✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गृह कर्ज

स
सुहास पाटील यांनी
Wed, 09/17/2014 - 15:21  ·  लेख
लेख
काही दिवसापूर्वी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक विश्लेषन वाचायला मिळाले. दुसरे गृह कर्ज घ्यावे का FD करावे. त्यात अगदी पटवुन सांगितले होते कि दुसरे गृह कर्ज घेऊ नये. त्या परिस सरळ FD मध्ये पैसे टाकावे. मला लिंक सापडता सापडत नाहीये नाहीतर इथे दिली असती. तरी मी शोधन्याचा प्रयन्त करतोय अजून, लिंक सापडली कि इथे देईल पण इथे धागा टाकण्याचा मुद्दा असा कि जाणकारांनी ह्या विषयावर प्रकाश टाकावा. दुसरे गृह कर्ज घ्यावे का FD करावे का शेअर मार्केट मध्ये गुंतवावे ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28291 वाचन

💬 प्रतिसाद (104)

प्रतिक्रिया

घरच घ्या

टवाळ कार्टा
Wed, 09/17/2014 - 15:38 नवीन
घरच घ्या
  • Log in or register to post comments

घरच घ्या

आदिजोशी
Wed, 09/17/2014 - 15:42 नवीन
योग्य ठिकाणी, योग्य प्रकल्पात आणि भरवशाचा विकासकाकडे गुंतवणूक केल्यास इतका परतावा देणारी दुसरी गुंतवणूक नाही. शेअर मार्केट मधे ह्यापेक्षा कैक पटींनी परतावा मिळू शकतो पण त्यासाठी सकाळी ९ वाजल्यापासून सगळे कामधंदे सोडून त्यात घुसावे लागते. घरातली गुंतवणूक आजच्या घडीला तरी १ नंबर आहे.
  • Log in or register to post comments

शेअर मार्केट मधे ह्यापेक्षा

अनुप ढेरे
गुरुवार, 09/18/2014 - 09:50 नवीन
शेअर मार्केट मधे ह्यापेक्षा कैक पटींनी परतावा मिळू शकतो पण त्यासाठी सकाळी ९ वाजल्यापासून सगळे कामधंदे सोडून त्यात घुसावे लागते.
हे असत्य आहे. शेअर मार्केट मधून पैसे मिळवायला स्वतः शेअर्स विकत घ्यायला पाहिजेत असं अजिबात नाही. चांगला म्युचुअल फंड १५% अ‍ॅन्युअलाइस्ड परतावे नक्की देऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

वा वा

आदिजोशी
गुरुवार, 09/18/2014 - 14:28 नवीन
१५% हा तुमच्या मते 'कैक पटीने' परतावा असेल तर आनंद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

माझा मुद्दा 'शेअर मार्केटमधून

अनुप ढेरे
गुरुवार, 09/18/2014 - 14:32 नवीन
माझा मुद्दा 'शेअर मार्केटमधून चांगला परतावा पाहिजे असेल तर दिवसभर त्यातच डोके खुपसून बसायला पाहिजे असं नाही.' असा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

अज्ञान, घोर अज्ञान !!!

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 09/18/2014 - 16:25 नवीन
अज्ञान, घोर अज्ञान !!! आजचा गृहपाठ. चक्रवाढ व्याजाचा formula दहा वेळा लिहिणे. 5-10-15-20-25-30 अशा मुदतिसाठी 15% व्याजाने काय परतावा मिळतो याचा तक्ता बनवणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

अगदी अगदी. ५ वर्षात घराची

अनुप ढेरे
गुरुवार, 09/18/2014 - 16:41 नवीन
अगदी अगदी. ५ वर्षात घराची किंमत दुप्पट हाही साधारण १५-१६% वार्षिक परतावा आहे. म्युचुअल फंड १५% टक्यांहून जास्तं परतावा देऊ शकतात पण त्याच जोखीम थोडी अधिक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

पण घर विकले गेले नाही तर ? हि

सुहास पाटील
गुरुवार, 09/18/2014 - 16:45 नवीन
पण घर विकले गेले नाही तर ? हि रिस्क आलीच की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

तो ग्रोस परतावा. ब्रोकरेज,

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 09/18/2014 - 19:55 नवीन
तो ग्रोस परतावा. ब्रोकरेज, stamp duty आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्जाचे व्याज. हे सगळे धरून हिशोब केला तर बराच फरक पड़तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

