Skip to main content

मला आनंद का झाला?

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 16/12/2007 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, "सुख पाहता जवांपाडे, दु:ख पर्वताएवढे" ही सर्वसाधारण माणसाची परिस्थिती आहे. आपण आनंदच हरवत चाललो आहोत. अनेक लहानसहान आनंदाच्या गोष्टी सभोवताली घडत असतात. पण तो आनंद आपल्याला समजत नाही. तेवढया जाणीवा आपल्याकडे नसतात. त्यासाठी तुम्हाला झालेला आनंद केवळ एका वाक्यात इथे लिहीत जा. इथे सह्या, आपला(.....) ही विशेषणे, मोठे परिच्छेद वगैरे लिहू नयेत. केवळ एका वाक्यात मला आनंद का झाला हे लिहावे. वाक्याचा बाज शक्यतो खालीलप्रमाणे ठेवण्याचा प्रयत्न करावा तर मजा येईल. --------------------------------------------------------------------- सरपंचांनी मिसळपाववर आणिबाणी जाहिर केली, हे वाचून मला आनंद झाला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23670
प्रतिक्रिया 57

प्रतिक्रिया

काल बायको माहेरी गेली म्हणून मला आनंद झाला.

आणिबाणी जाहीर झाली म्हणुन फारच आनंद झाला. च्यायला दररोज नव-नवीन कटकटीला वैतागून गेलो होतो. आज फार आनंद झाला.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमचे स्नेही प्राध्यापक बिरुटे यांना आनंद झाला, हे पाहून आम्हाला आनंद झाला

येथे आणिबाणी जाहीर झाली हे वाचून समाजकंटकांना आता दु:ख होईल, याचा मला आनंद झाला! :))

काल मिसळपाववरून एका समाजकंटकाची हकालपट्टी झाली याचा मला आनंद झाला

In reply to by धोंडोपंत

प्रशासक आणि बगलेतले बच्चे यांच्याशी वाद होऊन सुद्धा मी (तात्याकृपेने) अजून इथे टिकून आहे म्हणून (अरेच्या कोणीतरी मला आत्ताच फुटबॉलप्रमाणे उडवले अशी भावना का बरे होतेय?). > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

In reply to by सृष्टीलावण्या

सृष्टीताई मिपावर 'प्रशासक' ही शिवी आहे. आपण आपल्या लेखनात असाच शिव्यांचा वापर करत राहिलात तरी आपले खाते उडणार नाही कारण मिपाला शिव्या वर्ज्य नाहीत! पण तुम्ही आजकाल जे मिपावरील हे गडे मुर्दे खणण्याचे आणि मुखपृष्ठावर झळकवण्याचे काम सुरू केले आहे त्याने तुमच्या खात्याला धोका उद्भवु शकतो. नको त्या मुडद्यांना हात घालू नका. (फोकलीचा) अघळ पघळ

In reply to by अघळ पघळ

अवांतर प्रतिसादाबद्दल धोंडोपंत राग मानणार नाहीत ह्याबद्दल खात्री आहे (इतरांना राग आला असेल तरी चालेल, फार तर फार काय पेटीवर वाजवून गातील). सृष्टीताई मिपावर 'प्रशासक' ही शिवी आहे. आपण आपल्या लेखनात असाच शिव्यांचा वापर करत राहिलात तरी आपले खाते उडणार नाही कारण मिपाला शिव्या वर्ज्य नाहीत! पण तुम्ही आजकाल जे मिपावरील हे गडे मुर्दे खणण्याचे आणि मुखपृष्ठावर झळकवण्याचे काम सुरू केले आहे त्याने तुमच्या खात्याला धोका उद्भवु शकतो. नको त्या मुडद्यांना हात घालू नका. (फोकलीचा) अघळ पघळ असो. आपल्या आपुलकीच्या शब्दांनी मन भरून आले, गळा दाटला, शब्द गहिवरले. असे हितचिंतक असतील तर त्यांच्यावर एक का दहा मराठी संस्थळे कुर्बान. आपली लेखन शैली अतिशय आवडली. पण राहून राहून वाटते की तिचे मिपावरील दुसर्‍या एका लेखकू महाशयाशी साधर्म्य आहे (विशेषत: फारंभ शब्द). हा एक आत्मा आणि दोन शरीरे असा अचाट प्रयोग तर नव्हे. > > मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला । सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।

श्री. विक्रम पंडित यांची सिटी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वोच्चपदी नेमणूक झाली, याचा मला आनंद झाला.

