रटाळ 'फायंडिंग फॅनी'
हे परीक्षण चार-पाच दिवस आधी लिहून ठेवले होते. कार्यालयात खूप काम असल्याने अर्धवट पडून होते. कसेबसे पूर्ण करून आज टाकतोय. चित्रपटाप्रमाणेच परीक्षण देखील रटाळ असल्यास उदार अंतःकरणाने क्षमा करावी. यथा पिक्चर, तथा परीक्षण! :-(
---------------------------------------------------------------------------------
'फायंडिंग फॅनी' या नावाचा चित्रपट येऊ घातला आहे असं जेव्हा मी वृत्तपत्रात वाचलं तेव्हा मला वाटलं जगमोहन मुंदडा ('कामसूत्र' फेम), कैझड गुस्टाड (द ग्रेट 'बूम' फेम) सारखे उद्बोधक चित्रपट काढणार्या एखाद्या धीट दिग्दर्शकाचा हा पुरुष आणि स्त्री यांच्यातल्या शारिरीक आकर्षणावर गूढरम्य, गंभीर, आणि भावनिक भाष्य करणारा एक बेफाम चित्रपट असावा. 'फॅनी'चा स्लँग अर्थ तसा भलताच असल्याने माझा असा समज झाला. पुढे वाचलं की यात दीपिका, अर्जुन, पंकज, नसीरुद्दीन, डिंपल असे कलाकार आहेत. मग बुचकळ्यात पडलो. पण मनात म्हटलं का नाही? व्हाय नॉट? 'बूम'मध्ये जर अमिताभ बच्चनसारखा अभिनेता असू शकतो तर 'फायंडिंग फॅनी'ने असं काय 'तोंड काळं' केलं असावं की त्यात आघाडीच्या अभिनेत्यांनी काम करू नये. शक्य आहे. पण दीपिका? छे छे...काहीतरीच काय? नंतर कळलं की तो होमी अदजानिया नावाच्या दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. मी त्याचा 'बीईंग सायरस' पाहिला होता. ठीक होता. 'कॉकटेल' पाहण्याची अजिबात इच्छा झाली नव्हती. पण त्यातल्या "सेकंड हँड जवानी" गाण्यात दीपिका आवडली होती. पोस्टर्सवरून चित्रपट वेगळा असल्याची जाणीव झाली. दीपिकाचे फोटोज सुरेख होते. पंकज कपूर 'चमेली की शादी'मध्ये आवडला होता. त्यानंतर कुठे कधी नीटसा भेटलाच नाही. नाही म्हणायला 'जाने भी दो यारो', 'एक रुका हुआ फैसला' वगैरे होते पण ते मेनस्ट्रीमचे चित्रपट नव्हते. 'चमेली की शादी'मध्ये तो जाम सही होता. नसीरुद्दीन शाह तर उत्तम आहेच. पण त्याला कॉमेडी जमणार का हा प्रश्न पडला. 'हीरो हिरालाल', 'जाने भी दो यारो' मध्ये वगैरे त्याने थोडी कॉमेडी केली होती पण ती अगदीच तोंडी लावण्यापुरती.
गेल्या शनिवारी संध्याकाळी कंटाळा आला होता. मोबाईलवरुनच तिकीट बुक करून टाकले. मोठ्या अपेक्षेने थेटरात जाऊन बसलो. आधी १०-१५ मिनिटे क्रॉसवर्डमध्ये जाऊन भारी भारी इंग्रजी पुस्तके हातात धरून शायनिंग मारली. कोथरूडच्या सिटी प्राईडमध्ये शनिवारची रात्रीची ९ वाजताची वेळ! प्रेक्षक छान नटून-थटून आले होते. एक मंद सुगंध मनाला प्रसन्न करत होता. दुसर्या दिवशी रविवार असल्याने सगळे निवांत होते. 'हिरवळ' सोडा; आख्ख्या सिटी प्राईडमध्ये जणू 'एकर्स ऑफ लॉन' अवतरली होती.
