Skip to main content

परिपूर्ण एकटेपणा

लेखक पिंपातला उंदीर यांनी सोमवार, 22/09/2014 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
जी ए कुलकर्णी यांच्याबद्दल आणि त्यांच्या एकांतप्रियतेबद्दल बद्दल अनेक कथा ऐकल्या आहेत . मुंबई पुणे सारखी जागा सोडून त्यांनी धारवाड या छोट्या जागी राहणे पसंद केले . त्याना भेटायला अनेक लोक राज्याच्या कानाकोपर्यातून यायची . त्यांना ते फारस आवडायचं नाही . म्हणून ते बाजूला खेळणाऱ्या मुलाला बोलावून त्याला घराला बाहेरून कुलूप लावायला सांगत आणि स्वतहा आत बसून राहत . एका creative genius ची फ़क़्त एक लहर म्हणून त्याकडे बघतात का ? मुळात तुमचा हक्काचा एकांत मिळवण्यासाठी तुम्हाला जी ए सारख creative genius असणेच आवश्यक आहे का ? अनेकदा १० ते ५ नौकरी करणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या लोकांची पण ती गरज असतेच की . हि गरज दाबून बहुतेक लोक जगतात . मी एका nuclease मध्यमवर्गीय कुटुंबातल अपत्य . एकुलता एक मुलगा . आई बाबा दोघेही नौकरीला . त्यामुळे मला लहानपणा पासूनच एकटे राहावे लागले . पण माझ आणि एकटे पणाच भन्नाट जुळून आल . एकटे पणा आणि त्यातून येणार स्वातंत्र्य मला जाम आवडल . नंतर नंतर तर मला आजू बाजूच्या गर्दीचा जाचच होऊ लागला . शाळेतून पटकन घरी पटकन कधी येतो अस मला व्हयाच . फ़क़्त गणित आणि विज्ञान मध्ये चांगले मार्क येणे म्हणजे हुशार अश्या भंपक कल्पना असणाऱ्या शाळेत असाही जीव घुसमट करायचा . नंतर शिक्षणासाठी बाहेर गावी आल्यावर मी होस्टेल मध्ये राहायला लागलो . पण एका रूम ची एवढी छोटी जागा ३ लोकांनी शेयर करायची हि कल्पना मला रानटी वाटली . म्हणजे तुम्ही कधीही काहीही करत असलात तर किमान चार डोळे , दोन खिडक्या आणि एक दरवाजा ते बघत असतो हे मला तरी inhuman वाटायचं . मुंबई मधल्या लोकल प्रवासासारख . होस्टेल मध्ये बरीच धमाल केली असली तरी मी माझी स्पेस कायम मिस करायचो . जेंव्हा मला पहिला जॉब मिळाला तेंव्हा मी लगेच flat भाड्याने घेतला . आणि तिथे एक टीवी . माझ्या पगाराचा निम्म्याहून जास्त हिस्सा भाड देण्यात जायचा पण प्रत्येकाला आपली स्पेस घेण्याची किंमत चुकवावी लागते . आतापर्यंत माणुसघाणा म्हणून माझी बर्यापैकी बदनामी झाली होती . नातेवाईक 'तू आमच्याकडे येतच नाहीस ' म्हणून माझ्या नावाने ओरडायचे . पण सगळ्या नातेवाईक नि जमून काही धार्मिक विधी करायचे , एकमेकांची package विचारायची , कुणाची एकाची ठरवून क्रूर पणे खेचायची आणि इतर बर्याच निरर्थक गोष्टी फ़क़्त पिढ्यान पिढ्या चालू आहेत म्हणून करायच्या या गोष्टीं मध्ये मला रस नव्हता . म्हणजे मी एकटा असताना काही भव्य दिव्य करायचो अशातला भाग नाही पण मला माझी पुस्तक , माझा टीवी , आणि माझा परिपूर्ण एकटे पणा जास्त आवडायचा . आम्ही मित्र ट्रीप ला गेलो कि २ दिवस तरी घरापासून दूर राहायचो . तेंव्हा पण मित्रांसोबत धमाल करून झाली की मी एक तास तरी beach वर माझ एकटेपणा शोधण्यासाठी निघून जायचो . लग्नानंतर माझ्या या मनमुराद एकटेपणावर गदा आली . तेंव्हा पण माझी बायको आणि मी बसलो असताना मध्येच laptop उचलून मधल्या खोलीत निघून जायचो . बायको च्या चेहऱ्यावरचे हिरमुसलेले भाव अजून पण कधी कधी मला guilt देतात . नंतर नंतर या एकटे पणा पायी मी माझ्या जवळच्या मित्राना अतिशय क्रूर पणे कटवायला लागलो . आणि माझी मला च या अतिरेकाची जाणीव झाली . आणि मी माझ्यात थोडे बदल केले . पण ते फ़क़्त जवळच्या लोकांसाठीच . आपल्या समाजात एकटे राहण्याबद्दल आणि हक्काने स्वतःची स्पेस घेण्यार्या लोकांबद्दल काही जबरी गैरसमज आहेत . म्हणजे एखादा माणूस एकटा राहात असेल तर आजू बाजू च्या लोकाना ह्याच्या आयुष्यात काही तरी tragedy असेल असा समज होतो . म्हणजे एकट राहणे हे by choice असूच शकत नाही अस काही वाटत असेल काय ? स्वतःच्या स्पेस बद्दल भारतीय समाजा इतका उदासीन समाज दुसरा नसेल . आपल्या लोकाना कायम उत्सवप्रिय , गलबल्यात राहाण्याच brainwashing झाल असत कि काय असा प्रश्न पडतो . म्हणजे खूप लोक परिस्थितीमुळे (आर्थिक आणि सामाजिक ) स्वतःची स्पेस नाही घेऊ शकत हे मान्य पण ज्याना शक्य आहे ते पण आपली मुलभूत गरज पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात का हा प्रश्न आहे . आपण एकटे झालो म्हणजे समाजाच्या सुरक्षा चक्राबाहेर आलो . आपण लोकाना भेटायला नाही गेलो तर आपल्याला प्रसंगात कुणी येणार नाही या भावनेने अनेक लोक आपली स्पेस नाकारून पुन्हा लोकांच्या घाण्यात इच्छा नसताना घुसतात (वैयक्तिक sample survey मधून काढलेला निष्कर्ष : त्यामुळे बरोबर असेलच याची खात्री नाही ) एकटे राहणे ज्या समाजाच्या चौकटीत बसत नाही तिथे आपण misfit आहोत हि भावना कधी कधी बळावते . सतत स्वतःची स्पेस नाकारण्याचे काही वैयक्तिक / सामाजिक परिणाम होऊ शकतात का ? आपल्या समाजात स्वतःची स्पेस घेणाऱ्या लोकांवर ठप्पे मारणे समाज थांबवेल का ? समाज नावाच्या जनावराशी मुकाबला करणे मुळातच अवघड . झु मधल्या प्राण्यांसारखे compartment करून श्रेण्या देणाऱ्या समाजात तर ते अजूनच अवघड . मुळात स्पेस ची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते . वयाच्या तिसाव्या वर्षी माझी स्वतःची एक व्याख्या आहे ( ३ वर्षापूर्वी ती drastically वेगळी होती ) माझी व्याख्या विचाराल तर एक आळशी दिवस . कुठेही जायचे नाही . कुणीही येणार नाही . फ्रीज मध्ये २ बियर आहेत . घरात कुणी हि नाही . अगदी बायको पण नाही . टीवी चालू आहे . नेट पण एकदम फास्ट चालू आहे . वेळ दाखवणाऱ्या सगळ्याच साधनांमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे . आणि मनमुराद एकटेपणा प्यायचा आहे . कुणीही तुम्हाला जज करत नाहीये आणि तुम्हाला कोणी जज करत नाहीये . मस्त पैकी कुठला तरी nostalgia आहे सोबतीला . बस्स . अजून काय पाहिजे .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 17252
प्रतिक्रिया 86

