मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गांधीजी महान का ?

सवंगडी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आज कोणालाही विचारा महात्मा गांधी नोटेवर का छापलेले आहेत? याच कोणी समर्पक उत्तर देऊच शकणार नाही ! हां कदाचित ते सांगतील कि गांधीजी महात्मा होते म्हणून. पण मग ते नोटेवरच का छापले ?(मनात माझा प्रश्न-कि नोटेवर छापले मना-मनात का नाही ?) याचे मी माझ्या परीने शोधलेले उत्तर आज त्यांच्या जयंती निमित्त मांडतो आहे. खरेतर गांधीजींना नोटेवर छापणे हा त्यांचा अपमान आहे अस वाटतं आणि हाच त्या महापुरुषाचा पराभव पण आहे, आपण केलेला ! गांधीजींच्या विचारांना मानणारी एक पिढी होती, त्यांनी गौतम बुद्धाप्रमाणे गांधीजींना देव बनून टाकलं, त्यांना भजणारा एक पंथच तयार झाला. गांधीजींची तत्वे - ज्याप्रमाणे गौतम बुद्धाने महावीराने सांगितले त्याच प्रमाणे गांधीजींनी देखील काही तत्वे पाळली- सत्य- 'सत्याग्रह' हे नवे हत्यार गांधीजीनी आपल्याला दिले. अहिंसा - सगळा देश जमा करून अहिंसावादी चळवळ यशस्वी केली. त्यांना या काळात न्यूटन भेटला असावा. कारण हिंसक आंदोलनाची प्रतिक्रिया वाईटच येते हे तत्व गांधीजींना चांगले माहिती होते. क्रांतीकार्याने स्वातंत्र्य मिळालेच नसते असे मला आजिबात म्हणायचे नाही, परंतु त्याकडे वाटचाल करणे सामान्य माणसाला शक्य नव्हते,त्यामुळे अशा मार्गाला लोक गेले नसते,त्यामुळे सत्याग्रह, अहिंसावादी आंदोलन महत्वाचे ठरले. निस्वार्थ सेवा - गांधीजी आयुष्यभर या तत्वाने चालले. गरिबांसाठी फकीर बनले. उपेक्षितांसाठी आधार बनले. आजवर गांधीजींना विरोध करणारे त्यांना शिव्या घालणारे अनेक लोक आहेत. ती पुस्तकं पण काढतात. पण खरा सांगू ? आज जर गांधीजी असते तर त्यांनी या लोकांच हि म्हणणं आईकून घेतल असत. आणि हसून नम्रतेनं 'धन्यवादच' म्हणलं असतं. कारण गांधीजी 'व्यक्तिस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते' होते, प्रत्येकाच्या व्यक्तिगत मताचा सन्मान करणारे होते. त्यामुळे गांधीजी महान होते. आज अनेक लोक म्हणतात कि गांधीजींनी केलं ? लोकांना जमा केलं आणि आंदोलन केलं,ते ही काही मागण्या मान्य झाल्या कि मागे घेतलं. हो हे खरं आहे. पण आजच्या कोणत्यही तथाकथित नेत्याने, किवा समाजसेवकाने असं करून दाखवावं (न पैसे खर्च करता ). मला माहिती आहे शक्य नाही. गांधीजींनी स्वन्तात्र्याची चळवळ सर्वसामान्य नागरिकाची चळवळ बनावी म्हणून घेतलेला हा निर्णय होता. कारण सर्वसामान्य माणूस दडपशाही समोर टिकला नसता आणि अश्या सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन त्यांनी स्वातंत्र्य मिळून दिले म्हणून गांधीजी महान आहेत. स्वच्छता, वैयक्तिक चारित्र्य, मानसिक स्वच्छता हि देखील गांधीजींची तत्व ! या सर्वांबद्दल वाद आहेतच, पण तरीही गांधीजी महान ठरतात कारण यापैकी एकही तत्व आपण आपल्यामध्ये बाणवू शकलो नाही. सर्वधर्म समभाव, संपत्तीचे एकसमान वाटप हि तत्वे गांधीजींचा मोठेपणाच दर्शवतात. पाकिस्तानला मान्यता देणे यासाठी तात्कालिक परिस्थिती जबाबदार असूनही आपण या गोष्टीचे खापर गांधीजींवर फोडून मोकळे होतो. पण तरीही गांधीजी महान ठरतात कारण त्यांचा एक नकार त्यावेळी भारताचे हजारो तुकडे होण्यास कारण ठरला असता. प्रत्येक माणसात गुण-अवगुण असतातच. गांधीजींमध्येही ते होते पण अवगुण मान्य करायला हि मोठेपण लागतं. स्वाभिमान, दुराभिमान, जोपासणाऱ्या आजच्या जगात गांधीजी त्यामुळेच महान ठरतात. शेवटी माझ एकच म्हणणं आहे कि, (अगदी गांधीजींना मानत नसाल तरीही ) कोणावरही वैयक्तिक राग न धरता आपल्यातील वाईट गोष्टींना संपवण आपल्याला जमलं तरी अश्या थोर महापुरुषाचा तो विजय होईल आणि तिचा खरी आदरांजलीही ठरेल.

