माझ ब्राम्हण असण
लेखनप्रकार
सर्व प्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो . ब्राम्हण म्हणून जन्माला आल्याचा मला काही अभिमान वैगेरे वाटत नाही आणि लाज तर मुळीच वाटत नाही . पुढे जे लिखाणात येणार आहे ते संपूर्ण पणे माझ्या अनुभवांवर आधारित आहे आणि त्याला माझ्या वैयक्तिक Sample Survey चा आधार आहे . म्हणजे मी केलेली विधान चूक पण असू शकतात . यात कुठलेही सरसकट करण नाहीये . कुठल्या एका वाक्याने किंवा शब्दांनी तसा गैरसमज झाल्यास ती माझ्या लिखाणाची मर्यादा :
जेंव्हा तुमच बालपण मुंबई - पुण्याबाहेर आणि सांस्कृतिक - शैक्षणिक राजधानी वैगेरे वैगेरे च्या बाहेर जात तेंव्हा 'जात ' आणि इतर रखरखीत 'वास्तव ' फार लहान वयात कळायला लागतात . जात वैगेरे कस कळायला लागल ? तर लहान असताना आम्ही भाड्याच्या घरात राहायचो . घरमालकीण बाई एकदम धार्मिक - सोवळ्यातल्या वैगेरे वैगेरे . मैदानापासून माझ घर जवळ असल्याने खेळण झाल्यावर माझे मित्र पाणी प्यायला माझ्याकडे यायचे . आमच्या घर मालकीण बाई त्यांच्यावर फार बारीक नजर ठेवून असत . त्या प्रत्येक मित्राला direct आडनाव विचारीत (नाव नाही ) . मित्रांनी आडनाव सांगितलं कि त्यांच्या चेहऱ्यावर काही विशिष्ट भाव येत किंवा येत नसत . मग मला बाजूला घेत त्या मला सांगत ," अरे कुणासोबत हि राहतोस का रे ? आपल्या ब्राम्हण पोराना काय धाड भरली आहे का ?" त्यांनी बहुदा माझ्या आईकडे पण माझी तक्रार केली होती पण आईने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आणि नंतर आम्ही ते घरच बदलल . नंतर सर्व ब्राम्हण मुलांप्रमाणे मी पण शाखेत वैगेरे जायचो . तिथे शाखेवरचे गुरुजी गांधीजी बद्दल कधी टिंगल पूर्वक तर कधी विखारी पणे बोलायचे . तिथे फारसे ब्राह्मणेत्तर मुल नसायची .
नंतर बर्यापैकी हुशार विद्यार्थी असताना पण मी अकरावीला कला शाखा निवडली . एवढ्या मोठ्या वर्गात दोघेच ब्राम्हण . मी आणि अजून एक मुलगी . एव्हाना कुलकर्णी , देशपांडे , आणि आडनावाच्या शेवटी 'कर ' लागणाऱ्या लोकांसोबतच राहिलो होतो . डाके , अंभोरे , नलदे हि आडनाव पण जगात अस्तित्वात आहेत असा शोध मला लागला . बहुजन समाजाशी कॉलेज च्या निम्मिताने आलेला हा पहिला संपर्क . एकदा इतिहासाच्या देशमुख सरांनी पंढरपूर आणि तिथले बडवे यांच्यावर वर्गात काही जहाल विनोदी comments केल्या आणि अख्खा वर्ग जोरजोरात खिदळयला लागला . माझ्या मागच्या पोराने 'च्यायला हि बामन अशीच ' अशी हसता हसता दिलेली प्रतिक्रिया मला पण ऐकू आली . आपली जात बाकीच्या समाजात फार काही लोकप्रिय नाही अशी खुण गाठ मी मनाशी बांधली .
बारावी नंतर पुण्यात एका धार्मिक (का सांस्कृतिक ?) संघटनेचा प्रभाव असणार्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला . तिथल्या वसतिगृहातच राहत होतो . तिथे बारापगड जातीची मुल राहत . होस्टेल च्या शेवटच्या वर्षाला असणार्या मुलांपैकी एकाला 'Best Hostelite ' चा पुरस्कार दिला जाई . या पुरस्कारासाठी काही कारणाने ब्राम्हण मुल च (काही मोजके अपवाद वगळता ) पात्र ठरत . इतर जातीची मुल त्यामुळे वसतिगृह व्यवस्थापनावर खार खाउन असत . एकदा याच मोठ्या धार्मिक -सांस्कृतिक संघटनेचा एक कार्यक्रम कॉलेज मध्ये होता . त्या कार्यक्रमात एका ख्रिश्चन विद्यार्थ्याने टिळा लावून घेण्यास नकार दिला तेंव्हा होस्टेल मधल्या चित्पावन पोरांनी त्याला (त्याच्या पाठीमागे ) खूप शिव्या दिल्या होत्या . हि चित्पावन पोर माझ्यासारख्या घाटावरून आलेल्या ला पण खिजगणतीत
धरत नसत . त्यामुळे चित्पावन लोक म्हणजे आपल्यापेक्षा भारी हा तेंव्हा पासून आलेला गंड डोक्यातून अजून पण पूर्ण पणे गेलेला नाही . एकदा मी आणि माझा बहुजन समाजातला मित्र एका पेठेत रणरणत्या उन्हात अशाच एका महान धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पत्रिका वाटत असताना आलेला अनुभव तर उच्च श्रेणीतला होता . आम्ही लेले , नेने , देशपांडे यांचे दरवाजे पत्रिका देण्यासाठी वाजवायचो . मग माझा बहुजन साथीदार आपल नाव सांगून आम्ही कुठून व कशासाठी आलो आहोत हे सांगून पत्रिका द्यायचा . मे च उन होत पण कोणी आम्हाला उपचार म्हणून पाणी पण नाही विचारलं . वैतागून माझा मित्र मला म्हणाला , 'आता तू दरवाजा वाजव आणि माहिती दे .' पुढच्या ठिकाणी मी हा सोपस्कार केला . दरवाजा वाजवला आणि नाव सांगितलं . आणि अहो आश्चर्यम . पुढच्या अनेक घरी आम्हाला पाणी आणि काही ठिकाणी तर लिंबू शरबत पण घेण्याचा आग्रह झाला ." नावात आणि त्यातल्या त्यात आडनावात बराच काही असत रे ." खिन्न पणे हसून त्या मित्राने शालजोडीतला दिला . आडनावा वरून आपल्या समाज व्यवस्थेत किती मनांवर चरे उमटले असतील याची अजून गिणती व्हायची आहे .
एक अनुभव तर खासच . एकदा मी ट्रेन ने औरंगाबाद ला जात होतो . तर एका आजोबाना मी त्यांची अडचण ओळखून सामान वैगेरे चढवायला मदत केली . बाजूला जागा पण मिळवून दिली . मग आम्ही बर्यापैकी गप्पा पण मारल्या .त्यांनी स्वतहा बद्दल सांगितलं . त्यांनी काय करतोस असे विचारले . त्यावेळेस मी काहीच करत नसल्याने तोंडात येईल ते उत्तर देत असे . मी त्याना काही तरी द्यायचे म्हणून उत्तर दिल ,"मी मिलिंद कॉलेज मध्ये शिकतो ." आजोबांचा नूर एकदम पालटला . आजोबा एकदम बोलायचे थांबलेच . ट्रेन औरंगाबादला पोहोंचल्यावर ''बराय . बाझारात भेट होईल च कधीतरी ." म्हणून आजोबांनी कलटि मारली . दलित असणे म्हणजे काय असू शकते याची बारीकशी चुणूक मला त्या दिवशी मिळाली .
हा घाबरून राहणारा , समाजाच्या इतर घटकांपासून गंड ग्रस्त असणारा , पटकन सरसकट करण करणारा ब्राम्हण समाज बघणे वेदनादायक आहे . त्याना कायम एक शत्रू लागतो . कधी तो बहुजन समाज असतो , कधी मुस्लिम तर कधी यु पी चा भैय्या . इथे ब्राम्हण समाज म्हणजे आय टी मध्ये नौकरी करणारा आणि देशाबाहेर राहणारा समाज असे अजून एक generalization नाही केले तर अजूनच चांगल . ब्राम्हण असण्याचे सर्व फायदे ओरपून घेतल्यावर आता त्यातून निर्माण होणारया ऐतिहासिक ओझ्यांपासून (जाती व्यवस्था निर्मिती , दलितांवर अत्याचार ) आता दूर जाता येईल का ? कारण अल्पसंख्य समाजाला (त्यांची आक्रमण , सक्तीची धर्मांतर ) हा अधिकार देशाच्या अनेक समस्याना जबाबदार धरताना त्यांनी कधीच नाकारला आहे .
मी ब्राम्हण आहे म्हणजे मला वपु काळे आणि देशपांडे आवडलेच पाहिजेत , कुठेतरी कसलेतरी मंदिर बांधण्याच्या मोहिमेला माझा पाठींबा असलाच पाहिजे , एका विशिष्ट धार्मिक (सांस्कृतिक ?) संघटने बद्दल मला प्रेम वाटलेच पाहिजे , एका जहाल वैगेरे नेत्याला मी मुठी वळवून पाठींबा दिलाच पाहिजे आणि आरक्षण व अल्पसंख्यक लोकांबद्दल माझी अति जहाल मत असावीत अशा real आणि virtual आयुष्यात असणाऱ्या अपेक्षांचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे .
जाता जाता - हा भेद आंतर जालावर पण पाळला जातो का ? इथले कंपू आणि होणारे कट्टे यात जमलेल्या लोकांमध्ये एका विशिष्ट जातीच्या लोकांच प्रमाण जास्त असत का ? हा खवचट पणा नाही तर genuine प्रश्न आहे . कुठल्या जाणकाराच किंवा एखाद्या बहुजन समाजतल्या आय डी च यावरच Social Analysis वाचायला मला आवडेल .
खूप शिव्या खायला लागणार आहेत पण हरकत नाही . पण चांगली चर्चा घडण्यासाठी हि दिलेली किंमत असे समजू .
वाचने
22668
वाचनखूण
प्रतिक्रिया
113
मी पयला....
मी दुसरा,
पॉपकॉर्न खाणारी स्माइली कशी
जेपीराव...
पंखा साब शमत आहे.
आणुमोदण...
.........
ब्राम्हण????
In reply to ब्राम्हण???? by सर्वसाक्षी
मी अस कधी म्हंटलं ? मी
In reply to मी अस कधी म्हंटलं ? मी by पिंपातला उंदीर
हा भेद आंतर जालावर पण पाळला जातो का ?
In reply to हा भेद आंतर जालावर पण पाळला जातो का ? by मुक्त विहारि
+१
जन्माने मिळालेल्या जातीला आणि नावाला किंवा आडनावाला मी हिंग लावून विचारत नाही.