अगदी अगदी. पूर्ण सहमत. वर

अनुप ढेरे
गुरुवार, 09/18/2014 - 20:38 नवीन
अगदी अगदी. पूर्ण सहमत. वर अजून सोसायटी मेंटेनन्स, कर हे आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

रीअल इस्टेट ने गेल्या १०

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 09/18/2014 - 22:56 नवीन
रीअल इस्टेट ने गेल्या १० वर्षात मस्त रिटर्न्स दिले म्हणून येत्या काळात देईल असे नाही. १९९०-२००४ किती वाढले भाव ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

+१

आजानुकर्ण
गुरुवार, 09/18/2014 - 23:14 नवीन
सहमत. सलमान रश्दी यांच्या घराची रोचक गोष्ट http://www.valueresearchonline.com/story/h2_storyview.asp?str=21568
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

>>रीअल इस्टेट ने गेल्या १०

दशानन
Fri, 09/19/2014 - 22:48 नवीन
>>रीअल इस्टेट ने गेल्या १० वर्षात मस्त रिटर्न्स दिले म्हणून येत्या काळात देईल असे नाही. १९९०-२००४ किती वाढले भाव ? +१ हेच, आता शेअर मार्केट व गोल्डबद्दल पण लागू होत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे

arunjoshi123
Wed, 11/08/2017 - 15:05 नवीन
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्जाचे व्याज.
घराच्या लोनचा व्याजदर १०% प्रतिवर्ष मानला, लोनची राशी आणि स्वतःची राशी १:४ या प्रमाणात मानली, प्रॉपर्टीची किंमत ५ वर्षांत दुप्पट होते असे मानल, कॅपिटल गेन्स टॅक्ससाठी महागाईचा दर ५% मानला, कॅपीटल गेन्स टॅक्स २०% मानला, इन्कम टॅक्स ३०% मानला तर .... लोन घेणे प्रॉपर्टीत तुम्हाला खूप फायदा करून देते. ही वाक्यरचना चुकीची आहे कारण असं अधिक परतावा देणार्‍या गुंतवणूकीत सोबत जोडायला कमी किमतीचे सहाय अन्यत्र मिळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

माझ्या अंदाजाने घरातली

काळा पहाड
गुरुवार, 09/18/2014 - 15:42 नवीन
माझ्या अंदाजाने घरातली गुंतवणूक ही फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा कमी परतावा देते. आणि तुम्ही म्हणताय नं १?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

एकोळी धागो? संपादकानुंऽऽऽऽ

सूड
Wed, 09/17/2014 - 15:42 नवीन
एकोळी धागो? संपादकानुंऽऽऽऽ हंयसर येवा!!
  • Log in or register to post comments

पोटेन्शियल आसां... र्‍हांव दे

आदूबाळ
Wed, 09/17/2014 - 15:48 नवीन
पोटेन्शियल आसां... र्‍हांव दे हंयसरच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हप्ते भरण्यात सगळी उमेद संपून जाते असा

संजय क्षीरसागर
Wed, 09/17/2014 - 15:56 नवीन
(गरज नसतांना) दुसरं घर घेतलेल्या क्लायंटसचा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments

अनुभव टंका कि राव

सुहास पाटील
Wed, 09/17/2014 - 19:21 नवीन
अनुभव टंका कि राव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

गरज नसेल तर दुसरे घर घेऊ नका.

प्रसाद१९७१
Wed, 09/17/2014 - 16:02 नवीन
गरज नसेल तर दुसरे घर घेऊ नका. ५-७ वर्षा पूर्वी असे करणे योग्य होते. पण सध्या असे करु नये. घराला maintainance cost पण असते. भाड्यानी दिले तर २% पण परतावा मिळत नाही. ५% रजिष्ट्रेशन फी, MSEB cost वगैरे गोष्टी वाया जातात. हल्ली वर्षिक सोसायटी खर्च सुद्धा २५-३० हजार असतो. सरळ Liquid funds मधे टाका, टॅक्स जावून ८.५% कमीतकमी परतावा मिळेल आणि पाहीजे तेंव्हा पैसे वापरायला पण मिळतील.
  • Log in or register to post comments