वाचने 9341 वाचनखूण प्रतिक्रिया 50

चित्रगुप्त गुरुवार, 10/02/2014 - 02:58
महात्मा गांधी नोटेवर का छापलेले आहेत?
"गांधी" या आडनावाची इतक्या प्रचंड प्रमाणावर, पिढ्यान-पिढ्या जाहिरात आणखी कशी होऊ शकणार?

In reply to by चित्रगुप्त

सवंगडी गुरुवार, 10/02/2014 - 08:27
चित्रगुप्त मला आपल्या प्रतिक्रियेवर हसू आले, आपल्याला हे गांधी आणि ते "गांधी " यात असणारा फरक माहिती नाही याचे आश्चर्य आहे.

In reply to by सवंगडी

चित्रगुप्त गुरुवार, 10/02/2014 - 18:59
जाहिरातीचा परिणाम हा विचार, तर्क, माहिती, चिकित्सकपणा वगैरेंमुळे होत नसतो, तसे असते तर सचिन अमूक पेय पितो, माधुरी तमूक साबण वापरते, असल्या जाहिराती केल्याच गेल्या नसत्या. प्रत्येक नोटेवर गांधींचे चित्र, ही गोष्ट "गांधी" = "महानता" "देशभक्ती" वगैरे समिकरणे मनात नकळत रुजवत असते. महात्मा गांधी > इंदिरा गांधी > राजीव गांधी > राहुल गांधी ... अशी अनेकांची समजूत आहे, अशी वस्तुस्थिती आहे.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक Fri, 10/03/2014 - 01:31
आज कोणालाही विचारा महात्मा गांधी नोटेवर का छापलेले आहेत? याच कोणी समर्पक उत्तर देऊच शकणार नाही ! हां कदाचित ते सांगतील कि गांधीजी महात्मा होते म्हणून. पण मग ते नोटेवरच का छापले ?
सर्व साधारणपणे विविध देशाच्या नोटांवर त्यांच्या देशाच्या महान व्यक्तींचे स्मरण असावे असा भाव धरून अशी प्रथा पाळली जाते. त्यात त्या देशातील नेत्याचा, व्यक्तिमत्वाचा तो अपमान किवा लांगूलचालन असे दोन्ही अपेक्षित नाही... 'चलन' ही बिन पायानी चालणारी वस्तू आहे. ती किती वेळ आपण हातात किंवा आपल्या नावाने करून ठेवू शकतो त्यावर श्रीमंती- गरीबी अवलंबून असते. म्हणून त्याला चंचला म्हणतात... महात्मा गांधी काय किंवा काही काळाने अन्य नेते वा महान व्यक्तींचे दर्शन होत राहील होईल असे दिसते...

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त Fri, 10/03/2014 - 02:16
"देशाच्या महान व्यक्तींचे स्मरण" हा हेतु स्तुत्य असला, तरी फक्त आणि फक्त गांधीच का? या देशाच्या सहस्त्रावधी वर्षांच्या इतिहासात आणखी कुणी महान निपजलेच नाही का? आणि राजकारणी लोकंच महत्वाची का? लता मंगेशकर श्रेष्ठ गायिका का, तर म्हणे तिने नेहरुंच्या डोळ्यातून टिपे काढली...

