परिपूर्ण एकटेपणा
जी ए कुलकर्णी यांच्याबद्दल आणि त्यांच्या एकांतप्रियतेबद्दल बद्दल अनेक कथा ऐकल्या आहेत . मुंबई पुणे सारखी जागा सोडून त्यांनी धारवाड या छोट्या जागी राहणे पसंद केले . त्याना भेटायला अनेक लोक राज्याच्या कानाकोपर्यातून यायची . त्यांना ते फारस आवडायचं नाही . म्हणून ते बाजूला खेळणाऱ्या मुलाला बोलावून त्याला घराला बाहेरून कुलूप लावायला सांगत आणि स्वतहा आत बसून राहत . एका creative genius ची फ़क़्त एक लहर म्हणून त्याकडे बघतात का ? मुळात तुमचा हक्काचा एकांत मिळवण्यासाठी तुम्हाला जी ए सारख creative genius असणेच आवश्यक आहे का ? अनेकदा १० ते ५ नौकरी करणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या लोकांची पण ती गरज असतेच की . हि गरज दाबून बहुतेक लोक जगतात .
मी एका nuclease मध्यमवर्गीय कुटुंबातल अपत्य . एकुलता एक मुलगा . आई बाबा दोघेही नौकरीला . त्यामुळे मला लहानपणा पासूनच एकटे राहावे लागले . पण माझ आणि एकटे पणाच भन्नाट जुळून आल . एकटे पणा आणि त्यातून येणार स्वातंत्र्य मला जाम आवडल . नंतर नंतर तर मला आजू बाजूच्या गर्दीचा जाचच होऊ लागला . शाळेतून पटकन घरी पटकन कधी येतो अस मला व्हयाच . फ़क़्त गणित आणि विज्ञान मध्ये चांगले मार्क येणे म्हणजे हुशार अश्या भंपक कल्पना असणाऱ्या शाळेत असाही जीव घुसमट करायचा . नंतर शिक्षणासाठी बाहेर गावी आल्यावर मी होस्टेल मध्ये राहायला लागलो . पण एका रूम ची एवढी छोटी जागा ३ लोकांनी शेयर करायची हि कल्पना मला रानटी वाटली . म्हणजे तुम्ही कधीही काहीही करत असलात तर किमान चार डोळे , दोन खिडक्या आणि एक दरवाजा ते बघत असतो हे मला तरी inhuman वाटायचं . मुंबई मधल्या लोकल प्रवासासारख . होस्टेल मध्ये बरीच धमाल केली असली तरी मी माझी स्पेस कायम मिस करायचो . जेंव्हा मला पहिला जॉब मिळाला तेंव्हा मी लगेच flat भाड्याने घेतला . आणि तिथे एक टीवी . माझ्या पगाराचा निम्म्याहून जास्त हिस्सा भाड देण्यात जायचा पण प्रत्येकाला आपली स्पेस घेण्याची किंमत चुकवावी लागते .
आतापर्यंत माणुसघाणा म्हणून माझी बर्यापैकी बदनामी झाली होती . नातेवाईक 'तू आमच्याकडे येतच नाहीस ' म्हणून माझ्या नावाने ओरडायचे . पण सगळ्या नातेवाईक नि जमून काही धार्मिक विधी करायचे , एकमेकांची package विचारायची , कुणाची एकाची ठरवून क्रूर पणे खेचायची आणि इतर बर्याच निरर्थक गोष्टी फ़क़्त पिढ्यान पिढ्या चालू आहेत म्हणून करायच्या या गोष्टीं मध्ये मला रस नव्हता . म्हणजे मी एकटा असताना काही भव्य दिव्य करायचो अशातला भाग नाही पण मला माझी पुस्तक , माझा टीवी , आणि माझा परिपूर्ण एकटे पणा जास्त आवडायचा . आम्ही मित्र ट्रीप ला गेलो कि २ दिवस तरी घरापासून दूर राहायचो . तेंव्हा पण मित्रांसोबत धमाल करून झाली की मी एक तास तरी beach वर माझ एकटेपणा शोधण्यासाठी निघून जायचो .
लग्नानंतर माझ्या या मनमुराद एकटेपणावर गदा आली . तेंव्हा पण माझी बायको आणि मी बसलो असताना मध्येच laptop उचलून मधल्या खोलीत निघून जायचो . बायको च्या चेहऱ्यावरचे हिरमुसलेले भाव अजून पण कधी कधी मला guilt देतात . नंतर नंतर या एकटे पणा पायी मी माझ्या जवळच्या मित्राना अतिशय क्रूर पणे कटवायला लागलो . आणि माझी मला च या अतिरेकाची जाणीव झाली . आणि मी माझ्यात थोडे बदल केले . पण ते फ़क़्त जवळच्या लोकांसाठीच .
