मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बेबी 3

mohite jeevan · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
या आठवडी बेबीच्या मनावरील बराच ताण हालका झाला होता, ती नेहमी प्रमाणे कामावर जात होती. तीच्या चेहर्यावरील तेज पाहुन जाँन खुष होता, तीला ही त्याचे आकर्षण वाटत होते. तीचा मुड पाहुन जाँन तीच्याजवळ आला, 'खुप छान,' जाँन म्हणाला, 'काय?,'ती आश्चर्यचकीत होऊन म्हणाली, 'आसेच मला तु दिसायला पाहिजे,' 'म्हणजे?,' 'म्हणजे तुला समझणार नाही, पण तुला आजा मी फीरायला नेणार आहे, येशील ना,' बेबीच्या चेहर्यावर हास्य उमटले, ते पाहुन जाँन म्हणाला, 'चल मग गाडी तयार आहे बाहेर,' बेबीने त्याच्या हातात हात दिला, व ते दोघे हाँटेलच्या बाहेर गेले, रात्रीची वेळ होती, जाँनने गाडीचा वेग नेहमी पेक्षा कमी ठेवला होता, दोघाच्याही चेहर्यावर स्मित हास्य होते, जाँनने तीचा हात आपल्या माडीवर ठेवला व त्यावर आपला हात ठेवला व एका हाताने गाडी चालवु लागला. तो वारंवार तीच्या चेहर्याकडे पाहत होता, 'डु यु लव मी?,' जाँनने तीली विचारले, 'काय?,' ती न ऐकल्या सारखे म्हणाली, 'बेबी,आय लव यु,' 'ओ, यु टु,' आसे बेबी म्हणताच जाँनने गाडीचा वेग वाढीवला, 'आय लव यु सो मच,' आसे तो गाडीमधुन तोंड काढुन ओरडु लागला, ते पाहुन बेबी म्हणाली,' यु आर क्रेझी, तु वेडा आहेस वेडा,' आसे म्हणताच समोर आसलेल्या पुलावरुन गाडी सरळ नदीत कोसळते, व दोघे ही ओरडु लागतात. त्या ओरडण्याने ती एकदम जागी होते, तीला दरदरुन घाम आलेला आसतो, श्वास मोठ्याने चालत आसतो. ती डोळे उघडते तर घरात आंधार आसतो. तीला कळते आज ही पाँवर गेली आहे. ती जवळच आसलेली बाँटरीचा खटका आँन करते. आणि तीच्या समोर केस नसलेली तीची लहान पणाची बेबी व तीची आई उभ्या दिसतात, 'कोठे आहेत तुझे पप्पा, सांग मला,' आशी तीची आई म्हणत आसते, 'माँम मला काही माहीत नाही,मी खरे सागते,' 'पण नाही तु खोटे बोलत आहेस?,' ती बेबीला जोर जोरात तीच्या डोक्यात लाथा मारत आसते, ती लहान बेबी ओरडत आसते, 'सेव मी माँम,आय डोन्ट नो,' अचानक ती लहान बेबी बेबीच्या हातातील ती बँटरी हीसकावुन घेते व बेबीवर प्रकाश टाकते, तसे होताच ती त्या बाँटरीवर बेबी हात मारते व बँटरी बेड खाली जाऊन पडते, मग बेबी बेड खाली जाऊन पाहते, तर तिची आई तीली एक राक्षसी चेहर्याने हासते, 'आय कील यु बेबी, टेल मी, ' * 'हँलो हँलो,' पुन्हा 'हँलो डायना हँलो,' पण दुसरीकडुन काहीच प्रतिसाद येत नाही, शेवटी थकुन ती एक मँसेज तीला पाठवते, डीअर डायना, तु गेल्यापासुन खुप छानस चालु होते, पण गाडी कोठे घसरली काही कळाले नाही. आता माझी मानसिकता खुपच खालावली आहे, मला भिती वाटते की तो पुन्हा येईल माझ्या आयुष्यात आणि मला ठार मारेल, प्लिज मला वाचव लवकर ये. माझी प्रिय डायना,मी तुझी वाट पाहत आहे. * सायकाळी कामावरुन घरी गेल्यावर