भय इथले संपत नाही (एक)
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/28992
------------------
कवितेतून नक्की काय म्हणायचंय ते ग्रेस स्वत: कधीही सांगणार नाही. तो फक्त जीवाला सैरभैर करणारी त्याची कविता तुमच्यासमोर ठेवेल आणि प्रत्येक वेळी ती, एखाद्या कॅलिडोस्कोपसारखी असेल. हरेक रसिकाला ती कवितेत, स्वत:चा अर्थ शोधायला भाग पाडेल. आणि ग्रेसच्या कवितेचं वेगळेपण हेच, की समजत नाही म्हणून तुम्ही तिला अंतर देऊ शकणार नाही. एखाद्या विलोभनीय आणि दुष्प्राप्य कामिनीसारखी ती तुम्हाला सतत घेरुन राहील.
कारण ग्रेसची मराठी ही तुमची माझी भासली, तरी स्वत:च्या अभिव्यक्तीसाठी त्यानी निर्माण केलेलं ते त्याचं, स्वतंत्र आकाश आहे. त्याच्या शब्द आणि रुपकांच्या अनमोल बिलोरी खजिन्याचा तो स्वत: अनभिषिक्त सम्राट आहे. आणि सरते शेवटी त्याच्या लयकारीचा, (म्हणजे मांडणीचा), ‘अंदाजे बयां’ मराठीत (आजमितीला तरी) दुसरा कुणीही नाही.
थोडक्यात, पराकोटीची संवेदनाशिलता हा ग्रेसचा कॅनव्हास आहे. रसिकांची संवेदनाशिलता जरी तितकी प्रगल्भ नसली तरी दोघांची जाणिव एक असल्यामुळे, ग्रेस त्या कॅनव्हासवर (त्याला) हवी ती अभिव्यक्ती देऊ शकतो.
ग्रेसनं स्वत:ची स्वतंत्र परिभाषाच निर्माण केली आहे आणि त्यावर कहर म्हणजे ती पुन्हा `डायनॅमिक' आहे. ग्रेसच्या प्रत्येक नव्या संवेदनेसाठी ती नवा शब्द घेऊन येऊ शकते. परिणामी ग्रेसकडे रंगवैभवाचा अलय खजिना आहे. त्यामुळे त्याच्या कवितेला शब्दविभ्रमांच्या सोबतीला, रंगवैभवाचं परिमाण आहे.
आणि सरते शेवटी, मांडणीची सौंदर्यदृष्टी, ग्रेस बहुदा पारलौकिकातूनच घेऊन आलायं!
त्यामुळे `ग्रेस' ही फक्त ‘अनुभवण्याची कविता’ आहे. ज्याला जितकी उलगडली त्याला ती, `स्वत:लाच उलगडल्याचा' आनंद देईल. आणि तरीही एखाद्या गूढ रमणीसारखी, पुन्हा तुमच्यापासून अलग होऊन... तुम्हाला पुन्हा निमंत्रण देईल.
तर अशा या ग्रेसची, भयासारख्या आदिम आणि अत्यंत खोलवर रुजलेल्या संवेदनेवरची, ही अशीच एक जीवघेणी कविता : भय इथले संपत नाही!
_______________________________________________
लताचा आयुष्याच्या संध्यासमयीला साजेसा झालेला आवाज. हृदयनाथांची ज्यावर निर्विवाद हुकूमत आहे अशा यमनमधला, कवितेला चढवलेला कमालीचा धीरगंभीर स्वरसाज. आणि स्वत:ला ‘दु:खाचा महाकवि’ संबोधणार्या ग्रेसचे, निव्वळ अलौकिक रुपकांचे आणि गूढतम अनुभवांचे शब्दविभ्रम!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते
ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया
तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला
स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
भय इथले संपत नाही…मज तुझी आठवण येते…
मी संध्याकाळी गातो…तू मला शिकविली गीते…
____________________________________
( कवितेच्या रसग्रहणाचं साहस दुसर्या भागात)
वाचने
16944
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
सुंदर विश्लेषण
हि कविता खरच कधि कळली नाहि.
