Skip to main content

जिव्हा शुद्धी एक राष्ट्रीय अभियान

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 22/09/2014 17:52 या दिवशी प्रकाशित केले.

जिव्हा शुद्धी एक राष्ट्रीय अभियान

पचा पच थुंकणे व तसेच येता जाता कशा न कशा कारणांनी शिव्या देणे हा आपला राष्ट्रीय टाईम पास आहे. माता व बहिणींवर अशा मेहरबानीयां फार होतात. `च्या यला` हे पालुपद जास्त अन् ग्राम्य शिवी कमी अशी आजची अवस्था आहे. बामणांच्या चिकन मटन खाण्यामुळे मागणी वाढून भाव चढले असे चेष्टेने म्हणतात. खरे खोटे माहिती नाही. पण शिव्यांच्या मक्तेदारीत गैरब्राह्मण समाजाच्या मुक्त संचारात ब्राह्मणी जिव्हा तितक्याच जिव्हाळ्याने चालताना ऐकून, 'लगे रहो' असा पवित्र संदेश द्यावासा वाटतो...! भाषा शुद्धीच्या चर्चा कानावर येतात. पण शिव्यांना 'चले जाव' करायला आपली जीभ का कचरावी? यावरून आठवले पूर्वी हवाईदलातील कार्यकाळात माझ्या मुखी ब्लडी,बार्टर्ड, ईडीयट,उल्लू के पठ्ठे आदी हीन अभिरुचीचे शब्द न कळत वास करून होते. मुले झाल्यावर त्यांचा अभ्यास घ्यायला सुरुवात अशा शब्दांनी नको असे पत्नीने साध्या शब्दात सुचवून जागे केले व वेळीच मी सावध झालो. असो... संस्कारक्षम बालवयातील मुलांसमोर वरिष्ठांनी मुखरस थुंकण्याच्या सवय़ीला व आपल्या ग्राम्य भाषा वैभवाला कटाक्षाने अव्हेरले तर ते योग्य ठरणार नाही काय? असे एक राष्ट्रीय अभियान सुरू करायला नमोंनी १५ ऑगस्ट च्या मुहूर्तावर लाल किल्ल्यावरील आपल्या दणकेबाज शैलीत उद्घोषणा करायला हवी काय? ते मिपाकरांनी आपल्या पासून सुरुवात केली तर नाही का चालणार?

वाचने 37927
प्रतिक्रिया 124

प्रतिक्रिया

प्रतिसादांचे अवलोकन केले असता (प्रस्तुत धागाकर्त्याचे, फॉर रीझन ऑफ बायस, आणि उपप्रतिसादांचे गणन न करता) हा प्रस्ताव ६-१२ प्रतिसादांनी हरला आहे!!!! मिपाचे मूळ स्थान, त्याची प्रतिष्ठानापासूनची भूमिका, धागाकर्त्यांच्या लक्षात न आल्याबद्दल त्यांचे सांत्वन! आणि, मिपासंस्थापक तात्या अभ्यंकरांच्या शाब्दिक पुण्याईचा विजय असो!!!!! :)

ओकसाहेब जिवश्च कंठश्च मित्र कोण? माझी व्याख्या सोपी आहे. "ज्याचे सहर्ष स्वागत आपण चार शिव्या घालुन करतो तो!" ज्यांना शिव्या दिलेल्या आवडत नाहीत किंवा ज्यांना उघड शिव्या देणे परवडणारे नसते त्यांना कुणी शिव्या देत नाही. आजुबाजुला अपरिचीत स्त्रिया असतील शिवी देणे टाळले जाते. रस्त्यावरील भांडणे, हमरीतुमरीचा भाग वगळता शिव्या या आपुलकीनेच दिल्या जातात. शिव्या नसल्या तर मित्रांचे संभाषण कसे होईल? मुळात बहुत्वेकरुन शिव्या या उद्गारवाचक चिन्हांऐवजी वापरल्या जातात, त्या कुणाला उद्देशून वगैरे नसतात. शिव्या देणे बंद वगैरे करणे अमान्य. अर्थात आजुबाजुला कोण आहे आणि आपण कुठे आहोत याचे थोडे तारतम्य अवश्य बाळगावे.