तीने एक ग्लास पाणी पिऊन ओघोंळ करुन घेतली. थोडेसे साँन्डवीच खाऊ पर्यत झोपायची वेळ जवळ येत होती. मग तीला ते रत्न आठवले, जे डाँली तील म्हणत होती की ते रत्नच तीला वाचवु शकते. मग झोपायच्या आगोदर ती सर्व बेड खाली वरती झाडु लागली कोठे रत्न सापडते का? शेवटी तीला रत्न काही सापडले नाही,निराश होऊन ती तशीच बेडवर पालथी झाली. आणि तीच्या हाताला एक रत्न लागले,आसा तीला भास झाला पण ते रत्न नव्हते. व पुन्हा ती झोपी गेली. 'हाय,बेबी डाँल', 'बेबी, वेक अप,' हा आवाजा ऐकताच ती जागी होते, व व तीचा हात दचकन हालतो. 'बेबी, आय एम बँक,' 'नो गो बँक, डोन्ट काँल मी,'आसे बेबी जोरात ओरडते, 'मी तुझाच आहे, आणि तुनेच मला जागे केले आहेस, आय एम युअर स्विट मँडनेस, तुझा वेडापणा,' 'काय पाहिजे सांग तुला?,' 'नो नो तुला काय पाहिजे सांग आज मी तुला देणार आहे,' 'मला काही नको,' 'तु खोटे बोलु नकोस, मी सांगतो तुला काय पाहिजे ते,' 'प्लिज डोन्ट किल मी, ' आसे म्हणुन ती जोर जोरात रडु लागते, भिक मागु लागते. अचानक घरातील खिडक्या दरवाजे बदं होतात, घरात आंधाराचे साम्राज होते. 'तुला डायनाकडे जायचे आहे ना?, ' डायनाचे नाव तीला खुप आनंद होतो व ती रडत रडत डोळे पुसत म्हणाली, 'प्लिज मला डायनाकडे घेऊन चला,' घरात थोडा प्रकाश होतो, आणि घरातील त्या आरशात तीला डायना आपणाला बोलवत आसल्याचे दिसते. डायनाचा तो हासरा चेहरा पाहुन ती खुष होते. 'चल मग येणार ना डायना कडे?,' 'हो हो, चल चल मला खुप काही सांगायचे आहे डायनाला, ' आणि त्या आरशातुन एक राक्षसी चेहर्याचा व्यक्ती बाहेर पडतो, व तीच्या समोर उभा राहतो, ते पाहुन ती घाबरते. पण तो राक्षसी चेहरा जाँन सारखा तीला वाटु लागतो. 'जाँन तु,' 'होय मीच तुला डायनाकडे नेणार,' ती डोळे पुसत त्याचे स्वागत करते, 'बस माझ्या पाठीवर,' 'म्हणजे तु हावेत उडु शकतोस,' 'मी काही ही करु शकतो,' बेबी जाँनच्या पाठीवर बसते , क्षणर्धात बाल्कीनीचा दरवाजा उघडतो, व ते दोघे आकाशात झेप घेतात. * आज सकाळी सकाळी डायना घरातुन बाहेर पडली, कारण आज बेबीचा वाढदिवस आहे हे तीला ठाऊक होते, तीला मानसिक आधार देण्यासाठी ती घरातुन लवकरच निघाली होती. तीच्यासाठी तीने तीला एक गिफ्ट घेतले होते, व एक पुष्प गुच्छ. जशी बेबीच्या अपार्टमेटच्या समोर गाडी आली, तसे बेबी तीच्या गाडीवर आदळली, ते पाहुन डायना घाबरली व ती गाडीतुन बाहेर पडली, बेबीचा तो रक्ताळलेला देह पाहुन ती ओरडु लागली. 'हेल्प ', ती बेबी जवळ गेली बेबीचा माडीवर चेहरा घेतला व रडु लागली. 'त्याने मला मारले, ' आसे बेबी म्हणुन मरण पावली. डायनाला रडु कोसळले. * शेवटी ती आत्माहत्या केल्याचे पोलिसाना समजते. आता बेबी जाऊन महिना झाला, डायना ने तीला गिफ्ट घेतले होते. ते एक किंमती रत्न होते, ते तीने लाँकेट मध्ये ठेवले होते.आता डायना तीची आठवण म्हणुन ती लाँकेट वापरु लागली. समाप्त

