गांधीजी महान का ?
लेखनप्रकार
आज कोणालाही विचारा महात्मा गांधी नोटेवर का छापलेले आहेत? याच कोणी समर्पक उत्तर देऊच शकणार नाही ! हां कदाचित ते सांगतील कि गांधीजी महात्मा होते म्हणून. पण मग ते नोटेवरच का छापले ?(मनात माझा प्रश्न-कि नोटेवर छापले मना-मनात का नाही ?) याचे मी माझ्या परीने शोधलेले उत्तर आज त्यांच्या जयंती निमित्त मांडतो आहे.
खरेतर गांधीजींना नोटेवर छापणे हा त्यांचा अपमान आहे अस वाटतं आणि हाच त्या महापुरुषाचा पराभव पण आहे, आपण केलेला !
गांधीजींच्या विचारांना मानणारी एक पिढी होती, त्यांनी गौतम बुद्धाप्रमाणे गांधीजींना देव बनून टाकलं, त्यांना भजणारा एक पंथच तयार झाला.
गांधीजींची तत्वे -
ज्याप्रमाणे गौतम बुद्धाने महावीराने सांगितले त्याच प्रमाणे गांधीजींनी देखील काही तत्वे पाळली-
सत्य- 'सत्याग्रह' हे नवे हत्यार गांधीजीनी आपल्याला दिले.
अहिंसा - सगळा देश जमा करून अहिंसावादी चळवळ यशस्वी केली. त्यांना या काळात न्यूटन भेटला असावा. कारण हिंसक आंदोलनाची प्रतिक्रिया वाईटच येते हे तत्व गांधीजींना चांगले माहिती होते. क्रांतीकार्याने स्वातंत्र्य मिळालेच नसते असे मला आजिबात म्हणायचे नाही, परंतु त्याकडे वाटचाल करणे सामान्य माणसाला शक्य नव्हते,त्यामुळे अशा मार्गाला लोक गेले नसते,त्यामुळे सत्याग्रह, अहिंसावादी आंदोलन महत्वाचे ठरले.
निस्वार्थ सेवा - गांधीजी आयुष्यभर या तत्वाने चालले. गरिबांसाठी फकीर बनले. उपेक्षितांसाठी आधार बनले.
आजवर गांधीजींना विरोध करणारे त्यांना शिव्या घालणारे अनेक लोक आहेत. ती पुस्तकं पण काढतात. पण खरा सांगू ? आज जर गांधीजी असते तर त्यांनी या लोकांच हि म्हणणं आईकून घेतल असत. आणि हसून नम्रतेनं 'धन्यवादच' म्हणलं असतं. कारण गांधीजी 'व्यक्तिस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते' होते, प्रत्येकाच्या
व्यक्तिगत मताचा सन्मान करणारे होते. त्यामुळे गांधीजी महान होते.
आज अनेक लोक म्हणतात कि गांधीजींनी केलं ? लोकांना जमा केलं आणि आंदोलन केलं,ते ही काही मागण्या मान्य झाल्या कि मागे घेतलं. हो हे खरं आहे. पण आजच्या कोणत्यही तथाकथित नेत्याने, किवा समाजसेवकाने असं करून दाखवावं (न पैसे खर्च करता ).
मला माहिती आहे शक्य नाही. गांधीजींनी स्वन्तात्र्याची चळवळ सर्वसामान्य नागरिकाची चळवळ बनावी म्हणून घेतलेला हा निर्णय होता. कारण सर्वसामान्य माणूस दडपशाही समोर टिकला नसता आणि अश्या सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन त्यांनी स्वातंत्र्य मिळून दिले म्हणून गांधीजी महान आहेत.
स्वच्छता, वैयक्तिक चारित्र्य, मानसिक स्वच्छता हि देखील गांधीजींची तत्व ! या सर्वांबद्दल वाद आहेतच, पण तरीही गांधीजी महान ठरतात कारण यापैकी एकही तत्व आपण आपल्यामध्ये बाणवू शकलो नाही.
सर्वधर्म समभाव, संपत्तीचे एकसमान वाटप हि तत्वे गांधीजींचा मोठेपणाच दर्शवतात. पाकिस्तानला मान्यता देणे यासाठी तात्कालिक परिस्थिती जबाबदार असूनही आपण या गोष्टीचे खापर गांधीजींवर फोडून मोकळे होतो. पण तरीही गांधीजी महान ठरतात कारण त्यांचा एक नकार त्यावेळी भारताचे हजारो तुकडे होण्यास कारण ठरला असता.
प्रत्येक माणसात गुण-अवगुण असतातच. गांधीजींमध्येही ते होते पण अवगुण मान्य करायला हि मोठेपण लागतं. स्वाभिमान, दुराभिमान, जोपासणाऱ्या आजच्या जगात गांधीजी त्यामुळेच महान ठरतात.
शेवटी माझ एकच म्हणणं आहे कि, (अगदी गांधीजींना मानत नसाल तरीही ) कोणावरही वैयक्तिक राग न धरता आपल्यातील वाईट गोष्टींना संपवण आपल्याला जमलं तरी अश्या थोर महापुरुषाचा तो विजय होईल आणि तिचा खरी आदरांजलीही ठरेल.