प्रकाटाआ (सखेद) आजानुकर्ण

लोक वर उल्लेख केलेल्या गोष्टी न पाळता कुठेही काहीही लिहितात हे पाहून मला आनंद झाला.

आणीबाणीचे स्वरूप दिसुन आल्याने आनंद झाला. आपला गुंडोपंत

गुंडोपंतांना आनंद झाला हे पाहून मला आनंद झाला

चुकीच्या लेखनाचा लोकांना खेद झाल्यावर, ते प्रतिसाद काढून टाकतात याचा मला आनंद झाला.

येथे आणिबाणी लागू झालेली पाहून बर्‍याचश्या मंडळींना हायसं वाटलं याचा मला आनंद झाला..:) तात्या.

धोंडोपंतांसारख्या विद्वान माणसांनी इतक्या क्षुल्लक गोष्टीत आपला वेळ फुकट घालवलेला पाहून मला मुळीच आनंद झालेला नाहीये.

In reply to by प्रमोद देव

विद्वत्ता बाजूला ठेऊन काही लोकांना काही क्षण आनंद देऊ शकलो याचा मला आनंद झाला

तात्याला हायसं वाटलं हे पाहून मला आनंद झाला.

पंत कार्यकारी संपादक झाल्याचे पाहून आनंद झाला आपला गुंडोपंत

लोक चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात हे पाहून मला आनंद झाला.

धोडोपंतांमुळे भा रा तांबे यांच्या कवितेचा आस्वाद घेता आला याचा मला आनंद झाला. प्रकाश घाटपांडे

आणीबाणीचा खरा अर्थ कळल्याने आणि नेमका उपयोग पाहून आनंद झाला. तसेच चर्चगेट-ठाणे एसी बस सुरू झाल्याने आनंद झाला :)

मिसळपाव नरेशांच्या हाताशी मी नसलो तरी अजून कुणीतरी आहे, याने मला आनंद झाला. आपला गुंडोपंत

तात्यांसाठी 'मिसळपाव नरेश' असा शब्द सुचल्याने मला आनंद झाला.

आज ग्लासात सोडा ओततांना ग्लास सांडला व रम नुसतीच बाटलीनेच प्यावी लागली याचा आनंद झाला .

सरपंचही येथे आलेले पाहून आनंद झाला.

आमचे स्नेही प्रकाश घाटपांडे हे भास्कररावांच्या कवितांचे चाहते आहेत हे पाहून मला आनंद झाला.

गुजरातच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना यश मिळेल असे भाकित वाचल्याने मला आनंद झाला.

मिसळपावच्या हजर सदस्यांच्या यादीत आमचे मित्र केशवसुमारांचे नाव दिसताच मला आनंद झाला.

धोंडोपंतांनी आरती प्रभू आणि भा.रा. तांबे यांच्या कवितांवर येथे लिहायचे संकल्प सोडल्याचे वाचून आनंद झाला.. (आतूर)(आनंदी) केशवसुमार

भा.रा.तांबे यांच्या निवडक कवितांमध्ये आज माझी अत्यंत आवडती ' कळा ज्या लागल्या जीवा...' ही कविता मिसळपाववर टंकित केल्यामुळे मला आनंद झाला.

In reply to by धोंडोपंत

ही माझी अत्यंत आवडती अत्यंत आवडती सकाळी मि.पा. वर वाचायला मिळ्याल्यामुळे प्रचंड आनंद झाला.. धोंडोपंत धन्यवाद..