अर्धवटराव गुरुवार, 10/02/2014 - 07:53
अहिंसक, सविनय, सत्याग्रही व ठाम आंदोलनाने प्रश्न सोडवता येतात हा विश्वास गांधिजींनी भारतीय जनमानसात रुजवला. स्वातंत्रोत्तर काळात कामगार असो वा सामान्य जनता, आपलं मत मांडायला याच मार्गाचा प्रथम वापर होतो. गांधीजींचं हे यश त्यांच्या अत्युच्य महानतेचं द्योतक आहे.

सस्नेह गुरुवार, 10/02/2014 - 07:54
यथोचित लेख. या महापुरुषाची महानता समजून घ्यायला तितकीच पात्रता लागते. ऐ~यागै~याचे काम नोहे !

विटेकर गुरुवार, 10/02/2014 - 09:46
आज त्यांच्या जयंतीबद्दल विनम्र आभिवादन !!! माझ्या मते गांधीजी अस्सल भारतीय आणि हिंदू होते आणि म्हणूनच ते प्रातःस्मरणीय आहेत. व्यक्ति स्खलनशील असते, चुका घड्तात, डोंगरा एवढ्या चुका होतात. जगात परिपूर्ण कोणीच नाही. तरी ही त्या सर्व चुकांसह गांधीजी माझ्यासाठी प्रातःस्मरणीयच आहेत. (त्याचे आणखी एक अगदी खाजगी कारण म्हणजे त्यांच्या बलिदानामुळे काँग्रेसच्या लोकांनी आमची घरे जाळली आणि ब्राहमणांना देशोधडीला लावले, त्यामुळे आमच्या बापजाद्यांनी गावे सोडली आणि म्हणून आमची प्रगती झाली. नाहीतरी आज ही आम्ही एकादष्ण्या आणि सत्यनारायणाच्या पूजा करत बसलो असतो.जाता जाता देखील महात्माजींनी आमचा फायदाच केला !) आणि आजच्या निमित्ताने, गांधीजींची सारे तत्वे आणि शिकवण मनापासून आचराणात आणणार्‍या रा. स्व. संघाच्या सर्व प्रचारक ( ज्यामध्ये मा. पंतप्रधान मोदी देखील आले ), कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनाही विनम्र अभिवादन ! कसलाही अभिनिवेश न बाळगता गांधीजींच्या मार्गाने चालणारी पृथ्वीतलावरील ही कदाचित एकमेव संघटना असावी.

विटेकर गुरुवार, 10/02/2014 - 12:21
महात्माजीचे कोलाज स्वरुपात प्रतिमा मुखपृष्ठावर घेतल्याबद्दल सं म चे हार्दिक आणि मनःपूर्वक अभिनंदन ! आणि नेहरूंचा फोटो टाकल्याबद्दल सौम्य णिशेद. पंडितजीनी गांधी - विचारांची कत्तल केली , स्वदेशी - स्वावलंबन - ग्राम स्वराज्य -खादी- कुटीरोद्योग अशा मूलगामी भारतीय जीवनमूल्यांना तिलांजली दिली , विकासासाठी पाश्चिमात्य मॉडेल वापरले आणि विकासाच्या असमतोलाचा पाया घातला.

श्रीगुरुजी गुरुवार, 10/02/2014 - 13:19
>>> कारण गांधीजी 'व्यक्तिस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते' होते, प्रत्येकाच्या व्यक्तिगत मताचा सन्मान करणारे होते. काय सांगताय? मग १९३९ मध्ये गांधीजी पुरस्कृत उमेदवाराचा सुभाषबाबूंविरूद्ध काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यावर त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मताचा का सन्मान केला नाही?

नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/02/2014 - 17:24
गांधीजी अनेक ठीकाणी तुरुंगवास भोगून आले होते,प्रत्येकाने त्याठिकाणच्या परिस्थीतीविषयी एकदा माहीती करुन घ्या. गांधीविचाराने कैदी आंदोलन करतील याभीतीने गांधीजींना एकांत अंधारकोठडीत बंद करायचे ,गांधीजी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊ नये यासाठी त्यांना तुरुंगात यातना दिल्या जायच्या. तेलाचा घाणा ओढणे एक बात परंतू पाणी न देणे, कुणाशीही भेट नाकारणे, घामोळ्या येऊन त्रास व्हावा यासाठी गोणपाटाचे जाड कपडे घालायला देणे असे अनेक उपाय करुन गांधीजींचे नैतिक धाडस तोडण्याचे व त्यांच्याकडून माफीपत्र व हमीपत्र घेण्याचा प्रयत्न झाला. परंतु गांधींच्या देशभक्तीपूढे ब्रिटीशांनी गुडघे टेकले!

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय गुरुवार, 10/02/2014 - 17:45
खरे आहे. याबाबत त्यांची तुलना राणा प्रताप बरोबरच करायला हवी. त्यानेही कधी अकबराची माफी नाही मागितली. त्याच्यानंतरच्या काळातल्या काही राजांनी मागितली. पण त्याने नाही मागितली. घामोळ्या येऊन त्रास व्हावा यासाठी गोणपाटाचे जाड कपडे घालायला देणे गांधीजी केवळ पंचा नेसायचे. त्यांना गोणपाटाचा पंचा दिला होता का? कृपया संदर्भ द्या.

In reply to by मृत्युन्जय

नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/02/2014 - 18:02
तुरुंगात असताना कैद्यांचा पेहराव काही काळ गांधीजींना घालावा लागत होता.

In reply to by नानासाहेब नेफळे

विवेकपटाईत Fri, 10/03/2014 - 09:35
नानासाहेब, तेलाचा घाणा ओढणे एक बात परंतू पाणी न देणे, कुणाशीही भेट नाकारणे, घामोळ्या येऊन त्रास व्हावा यासाठी गोणपाटाचे जाड कपडे घालायला देणे असे अनेक उपाय माझ्या माहिती प्रमाणे अंदमानात सावरकराना असा त्रास दिला गेला. भारतातील जेलांमध्ये गांधी आणि इतर कोन्ग्रेस च्या नेत्यांना तरुण्गात त्रास दिला गेला नाही ऐकिवात नाही. पण कारावास करावासच असतो....बाकी ४० लाख भारतीय ब्रिटीश फौजेत असल्या मुळे आणि त्यातील २०-२५ लाखांना युद्धानंतर रिटायर्ड करणे भाग होते. भारतात युद्ध समान बनू लागले होते. भारतीय लोक सेनेत मोठ्यापदांवर पोहचले होते. त्या पैकी दिल्लीत कित्येकांशी मी स्वत: बोललेलो आहे. युद्ध संपल्यावर देशाला स्वतंत्रता दिली जाईल हे भारतीय अधिकाऱ्यांच्या गळ्यात उतरविल्या गेले होते. मोर्च्या वर त्यांना स्वतंत्र निर्णय घ्यायला प्रोत्साहित केल जात होत. अर्थात युद्धानंतर भारताला स्वतंत्रता देण्याशिवाय ब्रिटीशांजवळ काही मार्ग उरला नव्हता. गांधी आणि सरदार पटेल यांचे योगदान एकाच त्यांनी देशाची एकसंघता कायम ठेवली. आपण त्या साठी त्यांचे सदैव ऋणी राहणार अन्यथा ६०० तुकडे ही झाले असते.

In reply to by विवेकपटाईत

@विवेक पटाइत, सावरकरांविषयी मला विशेष माहीती नाही, पण बापूंविषयी मला ठाऊक आहे. त्यांना जेलमध्ये भयानक यातना सहन कराव्या लागल्या, परंतु त्याचे भांडवल करुन आपला एक पंथ तयार करण्याचा धुर्तपणा त्यांच्याकडे नव्हता.त्यामुळे त्यांच्या कारागृहातल्या दिवसांविषयी फारसे लिहले गेले नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Fri, 10/03/2014 - 12:52
सावरकरांविषयी मला विशेष माहीती नाही, ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती नाही त्यांच्याबद्दल्ल तोंड उचकटुन ज्या त्या धाग्यावर घाण करुन ठेउ नये ही नम्र विनंती.

