मेणाचा मृत्युंजय भावला
अरूण कोलटकर हे माझ्या मते मराठीतील महाकवीं पैकी एक आहेत. यांनी ज्या कविता मराठीत लिहीलेल्या आहेत तशा त्यांच्या अगोदर कोणी लिहील्या असतील असे वाटत नाही. त्यांच्या काही कवितांवर अतिशय सुंदर रसग्रहण पुर्वी मिपा वर आलेली आहेत. अनेक अर्थांनी अनोखा असा हा माणुस होता. यांचे कवितेतील अनुभव शैली इमानदारी सारेच काही विलक्षण होते. त्यांची एक विलक्षण कविता जी अतिशय अस्वस्थ करुन जाते तिच्यावीषयी त्याचा अर्थ जसा मला लागतोय तो सांगण्याचा प्रयत्न करतो.
त्यापुर्वी एक सांगावेसे वाटते की खालील कविते चे आकलन जर काही संदर्भ माहीत असतील तर सुगम होते. अन्यथा कविता क्लीष्ट वाटु शकते. जर अरेबियन नाइट्स जे रीचर्ड बर्टन याने लिहीलेले आहे ( अरेबियन नाइट्स च्या सुरस व चमत्कारीक कथा हा बाळबोध घरगुती मराठी अनुवाद नव्हे) व ज्यात रीचर्ड बर्टन च्या अत्यंत अभ्यासपुर्ण इस्लामी संस्कृती च्या सखोल अनुभवा अभ्यासा वर आधारीत फ़ुटनोट्स आहेत याचे वाचन असेल. तर इस्लामी संस्कृतीचे आकलन वाढते व काही लिंक लवकर लागतात. किंवा तुम्ही लॉरेन्स ऑफ़ अरेबिया हा सिनेमा बघितला असेल किंवा आवरण ही भैरप्पांची कादंबरी वाचली असेल तर कविता थोडी लवकर कळेल इतकेच म्हणायचे आहे. आदर वाइज देखील काही अगदीच गुढ आहे अशातला भाग नाही असो.
तर सर्वसाधारणपणे इस्लामी संस्कृतीत नवाबी षौक वा इनजनरल देखील अनेक उपभोगाच्या प्रकारांपैकी एक होता/आहे तो म्हणजे लौंडेबाजी कींवा ताजबाजी. लौंडा वा ताज या शब्दाचा अर्थ होतो समलिंगी संभोग ज्यासोबत करतात असा कोवळ्या वयाचा अविवाहीत मुलगा. यावरुन ताजबाज कींवा लौडेबाज हे शब्द बनतात म्हणजे असा षौक जे करतात ते पुरुष. हा अर्थात वरच्या वरीष्ठ स्तरात अधिक मुबलक प्रमाणात प्रचलित होता. साकी हा देखील कोवळा मुलगा च असतो ( जो दारु सर्व्ह करतो ) त्याच्याविषयी देखील अनेक लाडीक अश्लील उल्लेख शेरो शायरी त येत असतात. त्यामागील भाव हा देखील समलैंगिक आकर्षणातुन असतो.
आता यात अर्थातच मुलगा हा मायनर एज चा असतो त्याला उपभोगणारा हा सत्तावर्तुळातील आर्थिक सामाजिक सर्वच बाबतीत वरचढ. तर हा एक प्रकारे लैंगिक शोषणा चाच भाग झाला. यात जो काय स्वेच्छेने होत असेल तो दोन प्रौढ पुरुषांमधील संबंध तो वेगळा प्रकार आहे इथे मात्र जो आपण बोलत आहोत ते एकतर्फ़ी अत्यंत क्रुर असे लैंगिक शोषण च आहे. आता या कोलटकरांच्या कवितेमध्ये एका कोवळ्या अशा रीतीने भोगल्या गेलेल्या मुलाच्या मनाच्या अवस्थेचे त्याच्या भावनांचे. या क्रुर प्रसंगाला सामोरे जातांना त्या कोवळ्या मुलाच्या मनात उठलेल्या भावतरंगांचे अत्यंत सुक्ष्म विलक्षण संवेदनशील असे चित्र कोलटकर आपल्या खालील कवितेत रेखाटतात. पुन्हा एकदा एक लक्षात घ्या हा स्वेच्छेने केलेला प्रकार नाही. हा एक बलात्कार च आहे केवळ समलैंगिक बलात्कार आहे इतकेच.
तर कविता अशी सुरु होते.
- हो गया ?
- हो गया.