मी पण विचारत नाही. पण धागाकर्त्याच्या म्हणण्यात हि अर्थ आहेच मुवी शेवटी प्रत्येकाचे अनुभव आणि वेदनाच असे काही लिहिण्यास उद्युक्त करत असतात? १) "ब्राम्हणांनी पेशवाई घालवली" हे वाक्य किंवा हा पराक्रम आणि सगळे नॉन-वेज ब्राम्हणांनी महाग करून ठेवले हे ऐकताना होणारी वेदना बरयाच वेळा हमरीतुमरीवर गेली आहे. २) सरकारी नोकरीत ब्राम्हण सहकार्याने आधीच्या कर्मचार्याचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणल्या नंतर जातीविषयक कायद्याचा बडगा उगारलेला पाहून येणारी हतबलता वेदना आजही त्रास देते आहे. ३) dipartmental परीक्षांमध्ये ब्राम्हणांना डावलून इतरेजनांना पास करून सिनिओरीटी घालवलेली पहिली तर वाईट वाटत आले आहे. आणि ब्राम्हणेतर सर्व एरवी भांडले तरी त्यांच्यातल्याच एकावर अन्याय झाला (कुणाकडूनही)तर ते एक होताना कोर्टात जाताना पाहिलेत पण ब्राम्हण कधीही एक होत नाहीत ते आप्ल्यातल्याच ज्याच्यावर अन्याय झालाय तो कसा मूर्ख आहे आणि मी किती शहाणा आहे त्याची फुशारकी मारतो हे हि उद्विग्न करते. ब्राम्हण्याची व्याख्या आवडली पण ती वैयक्तिक जो पर्यंत समोरचा फणा काढत नाही तोपर्यंत. माझे मित्र, क्लायंटस कलीग्स वेग वेगळ्या जातीतले आहेत पण मी त्यांची जात कधी लक्षात घेतली नाही तरी कधी विषय निघाला की ते मला "भटा" म्हणंत आले आहेत पण मी जातीविषयक कुठल्याही कायद्याची मदत घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. मला ते हसण्यावारीच न्यावे लागते पण मी कुणाला कुठलेही जातीविषयक संबोधन वापरू शकतच नाही स्वभावानेही आणि कायद्यानेही. पण मग एखादा ब्राह्मण जर वरील प्रमाणे आपले मत मांडत असेल तर त्याला माझे नक्की अनुमोदन, पाठींबा आहेच आहे.In reply to हा भेद आंतर जालावर पण पाळला जातो का ? by मुक्त विहारि
हायला मला डोम्बोलीच्या आणि
In reply to हायला मला डोम्बोलीच्या आणि by टवाळ कार्टा
पुण्याच्या कट्ट्याचा पत्ताच
In reply to हा भेद आंतर जालावर पण पाळला जातो का ? by मुक्त विहारि
ब्रम्ह जानोति इति ब्राम्हणः....
हम्म
लै दंगा करायची इच्छा हाय पण
च्यामायला.....
वाक्य बरोबर
माझे पॉपकॉर्न संपत आलेत...
टेंन्शन इल्ले.
मी ब्राम्हण आहे म्हणजे मला
आव्हानात्मक विषय
असहमत!
In reply to असहमत! by भाते
हेच हो
In reply to हेच हो by उदयन
रास्त प्रतिसाद
In reply to हेच हो by उदयन
पण हा वंचित
ओरपले?!!!!
In reply to पण हा वंचित by ज्ञानव
मस्तं
In reply to असहमत! by भाते
सहानुभुती ..
In reply to सहानुभुती .. by सुहास..
आख्या प्रतिसादाला
In reply to सहानुभुती .. by सुहास..
+ १
In reply to + १ by मृत्युन्जय
सधन बांधकामव्यावसिकाचा मुलगा,
In reply to सधन बांधकामव्यावसिकाचा मुलगा, by एस
हे तितकेसे पटत नाहि
In reply to सधन बांधकामव्यावसिकाचा मुलगा, by एस
देवयानी खोब्रागडे यांचे वडील
In reply to देवयानी खोब्रागडे यांचे वडील by सुबोध खरे
उच्च स्तरीय अधिकार्याच्या
In reply to देवयानी खोब्रागडे यांचे वडील by सुबोध खरे
+१००० डाॅ. खरे
In reply to देवयानी खोब्रागडे यांचे वडील by सुबोध खरे
हेच..
In reply to + १ by मृत्युन्जय
आरक्षित महाविद्यालये....
In reply to आरक्षित महाविद्यालये.... by प्रभाकर पेठकर
ह्म्म्म
In reply to ह्म्म्म by इरसाल
राजकारण टाळा...
In reply to सहानुभुती .. by सुहास..
