परिघ परिक्रमा
बीजगणित हा माझा आवडता विषय. मला समीकरणांची उत्तरं शोधायची भारी हौस. पण 'डावीकडची बाजू उजवीकडच्या बाजूशी समान आहे हे सिद्ध करा' हा प्रश्न माझा स्वाभिमान दुखवत आलाय, आणि मला नाउमेद करत आलंय, नेहमीच. एकतर ज्या प्रश्नाचं उत्तर मला आधीपासूनच समोर दिसतंय तेच कसंतरी मटका मारून, नाहीतर पुस्तकात छापलेली पद्धत वापरून आपण आणणं अपेक्षित असतं. त्याचं कसलं कौतुक करायचं? आणि समजा ते उत्तर सिद्ध करता येत नसेल, मग तर माझं टाळकंच हटायचं. येत नाही म्हणजे काय! समोर एवढं ढळढळीतपणे दिसतंय म्हणजे यायलाच हवं.
आपल्याला आधीपासूनच ठाऊक असलेल्या ठिकाणीच जर जायचं असेल तर प्रवासाचा उत्साह कसा निर्माण करावा माणसानं? एखादं स्थळ, एखादी कथा, एखादं गाणं, यांची लज्जत पहिल्यांदा चाखतानाचा आलेला अनुभव आपल्या मनात घर करून बसतो. चांगला असो वा वाईट. ती लज्जत वाढीव उत्साहाने किंवा निरूत्साहाने पुन्हा चाखायला गेलो की तिच्या अनुभवाची तीव्रता कमी झाल्याचं कळतं. बारावीत अर्थशास्त्राचा अभ्यास केलेल्यांना हे सहज क्लिक होईल (Law of diminishing marginal utility).
थोडक्यात काय तर आपण सतत अनपेक्षिताची अपेक्षा ठेवून असतो. जिथे सगळंच अपेक्षित असतं, तिथे उत्साहाचं अस्तित्व नसतं. सकाळी घराबाहेर पडून, दिवसभर बाहेर विविध अनुभव घेऊन रात्री घरी परतायची वेळ येते तेव्हा रोजचा वरणभातच घशाखाली ढोसण्याच्या कल्पनेने कितीसा उत्साह जागा होतो? तेच जर मध्येच आईचा फोन आला आणि 'लवकर ये आज तुझ्या आवडीचा बेत आहे' असं तिनं म्हटलं तर पावलं कशी झपझप पुढे टाकली जातात!!
तत्त्वज्ञानावरच्या गप्पा सुरू झाल्या की सिद्धत्वाबद्दल हमखास चर्चा होते.
जो सिद्ध होतो त्याला सर्वस्वाचा साक्षात्कार झालेला असतो. त्यामुळे त्याला कसलीच इच्छा आकांक्षा उरत नाही, कसलं बंधन नाही, कसलीही भिती नाही. त्याच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात. तो पूर्णत्वाला पोचतो. पूर्णत्वाला पोचला म्हणजे आता त्याच्याकडे करण्यासारखं काही राहिलं नाही. दुरूस्त करण्यासाठी उणीवच राहिली नाही. आणि म्हणूनच पूर्णत्वाला शून्यत्वही म्हणायचं. म्हणजे स्वतःच्या मूळपदाशी तो सिद्ध माणूस पोचलेला असतो.
आयुष्यभर झक मारून पुन्हा 'जैसे थे'च व्हावं लागणार असेल, तेच जर जगण्यामागचं उद्दिष्ट असेल, तर जगण्याची उमेद का राहील एखाद्याला? आपलं आयुष्य म्हणजे शून्यत्वापासून सुरूवात करून पुन्हा शून्यत्वाकडेच नेणारं एक वर्तुळ असेल, आणि आपण त्याच्या परिघावरून, आतल्या बाजूने धावणारे, विविध जन्म घेणारे आत्मे असू, तर मला या वेटोळं घालून बसलेल्या अजगराच्या शेपटीवर पाय द्यायचाय, त्याला उलगडून सरळ व्हायला भाग पाडायचंय, त्याच्या शेपटीपासून त्याच्या जबड्याकडे जाईस्तोवर एकच आयुष्य जगून घ्यायचंय आणि मग हसत हसत त्याच्या जबड्यात शिरून, मृत्यू कसा असतो हा शेवटासाठी राखून ठेवलेला अंनुभव घ्यायचाय.
आयुष्य म्हणजे पंचतत्त्वांपासून आकार घेऊन, आपल्या वाटणीचे सगळे अनुभव जगून घेऊन, त्या अनुभवांचं गाठोडं बरोबर घेऊन आपण पुन्हा पंचतत्त्वांत विलीन व्हायचं असतं. निर्जीव शक्तीचं सजीव शक्तीत रूपांतर होऊन पुन्हा निर्जीव शक्तीत रूपांतर होतं. निर्मिती होते ती अनुभवांची. यात शून्यत्व आणि पूर्णत्वाची काहीच भूमिका मला तरी दिसत नाही.
- कौस्तुभ अनिल पेंढारकर
प्रतिक्रिया
बरं
+१
चौखुरे गुरुजींची आठवण झाली
ओह , असं झालं तर
गप रांव रे!! वश्शाड मेलो!!
>>आपण त्याच्या परिघावरून,
गिं ला जाऊन जड जड वजनं
जिम*
हा स्पांडू एक नंबरचा हरामखोर
ए ब्याट्या, माझ्या मित्राला
ओके सूडाना आझमी.
अत्यं.........त सहमत आहे!
चान चान!
यात शून्यत्व आणि पूर्णत्वाची काहीच भूमिका मला तरी दिसत नाही!
त्या टोमण्याखाली त्यांनी जे
हे क्लिअर केलंस ते बरं झालं!
मला या वेटोळं घालून बसलेल्या
तुला ते सोपं वाटतं म्याऊ...
थत्स अ रेअल्ल्य निचे इदेअ!!
'जेनी' हा तुमचाच डुआयडी का?
आता डुआयडी पण घ्यायची सोय
काय घंटा समजल नाय.
+१
लय भारी :)
हा लेख...
+१
आवरा!!!
Law of Economics.
ह्याला अपवाद पैसा आणि कंजूस