मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वांग्याचे काप

भिंगरी · · पाककृती
गणपतीत गोड खाउन कंटाळलात ना? मग जरा ही चमचमीत रेसीपी पहा. (कधीतरी खा,नेहमी नको,आरोग्याची काळजी घ्या.) वांग्याचे काप साहित्य.... मोठे वांगे तांदळाची पिठी एक चमचा बेसनपीठ मीठ लाल तिखट तळण्यासाठी तेल कृती........... मोठ्या वांग्याचे पातळ काप करून घ्यावे.व थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवावे नंतर निथळून जाळीवर काढून ठेवावे. 1 तांदळाची पिठी, बेसनपीठ,मीठ ,लाल तिखट कोरडेच एकत्र मिसळुन घ्यावे. त्या पिठात काप चांगले घोळवून घ्यावे. 2 तव्यावर थोडेसे तेल टाकून त्यावर हे काप दोनही बाजूनी मंद आचेवर तळून घ्यावे, 3 खमंग वांग्याचे काप चपाती, भाकरी कशाबरोबरही चांगले लागतात. तोंडी लावणे म्हणूनही उपयोग होतो. असेच टोमाटो,बटाटा,कारली याचेही काप करू शकता. आवडत असेल तर पीठ लावण्यापूर्वी आलं लसूण पेस्ट लावू शकता. kap

वाचने 20283 वाचनखूण प्रतिक्रिया 38

सुहास झेले 06/09/2014 - 00:06
मला प्रचंड आवडतात हे काप...गरम भातात कुचकरून खायला पण मस्त वाटतात... :) फोटो?

आवडता पदार्थ ! वांगी / बटाट्याचे काप असे तळण्यापूर्वी किंवा त्यांची भजी तळण्यापूर्वी मीठ टाकलेल्या थंड पाण्यात पाच मिनीटे बुडवून ठेवल्यास जास्त चवदार लागतात.

वांग्यांना सर्वात आधी मीठ, नंतर हळद नंतर चिंचेचा कोळ आणि शेवटी लाल तिखट लावून जरा मुरु देतो नंतर तांदूळाच्या पिठीत घोळवून तेलावर खरपूस भाजून घेतो. मस्तं लागतात.

अजया 06/09/2014 - 06:53
लै भारी पाकृृ ,भिंगरीताई!येऊ द्या अजून पाकृृ तुमच्या.

एस 06/09/2014 - 17:50
माझीच आयडिया ढापली... आमच्या वड्यांबरोबर असेच वांगे-बटाट्यांचे काप बनवले होते. ;-) मस्त पाककृती. सोबत प्रपे, इए आणि पैतै इत्यादींच्या टीप्सपण भारी. धन्यवाद.

पोटे 07/09/2014 - 14:14
शॅलो फ्राय करतो.. पीठ भज्यासारखे करुन काप त्यातुन बुचकळुन शॅलो फ्राय करतो

कंजूस 29/09/2014 - 21:05
फक्कड!आभार सर्वाँचे.ज्यांची पाकृ ढापलेली आहे त्यांच्यासाठी सहानुदर्शक ठराव एकमताने मान्य करून टाकू ३०सप्टेँबरच्या आत. आता उंधियु येऊ द्या.