In reply to by सर्वसाक्षी

जिवश्च कंठश्च मित्र कोण? माझी व्याख्या सोपी आहे. "ज्याचे सहर्ष स्वागत आपण चार शिव्या घालुन करतो तो!"--१०० % राईट्ट , सर्वसाक्षी साहेबांशी सहमत ,आताच बोर्डावर आलेला पटाईत साहेबांचा लेख ही हेच मत व्यक्त करतोय असे वाटते.

शिव्यांशिवाय कम्युनिकेशन, आय जस्ट कान्ट इमॅजिन यू नो ! ;) मी शक्यतो शिव्या देत नाही, दिल्याच तर त्या मनातल्या मनात देण्यावर जास्त भर असतो. ट्रॅफिक जाम मुळे आणि अतरंगी वाहन चालकांमुळे मात्र हल्ली टाळक सटकुन २-४ सॉफ्टकोअर शिव्या हासडतो... परवाच हायवेवर मधेच बाईक वळवु का नओ वळवु का नको अशा विचार मग्न असलेल्या पोराने माझी दुचाकी जवळ येताच मधेच बाईक वळवली ! मी ओरडले ! अरे छगन च्यायला डोक घरी ठेवुन आलास काय ? भाउला राग आला ! पुढे जाउन त्याने बाईक थांबवली आणि वाद घालायला सुरुवात केली,मी म्हंटल काय प्रॉब्लेम झाला, तर तो बोलाला की चूक झाली म्हणुन काय झालं छगन कशाला म्हणालास ? तो आग्री बाला आहे हे त्याच्या बोलण्यावरुन कळले, मी त्याला विचारले की छगन म्हणु नको तर काय म्हणु ? कन्फुज झाला आणि कीक मारुन मुकाट निघुन गेला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

In reply to by मदनबाण

मी त्याला विचारले की छगन म्हणु नको तर काय म्हणु ?
"मिथुन' म्हण!!!! जल्लां सगलां काय नांवानच हाय!!! :)

"छगन" ही शिवी आहे का ? शिव्यांचा काही भौगोलिक मापदंड ( जी आय) असतो का? नाशिक परिसरात " छगन" ही शिवा नसावी ( असे वाटते )

In reply to by विटेकर

अहो विटुकाका... ती शिवी नाही, पण ते सुद्धा लोकांना सहन होत नाही ! शिव्यांचा काहीही मापदंड नसतो ! देणारा सुद्धा गमतीने देउ शकतो आणि घेणारा सुद्धा गमतीने घेउ शकतो ! अर्थात पुरुष मित्रपरिवारात हे सहज होत्,स्त्रीयांचे काय माहित नाही... बहुधा परवा पमाकडे {प्रमिला}मंगळागौर झाली, काय सुरेख कार्यक्रम झाला होता ! पण आंबेडाळ काय नीट जमली नव्हती ! या पलिकडे कदाचीत त्यांचा संवाद जात नसावा ! { आपला अंदाज हो} ;) बाकी प्रकाकांनी दिलेला कोणत्या तरी स्त्रीचा *** पिळीन असा संवाद आठवतोय ! बहुधा त्यांनीच अशाच विषयावर धागा काढला होता का ? ते नीट आढवत नाही आता ! प्रकाका यावर अधिक प्रकाश टाकु शकतात याची बेशर्त गॅरेंटी देतो. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

In reply to by मदनबाण

या पलिकडे कदाचीत त्यांचा संवाद जात नसावा ! { आपला अंदाज हो} Wink अगदी अगदी ! फार तरं " पण तू काहीही म्हण , पमाचा नवरा अगदीच हेंदरट आहे " ही परमावधी !

In reply to by शिद

अरे बाप रे ! ( की अग बाई गं !) म्हणावे ? की दोन्ही लागू की दोन्ही गैरलागू? . . . पण तुम्ही नाशिक परिसरातील नाही , बरोब्बर ना ?

In reply to by शिद

छगन = बिचवाला...'आत्ता गं बाया' टाईप (आम्हा मित्रांच्या शिव्या-शब्दकोषाप्रमाणे) आम्ही तर शाळेत "मोहन" असा पण शब्दप्रयोग कारायचो. ज्याला बोलायचो तो बहुदा श्रीकृष्णाचं एक नावाने मला हाक मारत आहेत असा समज करुन घ्यायचा.

शिव्या ही माणसाची सहज प्रव्रुत्ती आहे. पुलं नी वस्त्रहरण नाटकाच्या १७५ व्या प्रयोगाच्या निमित्ताने केलेलं अध्यक्षिय भाषण मिळाल तर बघा..

"इचिभन" म्हणजे नक्की काय? "शाळा" या चित्रपटात बर्‍याच वेळा सुर्‍या च्या तोंडात हा शब्द आलेला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

'तेच्यायला' >> 'हेच्यायला' >> इसकी मां का... तसेच इचिभन>> इसकी (हेची-हिची: बोलीभाषेतील रूप) बहन का... असे असावे असा अंदाज.

In reply to by बॅटमॅन

सांगली-मिरजेकडे "लई चॅप्टर बोड्याचा" आणि " बारा बोड्याचा" अनेकदा ऐकले आहे. याचा काय अर्थ म्हणायचा? संस्कृत शब्द कोणते?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अहो, वेदात नाही असे जगात काही नाही, आणि संस्कृतमधे ज्याला प्रतिशब्द नाही, असा कोणताही शब्द नाही असे म्हणतात ना? की असे सांगणारेच चॅ. बो. म्हणायचे?

In reply to by चित्रगुप्त

काय आठवण करून दिलीत चित्रगुप्तजी....फीलिंग लैच नॉस्टॅल्जिक. 'बाराबोड्याचा' मागे काहीतरी व्युत्पत्ती आहे असे वाचल्याचे स्मरते. नक्की काय ते तूर्त माहिती नाही, पाहून सांगतो. इन जण्रल, -बोड्याचा हा प्रत्यय म्ह. त्या अगोदरचा गुणधर्म अधोरेखित करण्यासाठी असतो. उदा. तो लै हरामखोर**ड्याचा आहे. इथे -**ड्याचा हा प्रत्यय, हरामखोरपणा हा गुणधर्म त्या व्यक्तीत आहे हे सूचित करण्यासाठी वापरला जातो. एखादा गुणधर्म माणसात आहे याचा अर्थ त्या विशिष्ट अवयवातही आहे अशी काहीशी ती धारणा आहे.

In reply to by चित्रगुप्त

काय आठवण करून दिलीत चित्रगुप्तजी....फीलिंग लैच नॉस्टॅल्जिक. 'बाराबोड्याचा' मागे काहीतरी व्युत्पत्ती आहे असे वाचल्याचे स्मरते. नक्की काय ते तूर्त माहिती नाही, पाहून सांगतो. इन जण्रल, -बोड्याचा हा प्रत्यय म्ह. त्या अगोदरचा गुणधर्म अधोरेखित करण्यासाठी असतो. उदा. तो लै हरामखोर**ड्याचा आहे. इथे -**ड्याचा हा प्रत्यय, हरामखोरपणा हा गुणधर्म त्या व्यक्तीत आहे हे सूचित करण्यासाठी वापरला जातो. एखादा गुणधर्म माणसात आहे याचा अर्थ त्या विशिष्ट अवयवातही आहे अशी काहीशी ती धारणा आहे.

इचि- त्याच्या/त्याच/, भन म्हणजे बहिण.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्मूबुवांचा हा प्रतिसाद म्हणजे अंमळ सौदिंड्यन उच्चार वाट्टोय. आय होप अर्थ समजण्यातले कंटक दूर झाले असतील ;)

कुठल्या, कुठे, आणि कधी द्यायच्या एवढं कळलं; तर शिव्या दिल्या म्हणून बिघडत नाही. एक मत आपलं. बाकी चालूदे.

मित्रांनो, बडा प्रधान सेवक, न. मो. यांनी आज अशी हाक दिली की हे सर्व भारतीय नागरिकांनो, आपण आपल्या कामातून आठवड्यातील 2 तास सफाई अभियाना देऊ शकणार नाही काय... त्याच प्रकारे मी सुचवतो हे मिपा मित्रांनो आठवड्यातील 2 तास आपण जिव्हाशुद्धी करता देऊ शकत नाही काय ... ज्यांना नाही द्यायचे त्यांना हे आवाहन नाही. पण जे राष्ट्र निर्मितीच्या विधायक कामात आपला सहभाग असावा असे कळकळीने मानतात व सक्रीय भाग घेतात त्यांनी काही तास आपल्या जिव्हेवर ताबा ठेवायला काय हरकत आहे... विचार व्हावा....

In reply to by शशिकांत ओक

अपशब्दांचा अनावश्यक वापर करू नये असे मलाही वाटते. शिव्यांना सर्वस्वी बासनात बांधुन ठेवावं अस काही वाटत नाही. >>>>जे राष्ट्र निर्मितीच्या विधायक कामात आपला सहभाग असावा असे कळकळीने मानतात व सक्रीय भाग घेतात त्यांनी काही तास आपल्या जिव्हेवर ताबा ठेवायला काय हरकत आहे... राष्ट्रनिर्मितीच्या कामात शिव्यांमुळे अडथळा येतो? असे वाटत नाही. पश्चिमेकडची जी राष्ट्रे आपण प्रगत मानतो तिथली जनता येता जाता अपशब्द वापरत असतात. इतरांसाठी तसेच स्वतःच्या चुकासाठी स्वतःलाही.

In reply to by शशिकांत ओक

राष्ट्रनिर्मिती आणि जिव्हाशुद्धीचा परस्परसंबंध लक्षात आला तर बरं होईल. आणि जिव्हाशुद्धीपेक्षाही आपण राहतो, कामासाठी जातो, वावरतो त्या परिसराच्या स्वच्छतेसाठी काही करता आलं तर पाहावं (अर्थात ज्याचं त्यानं)!! बाकी पेठकर काकांशी सहमत, शिव्यांचा अतिरिक्त वापरही नको आणि बासनात गुंडाळून ठेवणेही नको. बाकी अष्टमी जवळ आलीच आहे, घागरी फुंकणं चालू देत!! ;)

काका ...शिरियस मोड ऑन >>>> माझ्या मते शिव्या देण्याचे दोन प्रकार आहेत , एक म्हणजे लेव्हलच्या माणसाबरोबर लाडिक संवादात , उदा. काय रे भाड्या कुठे आहेस दोन दिवस ? या करिता लेव्हल लागतेच . उद्या मी जर हे पेठकर काकांशी बोलताना वापरल तर काका माझी छानशी रेसीपी तयार करुन घुबडांना खायला घालतील...शिवाय माझ्यासाठी जे आदरार्थी आहेत त्यांना अशी भाशा वापरायची माझी मजल देखील जात नाही.. .हे वरील वाक्यातील भकाराने सुरु होणारा शब्द मी तुमच्याशी, पका काकाशी पिंडा काकांशी बोलताना वापरु शकत नाही, मजल जात नाही ..पण समवयस्क , आणि गहरा दोस्ताना असलेल्याशी मात्र बोलु शकतो ..उदाहरणे खुप आहेत , आणि त्यांना मनसोक्त शिव्या ही द्यायच्या आहेत , त्यातही फरक आहे ...खानदेशी, कोल्हापुरचे ( जे एकमेकांशी जवळ आहेत ) त्यांच्या ऐकाल तर घाम फुटेल .. पण उद्या एखादा पुणेकर मला 'बैल रान्डीच्या' म्हटल्यावर मला आश्चर्य वाटेल ( अर्थात माझ्या सारख्याला बैल म्हणने म्हणजे तो बैल नक्की दुष्काळग्रस्त भागातला असावा ;) पहिल्यांदा जेव्हा ही शिवी ऐकली तेव्हा ....असो ) ...या झाल्या कॅज्युल गोष्टी .. आता दुसरा प्रकार म्हणजे रागा-रागात शिव्या देणे ( मान्य आहे की या प्रकारात शिव्या देण्याने भो* पडत नाहीत ) पण मानसिक व्हेन्टिलेशन होते ..म्हणजे जिव्हा अशुध्द होत असली तरी मन शुध्द होते की !! मग कशाल अडचण ...बर्‍याच जेव्हा असे होते त्याला आपल्याला शारिरिक दुखापत करु शकत नाही, त्याच्यांकरिता हा शेवटचा पर्याय आहे ... असो प्रेमचंद मुन्शी ची एक कथा आठवली ... एक माणुस आपल्या बॉस च्या वागण्याने खुप परेशान असतो ..बॉसचा राग दिवस-रात्र बायका-पोरांवर , कधी मित्रांवर काढत असतो ...त्याच्या एक मित्र त्याला शेवटी विचारतो काय रे बाबा का चिड चिडा झाला आहेस हल्ली ? कारण सांगीतल्यावर मित्र आयडिया देतो ...याच वागणं बदलत ...शांत होतो ..बायकोशी आनि -पोराबाळांशी व्यवस्थित वागायला लागतो ...बायको ला कळत नाही ..ती जरा लक्ष देते ..तर समजते की हा दररोज अर्धा तास उशीरा येतो आहे ...एक दिवस ती त्याचा पिच्छा करते ...हा ऑफिसमधुन सरळ एक एकांताच्या ठिकाणी जातो अजिबात कुणी नसत ...एका झाडाला त्याच्या बॉस चा फोटो लावलेला असतो ...त्याच्या बॉस ला तो जे दणकुन शिव्या देत असतो फोटोवर दगड फेकत असतो ...सरते शेवटी पायातला जोडादेखील मारतो ..अर्धा तास खंड शिव्या दिल्यावर चेहर्‍यावर शातंता आणि हास्य दिसते ....बायकोला कारण कळत त्याच्या घरी शांत वागण्याच !! असो ..बाकी आपकी मर्जी शिरीयस मोड ऑफ

In reply to by सुहास..

माझ्या मते शिव्या देण्याचे दोन प्रकार आहेत +१ फॉर दोन्ही प्रकार.. आता उदाहरणार्थ मा.चो. ही शिवी घ्या. (म्हणजे माखनचोर म्हणायचे आहे मला...) ... तुमच्या मित्राला प्रेमाने (किंवा लाडीकपणे) "काय रे मा.चो. ? काय म्हणतोस" असे म्हणा. त्याला काही शिवी दिली असे वाटणार नाही. पण हेच जर रागाने आणि दात ओठ खात "माखनचोर" असे म्हणा आणि बघा काय होते ते....

मित्रांनो, सलगी युक्त संभाषणातून असे अर्वाच्य शब्द वापरायची आपल्याला सवय झाली आहे, ठीक आहे, पण ती अन्य लोकांना संबोधित करण्यासाठी योग्य नाही याचे भान आपल्या कडून राखले जाते... मित्रा `सवय` ही सबब होऊ शकत नाही. अयोग्य सवय सोडणे केंव्हा ही हितकर...

In reply to by शशिकांत ओक

@मित्रा `सवय` ही सबब होऊ शकत नाही. @अयोग्य सवय सोडणे केंव्हा ही हितकर... >>> या परस्पर विसंगत वाक्यांचा अन्वय कसा साधायचा? ;)

आम्हीच लिहिलेल्या एका लेखाची लिंक इथेच डकवतो आहे. विषयाला अनुसरौन असल्याने तेवढीच स्वतःच्या धाग्याची प्रसिद्धी करुन घेतो ;)

In reply to by मृत्युन्जय

आम्हीच लिहिलेल्या एका लेखाची लिंक इथेच डकवतो आहे. विषयाला अनुसरौन असल्याने तेवढीच स्वतःच्या धाग्याची प्रसिद्धी करुन घेतो ;) भाषिक संपत्ती http://misalpav.com/node/15135