Skip to main content

Lemon Zest cookies (लिंबाच्या सालीची बिस्किटे)

Lemon Zest cookies (लिंबाच्या सालीची बिस्किटे)

Published on मंगळवार, 30/09/2014
साहित्य : अमूल बटर (१०० ग्रॅम),साखर (१०० ग्रॅम), मैदा (२०० ग्रॅम), ताज्या लिंबाची साल ,लिंबाचा रस,बेकिंग पावडर, १ अंड. कृती : बटर आणि साखर एकत्र फेटून घ्या. त्यात अंड मिक्स करून फेटून घ्या. नंतर हळू-हळू मैदा घालून फेटून घ्या. या मिश्रणात ताज्या लिंबाची साल ,लिंबाचा रस,बेकिंग पावडर घालून एकत्र करून घ्या. हे मिश्रण ४०-४५ मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा. त्यानंतर एका बेकिंग ट्रे ला तूप लाऊन त्यात हे मिश्रण पसरून घ्या . प्री हिट ओव्हन मध्ये १८० डिग्री ला १५ मिनिटे भाजून घ्या. नंतर हव्या त्या शेप मध्ये कापून सर्व्ह करा लिंबाच्या सालीची बिस्किटे…  Biscuits

याद्या 6209
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

एक प्रश्न आहे. बिस्किटं गार झाली की ट्रेला चिकटतात. शक्ती वापरून काढायला गेलं तर मोडतात. यावर काय उपाय? बटर पेपर वगैरे वापरायचा असतो का?

बेकिंग ट्रे ला खाली तूप किंवा बटर लावलं कि बिस्किटे आपोआप निघतात. पण त्या साठी ट्रे पूर्ण गार होऊ द्यायाचा . :)

छान चव येत असेल लिंबाची.

दिसत नाहियेत का? बाकि पाकृ टेम्टींग दिसतेय (निदान वाचण्यापुरती)

चोप्य पस्ते?? म्हणजे ? नाही समजल.. मिपा वर नविन आहे ना त्यामुळं लाघुसंकेत नाही समजत …

In reply to by काव्यान्जलि

काव्यांजली, थोडा मैदा थोडी कणीक वापरून चालेल का? बिस्कीट पाहून मैदा समजला नाही तर खाता येईल. पण आपल्या हाताने एवढा मैदा खाववत नाही गं. चोप्य पस्ते = copy-paste आदूबाळ, पार्चमेंट कागद वापरून पहा. मी पाव भाजताना एका बाजूला पार्चमेंट पेपर, एका बाजूला फॉईल असणारा कागद वापरते. फॉईलच्या भागावर पाव ठेवते. भट्टीत भाजताना कागदाचा, खालच्या बाजूला असलेला पृष्ठभाग किंचित आक्रसतो, त्यामुळे पाव लगेच सुटतो.

मराठीत ते लिहुन बघा . लिहीताना जी ईंग्रजी अक्षरी वापराल त्यावरुन उमजून येईलच

३_१४ विक्षिप्त अदिती... कणि़क वापरुन पहाव लागेल.. मी तर नाहि try केल... वामनपंडित --- मला लघुसन्केत(shortcut) म्हणायच होत...