In reply to by मृत्युन्जय

आँ! हे काय भलतेच !! मी कुठे काही लिहीले आहे सावरकरांविषयी? मला त्यांच्याविषयी काहीच माहिती नाही . काँग्रेस गाँधी वगैरेंचा माझा अभ्यास आहे, मी फक्त त्याविषयीच लिहीतो.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Fri, 10/03/2014 - 14:44
>>> त्यामुळे त्यांच्या कारागृहातल्या दिवसांविषयी फारसे लिहले गेले नाही. तुम्ही लिहा ना मग. त्यांचा कारागृहात कसा छळ झाला, त्यांना रोज कोलू ओढायला लागत होता, त्यांना गोणपाटाचे कपडे दिले जात होते याविषयी जनतेला समजावून सांगा. आणि ते असा छळ भोगत असताना इतर तथाकथित स्वातंत्र्यसैनिक कशी लुटुपुटीची स्थानबद्धता भोगत होते, त्यांना गाद्या-गिरद्या, लोड-तक्के, पंखा, टबबाथ इ. देऊन इंग्रज कसे त्यांचे लाड पुरवित होते याबद्दल पण लिहा.

जेपी गुरुवार, 10/02/2014 - 17:36
काय तो विनोदी प्रतिसाद. पण लगे रहो सचीन,राजु भारतीय, ग्रेेटथिंकर,फिलॉसॉफर गेल्यापासुन मला इथल्या चर्चेत रस राहिला नव्हता. पण तुमच्या मुळे पुन्हा चर्चा वाचावश्या वाटतात. लगे रहो.

गांधी ह्यांनी ज्यावेळी स्वदेशी मोहीम काढली ती तत्कालीन परिस्थितीला साजेशी होती. असमतोल विषम कायदे हे भारतीय उद्योगांना मारक व ब्रिटीश उद्योगांना पूरक होते , त्यांचे आर्थिक खच्चीकरण व स्वदेशी उद्योगांना उत्तेजन म्हणून ही योजना चांगली होती मात्र स्वातंत्र्य कालांतर जेव्हा भारतात आपले कायदे होते कर आकारणी आपल्या हातात होती तेव्हा परदेशी उद्योगांना भारतात परवानगी देऊन निकोप स्पर्ध्धा निर्माण करून ग्राहकाला समाजाला देशाला महसुल सुब्बता देता आली असती. उद्योगजगताला वेठीस ठेवण्यास अनेक कायदे करणारी पूर्वीची सरकारे व हि मोजकीच खाजगी उद्योग समूह कामगारांना पिळवणूक करून सरकारला वेठीस आणत होती. परकीय कंपन्यांना भारतात न येऊ देण्यात व गांधीजी ह्यांचे स्वदेशी धोरणांचा उलट अर्थाने फायदा घेण्यास त्यावेळचे खाजगी समूह तेवढेच आघाडीवर होते.

श्रीगुरुजी गुरुवार, 10/02/2014 - 19:40
संपादक मंडळास एक नम्र विनंती, गांधीजी, सावरकर इ. विषयांवर धागे निघाले की कोणीतरी काडी टाकणारा प्रतिसाद देतात व त्या खोडसाळ प्रतिसादाला प्रत्त्युत्तर दिले की भडका उडून इतर अनेक परस्परविरोधी प्रतिसाद येतात. शेवटी संपादक मंडळ त्यातले बरेचसे प्रतिसाद काढून टाकते. असे धागे काढण्यास संपूर्ण बंदी घालावी किंवा अशा धाग्यातील प्रतिसाद न उडविता तसेच ठेवावेत असे मला वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/02/2014 - 20:54
श्रीगुरुजींशी सहमत! एकतर अशा धाग्यांवर बंदी घालावी किंवा सरळ वादविवाद व्हावेत! फार कष्टाने प्रतिसाद खरडायचे व परत येऊन बघितले तर प्रतिसाद गायब ,मुळात या धाग्यावरची चर्चा उद्बोधक चालू होती, इतके प्रतिसाद डीलीट करायचे कारण समजलेले नाही .बाकिच्या मराठी संस्थळांचे प्रशासन नेभळट आहे,त्यामानाने मिपाच्या नर्व्हज् स्ट्राँग आहेत व तोच मिपाचा युएसपी आहे, तो कायम ठेवावा, नाहीतर मिपाचे काही खरे नाही. (अजूनही या व आणखि एक गांधी धाग्याला कुलुप घालायची संधी आहे)

उदयन गुरुवार, 10/02/2014 - 20:01
गांधीजी महान यासाठी की त्यांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मि़ळाले जे स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत होते अश्या सर्वांना महात्मा गांधीनी एकत्रित करुन चळवळीला एकीचे बळ दिले म्हणुनच भारताला सर्वांच्या एकीच्या बळामुळे स्वातंत्र्य मिळाले.

