Skip to main content

लाल बहादुर शास्त्री जयंती......

लेखक _मनश्री_ यांनी गुरुवार, 02/10/2014 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
laal bahadur shastri आज भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची १०९ वी जयंती त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर लाल बहादुर शास्त्री यांना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे पंतप्रधान पद दिल गेल लाल बहादुर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ म्हणजे मृत्युपर्यन्त जवळ जवळ अठरा महीने ते पंतप्रधान पदी होते त्यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा यासाठी त्यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7332
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

In reply to by माम्लेदारचा पन्खा

शाप कि दुर्दैव ते माहीत नाही पण हे मात्र खरय कि २ ऑक्टोबर म्हणजे गांधी एवढंच सगळ्यांच्या लक्षात रहात . लाल बहादूर शास्त्रींची जयंती बरेच जण विसरतात

लालबहादूर शास्त्री आणि त्यांचे राजकिय गुरु महात्मा गांधी यांची जयंती एकाच दिवशी यावी हाच एक विलक्षण योगायोग आहे, शास्त्रीजींनी साधेपणा सत्शीलता अभ्यासुवृत्ती हे गुण त्यांचे गुरु व प्रेरणास्थान महात्मा गांधीँकडून घेतले होते. शास्त्रीजींना अभिवादन.

कोणेतहे गृहस्थ ? आपले पंतप्रधान होते का ? पण आडनाव तर 'शास्त्री' आहे ... ब्राम्हण? अरेरे ... पण अभिवादन कशाला ? गणित येत होते का त्यांना नाही म्हणजे १ कोटी म्हणजे किती हे माहित होते त्यांना ? नाही ?? बरे मग निर्लज्ज पणे खुर्चीला चिटकून राहणे ? ते हि नाही ? अरे काय हा अध:पात ... बरे झाले फार वेळ टिकले नाहीत ... काय झाला असते कि देशाचे... ह्म्म्म

साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा
अगदी यथार्थ वर्णन आहे! या महान नेत्याला विनम्र अभिवादन!

देशाच्या एका दुर्लक्षित शिल्पकाराला विनम्र अभिवादन! तुमचा प्रामाणिकपणा आणि तो पाळायला लागणारे धैर्य उच्चतम कोटीचे होते.

लालबहादूर शास्त्रींइतके प्रामाणिक, साधे व उच्च विचारांचे नेते पूर्वीही दुर्मिळ होते आणि आजही दुर्मिळ आहेत.

लालबहादूर शास्त्रींच्या जयंतीला श्रद्धांजली वाहिली कि पुण्यतिथी असल्यासारखे वाटते. असो, असतात एकेकाच्या श्रद्धा!