चित्रपट सुरु झाला. गोव्यातले कुठलेतरी पूर्ण ख्रिश्चन लोकवस्तीचे छोटेसे गाव. दीपिकाचा आवाज येत असतो. ती गाव आणि तिथल्या लोकांविषयी सांगत असते. सुरुवातच धाडकन आपटली होती. अतिशय संथ, निरुत्साही, आणि कंटाळवाणी सुरुवात होती. नंतर हळूहळू कॅमेरा नसीरुद्दीनच्या घरात शिरतो. नसीरुद्दीन शक्य तेवढ्या विचित्र वेषभूषेत काहीतरी करत असतो. इथे 'पेस्तनजी'ची आठवण होते. अत्यंत गचाळ घर! गोगलगायीपेक्षाही संथ गतीने नसीरुद्दीन हालचाली करत असतो. दाट रात्र झालेली असते. इथेच पहिली जांभई डोळ्याच्या कडा ओलावून गेली. पहिली सलामी! चित्रपटाचा वेग सेट झाला होता; मूड सेट झाला होता. काही वेळाने नसीरला एक पत्र येतं. आणि नसीर जोरात हंबरडा फोडतो. आसपासच्या घरातले दिवे लागतात. त्याने कधीकाळी (४७ वर्षांपूर्वी) एका मुलीला प्रेमाची कबुली देणारं पत्र पाठवलं असतं आणि ते तिला न मिळता ४७ वर्षांनी नसीरला परत मिळतं. तो दु:खी होतो. तिला आपलं हृदय कळलंच नाही. आणि आपण ती नाही म्हटली असंच समजून इतकी वर्षे जगत होतो असं वाटून नसीर निराश होतो. कॅमेरा संथपणे फिरतोय. नसीरदेखील संथपणेच हलतोय. संवाद अस्पष्ट आहेत.
गावात डिंपल ही विधवा तिच्या विधवा सुनेसोबत राहत असते. दीपिकाचा नवरा रणवीर सिंग हा लग्नाच्या समारंभातच मृत्यू पावतो. तेव्हापासून या दोघी एकत्र राहत असतात. गावात एक चित्रकार (पंकज) राहत असतो. दीपिकाला काहीच कामधंदा नसल्याने तिच्या मनात नसीरची ४७ वर्षांपूर्वी हरवलेली प्रेयसी शोधायला जाण्याची खुमखुमी येते. रटाळपणाचा कहर! दुसरी तगडी जांभई! विचित्र पार्श्वसंगीत वाजतेय. अर्जुन कपूर गावात आलेला असतो. त्याला दीपिकाने सोडलेलं असतं. म्हणून तो रागावलेला असतो. दीपिका घरचं कार्य असल्याप्रमाणे पंकज, नसीर, अर्जुन यांच्या गळी आपली 'फॅनी'ला शोधायला जाण्याची कल्पना उतरवते. सगळे तयार होतात. डिंपल आपल्या मांजरीला घेऊन येते. आणि ते पाचही नग एका अत्यंत घाणेरड्या गाडीत बसून या आगळ्यावेगळ्या सहलीला निघतात. मी जांभया मोजणं एव्हाना बंद केलंय.
सगळे गाडीत बसून प्रवास करत असतात. मध्येच मांजरामुळे नसीरला शिंका येतात. मग तो मांजराला मांडीत ठेवतो. ते त्याच्या नको त्या भागाला कडकडून चावा घेतं. प्रेक्षक हीहीही करून हसतात. तो ते मांजर उचलून खिडकीच्या बाहेर फेकतो आणि झाडावर आपटून ते मांजर मरतं. माझं डो़कं गरगरायला लागलं होतं. बायको खाऊ की गिळू नजरेने माझ्याकडे बघत होती. तिला हा चित्रपट पाहण्याची अजिबात इच्छा नव्हती. नावावरूनच तिला हा पिक्चर टुकार आणि कंटाळवाणा असणार याची खात्री वाटली होती. मी खूपच आग्रह करून तिला जवळपास खेचून आणलं होतं. घरी गेल्यावर आपलं काही खरं नाही याची खात्री मला पटली.
