आश्विन अमावास्या या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. सामान्यत: अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरते.
या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. आज आपण लक्ष्मीपूजनासंदर्भात माहिती पाहूया.
१. कोजागरी पौर्णिमा व श्री लक्ष्मीपूजन : कोजागरीस लक्ष्मी व इंद्र या देवतांचे पूजन सांगितले आहे, तर आश्विन अमावास्येस लक्ष्मी व कुबेर या देवतांचे पूजन सांगितले आहे.
२. श्री लक्ष्मी व कुबेर : लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे, तर कुबेर हा संपत्ती-संग्राहक आहे. अनेकांना पैसा मिळविण्याची कला साध्य असते; पण तो राखावा कसा हे माहीत नसल्यामुळे अनाठायी खर्च होऊन पैसा त्यांच्याजवळ शिल्लक रहात नाही. किंबहुना पैसा मिळविण्यापेक्षा तो राखणे, सांभाळणे व योग्य ठिकाणीच खर्च करणे हे फार महत्त्वाचे आहे. कुबेर ही देवता `पैसा कसा राखावा', हे शिकविणारी आहे, कारण तो धनाधिपती आहे; म्हणून या पूजेसाठी लक्ष्मी व कुबेर या देवता सांगितलेल्या आहेत. सर्वच लोक विशेषत: व्यापारी ही पूजा मोठ्या उत्साहाने व थाटामाटात करतात.
वाचने
6668
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद...
एक शंका......
कोण म्हणतो
In reply to एक शंका...... by ब्रिटिश टिंग्या
टीव्हीवर ऐकलं.....
In reply to कोण म्हणतो by अवलिया
अपमान? छे छे
In reply to टीव्हीवर ऐकलं..... by ब्रिटिश टिंग्या
मग
In reply to अपमान? छे छे by अवलिया
सदा सर्वदा
In reply to मग by ब्रिटिश टिंग्या
अपमान? छे छे
In reply to टीव्हीवर ऐकलं..... by ब्रिटिश टिंग्या
सोडुन दे ...
In reply to टीव्हीवर ऐकलं..... by ब्रिटिश टिंग्या
करेक्शन
In reply to सोडुन दे ... by छोटा डॉन
आरती बरोबर
In reply to करेक्शन by ब्रिटिश टिंग्या
:(
In reply to आरती बरोबर by अवलिया
राहिला
In reply to कोण म्हणतो by अवलिया
भाव
भाव
>>सामान्यत:
लक्ष्मी