आपल्या समाजात एकटे राहण्याबद्दल आणि हक्काने स्वतःची स्पेस घेण्यार्या लोकांबद्दल काही जबरी गैरसमज आहेत . म्हणजे एखादा माणूस एकटा राहात असेल तर आजू बाजू च्या लोकाना ह्याच्या आयुष्यात काही तरी tragedy असेल असा समज होतो . म्हणजे एकट राहणे हे by choice असूच शकत नाही अस काही वाटत असेल काय ? स्वतःच्या स्पेस बद्दल भारतीय समाजा इतका उदासीन समाज दुसरा नसेल . आपल्या लोकाना कायम उत्सवप्रिय , गलबल्यात राहाण्याच brainwashing झाल असत कि काय असा प्रश्न पडतो . म्हणजे खूप लोक परिस्थितीमुळे (आर्थिक आणि सामाजिक ) स्वतःची स्पेस नाही घेऊ शकत हे मान्य पण ज्याना शक्य आहे ते पण आपली मुलभूत गरज पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात का हा प्रश्न आहे . आपण एकटे झालो म्हणजे समाजाच्या सुरक्षा चक्राबाहेर आलो . आपण लोकाना भेटायला नाही गेलो तर आपल्याला प्रसंगात कुणी येणार नाही या भावनेने अनेक लोक आपली स्पेस नाकारून पुन्हा लोकांच्या घाण्यात इच्छा नसताना घुसतात (वैयक्तिक sample survey मधून काढलेला निष्कर्ष : त्यामुळे बरोबर असेलच याची खात्री नाही ) एकटे राहणे ज्या समाजाच्या चौकटीत बसत नाही तिथे आपण misfit आहोत हि भावना कधी कधी बळावते . सतत स्वतःची स्पेस नाकारण्याचे काही वैयक्तिक / सामाजिक परिणाम होऊ शकतात का ? आपल्या समाजात स्वतःची स्पेस घेणाऱ्या लोकांवर ठप्पे मारणे समाज थांबवेल का ?
समाज नावाच्या जनावराशी मुकाबला करणे मुळातच अवघड . झु मधल्या प्राण्यांसारखे compartment करून श्रेण्या देणाऱ्या समाजात तर ते अजूनच अवघड .
मुळात स्पेस ची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते . वयाच्या तिसाव्या वर्षी माझी स्वतःची एक व्याख्या आहे ( ३ वर्षापूर्वी ती drastically वेगळी होती ) माझी व्याख्या विचाराल तर एक आळशी दिवस . कुठेही जायचे नाही . कुणीही येणार नाही . फ्रीज मध्ये २ बियर आहेत . घरात कुणी हि नाही . अगदी बायको पण नाही . टीवी चालू आहे . नेट पण एकदम फास्ट चालू आहे . वेळ दाखवणाऱ्या सगळ्याच साधनांमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे . आणि मनमुराद एकटेपणा प्यायचा आहे . कुणीही तुम्हाला जज करत नाहीये आणि तुम्हाला कोणी जज करत नाहीये . मस्त पैकी कुठला तरी nostalgia आहे सोबतीला . बस्स . अजून काय पाहिजे .
याद्या
17228
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमच्या भावना पोहोचल्या
असं कसं दादा असं कसं?
+१
In reply to असं कसं दादा असं कसं? by आदूबाळ
+२
In reply to +१ by आजानुकर्ण
तस नाही . नेट वर असणे
In reply to +१ by आजानुकर्ण
खरंच की...नेट आणि टिवी चालू
In reply to असं कसं दादा असं कसं? by आदूबाळ
पटतय पटतय अगदी पटतय. मला सण
खयाल अपना अपना !
To each his own : )
In reply to खयाल अपना अपना ! by डॉ सुहास म्हात्रे
बहुतांशी सहमत आहे. एकटेपणाची
एकुटघाणा.
In reply to बहुतांशी सहमत आहे. एकटेपणाची by बॅटमॅन
पण समाज म्हटला की एकुटघाणाच
In reply to एकुटघाणा. by साती
अगदी अगदी
In reply to बहुतांशी सहमत आहे. एकटेपणाची by बॅटमॅन
अमोल साहेब
कसला भन्नाट अनुभव असेल .
In reply to अमोल साहेब by सुबोध खरे
अमोल साहेब
In reply to कसला भन्नाट अनुभव असेल . by पिंपातला उंदीर
पण लोकाना भेटायला नाही गेलो
@सुहास : भन्नाट प्रतिक्रिया
In reply to पण लोकाना भेटायला नाही गेलो by सुहास..
लिंक द्यायची राहिली ..असा ही
ब्लॉग एकच नंबर ... खुप आवडला.
In reply to लिंक द्यायची राहिली ..असा ही by सुहास..
आम्ही त्यातलेच.
चांगलं लिहिलंय. आवडलं. मला पण
हा एकटेपणा म्हणजे काय रे भाउ ?
एकटेपणा आवडणे म्हणजे
In reply to हा एकटेपणा म्हणजे काय रे भाउ ? by बाबा पाटील
एकटे म्हणा म्हणजे माणुसघाणेपणा नाही हो !
@निट वाचा कि पाटिल. अस काय
In reply to एकटे म्हणा म्हणजे माणुसघाणेपणा नाही हो ! by बाबा पाटील
आवड एकेकाची....
मान्य आहे.
पाटील तुम्हाला असे का
In reply to मान्य आहे. by बाबा पाटील
हम्म्म..
ज्याचा त्याचा प्रश्न आहे हा....
लेखन आवडले.
मी तर परीक्रमेवरुन घरी
मला एक कळलं नाही
+१
In reply to मला एक कळलं नाही by पिवळा डांबिस
सहमत
In reply to मला एक कळलं नाही by पिवळा डांबिस
आग्गो माझी बाये!!!
In reply to सहमत by पैसा
काकूंक इच्यारून लिवलांस मां?
In reply to आग्गो माझी बाये!!! by पिवळा डांबिस
एकटेपणा
In reply to काकूंक इच्यारून लिवलांस मां? by पैसा
लग्न करताना तुम्ही एका जिवंत
In reply to सहमत by पैसा
गैसमज नाही
In reply to लग्न करताना तुम्ही एका जिवंत by पिंपातला उंदीर
प्रत्येक ठिकाणी मी हा असाच
In reply to सहमत by पैसा
हिमालयात एक बंगला नांवाची
In reply to प्रत्येक ठिकाणी मी हा असाच by विलासराव
म्हनुनच तर आमची बाजु स्पष्ट
In reply to हिमालयात एक बंगला नांवाची by पिवळा डांबिस
है है. अदुगरच बांदलिय कुनीतरी
In reply to हिमालयात एक बंगला नांवाची by पिवळा डांबिस
हेचा मालक 'रेन्ट' आहे? असणारच
In reply to है है. अदुगरच बांदलिय कुनीतरी by डॉ सुहास म्हात्रे
आवडलं
In reply to प्रत्येक ठिकाणी मी हा असाच by विलासराव
जरा जास्तच ओव्हर लिहिलाय
In reply to सहमत by पैसा
+१.
In reply to जरा जास्तच ओव्हर लिहिलाय by बॅटमॅन
आलात!
In reply to जरा जास्तच ओव्हर लिहिलाय by बॅटमॅन
बरं मग?
In reply to आलात! by पैसा
असू दे असू दे!
In reply to बरं मग? by बॅटमॅन
अस्सं होय!
In reply to असू दे असू दे! by पैसा
बरं मग?
In reply to अस्सं होय! by कवितानागेश
असोच!
In reply to बरं मग? by बॅटमॅन
बरं मग?
In reply to असोच! by पैसा
कापूसकोंड्याची गोष्ट आठवायला
In reply to बरं मग? by बॅटमॅन
रजनीकांतला माहितीये म्हणे.
In reply to कापूसकोंड्याची गोष्ट आठवायला by प्यारे१
ते का म्हणे?
In reply to कापूसकोंड्याची गोष्ट आठवायला by प्यारे१
>>जरा जास्तच ओव्हर लिहिलाय
In reply to जरा जास्तच ओव्हर लिहिलाय by बॅटमॅन
सहजीवन.
In reply to सहमत by पैसा
प्रतिसाद आवडला.
In reply to सहजीवन. by प्रभाकर पेठकर
माझी व्याख्या विचाराल तर एक
ह्म्म्म....
असंच काहीसं !!!
In reply to ह्म्म्म.... by माम्लेदारचा पन्खा
कामाच्या स्वरुपामुळे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!जाता जाता :- माणुस या जगात
In reply to कामाच्या स्वरुपामुळे by मदनबाण
दुसऱ्या एका संकेतस्थळावर
एकटेपणा मलाही प्रचंड आवडतो.
Myers-Briggs Type Indicator
बाकी विलासराव म्हणतात तसं
आत्ता त्या प्रांतात मुद्दाम
In reply to बाकी विलासराव म्हणतात तसं by विलासराव
मी एकटा असलो की सुखी असतो
+ १ टु विजुभाऊ
In reply to मी एकटा असलो की सुखी असतो by विजुभाऊ
>>पण सगळ्या नातेवाईक नि जमून
जिथे माझे विचार व कृती
माझे ठाम मत आहे....
@किल्लेदार साहेब- प्रतिसाद
In reply to माझे ठाम मत आहे.... by किल्लेदार
:)
In reply to @किल्लेदार साहेब- प्रतिसाद by पिंपातला उंदीर
एकटेपणा
अमोल साहेब
निदान अशी सोबत चालेल का ?
तुमचे जुने धागे चाळताना हा
In reply to निदान अशी सोबत चालेल का ? by किल्लेदार
एकच नंबर !!
In reply to निदान अशी सोबत चालेल का ? by किल्लेदार
हा हा. आधी पण दाखवलेला काय
In reply to निदान अशी सोबत चालेल का ? by किल्लेदार
इफेक्ट ???