळ्यांचे फरसाण मिळायला लागलेय.
आमच्या इथे मात्र नेहमी बेसनाचेच फरसाण मिळते

महाराष्ट्रात फरसाण खावं ते मुंबईत! ते ही सेन्ट्रल लाईनवर घाटकोपर, मुलुंड तसंच वेस्टर्न लाइनवर अंधेरी, मालाड असल्या नामांकित उपनगरात!!! माझी वैयक्तिक आवड म्हणजे मुलुंड वेस्ट्चं स्टेशन जवळचं कोठारीचं फरसाण!!! पठ्ठ्या किती दशकं फरसाण विकतोय माहिती नाही पण चाळीस वर्षांपूर्वी त्याचं दुकान जुनं, म्हणजे दुकानावरची पाटीबिटी झिजून तुटून गेलेली, असं होतं! पण फरसाणाच्या चवीला तोड नाही!!! अजूनही प्रत्येक भारतभेटीत त्याचं किलोच्या किलो फरसाण वाहून इथे आणतो!!!!

In reply to by पिवळा डांबिस

+ १०० मुलुंडला मी ४७ वर्षे राहत आलो आहे( मधली २३ वर्षे लष्करात असल्याने जाऊन येउन) परंतु त्या दुकानाचे नाव आजही मला माहित नाही.ते ज्या इमारतीत आहे तिचे नाव कोठारी निवास आहे त्यामुळे त्या दुकानाला कोठारी निवास, कोठारीचं फरसाण अशी नावे आहेत. तो फरसाण बाजूच्याच दुकानात तळतो. त्यासाठी वापरलेले रिफाईण्ड गोडे तेलाचे डबे आपल्याला समोर दिसतात. त्या फरसाणाचा खप भरपूर असल्याने तेथे शिळे फरसाण कधीच मिळत नाही. शिवाय फ़र्सनबरोबर मिळणारी पपई च्या काचर्या घातलेली चटणी हे त्याचे वैशिष्ट्य आहे. अशी चटणी एक तर गुजराती फरसाण वाल्यांकडे मिळते किंवा थेट सौराष्ट्रातच मिळते.

In reply to by सुबोध खरे

त्यासाठी वापरलेले रिफाईण्ड गोडे तेलाचे डबे आपल्याला समोर दिसतात. खरे साहेब, आपल्या दुकानदारावर मी कुठलाही आरोप करीत नाहीये. आणि कुठलेही सरसकटीकरणही करीत नाहीए. माझा अनुभव सांगतो आहे. चांगल्या ब्रँडेड तेलाच्या डब्यांना भंगारात बर्‍यापैकी किमत येते फक्त अट असते डब्याला अगदी बारीक भोक पाडून (खिळ्याने वगैरे) त्यातील तेल काढून घ्यायचे आणि डबा खराब करायचा नाही. आठवड्यातून एकदा एक माणूस येऊन सर्व डबे घेऊन जातो अर्थात तुम्हाला चांगली किंमत देऊनच. शिवाय तुमच्याकडचे वापरलेले, काळे पडलेले तेल सुद्धा विकलं जातं. ह्या काळ्या पडलेल्या तेलात कसले तरी केमिकल मिसळले कि त्यातील कार्बन (तेल काळे करणारा घटक) वेगळा होऊन तळाशी बसतो. वरचे अल्मोस्ट स्वच्छ दिसणारे तेल त्या वापरलेल्या ब्रँडेड डब्यात भरून ते बेमालूम 'सील' केले जातात. हे वापरलेले तेल अर्ध्या किमतीत विकले जाते. बघणार्‍याला ब्रँडेड डबे दिसतात आणि 'चांगले' तेल वापरत असल्यावर विश्वास बसतो. ह्या तेलात, ते स्वच्छ करण्यासाठी वापरलेल्या, केमिकलचे अंश असतात जे आपल्या आरोग्याला अत्यंत धोकादायक असतात. सर्व उपहारगृह व्यावसायिक असे तेल वापरतात असे नाही. पण बहुतेक जणं वरच्या कमाईसाठी ब्रॅंडेड तेलाचे डबे अशा एजंटांना विकतात आणि ह्या धोकादायक भेसळीला हातभार लावतात. असे तेल खुपवेळा रस्त्यावच्या वडापाव गाड्यांवर, ऑम्लेट, भुर्जीपाव गाड्यांवर, रस्त्याच्या कडेच्या चायनिज गाड्यांवर विकले जाते. टपरी टाईप उपहारगृह सुद्धा वापरत असावीत असा माझा संशय आहे. हा प्रतिसाद मागेही एकदा तुमच्याच एका प्रतिसादावर दिला होता. नव्याने देण्याचे कारण नविन सदस्यांच्या माहितीसाठी आणि जुन्या सदस्यांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी दिला आहे. वाचकांनी बाहेरचे जंक फुड वगैरे खाताना काळजी घ्यावी ही विनंती.

In reply to by प्रभाकर पेठकर

तुम्ही डिसक्लेमर दिलेला आहेच. आणि कोण कसलं तेल वापरत असेल ते आजकालच्या काळात ते कुणी सांगावं? परंतु कोठारी फरसाणच्या संदर्भातला अनुभव म्हणून सांगावसं वाटतं की त्याचं फरसाण आजवर आमच्या घरातल्या तीन पिढ्यांनी खाल्लेलं आहे, आता चौथी खातेय. पण ते खाल्ल्यामुळे कुणालाही काहीही धाड भरलेली नाही... असो.

In reply to by पिवळा डांबिस

त्याचं फरसाण आजवर आमच्या घरातल्या तीन पिढ्यांनी खाल्लेलं आहे, आता चौथी खातेय. पण ते खाल्ल्यामुळे कुणालाही काहीही धाड भरलेली नाही... वाचून आनंदच झाला. कधी काळी आलोच तिथे तर मीही विश्वासाने कोठारींकडून फरसाण घेईन. माझा उद्देश आहे की, कांही ठिकाणी, कांही संशयास्पद आढळलं तर काळजी घ्या. सगळेच कोठारी नसतात.

In reply to by पिवळा डांबिस

घाटकोपरला हिंगवाला लेन बहुदा. मस्त फरसाण मिळायचे.. आठवड्यातून एकदातरी वारी व्हायची...

In reply to by पिवळा डांबिस

वॉव! ग्रेट माईन्ड्स थिंक अलाईक!!!!!!!! :) मिपावरचे दिग्गज माझ्या मताशी सहमत असलेले पाहून धन्य झालो! खरेडॉक्टर, नाटक्या, तुम्हाला अनेक धन्यवाद! (आता बाकीच्या चिल्लरपिल्लरांना घालू देत काय गोंधळ घालायचाय तो!!!) :)

In reply to by पिवळा डांबिस

मुंबईच्या बाहेर जग आहे बरं का पि डां काका. उगा आपण रहात असलेल्या लाईनला लागून शेवटचं स्टेशन म्हणजे जग संपतं असं नाही. (फुल्ल पेटती मशाल. राकेलच्या बुधल्यासकट ) आमच्या पाचगणीच्या लक्ष्मीविलास हॉटेल (दवे बरं का दवे) चं नाहीतर राजपुरे चं फरसाण खाऊन बघा. नाय आवडलं तर नाव बदलेन. (स्वगतः ...... अहो स्वगत आहे ना? तुम्हाला कसं कळणार?) थोडक्यात, गावागणिक फरसाणची, फॉर दॅट मॅटर कुठल्याही पदार्थाची चव बदलते. लहानपणापासून त्याच चवीची सवय लागलेले आपण थोडीच्च दुसर्‍या कशाला चांगलं म्हणणार आहोत? पदार्थाच्या चवीबरोबर आपण चघळतो आपले 'ते' दिवस. खरंतर ते आपल्या आवडीचे असतात. म्हणून अमुक एक लई भारी आणि तमुक एक बरा. चालायचंच!

In reply to by प्यारे१

:P

In reply to by पैसा

पिडांच्या फुडे कोण कितें उलयतलो?
आय अ‍ॅम टेकिंग धिस अ‍ॅज अ कॉम्प्लिमेंट!!! :) अ‍ॅन्ड, थॅन्क यू सो व्हेरी मच, फॉर द कॉम्प्लिमेंट!! आय अ‍ॅम ग्रेटफुल!!

In reply to by पिवळा डांबिस

+१०००००० अगदी अगदी लहानपणापासून कोठारीचे फरसाण खाल्ले आहे, आजही भारतवारीत माहेरी गेल्यावर कोठारीकडचेच फरसाण आणते व इथेसुद्धा घेऊन येतेच. खरे सर म्हणतात तसेच पपईची लच्छेदार चटणी तर क्या बात है. तसेच बोरीवली-दहिसरच्यामध्ये प्रकाश फरसाणवाला आहे त्याच्याकडे मिळणारा कॉर्न चिवडा, पोह्यांचा चिवडा ताजा,चविष्ट असतो, तसेच दहिसर पूर्वेला Misquitta Nagar ला फरसाणमार्ट आहे (नाव आठवत नाही) तिथे मिळणारी कचोरी, भावनगरी शेव, गाठिया व डिंकाचे लाडू अगदी तोंपासू आहेत.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्मूस, जिलबी दिस्तेय खरी पण ज्या तांब्यातून पाडली गेली तो तांब्या- अर्थात भांडे..का लपविता?

धाग्याकर्ताने धाग्यात चितळे आणि काका हलवाईंचे नाव दोनदा का आणले अशी मला उगाच शंका आली. फरसाणला इंग्रजीत मिक्शर म्हणलेले पाहीले आहे. मला फरसाण आवडते भेळ आणि मिसळीवर पण फरसाण चांगले लागते. फरसाणात कांदा घालून कोणी खाल्ले आहे का? फरसाण कुठल्या तेलात केलेले असते माहीत नाही. पण एकंदरीतच त्यात फॅट असावे असे वाटते. म्हणून ते कमी खावे. असो, याहून जास्त मोठा निबंध लिहीता येईल असे वाटत नाही.

मंगला टाकीजजवळ गुप्ता फरसाणवाला आहे. एक नंबर फरसाण मिळत त्याच्याकडे. आणि बरोबर मिरचीचा ठेचा. आहाहा!

दादर कबुतरखाना डि'सिल्वा हा०स्कूल समोरचं फरसाण(=भूसा)+तळलेल्या मिरच्या +पपईचे तळलेले काप (पाचक).आमच्या बाल्कनीत दहा वर्षे येणारा कावळा फक्त फरसाणच खातो सकाळी आठ आणि दुपारी चार वाजता.

In reply to by कंजूस

दादर कबुतरखाना डि'सिल्वा हा०स्कूल समोरचं फरसाण(=भूसा)+तळलेल्या मिरच्या +पपईचे तळलेले काप (पाचक). सौराष्ट्र का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

मिपाकर गुजरातमध्ये गेलेले दिसत नाहीत वाटते... फरसाण खावे ते राजकोट,भावनगरला. ८०च्या दशकात गेलो होतो आम्ही तिकडे. उत्तम प्रतीचे फरसाण्,गाठी,पापडी मिळते तेथे.

In reply to by काळा पहाड

माई जुन्यापुराण्या आहेत... म्हणजे तश्या त्या असाव्यात, कारण सर्वांनाच त्या अधिकारवाणीने अरे-तुरे करतात. तेव्हा त्या कदाचित १८८० च्या दशकातही तेथे गेल्या असण्याची शक्यता आहे!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

...आत्ताच्या ह्या दशकात तिकडे 'मोदीछाप' उत्तम प्रतीचे फरसाण्,गाठी,पापडी मिळते तेथे. असे नान्याने मला एकदा हळुच सांगितले होते. तो म्हणे तिकडे हल्ली वरचेवर जात असतो, हे खरे आहे काय ???

व्यक्ति:श मला चितळे, काका हलवाई यांच्याकडचे फरसाण नाही आवडत. फारच मिळमिळत असतात. कराचीवालाची जाड शेव मस्त असते. तीच मी शेवभाजी साठी सुद्धा वापरते.

खरं तर गुजराती लोक तशा प्रकारच्या सगळ्याच नाश्त्याला 'फरसाण' असे म्हणतात. फक्त मुंबई-पुण्याकडे या मिक्स्चरला 'फरसाण' म्हणतात. 'फरसाण' नांवाने जे मिळते त्याहीपेक्षा चविष्ट मिक्स्चर खायचे असेल तर ' शेव खमणी' खाऊन बघा. बडोदा-अमदाबादला उत्तम चवीची मिळते.

In reply to by तिमा

आपण ज्याला फरसाण असे संबोधतो, त्याला गुजराती 'फाफडा' म्हणतात. ताटात 'डाव्या व मधल्या' बाजूला जे जे काही असते, म्हणजे लोणची, चटण्या, भजी, ढोकळा इत्यादी. -- ह्या सगळ्याला मिळून 'फरसाण' म्हटले जाते. मी अहमदाबादेत पूर्वी रहात होतो, तेव्हा आमच्या जवळच एक नवे फरसाणचे दुकान उघडले. त्याचा गल्लीच्या कोपर्‍याबर 'फरसाण नो दरियो' व त्याखाली दुकानाच्या दिशेने बाण--असा बिलबोर्ड लावला होता, तो ह्या लेखाच्या निमीत्ताने आठवला.

In reply to by प्रदीप

प्रदीप जाजा. गुजराथी लोक ; जेवणातील तळलेल्या विषेषतः खार्‍या-तिखट पदार्थाला उदा : पापड, समोसे , गाठेया ,कचोरी , पात्रा , ढोकळा ,या सर्वाना फरसाण असेच सम्बोधतात. आपण फक्त शेव गाठीया वगैरे कोर्‍या मालाला फरसान म्हणतो.

In reply to by विजुभाऊ

माझी एक चूक झाली होती, लोणची- चटण्या इ. 'अथाणूं' म्हटले जाते-- ते 'फरसाण'चा भाग नव्हेत. आणि तुम्ही लिहील्याप्रमाणे जेवणातील तळलेल्या,खार्‍या-तिखट पदार्थांना फरसाण असे संबोधतात.

In reply to by विजुभाऊ

आपण फक्त शेव गाठीया वगैरे कोर्‍या मालाला फरसान म्हणतो
गडी अंगानं किरकोळ, न आडवा, त्याच्या काव्यात सातारवी गोडवा, गंऽऽ त्याच्या काव्यात सातारवी गोडवा... हसरा मुखडा, काळजाचा तुकडा मिपावरी रुतला, गं बाई बाई, मिपावरी रुतला!!! हितंबी दिस्तोय, तिथंबी दिस्तोय, शोधू नको, शोधू नको, शोधू नको.... बाटला गं बाई, बाटला!!!! बाटला गं बाई, बाटला!!!! घाट्यांत राहून हा विजू शहा बाटला, गं बाई बाटला!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

बाटला गं बाई, बाटला!!!! बाटला गं बाई, बाटला!!!! घाट्यांत राहून हा विजू शहा बाटला, गं बाई बाटला!!!!
ओ हायच मी पक्का घाटी. कृष्णेच्या घाटावरचा. उगाच डोंबोली अन ठाणे असल्या बीनघाटाच्या गावातला नाय पिडां काका कदी येताय हिकडं.....

फरसाणसारखाच खुसखुशीत अन सात्विक धागा !

आमचे मत नाशिककर फरसाण, एच्.ए. कॉलनी पिंपरी १ लंबर परदेशी फरसाण, गांधी पेठ, चिंचवड्गाव. २ नंबर

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

पुण्यातलं फरसाण हे कसलं फरसाण? पुणेरी मिसळ, पुणेरी वडापाव सारखाच पुणेरी फरसाण हा विनोदाचा विषय आहे.

In reply to by काळा पहाड

पुणे आणि पिंपरी चिंचवड्मधे फरक आहे. खरे खवय्ये गावांवरुन नाही तर प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन, चाखुन मत बनवतात,

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

नाशिककर सहमत. लै भारी. पण हल्ली अंमळ सोडा जास्त असतो. परदेशीकडचे अगदी ताजे आणि मस्त.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

कुठे आहे? एकदा भेट द्यावी काय? नेह्मीचे परदेशीपेक्षा जरा बदल म्हणून.

पुण्यात फरसाण हा प्रकार इतका मोठ्ठ्या रेन्ज मधे मिळतो की लोक बटाटा वेफर्स आनी वडा पावाला सुद्धा फरसान म्हणतात