In reply to by उदयन

चित्रगुप्त गुरुवार, 10/02/2014 - 20:11
हिटलरासही महान म्हटले पाहिजे, ज्याच्यामुळे महायुद्ध होऊन त्यात ब्रिटिशांची शक्ती खच्ची होऊन त्यांना आपल्या वसाहतींमधून काढता पाय घेणे भाग पडले.

In reply to by चित्रगुप्त

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 10/02/2014 - 21:33
+१ युद्धामुळे ब्रिटीश अर्थव्यवस्थेचे बारा वाजले होते. भारतासारखा पांढरा हत्ती पोसणे त्यांना जमणार नव्हतेच. त्यातुन क्रांतीकारकांनी खजिना लुटणे, महत्त्वाच्या अधिकार्‍यांचा वध करणे आदी गोष्टी चालु केल्या. त्यामुळे ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य दिले. बाकी "अंग्रेज चले गये, पिछे अपनी औलाद छोड गये" =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/02/2014 - 21:49
म्हणजे आद्यक्रांतिकारक फडके टीळक सावरकर यांच्यापेक्षाही भारताला स्वातंत्र्य देण्यात हिटलरचा वाटा अधिक आहे यावर हिंदुत्ववाद्यांचे एकमत आहे तर! ना गांधी ने ना विनायक ने ,आझादी दिलायी हिटलर ने असे वचनही उद्या प्रचलीत होईल.

In reply to by नानासाहेब नेफळे

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 10/02/2014 - 22:19
नेफळे नाना, जरा अभ्यास वाढवा. माझं एक छोटसं काम करा, उद्या पाकिस्तान बॉर्डर वर जा, नो मॅन्स लँड वर उपोषणाला बसा. जर का तुमच्या उपोषणानी पाकिस्तान ला कळवळा आला आणि बिनशर्त अतिरेकी कारवाय थांबवल्या तर तुम्हाला म्हणाल तिथे पार्टी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/02/2014 - 22:57
अच्छा! तिथे हजारो लाखो सैनिक एकमेकाकडे बंदुका रोखुन उभे आहेत, तीन युद्ध झालीत, सुटला काश्मीर प्रश्न?पाकिस्तानच्या मानसिकतेत फरक पडला? जर प्रचंड ताकद असेल तर जरुर सशस्त्र प्रतिकार करावा, पण जिथे (ब्रिटीशांपूढे) तुटपुंजी सैनिकी ताकद असते तिथे दंडाला फूकाच्या बेटकुळ्या काढल्याने फक्त प्रतिस्पर्ध्याचे मनोरंजन होते, बाकी काही नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 10/02/2014 - 23:08
प्रश्ण तेव्हाच सुटतात जेव्हा ते सोडवायची ईच्छा असते. जर का आपण युद्ध करायचचं ठरवलं तर काश्मिर सेनाबळावर मिळवणं फारसं अवघड नाही. ते घोंगडं आजपर्यंतच्या सगळ्या सरकारनी भिजत ठेवलं आहे. कुठलही सरकार थेट युद्ध टाळत आहे ह्याचं कारण तुम्हाला गेल्या वर्षी शहीद स्मारकाला काय प्रकार घडला त्यावरुन ल़क्षात यायला हवा. थेट युद्धाबरोबर अंतर्गत बंडाळीला तोंड देणं सरकारला जड जाईल.
तिथे दंडाला फूकाच्या बेटकुळ्या काढल्याने फक्त प्रतिस्पर्ध्याचे मनोरंजन होते, बाकी काही नाही.
अगदी सहमत. उपोषण केल्यामुळे शत्रुला शष्प फरक पडत नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/02/2014 - 23:41
अंतर्गत बंडाळी
आपले आवडते पंतप्रधान परमप्रतापी मोदीजींचे अंतर्गत बंडाळीविषयीचे मत वाचा,यावर आपले काय म्हणने आहे. http://www.thehindu.com/news/national/indian-muslims-will-fail-alqaeda-modi/article6460807.ece/ ( हिंदू हिंदूत्व याविषयी चर्चा करताना नाव तरी शोभेल असे घ्या !कॅप्टन जॅक स्पॅरो कशाला?)

