एक रात्र फुटपाथवरील
पन्नास वर्षांपुर्वीची गोष्ट. पावसाची रिप रिप. वीज गेलेली. रात्रीचे 11 वाजून गेलेले. कुठलेच हॉटेल खायला व राहायला उघडे नाही. अशा अवस्थेत मी आणि माझा मित्र व त्याचे वडील दुसऱ्या दिवशीच्या पहाटेच्या एसटीसाठी वणवण भटकत फिरून शेवटी हाताची उशी करून फुटपाथवर उताणे पडलो होतो. “... अंगावर मायेने हात फिरवणारे कोणी नाही, राहायला निवारा नाही, उद्याच्या भाकरीसाठी करायला लागणारे कष्ट करून थकलेले शरीर, कपड्याला घामाचे वास येऊन कडक झालेला सदरा अशा अवस्थेत आकाशातील तारे व चंद्र याकडे पाहून मनात काय विचार येत असतील याचा विचार करत आजची रात्र काढा...” “बरं का रे शशी,” मला आपल्या बोलण्यात सामावून घेताना मित्राचे वडील म्हणाले, “तुमच्यावर अशी वेळ येऊ नये, येणारही नाही पण या रात्रीची आठवण ठेवा. ज्यांच्या जवळ नाही त्यांच्या नजरेतून ज्यांच्या जवळ आहे अशा जगाला आजच्या रात्री बघा, अनुभवा. आजच्या रात्रीतील विचार तुमची जगाकडे पहायची नजर, उन्मत्त व उत्शृंखल होऊ देणार नाही. आयुष्यात काहीतरी बनायला त्यातून प्रेरणा घ्या...” ती रात्र संपली. पहाटेच्या एसटीतून प्रवास करत आम्ही योग्य ठिकाणी पोहोचलो. आयुष्याच्या पुढल्या प्रवासात पुन्हा असे फुटपाथवर हात उशाला करून पडणे वाट्याला आले नाही. मऊ आरामदायक गाद्या व सुखवस्तू जीवनात त्या रात्रीच्या आठवण मागे पडली. पण अचानक कुठे असे फुटपाथवरील कोणाचे देह पाहिले की त्या रात्रीचा आठवण येते... त्या रात्री खिशात भरपूर पैसे असूनही आम्हाला असे कष्टमय जिणे वाट्याला का यावे अशी सुरवातीला आलेली मनाची चडफड शांत झाली. विचारीपणाने, जिद्दीने सामोरे गेले तर ही दशा पण बदलेल. असा संदेश मला आयुष्यात कामाला आला...
वाचने
8786
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्यांच्या जवळ नाही त्यांच्या
+१११
In reply to ज्यांच्या जवळ नाही त्यांच्या by गणपा
+२२२
In reply to +१११ by डॉ सुहास म्हात्रे
का आली बरं?
पन्नास वर्षांपुर्वीचा काळ आहे
In reply to का आली बरं? by प्रभाकर पेठकर
अशी परिस्थिति का आली ?
In reply to पन्नास वर्षांपुर्वीचा काळ आहे by गणपा
अहो ५० वर्षांपूर्वीच्या रत्नागिरीत
In reply to अशी परिस्थिति का आली ? by शशिकांत ओक
साधा पत्ता विचारला तर...
In reply to अहो ५० वर्षांपूर्वीच्या रत्नागिरीत by मिसळपाव
हो.
In reply to साधा पत्ता विचारला तर... by शशिकांत ओक
खर आहे अशा आठवणी आपल्याला
मार्गदर्शक अनुभव
छान लिहिलं आहे काका.
गोगटे जोगळेकर पन्नास
द्यायची ताणून!... मंदिर - शाळेत...!!
अंगावर मायेने हात फिरवणारे
जो त्या परिस्थितीत असतो
छान लिहिलेत
मान्य
In reply to छान लिहिलेत by vikramaditya
त्या रात्रीतले अजून काही
संदेश चांगला आहे पण
अहो,
In reply to संदेश चांगला आहे पण by आदिजोशी
मला लेखकाला काय म्हणायचे आहे
काही घटना सामान्य वाटतात पण मनावर प्रभाव टाकतात
In reply to मला लेखकाला काय म्हणायचे आहे by प्रसाद१९७१
प्रतिसाद म्हणुन फटु!
रस्ता दुभाजक आनी पादचारी
In reply to प्रतिसाद म्हणुन फटु! by संदीप डांगे
पन्नास वर्षांपूर्वी फूटपाथ मिळायचे. आता रस्ता दुभाजक. पुढे काय?
In reply to रस्ता दुभाजक आनी पादचारी by विलासराव
पुढे काय?
In reply to पन्नास वर्षांपूर्वी फूटपाथ मिळायचे. आता रस्ता दुभाजक. पुढे काय? by संदीप डांगे