नंतर अचानक पेट्रोल संपतं. लांबचा ग्रामीण भागातला प्रवास आहे; पेट्रोलची सोय असली पाहिजे वगैरे साधा विचार कुणीच करत नाही. एरवी मोबाईलचा चार्ज संपल्यावर लोकं घाबरतात. दूर आडरानात पेट्रोल संपलं तरी हे पाचही जण ओक्के असतात. झाड शोधतात. पंकज तिथेच डिंपलला कपडे बदलायला लावून तिचं चित्र काढतो. डिंपल अतिशय भयानक कपडे घालून विचित्र अशी पोझ घेऊन उभी राहते. पंकज तिचं अत्यंत घाणेरडं चित्र काढतो. इथे मला पश्चात्तापाचे कढ यायला सुरुवात झाली होती. सहाशे वीस रुपयांच्या नोटा वाकुल्या दाखवायला लागल्या.
इकडे दीपिका आणि अर्जुन रंगात येतात. अंधार पडतो. डिंपल झाडाखाली पसरते. नसीर आणि पंकज तिच्या उशा-पायाशी बसतात. म्हटलं आता हे यांचं काही दाखवतात की काय म्हणून मला घाम फुटला. पण दिग्दर्शकाला थोडी तरी अक्कल असल्याचे जाणवते. डिंपल अस्ताव्यस्त पसरलेली असते. इकडे दीपिका आणि अर्जुन आधी भांडतात. अर्जुन लघुशंका करत असतांना दीपिका त्याच्याजवळ येऊन थांबते. मला वाटलं आता 'शूशूशू...' असा आवाज काढून त्याला मदत करते की काय. पण तसं काही होत नाही. ती अगदी जवळ येऊन त्याला विचारते, "क्या कर रहे हो?". खरं म्हणजे हे कार्य करणारा पुरुष मागून जरी पाहिला तरी तो काय करत असावा याचा अंदाज येतोच. उभं राहण्याची ती ढब सगळं शब्दावीण सांगून जाते. पण दीपिका त्याच्या जवळ जाऊन त्याने तिच्याकडे पाहिल्यावर त्याच्या झिपकडे बघत 'ओह सॉरी' असं अगदीच कॅज्युअली म्हणते. इतकं क्यॅज्युअली की आपला कुणाला चुकून हलका धक्का लागल्यावर आपण कसे सॉरी म्हणू, अगदी तस्सं! अर्थातच तो एक सिग्नल असतो. ग्रीन सिग्नल. मग अर्जुन तिचं एक दीर्घ चुंबन घेतो. आणि ती भडकते. का? कळत नाही. आणि मग डायरेक्ट ते झुडुपामध्ये जातात. झुडुपात जे जे करण्यासारखं असतं ते ते सगळं घडून जातं.
असं सगळं कसं आनंदात चाललेलं असतं. कुणाला काहीच टेंशन नसतं. मध्येच केव्हातरी ते फॅनीच्या जुन्या पत्त्यावर जातात. तिथे एक विचित्र माणूस काहीबाही बडबडतो. मध्येच नसीर गायब होतो. अर्जुन, डिंपल, पंकज, आणि दीपिकाला कारमध्ये एक छोटी बंदूक सापडते. झटापटीत त्यातून गोळी सुटून मागच्या सीटवर बसलेल्या पंकजला लागते. तो ताबडतोब गतप्राण होतो; कारचा दरवाजा उघडला जातो; चालत्या कारमधून तो बाहेर फेकला जातो; तळ्यात कोसळतो; आणि थेट तळाशी जाऊन विसावतो. मध्येच नसीर पुन्हा उगवतो. पुन्हा बसतो. मग उलथलाच का होता हे कळत नाही. मग एक प्रेतयात्रा दिसते. ती बहुधा फॅनीची असते. माझी शिव्यांची लाखोली सुरुच होती. नंतर नसीर आणि डिंपल आणि दीपिका आणि अर्जुन लग्न करतात. हुश्श्श...