वाचने 7813 वाचनखूण प्रतिक्रिया 53

In reply to by स्पंदना

साती गुरुवार, 09/04/2014 - 07:08
अपर्णाताई तुम्ही नीट वाचलेले दिसत नाही. आंघोळ नाही ओघोंळ होते. म्हणजे ग्लास घेऊन घाईघाईने पाणी पिताना पाण्याचे ओघोंळ (एक ओघोळ , अनेक ओघोंळ) अंगावर पडतात. ट्राय करून पहा. ;)

अजया गुरुवार, 09/04/2014 - 07:11
एक ग्लास पाणी पिऊन आंघोळ! !क्या बात है!! जिमो तुनी जितकी मजाँ अँणली मिपाँवर तशी कोणीच नाइ अँणलि.मी हावेत उडते आँहे,कथा वाचुन. :-)) :-))

साती गुरुवार, 09/04/2014 - 07:11
मस्तं कथा. अनेक नवेनवे शब्द आणि नविन नावे कळली. तरी राँबर्‍ट ची सर कुणाला येणार नाही. हा शब्द इतका युनिक आहे की मला तो लिहिताही येत नाहीये.

आनन्दिता गुरुवार, 09/04/2014 - 07:21
जाँनने तीचा हात आपल्या माडीवर ठेवला व त्यावर आपला हात ठेवला व एका हाताने गाडी चालवु लागला.
म्हणजे हे नक्की कसं केलं हे सांगाल का जीवन सर!

In reply to by आनन्दिता

आरश्यातून जो माँणूस (कीवाँ भूत) बाहेर येतो तो "तीचा हात आपल्या माडीवर" ठेवू शकणार नाही का ? आणि गाडी चालवणे आणि तिचा पुलावर अपघात करणे हा तर जीवन्भौंचा ट्रेडमार्कच आहे ! वाचा बघू मोजींचे सर्व साहित्य दहा वेळा !

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 09/04/2014 - 07:56
काही प्रश्ण!!
१. जाँनने तीचा हात आपल्या माडीवर ठेवला व त्यावर आपला हात ठेवला व एका हाताने गाडी चालवु लागला.
गाडी बिनगिअरची होती का ऑटोट्रान्समिशनवाली होती? कितना देती थी?
२. सायकाळी कामावरुन घरी गेल्यावर तीने एक ग्लास पाणी पिऊन ओघोंळ करुन घेतली. थोडेसे साँन्डवीच खाऊ पर्यत झोपायची वेळ जवळ येत होती.
किरिस्तांव लोकांमधे पण 'लवकर निजे लवकर उठे त्यासी धनसंपदा लाभे' मानतात का?
३. सायकाळी कामावरुन घरी गेल्यावर तीने एक ग्लास पाणी पिऊन ओघोंळ करुन घेतली.
एक आयडीया जो बदल दे आपकी दुनिया.
४. बेबी जाँनच्या पाठीवर बसते , क्षणर्धात बाल्कीनीचा दरवाजा उघडतो, व ते दोघे आकाशात झेप घेतात. *
जॉन पार्ट टाईम ड्रग्स वैगेरे विकत असेल काय?

