हल्लीच्या काळात, हिंदी चित्रपट हे डोकं घरी ठेवून बघायला जाण्याची गोष्ट आहे, व तत्सम कावा, डोकं वापरून चित्रपट बनवण्याची स्वतःची कुवत नसलेल्या बर्याच चित्रपटकर्त्यांकडून उघडपणे केला जाऊ लागला आहे. त्यांनी हाताशी धरलेल्या समिक्षकांनीपण "करमणूकप्रधान मसालापट" वगैरे विशेषणं लावून या निर्बुध्दपटांना उचलून धरण्याची केविलवाणी कसरत सुरू केली आहे. आजच प्रदर्शित झालेला बँग बँग हा प्रचंड खर्च करून बनवलेला चित्रपट याच मालिकेतील एक.
असो..
आधी चित्रपटातील काही चांगल्या गोष्टी :
१. हा चित्रपट "किक" इतका वाईट नाही.
बस्स. यापलिकडे चांगलं म्हणावसं असं यात खरच काहीच सापडत नाही. तुम्ही जर आजवर एकही हिंदी चित्रपट अजिबात पाहिला नसेल तरच तुम्हाला यात काही नाविन्य जाणवेल. इथे प्रचंड पराक्रमी नायक आहे (हजारो गोळ्यांचा सामना करूनही ज्याला त्यातली एकही स्पर्शून जात नाही, तो). साधी सरळ, गर्ल नेक्स्ट डोअर नायिका आहे (आई वडिलांच्या अपघाती निधनानंतर आजीने वाढवलेली). विमानापासून रणगाड्यापर्यंत फौजफाटा बाळगणारा, चुटकीसरशी हव्या त्या देशात मारेकरी पाठवू शकणारा खलनायक आहे(सुरुवातीलाच नायकाच्या भावाचा खून,.. ते जागतिक दहशतवाद इत्यादि). मॉडर्नपणाच्या नावाखाली अत्यंत आचरट वागणारी, भयंकर डोक्यात जाणारी नायिकेची आजी आहे (हे एक पात्र हल्ली उगाचच सर्व चित्रपटात "मस्ट हॅव" झालंय). नायक - नायिकेची अपघाती पहिली भेट आहे. तिचं पहिल्याच भेटीत त्याच्या प्रेमात पडणं आहे. विनकारण घुसवलेली विसंगत गाणी आहेत. हृतिक चांगला नाचतो म्हणून घुसवलेले नृत्याचे प्रसंग आहेत, मिशनच्या नावाखाली विविध देशातील निसर्गरम्य ठिकाणी नाचगाणी + पाठलाग, गोळीबार इत्यादि आहे. खलनायकाला संपवण्यामागे भावाच्या खुनाचा बदला + अंतरराष्ट्रीय दहसह्तवादाचे उच्चाटन असा दुहेरी उदात्त हेतू आहे. गेल्या पन्नास वर्षात वापरून बोथट झालेले सर्व क्लिशे इथे वापरलेत.
थोडक्यात कथानक याप्रमाणे.. जफर हा एक अंतर्राष्ट्रीय दहशतवादी लंडनच्या कैदेतून फरार होतो. भारत व इंग्लंडदर्म्यान गुन्हेगार हस्तांतरणाचा एक ऐतिहासिक करार होऊ घातलेला असतो. या करारात अडथळा आणण्यासाठी जफरसाहेब थेट कोहिनूर हिरा चोरण्याचा प्लॅन बनवतात. (त्याचा कराराशी काय संबंध? त्या कराराचा उल्लेख पुढे संपूर्ण चित्रपटात का नाही? वगैरे बावळट प्रश्न विचारायचे नाहीत). इतर कोणीही तो चोरू नये म्हणून हृतिक स्वतःच तो चोरतो. आता एकीकडे पोलिस (अत्यंत हास्यास्पद भूमिकेत पवन मल्होत्रा आणि विक्रम गोखले) आणी दुसरिकडे जफरचे गुड, विविध देशात त्याचा पाथलाग चालू करतात. चोर पोलिस खेळता खेळता सिमल्यात त्याला कतरीना भेटते व अपघातानेच या प्रकरणात ओढली जाते. मग हृतिक - कतरीना जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशात, सुंदर निर्जन बेटांवर वगरे त्यांच्याबरोबर चोर - पोलिस, पकडा पकडी वगैरे खेळतात. ३ तासांनंतर कथा अपेक्षित वळणावर येते, आणी हृतिक एकदाचा एकट्यानेच जफर गँगचा खातमा करतो, आणी जगाला वाचवतो. आणी भावाच्या खुनाचा बदला पण उरकतो.
अभिनय वगैरेसाठी फारसा कोणालाच वाव नसलेल्या या चित्रपतात हृतिकने नेहमीपेक्षा कमी ओव्हरअॅक्टिंग केली आहे. कतरीना यापुर्वीच्या कुठल्याही भूमिकेत किंवा "माझा", "पँटीन" वगैरे जाहिरातीत दिसते व वावरते, तशीच दिसली व वावरली आहे. लगानमध्ये इंग्रजांच्या भूमिका केलेल्यांपेक्षा आंग्लाळलेले हिंदी उच्चार करून तिने कमाल केली आहे.