रटाळपणाचे सारे विक्रम 'फायंडिंग फॅनी' ने मोडीत काढले असावेत. अत्यंत मंदगती, कंटाळवाणे लांबलचक प्रसंग आणि संवाद, कळकट नसीर आणि पंकज (किती वेळा यांना असं बघायचं?), मध्येच विनाकारण पार्श्वभागावर टर्रकन फाटलेला झगा दाखवणारी डिंपल, अत्यंत फालतू कथा, अत्यंत नीरस सादरीकरण, ठिगळं लावल्यासारखे जोडलेले असंबद्ध प्रसंग (नसीरच्या शिंका, मांजरीचा चावा फॉलोड बाय मृत्यू, तिचा दफनविधी, डिंपलचे चित्र, अर्जुनची सूसू, प्रेतयात्रा, इत्यादी), कंटाळवाणी पटकथा, 'आता पुढे काय होणार' अशी पुसटशीही जिज्ञासा प्रेक्षकांना वाटू नये ही लेखक-दिग्दर्शकाने घेतलेली खबरदारी...काही विचारू नका.
आता मला खूप मोठी जांभई यायला लागली आहे. पुरे करतो. चित्रपट अजिबात बघू नका. त्यापेक्षा गुगलवर दीपिकाचे छान छान फोटो बघा, 'सागर' आणि 'जानबाज'मधल्या डिंपलला आठवा, आणि पैसे वाचवा!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
धन्यवाद
अहाहा ..! काय ते शाल जोडीतले
असेच म्हणतो. आता फाईंडिंग
अधिक ११११११११
वाचले !!
क्रिटिक्सनी चांगले म्हटले की
विनंतीला मान देऊन परीक्षण
(No subject)
त्यातल्या शेक योर बुटिया ओन द फ्लोर
"देवाने शिक्षा करण्यासाठीच
"व्यासपीठावर हलवा"
हहहहाह्हहा
अरसिक किती हा मेला !!
@ समीरसूर,
मध्येच नसीर गायब होतो. अर्जुन
मी डाउनलोड करून पहिला तरी
चित्रपट पाहून शेवटी हातात
(No subject)
@अश्लील, अश्लील>>>
म्हणुनच म्हणतात
बायको तीन-चार दिवसापूर्वी या सिनेमाचा फारच आग्रह करत होती
बरं झालं कळवलत. आता बघणार
मला
मला पण, (मी पाह्यलेल्या)
माझ्याही एका मित्राला हा
>>केवळ हॉलीवुडपट पाहणारा आमचा
मला त्या तिसर्या मित्राबद्दल
प्वाइंटाचा मुद्दा
दर्पण सुंदरी आरशात बघताना
ठ्ठो
(No subject)
>>एकशे चाळीस रुपये कोणी दिले?
चितचोर
उदासी
बरोबर आहे
मला जे काही म्हणायचंय ते
जाऊ द्या
आक्षेप
अंधार्/अंधुक फ्रेम्स- हे
अमोल पालेकर, झरीना वहाब, ए के
बजेट
आकडे
मला ही आवडला....
आम्ही तिघं मित्र गेलो होतो.
तुम्ही म्हणे तेव्हा "मेझ रनर"
अगदी अगदी.
सिनेमाच माहित नाही.परिक्षण
इष्टोरी इतकी फालतू असली तरीही
पहिले शक्तीकपूर बद्दल असंच
काहीतरीच काय ? माझ्या मते