खिडकीतून बाहेर पाहिले.. आज बाहेर पाऊस किंवा बर्फ नाही हे बघून आनंद झाला.. (आज सुर्याच दर्शन झाले तर !!) केशवसुमार

एकूणच सगळीकडे आनंद नुसता ओसंडून वाहतो आहे हे बघून आनंद `वाटला'!

मिसळपाव वर आणिबाणी जाहीर झाल्यापासून दोन खत्रुड अभिप्राय सोडले तर बाकी चांगलं लेखन झालं हे पाहून मला आनंद झाला

तुम्हा सर्वांना झालेला आनंद पाहून मला ही आनंद झाला.... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

मला मुलगा झाला. त्यचे नाव "आनंद" ठेवले आणि मला आनंद झाला. आपलाच, मन्या

मी गाडितून येताना हातातील पुस्तक एका सुंदर मुलीचंही आवडतं आहे हे तीने मला सांगितल्यावर आनंद झाला :) ऋशिकेश

इतक्या लोकांना आनंद झाला हे पाहुन मला आनंद झाला!!! :) -- ध्रुव

कसलीही समजूत न काढता बेसनलाडू पुन्हा आलेला पाहून मला आनंद झाला.

लोकांचा कळवळा पाहून मला आनंद झाला.

एवढे "आनंदी-आनंद गडे, इकडे, तिकडे, चोहिकडे" झालेले बघून मलाही आनंद झाला. स्वार्थाच्या बाजारांत किती पामरें रडतात; त्यांना मोद कसा मिळतो? सोडुनि स्वार्था तो जातो- द्वेष संपला, मत्सर गेला, आतां उरला इकडे,तिकडे, चोहिंकडे आनंदी-आनंद गडे!

शेअरबाजार खाली आला याचा मला आनंद झाला

स्वत: काही विधायक न लिहीता आणि इतरांच्या चांगल्या लेखनाला अभिप्रायही न देता काही लोक दिवसभर मिसळपाववर पडलेले असतात हे पाहून मला आनंद झाला.

डॉ. माधवी गाडगीळ, विसोबा खेचर, यशोदेचा घनश्याम तसेच धोंडोपंत, गारंबीचा बापू हे ऑनलाइन झाले की मला नेहमीच आनंद होतो.

In reply to by विसोबा खेचर

सोबत कोलीवाडा पापलेट आणि कोलीवाडा सुरमई खाताना मला आनंद झाला. ह्याशिवाय, धोंडोपंतांसोबत कोंबडी वडे खाताना मला आनंद झाला. आणि धोंडोपंतांसोबत चाट खातानाही मला आनंद झाला.

धोंडोपंत कोंबडि खातात हे कलुन मला बि आनंद जाला.

आज २ दिवसांनंतर पुन्हा एकदा "मिसळपाव" बघायला मिळाल्याने मला हर्ष ..... चुकलं चुकलं ... आनंद झाला. आनंदमार्गी [ छोटा डॉन ]

आमचा शिवराळ तात्या परत आलेला पाहून आम्हाला आनंद झाला

पंतऽ जरा ह्याची कुडंली मांडा व बघा ह्या च्या पाठी मागे ...........दशा केव्हालागणार आहे. जेव्हा लागेल तेव्हा माला व इतर पिडीताना आनंद होईल. १३वा ग्रह संजिव

काल इकडे (बेंगलोरला)झकास पाऊस झाला...... भजी खायला मिळाली आणि आज डब्यात भरल्या बांग्याची भाजी..........या पेक्षा जास्त काय कारण हवे खूश व्हायला...............

आज सकाळी मिपा ऊघडल्या वर चागले साहीत्य वाचुन आन॑द झाला.. आपलाच (मि पा का र ) विवेक वि.

एवढी बकवास उत्तरं वाचून माझ्या आनंदावर पार विरजण पडलं.

सक्काली सक्काली मिपावर कोलंबी भाताचा फोटु पाहुन आन्नन्द झाला. पाथस्थाचा इजय आसो. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* मेंदु गेला वाया, फ़िदीफ़िदी हसती बाया, शिनल्या मेंदुला चाळे नवे, जुन्या घराला टाळे नवे!