यात त्या मुलाने प्रश्न केलेला आहे झाल का ? आटोपल का ? उत्तर मिळालय हो झाल ( आता जाउ शकतोस या अर्थाने)
आता मुलगा पुढील कविता स्वत: नॅरेट करतोय. स्वत:विषयी बोलतोय कोलटकरांचा एक एक शब्द अतिशय काळजीपुर्वक वापरलेला असतो बघा
मी मेणाचा भावला
चिकणा हिजडा
भादरलेला
स्वत:ला भावला म्हणतोय व तोही मेणाचा का ? तर भावला हा शब्द मुलगा दर्शवतो मुलगी नाही परत भावला हा खेळण्यासाठी असतो मन मानेल तस तुम्ही त्याच्याशी खेळु शकता. त्याचे हातपाय पोट कसेही वाकवु हलवु शकतात. त्याच्या शरीराशी कसेही अगदी मनाला येइल तसे भावला तुम्हाला करु देतो. त्याला पर्याय च नसतो तो तुमचा खेळ असतो. क्लीओपात्रा या सिनेमात क्लीओपात्रा ही राजाला एका प्रसंगात संतापुन सांगते i am not your sport !. म्हणजे तु वाटेल तस माझ्या शरीरा बरोबर भावने बरोबर खेळु नाही शकत पण भावला ? तो काय म्हणु शकतो बिचारा विकत घेतलेला जत्रेत दिड दमडीची किंमत असले ला भावला ! शिवाय हा मेणाचा आहे. मेणाची तीच खासियत पुन्हा हवा तो आकार द्या कसाही वाकवा तोडा मरोडा काहीही करा तो लोखंडाचा नाही मेणाचा आहे. मउ मॅलीएबल. आणि तो भादरलेला आहे. त्याच्या अंगावरील केस काढण्यात आलेले आहे त्याच वॅक्सीग करण्यात आलेल आहे. तो स्त्री सारखा व्हावा म्हणुन केस काळे केस अडथळा निर्माण करतात रसभंग होतो म्हणुन त्याला पुर्ण भादरलेला आहे “ तयार “ करण्यात आलेला आहे.
दरबारी हजामानं
हिरेजडीत वस्तरा उघडताच
मी काखा वर केलेल्या
दरबारी हजाम आहे नेहमीचच काम आहे हे त्या मुलाच नेहमीच आणला जातो तो येथे राजाला तलफ़ आली की. मग तो म्हणतोय की सराइतपणे आता माहीतेय पुढे काय होणार हे आणि विरोधाचा प्रश्न च येत नाही, म्हणुन तो तुरंत काखा वर करुन उभा राहतो. वस्तरा हिरेजडीत आहे हा उल्लेख भोगणारा राजा कीती शक्तीशाली आहे याची ओळख करुन देतो. म्हणजेच दबाव काय असेल आणि विरोधा चा परीणाम काय असेल व त्या मुलाची तेथील पोझीशन काय असेल याची कल्पना येत जाते.
मांड्या फ़ासटलेल्या
पोटावर सुगंधी साबण फ़ेसाळताच
माझा श्वास मंद झालेला
त्याला प्रिपेअर करण्यात येत आहे. मांड्या फ़ासटलेल्या त्या नंतर पोटावर सुगंधी साबण लावताच त्याचा श्वास मंद झालाय म्हणतो का ? गर्भगळीत झाल्यान ? नेहमीचा अनुभव असला तरी येणारया शिसारीनं ? कळत नाही पण श्वास मंद झालेला वाचताच त्या मुलाच मन डोळ्यासमोर उभ राह्त.
रंगमहालात मी उताणा उखाणा
पालथा बिलोरी छतात किलावर गुलाम
बदामी होणारा सलामत
हो गुलाम च आहे तो हे तर सरळ सत्य आहे. बदामी होणारा सलामत ही ओळ काही मला कळली नाही. पण एक आहे सीन डोळ्यासमोर उभा राहतोय व मुलाच्या मनाची अवस्था तेथील वातावरण व त्यातील वस्तुंचा प्रतिकात्मक वापर सर्व घटनेचा संवेदनेच्या पातळीवर तरी झणझणीत अनुभव देतो.
नसत्या झुंबराला
पेटवतो
माझा दुबारा सलाम
राजाला मी दोनदा सलाम केला म्हणतोय हा मुलगा व नसते झुंबर देखील पेटवते याचा सलाम हे प्रतिकात्मक आहे. याला पाहुन याचा सलाम पाहुन जी कामवासना राजाच्या मनात पेटलीय त्याच प्रतिक आहे. तो पेटवतोय राजाच्या कामवासनेला राजा पेटुन उठलाय पुढच्या कामनेने.
मी कुशीला वळेन
तेव्हा माझी विकतची पाठ
ओलावेल गुलाबपाण्यानं
हे ही एक नवाबी रीच्युअल आहे पाठ पुढील कार्यक्रमासाठी गुलाबपाण्यान सुगंधीत केली जातेय. आणि ती विकतची आहे हे महत्वाच. ती हवी तशी वापरता येणार आहे. राजा दाम देखील मोजणार आहे
आणि माझ्यावर अंधार पडेल
सुरकुतलेल्या राजाप्रमाणं
लटलटत.
मेणाचा मृत्युंजय भावला
उच्चारेल मृत्याचा राजलंड
बोबडा
वरील ओळी एक्स्प्लेन करण्यात अर्थ नाही......स्वत: च असणं गरजेचं आहे,
वर्गीकरण
प्रतिक्रिया
काय लिहू कळत नाहीये.
जबरदस्त! अतिशय परिणामकारक
असह्य!! असहाय्य्य!!
बाप रे !
रिचर्ड बर्टनचे १००१ अरेबिअन
असह्य आहे ...
अरेबियन नाइट्स
>>मला वाटते तो चार खंडांत
पठडीपल्याडचा कवी.
.....
या सुरेख अश्या लेखाला
सुंदर.
वाचून शिसारी आली. हा प्रकार
विस्मयकारक कवितेबद्दलचा रोचक लेख.
वा, मस्त !