In reply to by नानासाहेब नेफळे

दिलेल्या लिंक विषयी
मोदी एक उत्कृष्ट दर्जाचे राजकारणी आहेत.
( हिंदू हिंदूत्व याविषयी चर्चा करताना नाव तरी शोभेल असे घ्या !कॅप्टन जॅक स्पॅरो कशाला?)
मग काकासाहेब सापळे, बाईसाहेब फुरसुंगीकर, ग्रेट्स्टिंकर, थिकॉसॉफर अश्याच नावांना हिंदुत्वावर बोलायचा अधिकार आहे का काय?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

काळा पहाड Fri, 10/03/2014 - 00:13
नेफळे नाना, जरा अभ्यास वाढवा. माझं एक छोटसं काम करा, उद्या पाकिस्तान बॉर्डर वर जा, नो मॅन्स लँड वर उपोषणाला बसा. जर का तुमच्या उपोषणानी पाकिस्तान ला कळवळा आला आणि बिनशर्त अतिरेकी कारवाय थांबवल्या तर तुम्हाला म्हणाल तिथे पार्टी.
कळ्ळं नाय ओ त्याला. आमाला कळ्ळं. निदान पाकिस्तानी वाले तरी ही बिनडोक डोकेदुखी कायमची घालवतील असं तुमाला म्हणायचंय.

In reply to by नानासाहेब नेफळे

चित्रगुप्त Fri, 10/03/2014 - 16:28
ना गांधी ने ना विनायक ने ,आझादी दिलायी हिटलर ने असे वचनही उद्या प्रचलीत होईल.
छे छे .. दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल ... हे गाणे लहानपणापासून कानावर टाकून टाकून पक्के चिरेबंदी करून टाकले गेलेले आहे.

भृशुंडी Fri, 10/03/2014 - 08:43
म्हणजे खरंच कंटाळा येत नाही का? देजावूचा बाप वाटेल असं चालू असतं. गांधींवरच्या आधीच्या चर्वितचर्वाणाला मिपावर कुठेतरी सन्माननीय आणि चट्कन दिसेल अशी जागा शोधायला हवी. म्हणजे अपघात वाचतील.

पैसा Fri, 10/03/2014 - 14:37
महात्मा गांधीजींना भावपूर्ण श्रद्धांजली! प्रत्येकाने इथे निरर्थक काथ्या कुटणे आणि उखाळ्यापाखाळ्या काढण्यापेक्षा आपापले कामाचे टेबल, घर आणि गल्ली मन लावून साफ करावी. ती गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल.

In reply to by पैसा

आजानुकर्ण Fri, 10/03/2014 - 15:24
गांधी महान खरे पण स्वच्छता त्यांच्यामुळे होत असे असे मानणे हा प्रचंड मोठा मुर्खपणा आहे. गाडगेबाबांना श्रेय द्यायला हवे! (पण गांधी महान!!) आयाबहिणींना शिवी देऊन दादागिरी करणारे गल्लीत सापडतात ते स्वच्छता कशी करुन देतील?

In reply to by आजानुकर्ण

पैसा Fri, 10/03/2014 - 15:44
आपण दुसर्‍याकडे कशाला बघायचं? स्वतःला जेवढं करता येईल तेवढं करावं. कोणी अडवलंय! फक्त स्वच्छता असं नव्हे, गांधीजींच्या मार्गावरील जे जे म्हणून प्रत्येकाला जमेल ते करावंच! काहीच नाही तर शाब्दिक आणि वैचारिक हिंसा तरी करू नये! असत्य बोलू नये, महिलांबद्दल आदर दाखवा, भ्रष्ट मार्गाने पैसे मिळवू नये, गरजेहून जास्त संपत्ती गोळा करून ठेवू नये. यातलं काहीच जमणार नाही का? मग निदान घरदार आणि गल्ली तरी स्वच्छ ठेवा. कमीतकमी रस्त्यावर कचरा, घाण टाकू नका. एवढं तरी जमेल ना?