सुनील शेट्टीने देखील नाकारावी इतकी दुय्यम भूमिका विक्रम गोखलेंनी का केली असावी, हे तेच जाणोत.
बाकी या चित्रपतात उल्लेखनीय काहीच नाही. नाविन्यही नाही. आज पहिल्याच दिवशी पुण्यातल्या मुल्टिप्लेक्समध्ये अर्ध्याहून कमी भरलेल्या हॉलमध्ये बँग बँग बघितला. तरीही आठवड्याभरात चित्रपटाने २००-४०० कोटी कमावल्याच्या बातम्या लवकरच छापून येणार, यात शंका नाही. (खरे - खोटे देवास ठावूक)
याद्या
10646
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाहिलाच पाहिजे हा सिनेमा
उत्तम परिक्षण
वाटलच होतं! शिनेमा अज्याबात
बरे झाले सांगितलेत.
अरेरे, श्रीरंग आणि श्रीरंग
In reply to बरे झाले सांगितलेत. by खटपट्या
परिक्षण म्हणून आवडले
नाही कसा? आणि अन्य गमती जमती
धन्य आहात....
टॉम नाईट अन डे मधेच डोक्यात गेला होता
आताच पाहिला...
In reply to टॉम नाईट अन डे मधेच डोक्यात गेला होता by काउबॉय
रीमेक पेक्षा
हिंदीत भाषांतर करुन रिलीज केला असता तरी चालले असते
आम्हाला प्रोमोज आवडलेले की.
जैसा दिखताय वैसा नही होताय ना
In reply to आम्हाला प्रोमोज आवडलेले की. by प्यारे१
पैसे देऊन चित्रपट बघायचे
In reply to जैसा दिखताय वैसा नही होताय ना by रेवती
टोरेन्ट किस काम का फिर????
In reply to पैसे देऊन चित्रपट बघायचे by प्यारे१
तुम्ही करा चालू. आम्हाला ३-४
In reply to टोरेन्ट किस काम का फिर???? by मुक्त विहारि
मग ठीक आहे.
In reply to पैसे देऊन चित्रपट बघायचे by प्यारे१
'बँग बँग' नॉट वर्थ डिस्कसिंग...
@सुनील शेट्टीने देखील
डालरा रे डालरा
In reply to @सुनील शेट्टीने देखील by अत्रुप्त आत्मा
टिपः मी चित्रपट पाहिलेला नाही
खतरनाक!
गोळी
माझ्या लहानपणी एक चित्रपट बघत
In reply to गोळी by कपिलमुनी
भारतीय मसाला/अॅक्शन चित्रपट हॉलिवूड सारखे बनू शकत नाहीत.
हम्म..
>>>ह्या लोकांनी कधी देहरादून
In reply to हम्म.. by चिगो
जो पर्यंत आपल्याकडे कुठलाही
लेखकाने हैदर पेक्ष्या सदर
In reply to जो पर्यंत आपल्याकडे कुठलाही by निनाद मुक्काम …
हाहाहा
समीरसुर तुम्ही इतक्या वेळा
+१११
In reply to समीरसुर तुम्ही इतक्या वेळा by पिलीयन रायडर
ओमकारा
In reply to +१११ by प्यारे१
ओमकारा संथ नव्हता. ओमकाराची
In reply to ओमकारा by समीरसूर
खरं आहे
In reply to ओमकारा संथ नव्हता. ओमकाराची by प्यारे१
तुमचा गैर समज आहे, ओंकारा हा
In reply to ओमकारा by समीरसूर
माझी माहिती चुकीची
In reply to तुमचा गैर समज आहे, ओंकारा हा by प्रसाद१९७१
वा!!!
In reply to समीरसुर तुम्ही इतक्या वेळा by पिलीयन रायडर
मलाही आता काय होणार अशी
In reply to वा!!! by समीरसूर
खरच इंडस्ट्रीला काय झालय ?
In reply to वा!!! by समीरसूर
एक महत्वाचं सांगायचं राहिलं..
In reply to समीरसुर तुम्ही इतक्या वेळा by पिलीयन रायडर
@भारतीय अधिकारी संशयितांची
In reply to एक महत्वाचं सांगायचं राहिलं.. by पिलीयन रायडर
हे राहिलं वाटतं वाचायचं..
In reply to @भारतीय अधिकारी संशयितांची by निनाद मुक्काम …
सिनेमासृष्टीतले पैसे
In reply to हे राहिलं वाटतं वाचायचं.. by पिलीयन रायडर
हं... शक्य आहे...
In reply to सिनेमासृष्टीतले पैसे by पैसा
बांग बांग सोडून इतर अतिअवांतर प्रतिसाद
In reply to हं... शक्य आहे... by पिलीयन रायडर
मी हैदर बघणार नाही पण खूबसुरत
पिक्चर कसेही असोत; इथली
मलाही ओमकारा अजूनही समजला
http://www.youtube.com/watch
In reply to मलाही ओमकारा अजूनही समजला by रेवती
मग सोडून द्या ;-)
In reply to मलाही ओमकारा अजूनही समजला by रेवती
हां, तेच ते, ओ साथी रे, गाणं
सोप्पा आहे हो!
In reply to हां, तेच ते, ओ साथी रे, गाणं by रेवती