Skip to main content

इरेला पेटला आहे पिसारा (गझल)

लेखक अजय जोशी यांनी गुरुवार, 18/09/2014 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाचा केवढा झाला पसारा बिलगला वेदनेचाही पहारा तुझ्या लाटेत सामावून घे ना कधीचा थांबला आहे किनारा तुझ्या वाणीत सारे भाव होते नको सांगूस की केला पुकारा तुझा रस्ता कधी चुकलो नसे मी नसे ही बातमी आहे इशारा किती चेकाळली स्वप्ने उराशी पहा मिळताच थोडासा उबारा अजुन तुडवीत आहे पाय काटे अजुन नक्की नसे माझा निवारा शरीराची उडाली फार थरथर मनामध्ये कुठे होता शहारा? मला सांगून गेला आपलेपण तुझा तो एक ओळीचा उतारा दुरुन नुसतेच तू नाचू नको ना इरेला पेटला आहे पिसारा जगाला पाहिजे ते ते म्हणू दे 'अजय' बिनधास्त वाजव तू नगारा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2317
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

मस्त आहे ! आवडली ! >> तुझ्या लाटेत सामावून घे ना कधीचा थांबला आहे किनारा हे विशेष आवडले !

हे विशेष आवडले जगाला पाहिजे ते ते म्हणू दे 'अजय' बिनधास्त वाजव तू नगारा

"तुझ्या लाटेत सामावून घे ना कधीचा थांबला आहे किनारा" व्वा ! क्या बात है ! !

खास जमली नाही. ओढून ताणून वाटली.