कर्फ्यू
लेखनप्रकार
लहानपणी एकदा आमच्या गावात कर्फ्यू लागला होता. त्यावेळी त्याचा अर्थ काळात नव्हता पण घराबाहेर पडायचे नाही असे वडिलांनी बजावले होते. मग घरात बसुन बसुन कंटाळ आल्यामुळे मोठ्यांची नजर चुकवुन आम्ही गच्चीवर गेलो. रस्त्यावर शुकशुकाट होता. गच्चीवर आमचं क्रिकेट सुरु झालं. त्याच वेळी आकाशातुन एक विमान चाललं होतं. मला प्रश्न पडला ,गावात कर्फ्यू असतांना गावावरून विमान कसं काय जाऊ शकतं ? मग वाटलं की कदाचित पायलटला कर्फ्यूविषयी माहिती नसेल. आणि अशावेळी त्या पायलटला ही माहिती पुरवणं हे आमचं कर्तव्यचं नाही का ?
मग क्रिकेट सोडून आम्ही विमानाकडे बघुन मोठमोठ्याने ओरडायला लागलो ," अबे … कर्फ्यू आहे … वापस जा !! वापस जा !! "
आमचा आवाज जगात फक्त दोघांना ऐकू गेला. आमच्या गल्लीत गस्तीवर असलेला पोलिस आणि आमचे तीर्थरूप !!!
पुढचं काही विचारु नका . पोलिस परवडला पण तीर्थरूप नको असं झालं होतं !!
वाचने
3144
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
मिपाला पण
मस्त विषय
पोलिसाने "अबे वापस जा" एवढेच
तुम्ही बेळगावात होतात का ?
हा हा हा...
धन्यवाद चिनारशेठ
Mast...
असाच जमानिवरचा कर्फ्यू