ही लिक्विड फंड काय भानगड आहे

काळा पहाड
Wed, 09/17/2014 - 18:45 नवीन
ही लिक्विड फंड काय भानगड आहे जरा इस्कटून सांगा. म्युच्युअल फंडच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

liquid funds म्हणजे Mutual

प्रसाद१९७१
Wed, 09/17/2014 - 19:23 नवीन
liquid funds म्हणजे Mutual Funds नी Short Term Debt instruments चे चालू केलेले फंड. त्यात ते नॉर्मली सरकारी रोख्यात गुंतवणुक करतात. त्यामुळे जवळ जवळ Risk Free असते. जशी बाकीची Mutual Fund ची युनीट विकत घेतली जातात तशीच ही पण घ्यायची किंवा विकायची असतात. १. ह्यात Entry Or Exit Load बसत नाही. त्यामुळे एक पैसा सुद्धा वाया जात नाही ( कमीशन किंवा फी पोटी ). २. ३ वर्ष गुंतवणुक ठेवली आणि युनिट विकली तर Long Term Capital Gain बसतो म्हणजे Indexation चा फायदा मिळतो. म्हणजेच जवळ जवळ Tax Free. 3. तुमचे जर Online Trading Account असेल तर, आज विकत घेतले तर उद्या तुमच्या डीमॅट ला जमा होतात. आज विकले तर उद्या पैसे जमा होतात. अगदी १ दिवस सुद्धा पैसे ठेवता येतात. ४. रोजच्या रोज NAV वाढतेच अगदी नक्की. माझ्या अनुभवाप्रमाणे HDFC, ICICI Mutual Funds च्या योजनांमधे वार्षिक ९ ते ९.५% परतावा मिळतो. आणि ३ वर्ष थांबल्यास तो जवळजवळ टॅक्स फ्री असतो. इतका चांगला टॅक्स फ्री आणि पुर्ण सुरक्षीत तसेच liquidity असणारा दुसरा पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

ओक्के. यालाच अल्ट्राशॉर्ट डेट

काळा पहाड
Wed, 09/17/2014 - 22:40 नवीन
ओक्के. यालाच अल्ट्राशॉर्ट डेट फंड असंही म्हणतात असं दिसतं. पण मला एक कळत नाही. याचं रिटर्न लाँग टर्म डेट फंड पेककरण्य जास्त कसं? मला वाटलं की डेट जितकं लाँग टर्म, तितकं रिटर्न जास्त हवं नाही तर लाँग टर्म इन्वेस्ट करण्याचा फायदा काय? बाकी हे म्हणजे फिक्स पेक्षा जास्तच उत्पन्न झालं, ते ही टॅक्स फ्री.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

यात आधी कधी जास्त बघितले न्हवते म्हणुन एक बाळबोध शंका

काउबॉय
Wed, 09/17/2014 - 23:03 नवीन
3 वर्षाच्या आत विकले तर शोर्ट टर्म गेन लागणार काय ? 30% ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

3 वर्षाच्या आत विकले तर शोर्ट

प्रसाद१९७१
गुरुवार, 09/18/2014 - 09:28 नवीन
3 वर्षाच्या आत विकले तर शोर्ट टर्म गेन लागणार काय>>>> तुमच्या Income मधे धरले जाणार, जसे FD चे व्याज धरले जाते तसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काउबॉय

ह्या वर्षीच्या बजेट च्या आधी

प्रसाद१९७१
गुरुवार, 09/18/2014 - 09:29 नवीन
ह्या वर्षीच्या बजेट च्या आधी ही मुदत फक्त १ वर्षाची होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काउबॉय

मला वाटतं २००५ पासून आहे. आणि

कवितानागेश
गुरुवार, 09/18/2014 - 11:55 नवीन
मला वाटतं २००५ पासून आहे. आणि ते कर्ज जर इन्कम टॅक्स बेनेफिटसाठी दाखवले असेल, तर ५ वर्ष विकता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

प्रतिसाद टाकणार्यांचे धन्यवाद

सुहास पाटील
Wed, 09/17/2014 - 18:01 नवीन
प्रतिसाद टाकणार्यांचे धन्यवाद. अजुन चर्चा व्हावी हि अपेक्षा.
  • Log in or register to post comments

फ्लॅट ऐवजी जमिनीमधे गुंतवा.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 09/17/2014 - 18:21 नवीन
फ्लॅट ऐवजी जमिनीमधे गुंतवा. (बंगलो प्लॉट्स किंवा एखादा बंगला). जेणेकरुन तुम्हाला मेंटेनंन्स कमीत कमी भरायला लागेल. किंवा सोन्यात गुंतवा.
  • Log in or register to post comments

बाब्बो...

राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 09/18/2014 - 13:27 नवीन
जमीन? अहो तुम्ही तिकडे रहात नसाल तर ती कधी जाईल समजणार पण नाही..कसले रिटर्न्स आणि काय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

खोस ला का घोस ला पाहिलाय का

कवितानागेश
गुरुवार, 09/18/2014 - 16:33 नवीन
खोस ला का घोस ला पाहिलाय का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

म्हणुनचं एखादा बंगला सुद्धा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 09/19/2014 - 08:16 नवीन
म्हणुनचं एखादा बंगला सुद्धा म्हणालोय. कारण जमिनीचा भाव कमी असताना केलेली गुंतवणुक भविष्यात नेहेमीचं उत्तम रीटर्न्स देते. बाकी कर्ज नं काढता सुद्धा जमिन घेणं आता शक्य आहे. पुण्यात काही डेव्हलपर्स ई.एम.आय. बेसिस वर जमिन विकतात (त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे माहीत नाही कारण हा व्यवहार मी स्वतः केलेला नाही.). ह्याचा फायदा म्हणजे जमिन ज्या दिवशी घेताय त्याच दिवशीच्या किंमतीएवढी रक्कम तुम्हाला टप्प्याटप्प्यानी भरता येते. डोक्यावर एकदम मोठ्या रकमेचा बोजा रहात नाही. दुसरं घरं ही गरजेची वस्तु नसुन चैनीची आहे आणि कर्ज काढुन चैन करु नये असं माझं नेहेमीचं मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

जमिनीची खरेदी विक्री चांगली

सुहास पाटील
गुरुवार, 09/18/2014 - 16:36 नवीन
जमिनीची खरेदी विक्री चांगली ओळख असल्याशिवाय करू नये. त्यातच शहाणपणा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

+१११

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 09/19/2014 - 08:17 नवीन
+१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास पाटील

आमचा प्रतिसाद उडाला.योग्य

जेपी
Wed, 09/17/2014 - 18:29 नवीन
आमचा प्रतिसाद उडाला.योग्य प्रश्न विचारले होती की ? :-(
  • Log in or register to post comments

प्रतिसाद पुन्हा टाका. हा

सुहास पाटील
Wed, 09/17/2014 - 18:31 नवीन
प्रतिसाद पुन्हा टाका. हा धागाच आधी उडाला होता. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

दुसरे घर घेतलंत, तर त्याचा

कवितानागेश
Wed, 09/17/2014 - 18:31 नवीन
दुसरे घर घेतलंत, तर त्याचा वेल्थ टॅक्स पण पडेल दरवर्षी, त्याचापण विचार करा. आणि एकावेळेस २-३ लोन्स असणं बरं नाही.
  • Log in or register to post comments

वेल्थ टॅक्स ? एखादी लिंक

सुहास पाटील
Wed, 09/17/2014 - 18:33 नवीन
वेल्थ टॅक्स ? एखादी लिंक दिलीत तर बर होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

इन्कम्टॅक्स बेनेफिट मिळ्तो का

काळा पहाड
Wed, 09/17/2014 - 18:46 नवीन
इन्कम्टॅक्स बेनेफिट मिळ्तो का दुसर्‍या घरासाठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

मिळतो तर. उलट दुसर्या घरासाठी

सुहास पाटील
Wed, 09/17/2014 - 18:52 नवीन
मिळतो तर. उलट दुसर्या घरासाठी आपण पूर्ण व्याज वजावट दाखउ शकतो. पण भाड्याची इन्कम दाखवावी लागते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

एक साधे सूत्र

मित्रहो
Wed, 09/17/2014 - 18:36 नवीन
दुसऱ्या घरासाठी कर्ज घेताना एक साधे सूत्र. इएमआय मधील किती रक्कम व्याजात जाते हे बघणे, ते व्याज हे मिळणाऱ्या भाड्यापेक्षा जास्त नसावे. तसे जर झाले तर भारतात घराच्या किंमती ह्या FD वर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त दराने वाढतात. घर ही जास्त काळाची गुंतवणुक आहे. कितीही मार्केट चांगले असले, घर कितीही मोक्याच्या जागी असले तरी ते विकून हातात पैसे यायला विकायचा विचार केल्यानंतर कमीत कमी चार ते सहा महीन्याचा कालावधी लागतो.FD, शेअर विकून लगेच पैसा आणता येतो. या महत्वाच्या फरकामुळे दोन गुतवणुकीतली तुलना करता येत नाही. मित्रहो
  • Log in or register to post comments