In reply to हि कविता खरच कधि कळली नाहि. by अर्धवटराव
संगीत आणि गायकी इतकी जबरदस्त
In reply to संगीत आणि गायकी इतकी जबरदस्त by विजुभाऊ
कोण आहे "ती"?
In reply to कोण आहे "ती"? by पिलीयन रायडर
कोण आहे "ती"
In reply to कोण आहे "ती"? by पिलीयन रायडर
कोण आहे "ती"
In reply to संगीत आणि गायकी इतकी जबरदस्त by विजुभाऊ
ती गेली तेंव्हा रिमझिम पाउस
वा वा.. पुढील भागाची वाट पाहत
काय ते शब्द … !!
In reply to काय ते शब्द … !! by माम्लेदारचा पन्खा
हृ मंगेशकरांची चाल उत्तम आहे
In reply to हृ मंगेशकरांची चाल उत्तम आहे by प्रसाद१९७१
+१
In reply to +१ by समीरसूर
अर्थच नाही कळला तर कविता
In reply to अर्थच नाही कळला तर कविता by प्रसाद१९७१
खि:खि:
In reply to खि:खि: by स्पा
स्पावड्या
In reply to +१ by समीरसूर
तुम्ही साजणवेळा ऐकलय का?
In reply to तुम्ही साजणवेळा ऐकलय का? by पिलीयन रायडर
कळत नाही म्हणजे त्यात अर्थच
In reply to कळत नाही म्हणजे त्यात अर्थच by प्रसाद१९७१
का अर्थ लागलाच पाहिजे?
In reply to का अर्थ लागलाच पाहिजे? by पिलीयन रायडर
मी काय म्हणलो आहे ते तुम्ही
In reply to मी काय म्हणलो आहे ते तुम्ही by प्रसाद१९७१
एकूण
In reply to एकूण by मिसळलेला काव्यप्रेमी
मला अर्थ कळला नाही तर त्याला
In reply to मी काय म्हणलो आहे ते तुम्ही by प्रसाद१९७१
प्रगो, `अर्थ लागायलाच पाहिजे' ही अट असेल तर
In reply to प्रगो, `अर्थ लागायलाच पाहिजे' ही अट असेल तर by संजय क्षीरसागर
संक्षी - तुम्ही मला ओळखत नाही
In reply to संक्षी - तुम्ही मला ओळखत नाही by प्रसाद१९७१
अनिलांच्या कवितेबद्दल तर मला स्वतःचं कौतुक आहे
In reply to अनिलांच्या कवितेबद्दल तर मला स्वतःचं कौतुक आहे by संजय क्षीरसागर
एक तर मला तुमच्या सारखे
In reply to काय ते शब्द … !! by माम्लेदारचा पन्खा
ह्या निमित्ताने पूर्वी
अर्थ कळला असे नाही
In reply to अर्थ कळला असे नाही by मित्रहो
आपल्याला "हे सरता संपत नाही,
सुंदर !
>>>त्यामुळे `ग्रेस' ही फक्त
एक नितांतसुंदर गाणं.
In reply to एक नितांतसुंदर गाणं. by रेवती
अगदी अगदी!
In reply to अगदी अगदी! by पैसा
हैला! खरं की काय!
In reply to अगदी अगदी! by पैसा
सासुबै ड्युयाडी म्हनतात ते
In reply to सासुबै ड्युयाडी म्हनतात ते by जेनी...
हो हो!
माझेच्च
आयडी आहेत. झालंस्तर जास्त गडबड करणार्या आयडींना "ड्युप्लिकेट" आयडी चे "अदृश्य" आयडी कसं करायचं ते पण मला माहिती आहे. तुझ्यावर प्रयोग करून दाखवू? ;)In reply to हो हो! by पैसा
(No subject)
हे शिव धनुष्य आहे
मस्तच
साहेब वाट बघतोय विश्लेषणाची.
वाट बघतोय विश्लेषणाची.+१
आवडल.
छान रसग्रहण
एक बोधकथा
साहेब नुकताच तुमचा या विषयावर
हम्म,