Skip to main content

कर्फ्यू

लेखक चिनार यांनी मंगळवार, 16/09/2014 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी एकदा आमच्या गावात कर्फ्यू लागला होता. त्यावेळी त्याचा अर्थ काळात नव्हता पण घराबाहेर पडायचे नाही असे वडिलांनी बजावले होते. मग घरात बसुन बसुन कंटाळ आल्यामुळे मोठ्यांची नजर चुकवुन आम्ही गच्चीवर गेलो. रस्त्यावर शुकशुकाट होता. गच्चीवर आमचं क्रिकेट सुरु झालं. त्याच वेळी आकाशातुन एक विमान चाललं होतं. मला प्रश्न पडला ,गावात कर्फ्यू असतांना गावावरून विमान कसं काय जाऊ शकतं ? मग वाटलं की कदाचित पायलटला कर्फ्यूविषयी माहिती नसेल. आणि अशावेळी त्या पायलटला ही माहिती पुरवणं हे आमचं कर्तव्यचं नाही का ? मग क्रिकेट सोडून आम्ही विमानाकडे बघुन मोठमोठ्याने ओरडायला लागलो ," अबे … कर्फ्यू आहे … वापस जा !! वापस जा !! " आमचा आवाज जगात फक्त दोघांना ऐकू गेला. आमच्या गल्लीत गस्तीवर असलेला पोलिस आणि आमचे तीर्थरूप !!! पुढचं काही विचारु नका . पोलिस परवडला पण तीर्थरूप नको असं झालं होतं !!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3151
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

अधून मधून हल्ली कर्फ्यू लागायला लागलाय. कितीहि रिफ्रेश मारलं तरी तोच मेसेज येत राहतो. तुमच्याकडे ह्यावर काहि उपाय आहे का?

इतका संवेदनशील विषय लेखकाने ज्या तरलतेने आणि आत्मीयतेने मांडलाय त्याला दाद दिल्यावाचून राहवत नाही. मला खात्री आहे की वाचकांपैकी कित्येकांच्या बाबतीत डोळे पाणावले अशी अवस्था झाली असणार. लिहीत रहा. आम्ही वाचत राहू.

हा हा हा ... मस्त किस्सा.. अबे … कर्फ्यू आहे … वापस जा !! वापस जा !! हा किस्सा जर जपानमध्ये या काळात घडला असता तर पोलिसांना 'अबे' यांना वापस जा असे म्हणल्यामुळे राग आला असता...

"भिक नको पण कुत्र आवर" ह्या म्हणीचा अर्थ आज मला समजला. पैजारबुवा,

Avadala... Awantar :- Marathi typing hoat nahiye Windows 7 war.. Kay karave ?