दुसरे गृह कर्ज घ्यावे का FD

सुहास..
Wed, 09/17/2014 - 18:39 नवीन
दुसरे गृह कर्ज घ्यावे का FD करावे का शेअर मार्केट मध्ये गुंतवावे ? >>> कळले नाही ! FD करायला पैसै लागतील ना ? आणि गृह कर्ज म्हणजे लोन करावे लागेल ...आणी शेयर्स मध्ये तर खेळता पैसा लागतो ....अर्थात जर असे समजले तुमच्याकडे आता सध्या काही रक्कम आहे आणि ती गुंतवायची आहे तर ...येस्स !! जागा घ्या ...या तीन गोष्टी आहेत जिथे गुंतवा रक्कम वाय जात नाही ..रोटी , कपडा आणि मकान ...या तीन पैकी कुठे ही गुंतवा
  • Log in or register to post comments

सुहासराव - तुम्हीच धागा

प्रसाद१९७१
Wed, 09/17/2014 - 18:44 नवीन
सुहासराव - तुम्हीच धागा काढताय आणि तुम्हीच "कळले नाही" म्हणताय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

सुहासराव - तुम्हीच धागा

सुहास..
Wed, 09/17/2014 - 18:46 नवीन
सुहासराव - तुम्हीच धागा काढताय आणि तुम्हीच "कळले नाही" म्हणताय >>> एकाहत्तर राव ...ते पाटील आहेत ..तो मी नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

आहो, धागा पाटलांनी काढलाय, पण

स्वप्नांची राणी
Wed, 09/17/2014 - 18:47 नवीन
आहो, धागा पाटलांनी काढलाय, पण बिनपाटलांना कळलेलं नाहिये...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

> सुहासराव - तुम्हीच धागा

सुहास पाटील
Wed, 09/17/2014 - 18:48 नवीन
> सुहासराव - तुम्हीच धागा काढताय आणि तुम्हीच "कळले नाही" म्हणताय आहो तो मी नव्हे. नाव एक आहे पण व्यक्ती दोन प्रतिसाद टाकणारे आणि धागा टाकणारे दोन वेगळे सुहास आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

>>कळले नाही ! FD करायला पैसै

सुहास पाटील
Wed, 09/17/2014 - 18:43 नवीन
>>कळले नाही ! FD करायला पैसै लागतील ना ? आणि गृह कर्ज म्हणजे लोन करावे लागेल सुरवातीचे २०% ( ज्याला आपण डाऊन पेमेंट म्हणतो )असल्यावरच ८०% गृह कर्ज मिलते. तर इथे सुरवातीचे २०% कुठेतरी गुंतवायचे का ते वापरून अजून ८०% कर्ज घ्यायचे
  • Log in or register to post comments

कर्जाला शक्यतो नाही म्हणेन मी

सुहास..
Wed, 09/17/2014 - 18:50 नवीन
कर्जाला शक्यतो नाही म्हणेन मी ..( मायला आयुष्य जात व्याजासकट भरता भरता :) ) सध्या ...एक पर्याय येतो ..गावकड्याला , जिथे हाय वे होताहेत एमआयडिसी आहे ..तिथे आर- झोन च्या जागा असतात ...सुरवातील काही रक्कम मग ठराविक हत्याने अश्या स्वरुपात ...जरा जेन्युयन ओळख ई, काढुन गुंतवुणक आहे फायद्याची ...शिवाय स्मार्ट सिटीच मध्ये पण असे काही पर्याय आहे का बघायला हवे .. ( मी दोन वर्षापुर्वी कवडीमोल घेतली होती औ.बाद -जालना रोडला , सध्याचा भाव .. ;) )
  • Log in or register to post comments

आर-झोन म्हणजे काय असतं?

कवितानागेश
Wed, 09/17/2014 - 19:15 नवीन
आर-झोन म्हणजे काय असतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

Residencial Zone

प्रसाद१९७१
Wed, 09/17/2014 - 19:25 नवीन
Residencial Zone
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा