Skip to main content

नवीन संपादक

लेखक नीलकांत यांनी सोमवार, 29/09/2014 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज पासून मिसळपाव.कॉम च्या संपादक मंडळात तीन नवीन संपादक सहभागी झाले आहेत. तसेच मिसळपावच्या महिला दालनात एक नवीन संपादक सहभागी होत आहे. येत्या सहा महिण्यांसाठी ह्या नेमणुका असतील. त्यापुढे आवश्यकता भासल्यास नवीन घोषणा करता येईल. नवीन संपादकांची नावे १) इस्पीकचा एक्का २) स्नेहांकिता ३) अजया अनाहिता संपादक १) मितान सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभकामना.

वाचने 30507
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

नवसंपादकांचे अभिनंदन ! कात्रीपूर्वक शुभेच्छा ! बादवे मिपावर संपादकीय निवडणुका ठेवाव्यात काय ? ;)

In reply to by कपिलमुनी

प्रत्येकाने blue print जाहिर करावी त्यानुशंगाने निवड व्हावी :) म्हणजे संपादकीय निर्णयाची कार्यपध्दति व पारदर्शकता अबाधित राहील.

*good* नवनिर्वाचीत संपादकांना मनापासुन शुभेच्छा *give_rose* (आणि सहानुभूती) *blum3* पैजारबुवा,

सर्व संपादकांचे अभिनंदन आणि संपादकांना लिहीते राहण्याची विनंती. संपादक झाल्यावर बरेचजण लिहायचे बंद / खुपच कमी झाले असे निरिक्षण आहे.

एक्कासाहेब उचला कात्री आणि कापा (प्रतिसादाची) फित होऊन जाऊ दे उद्घाटन ;)

अभिनंदन ! आणि संपादक कोण आहेत सांगितल्याबद्दल धन्यवाद ! आता संपादक मंडळाच्या कॉमेंट वर सावध प्रतिक्रिया द्यायला हे बरे !

अरे वा! मध्यवर्ती डोंबिवलीकर संमंमध्ये! :) चला! डोंबिवलीत आणखी एक कट्टा करायला नविन कारण मिळाले. एक्का काका, आता तुम्ही संपादकीय कामकाजाबरोबर तुमचे लिखाणसुध्दा पहिल्यासारखे चालू ठेवा हि नम्र विनंती.

In reply to by भाते

>>अरे वा! मध्यवर्ती डोंबिवलीकर संमंमध्ये! हायला म्हणजे काही दिवसांपूर्वी एका संपादकाशी पंगा घेतला तर!! प्रतिसादांना पंख लावून घेण्यास तयार राहावे आता. ;)

सर्व नव्या संपादकांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. सर्व विद्यमान संपादकांची यादी कुठे बघायला मिळेल?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

सर्व विद्यमान संपादकांची यादी कुठे बघायला मिळेल?
यादी येथे उपल्ब्ध आहे.

http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif ================ १) इस्पीकचा एक्का २) स्नेहांकिता ३) अजया अनाहिता संपादक १) मितान ============= http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hand-clapping-smiley-emoticon.gif सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभकामना.

सर्वांचे मनापासून आभार !!! तुमच्या सर्वांच्या अपेक्षांना उतरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल... ( अरे, कुठे गेली ती कात्री ?! :) ;) )

इस्पिकचा एक्का, स्नेहांकिता, अजया व मितान यांचे हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा!! या निमित्ताने अनेक वर्षांपासून अविरत सेवा देणार्‍या विद्यमान संपादकांचे अभार मानतो. नव्या सवंगड्यांमुळे त्यांच्यावरील कामाचा व जबाबदारीचा भार कमी होईल असा विश्वास आहे.

हॉट सीटवर बसल्याबसल्या हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव स्विकार व्हावा. सर्व नवसंपादकांचे अभिनंदन आणि संपादकिय वाटचालीसाठी शुभेच्छा.

सर्व नवीन संपादक मंडळीन्चे हार्दिक अभिनंदन ! इस्पिकचा एक्का जी आपले नाव पाहुन अत्यानंद झाला ... शुभेच्छा !

आणि संपादन करण्यालायक काही लिहू नये ही विनंती. लेखन जे मिपाची शान वाढवेल आणि मान उन्चावेल असे आमच्या कारकिर्दीत बहरावे.

In reply to by मितान

आणि संपादन करण्यालायक काही लिहू नये ही विनंती.
नवीन संपादक निरागस आहेत. :-P (ह. घ्या.) बादवे, प्रतिसादकांनो, वरील विनंती गं. घ्या.

संपादक म्हणून जे काही भोगावे लागते, याचा चांगला अनुभव माझ्यापाठीशी देखील आहे ;) त्यामूळे तुम्हाला सर्वात जास्त ज्याची गरज आहे ते "भरपूर शुभेच्छा" :) इस्पीकचा एक्का यांच्या लेखनामुळे थोडीफार ओळख झाली आहे व मितान मला चांगला ओळखते ;) तारेवरची ही कसरत तुम्हाला सहज जमेल व सर्वत्र आनंदच पसरत राहो यासाठी तुम्ही सर्वजण मनापासून या लष्कराच्या भाकऱ्या थापत प्रयत्न कराल याची खात्री आहे. पुन्हा एकदा भरपूर शुभेच्छा आणि अभिनंदन! ** सिलसिले के बाद कोई सिलसिला रौशन करें इक दिया जब साथ छोड़े दूसरा रौशन करें -ज़फ़र गोरखपुरी

संपादक म्हणून जे काही भोगावे लागते, याचा चांगला अनुभव माझ्यापाठीशी देखील आहे >>> =)) =)) =)) =)) " व्हायचे थांबले का " वाले आठवले ;)

सर्व नवीन संपादकांचे संपादक मंडळात स्वागत, अभिनंदन आणि शुभेच्छा! जास्त काही सांगून आताच घाबरवत नाही! सतत आईस-बकेट चॅलेंज घेऊन आहात असा विचार केलात तरी हरकत नाही! ;)

नवनिर्वाचितांचे अभिनंदन!! अगदी सार्थ निवड.. जाता जाता: संपादक पदासाठी पुढच्या जागा कधी निघणार आहेत? :) :)

नवीन संपादकांचे अभिनंदन. नविन संपादकांनी आपले लेखन पहिल्यासारखेच जोमाने सुरु ठेवावे अशी विनंती. :smile:

नवीन संपादकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!

माझ्यासारख्या आळशी व्यक्तीला कामाला लावणं हे आईसबकेटच्यालेंजाहून अवघड काम आहे. त्यासाठी जेष्ठ संपादकांना हार्दिक शुभेच्छा ! ;)

मनःपूर्वक अभिनंदन , नवीन संपादकांची पूर्वी कधी राडे झाले होते का हे आठवण्याचा प्रयत्न केला पण मग लक्षात आले अलीकडे मी खूप मवाळ झालो आहे , सब का साथ सबका विकास धोरण अंगवळणी पडल्याने पुढील ५ वर्षात संपादकासह मिपाकर व मालकाशी सौजन्याने वागण्याची लेखी हमी भरत आहे :-)

नव संपादकांचे अभिनंदन... ए़डमिनना विनंती - एकूण आता अन्य संपादक मिळून किती जण झाले? त्यांची नावे व अन्य माहिती पुन्हा दर्शवता आली तर छवी तयार होईल. छान,