प्रतिक्रिया

बाकी विलासराव म्हणतात तसं सगळ्यांच्यात बसून सुद्धा हिमालय आत आणता येत असेल तर बाहेरच्यांचा त्रास न व्हावा. खरंय.
  • प्यारे हे जे जग आपण पाहातो ते आपल्या अंतरात जे आहे त्याचे प्रतीबींब आहे. एकदा आतले सगळे विकार संपले की प्रतीबींब आपोआप नाहिसे होते. मग जे उरते त्याला बरीच नावे आहेत जसे की निर्वान,आत्मा,परमात्मा,परमेश्वर्,अल्लाह्,जिझस्,मोक्ष्,मुक्ती आणखीही बरेच आहेत . त्यामुळे आणायची -न्यायची भानगडच नाही.त्याकरता आपल्या अंतर्मनात उतरायची कला शिकलं म्हणजे झालं. बाकी यावर मिपावर बराच काथ्या कुटला गेलाय.

In reply to by विलासराव

आत्ता त्या प्रांतात मुद्दाम नाही घुसलो. माणसाला बराच काळ एकटं राहण्याची सवय लागली की त्याची माणसांमध्ये चिडचिड होते. कधीकधी मूळ स्वभाव अबोल, शांत राहण्याचा असतो. माझा एक मित्र मेडीकल ट्रान्सक्रिप्शनची कामं करतो. रात्रभर हेडफोन कानाला. त्याला हेडफोन काढल्यावर कुणाशी बोलावंसं वाटत नाही हे त्याच्या जॉबचं बायप्रॉडक्ट. हॅपन्स. बाकी आतली शांतता वेगळीच असते. असो!

