Skip to main content

सत्याचा "बुरखा"फाश

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 13/07/2014 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मित्रमंडळींनो. मागे एकदा नथुराम गोडसेंच्या धाग्यावरुन बरीच शाब्दिक हाणामारी झालेली होती. त्यावेळेला काही गांधींच्या समर्थक बुद्धीवादी मंडळींनी आंधळ्या गांधीवादाखातर बरीच शाब्दिक हिंसा केली होती (अर्बन डिक्शनरीमधे हिप्पोक्रसी चा नवा अर्थ टाकता येईल काय?) असो. त्यावेळी पुरावा द्या, पुरावा द्या असा 'सत्याग्रह' काही गांधीवाद्यांनी केला होता. आपल्या मौलिक वेळातला फक्त दिड तास काढुन हे नक्की बघा किंवा ऐका. ज्या गोष्टींचे पुरावे अस्तित्वात आहेत आणि कोणालाही बघता येतील अश्या स्थितीत आहेत त्यावरुन "गांधीवादः एक थोतांड" हा मुद्दा अधोरेखित केला जाऊ शकेल. खालील मुद्दे मात्र नक्की लक्षात घेण्यासारखे आहेत. १. विशिष्ट धर्मियांचा अनुनय. (प्रकरण भाई रशिद, खिलाफत चळवळ, तुर्कस्तानच्या दोन मुल्लांनसाठी हजारो देशबंधुना तुरुंगात सडु द्यायचा अट्टाहास ई.ई.) २. अत्याचार झालेल्या भगिनीवर्गाला दिलेले सल्ले. ३. स्वतःच महत्त्व कमी होऊ नये म्हणुन क्रांतिकारकांच्या शिक्षांमधे हस्तक्षेप नं करणं. ४. स्वातंत्र्य फक्त आणि फक्त गांधींमुळे मिळालं ह्याचं शालेय ईतिहासापासुन चालु असलेल पद्धतशिर ब्रेन-वॉशिंग. धागा मला जुने वाद उकरुन काढायचे आहेत ह्या उद्देशानी काढलेला नाही. गांधीवादी असोत किंवा कट्टर विरोधक असोत, कृपया वाद टाळावा ही नम्र विनंती. आफळे बुवा: गांधी भाग-१ Charudatta Aphale: Gandhi Part 1 आफळे बुवा: गांधी भाग-२ Charudatta Aphale: Gandhi part 2 आफळे बुवा: गांधी भाग-३ Charudatta Aphale: Gandhi Part 3 गांधींच्या म्हणण्याप्रमाणे "सत्यमेव जयते" म्हणतो. :).
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 17187
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

आम्ही एव्हढे प्रयत्न करून पण या धाग्याचे शतक काही होत नाही. मी याबद्दल मिपाच्या अनुभवी सदस्यांचा जाहीर धिक्कार करतो.

In reply to by आनन्दा

तसा अनुभव कमीच पण तरीही आमच्याक्डून हा प्रतिसाद हातभार म्हणून घेण्यात यावा. धन्या-वाद... आपलं धन्यवाद! ;)

सगळ्यांचीच जय! फ्क्त जय गांधी आणि जय नेहरुच का?

आत्ताच नरसोबाच्या वाडीतुन परत आलोय... हा धागा जेव्हा पाहिला होता तेव्हा वाटलही नव्हत की चारुदत्त आफळ्यांचे किर्तन ऐकावयास मिळेल. परंतु गेले ३ दिवस वाडीत चारुदत्त आफळ्यांचे किर्तन चालु होते त्यातील २ दिवसांचे किर्तनाचा लाभ मला घेता आला :) विषय होता " सावरकरांचे थोरले बंधु :- गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर " किर्तनाचा अनुभव केवळ अवर्णीय होता ! कित्येक वर्षांनी अतिशय सुरेख किर्तन ऐकल्याचा अनुभव आणि आनंद मिळाला ! :) माझ्या मोबल्यातुन लांबुन फोटु काढले ते तितकेसे चांगले आणि स्पष्ट नाहीत, परंतु तरी सुद्धा ते इथे देत आहे :- गणपती बाप्पाला हार घालताना चारुदत्त आफळे. 1 चारुदत्त आफळे किर्तन करताना. 2 बाकी कॄष्णेच्या पाण्याचा स्तर बराच वर आलेला आहे, माझी एकदातरी दक्षिणद्वार घडावे अशी इच्छा आहे, बघु कधी तो योग येइल. 3 जाता जाता :- आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला अश्या असंख्य किर्तनकारांची आजच्या घडीला गरज आहे हे प्रकर्षाने जाणवले. {वाडीकर} :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom - Official Trailer

In reply to by मदनबाण

फोटोंबद्दल धन्यवाद मदनबाण :)....काय काय सांगीतलं आफळेबुवांनी त्याचा ईथे किंवा दुसरा धागा काढुन सांगितलतं तर बरं वाटेल. :)

काय काय सांगीतलं आफळेबुवांनी त्याचा ईथे किंवा दुसरा धागा काढुन सांगितलतं तर बरं वाटेल. रात्री ९:०० ते १२:३० इतका वेळ किर्तन चालले. :) सावरकर बंधुंचे आणि त्यांच्या घरातील स्त्रीयांनी केलेले देशकार्य. बाबाराव साबरकरांनी भोगलेल्या यातना,त्रास.त्यांच्या शारिरीक आजारा बद्धल आणि बरचं काही. :) हे सगळं लिहण्याची माझी क्षमता नाही ! शिवाय ऐकण्यात जे समाधान आहे ते वाचण्यात नाही. :) यात सुरुवातीला मुख्य विषयाची सुरुवात करण्याआधी कविराज भूषण आणि औरंगजेब यांच्या बद्धल सांगितलं, त्यात खाली दिलेला भाग थोडक्यात आला होता :- https://www.facebook.com/kavirajbhushan/posts/692220437481911

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom - Official Trailer

आम्ही लहानपणी ज्येष्ठ आफळे बुवांचे किर्तन ऐकलेले आहे. त्यामुळे 'आफळे' नांवाभोवती असणारे किर्तनाचे वलय प्रत्यक्ष अनुभवले आहे. धाकटे आफळे 'बापसे बेटा सवाई' असतिल ह्यात शंका नाही. घराण्याला ओघवत्या भाषेचे आणि ज्ञानाचे वरदान आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

हो काका. बापसे बेटा सवाई नक्की आहेत. सिनिअर आफळे बुवांच्या किर्तनाचं रेकोर्डींगच्या दोन कॅसेट मा़झ्या आजोबांकडे होत्या. त्यातली एक ऐकलं आहे (अर्धवट). ज्युनिअर आफळेबुवांची जिभ अजुन धारदार आहे. बाकी बुवा गातात जबरदस्त.

धाकटे आफळे 'बापसे बेटा सवाई' असतिल ह्यात शंका नाही. घराण्याला ओघवत्या भाषेचे आणि ज्ञानाचे वरदान आहे. अगदी असेच आहेत, चारुदत्त आफळे सुरेख गायन करतात आणि अर्थात भाषेवर प्रभुत्व आहेच ! :) ज्यांनी वरचे दुवे {लेखात दिलेले} अजुन ऐकले नसतील त्यांनी ते आवार्जुन ऐकावेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

भारताच्या स्वातंत्र्याची मागणी ही भारतातल्या काही सत्ता पिपासू लोकांनी त्यांना सत्तेवर येण्यासाठी केली होती असे माझे मत बनत चालले आहे. १९०० सालाच्या आधी पासुन महानगर पालिके वर हिंदी लोक निवडुन येउन राज्य करत होते. राज्यांच्या विधानसभासुद्धा तीस च्या दशकात चालू झाल्या होत्या. संसद सुद्धा अस्तीत्वात आली होती १९४० च्या आसपास. पण ह्या चोरांना वाट्टेल तसे खायला ब्रिटीशांमुळे संधी मिळत नव्हती म्हणुन ह्यांना स्वातंत्र्य हवे होते. अगदी १९४५ पर्यंत लष्कर आणि पोलिस दल ब्रिटीशांना एकनिष्ठ राहीले. जगात कुठेच ज्या लोकांवर सो कॉल्ड राज्य करायचे त्याच लोकांचे ९०% लष्कर आहे असे दिसले नाहीये. ब्रिटिशांच्या काळातच सामान्य माणुस स्वतंत्र होता.

In reply to by बॅटमॅन

रा.रा. मदनबाण, तुम्ही वाडीकर हे ठौक न्हवते! अगदी शब्दशः वाडीकर नाही, पण वाडी प्राण आहे माझा. :) आता काही काळाने वयाची पस्तीशी गाठेन, त्यातली जवळपास ३३ वर्ष वाडीला जात आहे. :) बाकी मिरज वाडी रस्ता अगदी रद्दड आहे ! इतके वर्ष प्रवास करतोय पण रस्त्याला धड डांबर नाही, आपल्या महाराष्ट्रीची प्रगती असे रस्ते पाहुनच कळुन येते. :( सरकारने जनतेच्या पैशातुन जाहिरात करण्या ऐवजी धड रस्ते बांधावेत आधी !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

नथुराम गोडसे यांच्यावर आता चित्रपट येत आहे. नव्या वादाची सुरुवात ? http://www.youtube.com/watch?v=l0d-MJ8lIHE

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

In reply to by प्रभाकर पेठकर

अच्छा... हे माहित नव्हते. तू-नळीवर असल्यास पाहण्याचा प्रयत्न करीन.तू-नळीवर नाटक आहे, ते सुद्धा पहायचे आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट