Skip to main content

वांग्याचे काप

लेखक भिंगरी यांनी शनिवार, 06/09/2014 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
गणपतीत गोड खाउन कंटाळलात ना? मग जरा ही चमचमीत रेसीपी पहा. (कधीतरी खा,नेहमी नको,आरोग्याची काळजी घ्या.) वांग्याचे काप साहित्य.... मोठे वांगे तांदळाची पिठी एक चमचा बेसनपीठ मीठ लाल तिखट तळण्यासाठी तेल कृती........... मोठ्या वांग्याचे पातळ काप करून घ्यावे.व थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवावे नंतर निथळून जाळीवर काढून ठेवावे. 1 तांदळाची पिठी, बेसनपीठ,मीठ ,लाल तिखट कोरडेच एकत्र मिसळुन घ्यावे. त्या पिठात काप चांगले घोळवून घ्यावे. 2 तव्यावर थोडेसे तेल टाकून त्यावर हे काप दोनही बाजूनी मंद आचेवर तळून घ्यावे, 3 खमंग वांग्याचे काप चपाती, भाकरी कशाबरोबरही चांगले लागतात. तोंडी लावणे म्हणूनही उपयोग होतो. असेच टोमाटो,बटाटा,कारली याचेही काप करू शकता. आवडत असेल तर पीठ लावण्यापूर्वी आलं लसूण पेस्ट लावू शकता. kap

वाचने 20307
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

मला प्रचंड आवडतात हे काप...गरम भातात कुचकरून खायला पण मस्त वाटतात... :) फोटो?

In reply to by सुहास झेले

मध्ये आहेत ते वांग्याचे काप,चार आहेत ते बटाट्याचे आणि पाच आहेत ते टोमाटोचे आहेत.

आवडता पदार्थ ! वांगी / बटाट्याचे काप असे तळण्यापूर्वी किंवा त्यांची भजी तळण्यापूर्वी मीठ टाकलेल्या थंड पाण्यात पाच मिनीटे बुडवून ठेवल्यास जास्त चवदार लागतात.

हा...काय तोंपासू दिसतायेत...माझा प्रचंड आवडीचा प्रकार..!! धन्यवाद भिंगरी पुन्हा आठवण करुन दिल्याबद्दल!!

वांग्यांना सर्वात आधी मीठ, नंतर हळद नंतर चिंचेचा कोळ आणि शेवटी लाल तिखट लावून जरा मुरु देतो नंतर तांदूळाच्या पिठीत घोळवून तेलावर खरपूस भाजून घेतो. मस्तं लागतात.

माझीच आयडिया ढापली... आमच्या वड्यांबरोबर असेच वांगे-बटाट्यांचे काप बनवले होते. ;-) मस्त पाककृती. सोबत प्रपे, इए आणि पैतै इत्यादींच्या टीप्सपण भारी. धन्यवाद.

In reply to by खटपट्या

करून पाहीले की नाही अजून,नाहीतर आता अजून थोडे वेगळे,पण चवदार वांग्याचे काप आले आहेत.

शॅलो फ्राय करतो.. पीठ भज्यासारखे करुन काप त्यातुन बुचकळुन शॅलो फ्राय करतो

बंगाल मध्ये वांगे केवळ तेलावर तळतात आणि मीठ लावून खातात...तिथे नेहमी हा पदार्थ खाल्ला जातो.तेला "बैंगन भाजा" म्हणतात.

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्स्स्स्स्स्स्स्स्स्स्द!!!!! शेवटचा फोटू बगून गरमागरम आमटीभात पण दिसायला लागाला! एक नंबर !

सहीच!! बंगालात बेगुन भाजा अन बिहार झारखंडात बेगुनी म्हणतात ह्यालाच थोड्याफार फरकाने!!

मलाही आवडतात वांग्याचे काप. कमी तेलात भजी खाण्याचा आनंद मिळतो. बरोबर अदरक टाकून बनविलेला गरमागरम चहा,अहाहा, तोंडात पाणी आले.

मस्त पाकृ....मला प्रचंड आवडतात वांग्याचे काप!! शाळेत असताना बर्‍याचदा डब्यात पोळी आणि काप म्हणजे बस्स...

फक्कड!आभार सर्वाँचे.ज्यांची पाकृ ढापलेली आहे त्यांच्यासाठी सहानुदर्शक ठराव एकमताने मान्य करून टाकू ३०सप्टेँबरच्या आत. आता उंधियु येऊ द्या.