+१
In reply to सहानुभुती .. by सुहास..
प्रतिसाद आवडला
तुम्हाला जे अनुभव आले तसले
वैयक्तिक प्रांजळ्ता म्हणून लेखन आवडले
ब्राम्हण असल्याचे फायदे
In reply to ब्राम्हण असल्याचे फायदे by कॅप्टन जॅक स्पॅरो
वा ...प्रतीसाद आवडला.
In reply to ब्राम्हण असल्याचे फायदे by कॅप्टन जॅक स्पॅरो
सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट
In reply to सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट by सस्नेह
सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट हा
In reply to सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट हा by कॅप्टन जॅक स्पॅरो
बरोबर
In reply to बरोबर by सस्नेह
नक्की कसला र्हास?
In reply to बरोबर by सस्नेह
एका समाजाला वारंवार
In reply to एका समाजाला वारंवार by कॅप्टन जॅक स्पॅरो
+1
In reply to +1 by सस्नेह
एक्झॅक्टली. पण सगळ्यांकडे हे
In reply to ब्राम्हण असल्याचे फायदे by कॅप्टन जॅक स्पॅरो
कष्ट
बुरा जो देखन मैं चला, बुरा न
माणुसकी पहिली....
हे फारच धाडसी वक्तव्य आहे
In reply to हे फारच धाडसी वक्तव्य आहे by पैसा
+१११
In reply to हे फारच धाडसी वक्तव्य आहे by पैसा
सहमत आहेच पण हा विषय इतक्या
In reply to सहमत आहेच पण हा विषय इतक्या by रेवती
+१
In reply to सहमत आहेच पण हा विषय इतक्या by रेवती
+१
In reply to हे फारच धाडसी वक्तव्य आहे by पैसा
पैसा ताईशी १००% सहमत. ह मो मराठे ह्यांचे बालकांण्ड हे वाचताना
In reply to पैसा ताईशी १००% सहमत. ह मो मराठे ह्यांचे बालकांण्ड हे वाचताना by निश
निश
In reply to हे फारच धाडसी वक्तव्य आहे by पैसा
+१००
In reply to हे फारच धाडसी वक्तव्य आहे by पैसा
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by प्रदीप
धन्यवाद!
?
मिपावर
मला माहित नाही कि हे अवांतर
In reply to मला माहित नाही कि हे अवांतर by खटपट्या
मित्रा असे खरेच काही नाही आहे रे....
In reply to मित्रा असे खरेच काही नाही आहे रे.... by मुक्त विहारि
सर, बरोबर आहे तुमचे म्हणणे,
कोणाला कसला अभिमान असला तर तो
एक प्रांजळ मत
In reply to एक प्रांजळ मत by वेल्लाभट
७८-३८ चा फॉर्म्युला
In reply to ७८-३८ चा फॉर्म्युला by आदूबाळ
ते अॅडमिशनच्या
In reply to ७८-३८ चा फॉर्म्युला by आदूबाळ
अहो, वरती 'भाते' यांचा
In reply to अहो, वरती 'भाते' यांचा by वेल्लाभट
ओह ओके. मला वाटलं काही
लेख आवडला !!
In reply to लेख आवडला !! by बाळ सप्रे
लेख आवडला असे म्हणून आपण
संशयास्पद उद्देश....
In reply to संशयास्पद उद्देश.... by प्रभाकर पेठकर
पुर्णपणे सहमत..
तुमची इच्छा असो किंवा नसो.
तुमचे वैतक्तिक अनुभव म्हणून
In reply to तुमचे वैतक्तिक अनुभव म्हणून by सूड
+१
अलेलेले अशं झालं कां? बरं बरं
ह्म्म !
ज्या बहुजन समाजाच्या नावाने
धाडसी विषय.
फायदे?
In reply to फायदे? by समीरसूर
व्वा. सुंदर प्रतिसाद.
In reply to फायदे? by समीरसूर
+१