वाचने
9341
वाचनखूण
प्रतिक्रिया
50
गांधी" आडनावाची जाहिरात
In reply to गांधी" आडनावाची जाहिरात by चित्रगुप्त
ती पण सरकारी खर्चानी.
In reply to गांधी" आडनावाची जाहिरात by चित्रगुप्त
हे गांधी आणि ते "गांधी "
In reply to हे गांधी आणि ते "गांधी " by सवंगडी
जाहिरातीचा परिणाम
In reply to जाहिरातीचा परिणाम by चित्रगुप्त
सहमत...अंधभक्तांना कोण
In reply to गांधी" आडनावाची जाहिरात by चित्रगुप्त
तो एक प्रथेचा भाग आहे...
In reply to तो एक प्रथेचा भाग आहे... by शशिकांत ओक
फक्त गांधीच का?
In reply to गांधी" आडनावाची जाहिरात by चित्रगुप्त
अजुन कुणाची जाहीरात करायची इच्छा होती का ?
गांधीजींची महानता !
यथोचित लेख.
गांधीजी
In reply to गांधीजी by विटेकर
वाचा वृत्तपत्रातले कात्रण वाचावे
संपादक मंडळ इकडे लक्ष देईल का ?
>>> कारण गांधीजी
In reply to >>> कारण गांधीजी by श्रीगुरुजी
मी म्हणतो तेचं खरं म्हणायची
गांधीजी अनेक ठीकाणी तुरुंगवास
In reply to गांधीजी अनेक ठीकाणी तुरुंगवास by नानासाहेब नेफळे
खरे आहे. याबाबत त्यांची तुलना
In reply to खरे आहे. याबाबत त्यांची तुलना by मृत्युन्जय
पंचा = धोतर असे वाचावे
In reply to खरे आहे. याबाबत त्यांची तुलना by मृत्युन्जय
तुरुंगात असताना कैद्यांचा
In reply to तुरुंगात असताना कैद्यांचा by नानासाहेब नेफळे
कृपया संदर्भ द्या.
In reply to गांधीजी अनेक ठीकाणी तुरुंगवास by नानासाहेब नेफळे
नानासाहेब,
In reply to नानासाहेब, by विवेकपटाईत
@विवेक पटाइत, सावरकरांविषयी
In reply to @विवेक पटाइत, सावरकरांविषयी by नानासाहेब नेफळे
सावरकरांविषयी मला विशेष
In reply to सावरकरांविषयी मला विशेष by मृत्युन्जय
आँ! हे काय भलतेच !!
In reply to सावरकरांविषयी मला विशेष by मृत्युन्जय
स्वतः घाण करायची
In reply to स्वतः घाण करायची by उदयन
खरय.
In reply to @विवेक पटाइत, सावरकरांविषयी by नानासाहेब नेफळे
>>> त्यामुळे त्यांच्या
नानासाहेब
गांधी ह्यांनी ज्यावेळी
संपादक मंडळास एक नम्र विनंती,
In reply to संपादक मंडळास एक नम्र विनंती, by श्रीगुरुजी
श्रीगुरुजींशी सहमत!
गांधीजी महान का?
In reply to गांधीजी महान का? by उदयन
महान
In reply to महान by चित्रगुप्त
+१
In reply to +१ by कॅप्टन जॅक स्पॅरो
म्हणजे आद्यक्रांतिकारक फडके
In reply to म्हणजे आद्यक्रांतिकारक फडके by नानासाहेब नेफळे
नेफळे नाना, जरा अभ्यास वाढवा.
In reply to नेफळे नाना, जरा अभ्यास वाढवा. by कॅप्टन जॅक स्पॅरो
अच्छा! तिथे हजारो लाखो सैनिक
In reply to अच्छा! तिथे हजारो लाखो सैनिक by नानासाहेब नेफळे
प्रश्ण तेव्हाच सुटतात जेव्हा
In reply to प्रश्ण तेव्हाच सुटतात जेव्हा by कॅप्टन जॅक स्पॅरो
अंतर्गत बंडाळी
In reply to अंतर्गत बंडाळी by नानासाहेब नेफळे
दिलेल्या लिंक विषयी
In reply to नेफळे नाना, जरा अभ्यास वाढवा. by कॅप्टन जॅक स्पॅरो
नेफळे नाना, जरा अभ्यास वाढवा.
In reply to नेफळे नाना, जरा अभ्यास वाढवा. by काळा पहाड
(No subject)
In reply to म्हणजे आद्यक्रांतिकारक फडके by नानासाहेब नेफळे
चिरेबंदी
In reply to महान by चित्रगुप्त
ज्याची जशी मानसिकता तशी महानता वाटु शकेल
कालचा सुविचार :
म्हणजे खरंच कंटाळा येत नाही
महात्मा गांधीजींना श्रद्धांजली!
In reply to महात्मा गांधीजींना श्रद्धांजली! by पैसा
गाडगेबाबा
In reply to गाडगेबाबा by आजानुकर्ण
असू दे ना!
५० वी प्रतिक्रिया एक्दम भारी