मी एकटा असलो की सुखी असतो कशाला कोण पाहीजे. सम्गीताची साठवण असलेली एक झकास सी डी खूप पुरते. गाडी चालवताना तर कोणी सोबत असण्यापेक्षा एकटेच खूप बरे वाटते

In reply to by विजुभाऊ

मलाहि एकटं रहायला खुप आवडतं. ईकडे कधी कधी मुद्दाम मेडिकल घेउन घरात पडून असतो. लेखातला शेवटचा पॅरा खुप आवडला. चिल्ड बियरच्या साथीने मी एकटा कुठेहि/कितीहि दिवस राहिन.

>>पण सगळ्या नातेवाईक नि जमून काही धार्मिक विधी करायचे , एकमेकांची package विचारायची , कुणाची एकाची ठरवून क्रूर पणे खेचायची आणि इतर बर्याच निरर्थक गोष्टी फ़क़्त पिढ्यान पिढ्या चालू आहेत म्हणून करायच्या या गोष्टीं मध्ये मला रस नव्हता अगदी मनातलं बोललात.. बाकी एकटेपणा मलाही आवडतो. पण लोकं बरेच अर्थ काढतात. स्थळं बघताना एका मुलीने हा प्रश्न विचारला होता.मी म्हणलं आवडतं कधी कधी एकटं (एकांतात) राहायला. तेव्हा फारच विचित्र प्रतिसाद दिला होता तिने. असो... पण माझ्यामते प्रत्येकाने आठवड्यातुन थोड वेळ तरी एकांतात घालवावा.बरं वाटतं.

जिथे माझे विचार व कृती स्वातंत्र्य बर्यापैकीअबाधित आहे अशी सर्व ठिकाणे मला पसंत आहेत मग एकांतवास असो वा नसों... फार फरक पडत नाही. फ़क्त वरील स्वातंत्र्य अड़चनीत आणनारे घटक मी आयुष्यात कटाक्षाने दूर ठेवतो. बाकी प्रत्येकाची असे स्वातंत्र्य उपभोगायची क्षमता व पध्दत वेगवेगळी असते याची जाण असल्याने... याबाबत माझे कोणतेही ठाम मत होत नाही ज्याचा पुरस्कार करावा.

माझे ठाम मत आहे की माणसाने काही काळ स्वतः बरोबर घालवावा. स्वतः बरोबर चांगला वेळ घालवणे म्हणजे एकटेपणा नक्कीच नव्हे. हेन्री डेवीड थोरो हा प्राणि तब्बल २ वर्ष वाल्डेन नावाच्या तळ्याकाठी स्वतः घर बांधून एकटा राहिला. वाल्डेन नावाचे त्याचे पुस्तक वाचनीय आहे. किंवा गो. नी. दांडेकर यांच्या दुर्गभ्रमणगाथा मधील त्यांची प्रस्तावना वाचा. केवळ अफलातून आहे. स्वतः ची कंपनी आवडणे नक्कीच वाईट नाही पण फक्त "स्वतः चीच" कंपनी आवडणे हे ही पटत नाही. मी नेहमीच वर्षातले काही दिवस एकट्याने प्रवास करतो. अशा ठिकाणी जातो की कोणी मला ओळखत नाही. मग भर गर्दीतही एकांत मिळतो. बीअर किंवा स्कॉच (स्थलकालपरत्वे) बरोबर बंद खोलीत पुस्तकाऐवजी माणसांची गर्दी वाचण्यातही मजा आहे. रम चे घोट घेत मी हिमालयात एकांत अनुभवला आहे किंवा बीअर चाखत गोव्याच्या बीचवर सुद्धा. असा अनुभव गप्पा मारायला नेहमीचेच कोणी असेल तर नक्कीच घेता येत नाही.

कठीण आहे बुवा, सतत मुल काहीतरी मागायला लागली, बायको चिडायला लागली ऐकू येत नाही का वेगेरे तर वाटते एकटेपणा हवा. सारेच गावाला गेले तर मग मात्र तो एकटेपणा नकोसा वाटतो. स्पेस प्रत्येकाला हवी असते, फक्त त्याची प्रत्येकाची आपली व्याख्या आणि गरज. मला तरी दिवसातून अर्धा ते एक तास एकटेपणा पुरे होतो.

आपण लेखाची सुरुवात जी एं चे उदाहरण देवुन केलीत. जी एं नी जरी लोकांशी प्रत्यक्ष संपर्क टाळला तरी ज्यांच्याशी 'सुर' जुळले त्यांच्याशी प्रदीर्घ काळ मनमोकळा पत्रव्यवहार केला. स्वतःसाठी काही वेळ राखणे जरुरी त्याचबरोबर ज्यांच्याशी 'संवाद' साधण्यात आनंद मिळतो तर तोही साधावा असे वाटते. शेवटी 'टु ईच हिज ओन' प्रत्येकाचा स्वभाव डीनए सारखा युनिक! त्याचे किती आणि कसे विष्लेषण करणार?

इफेक्ट ??? अहो खरंच असेल कुणितरी =-O