किसन शिंदे गुरुवार, 09/04/2014 - 08:42
आसे म्हणताच समोर आसलेल्या पुलावरुन गाडी सरळ नदीत कोसळते, व दोघे ही ओरडु लागतात.
हे वाचतानाच मागच्या काही कथा आठवल्या आणि खिक्कलो..! =))

In reply to by किसन शिंदे

थॉर माणूस गुरुवार, 09/04/2014 - 10:14
>>>पुलावरुन गाडी सरळ नदीत कोसळते नक्की पुण्यातला झेड ब्रिज असणार. पण त्ये आस्किडंट कथावालं रायटर आनी आपलं जीवनभौ येगळं हाईत की. जीवनभौ, तुम्ही तिकडं घुसू नगा. तुमच्या कथा आदीच लय खत्रुड असत्यात. तशाच लिवा. आनी जमलं तर तुमच्या हितं न आलेल्या काय कथा आसतील तर त्या बी यौंद्या.

प्रमोद देर्देकर गुरुवार, 09/04/2014 - 09:25
ऑताच आलेल्या बॉतमींनुंसांर मूजीभावुंणा २०१५ सालॉचे आँखिल भाँरतींय साहित्य सॅमेल्लन्नॉचे ऑध्याक्ष पॉद मिळॉले आहे. हॉभिनंदन हो मूजीभावुं.

दिपक.कुवेत गुरुवार, 09/04/2014 - 11:04
पण आता आताशी तुमच्या लिखाणाची किव येउ लागली आहे. कुणी ठरवुन सुद्धा सतत ईतकं अशुद्ध लिहु शकत नाहि आणि तुम्हि तर ईतक्या अशक्यप्राय कथा मिपास भेट दिल्या आहेत तेव्हा सरावाने का होईना निदान काहि ठिकाणी तरी शुद्ध लिहाल हि माफक अपेक्षा आहे. एका ठरावीक भागानंतर पुढिल कथा वाचलीच नाहि.

In reply to by दिपक.कुवेत

प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/04/2014 - 11:24
दिपक, >>>>आता आताशी तुमच्या लिखाणाची किव येउ लागली आहे.

ज्ञानदेवे रचिला पाया, तुझा झालासे कळस.

जाणूनबुजून विकृत भावनेने केलेले लेखन मिसळपाववर स्विकारले जाते आहे ह्याचेच मला राहून राहून आश्चर्य वाटते. लेखकाला, संपादक मंडळाकडून, लेखन सुधारण्याविषयी विनंती, सूचना किंवा असे लेखन उडविले जाईल अशी तंबी दिली जात नाही, कृती होत नाही. हेच आपले दुर्भाग्य आहे. मिसळपाव संपादक मंडळाने आणि मालकांनी संस्थळाच्या दर्जाकडेही लक्ष पुरविणे गरजेचे आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रमोद देर्देकर गुरुवार, 09/04/2014 - 12:10
@ खटपट्या/ पेठकर साहेब १००% सहमत आहे. हा मुद्दाम म्हणुन लक्ष वेधण्यासाठी केलेला प्रयत्न वाटतो आहे. जर शब्द व्यवस्थीत लिहता येत नाही तर एकच कठीण शब्द "पुष्प गुच्छ" हा कसा काय बरं बरोबर लिहला? सं.पा. मंडळाने असे लिखाण प्रसिध्द करु नये त्याने मि.पा. चा दर्जा खालवतो आहे.

In reply to by सस्नेह

प्यारे१ Fri, 09/05/2014 - 01:18
दीपक आण्णा, पेठकर काका, देर्देकर तात्या, स्नेहाक्का नका काळजी करु एवढी कुणीच. श्री समर्थ आहेत. इतके दिवस साहित्य येत आहे मो जींचं. संपादक मंडळानं नोंद नसेल घेतली? नसेल घेतली तर आता घेईल ह्याची काय खात्री? नाही झी चे चित्रपट आवडत तर चॅनेल बदलावा असंच मत असतंय ना इतर ठिकाणी? नको वाचूया लेख. पट्तंय का?

In reply to by प्यारे१

दिपक.कुवेत Fri, 09/05/2014 - 11:04
माझा ना त्यांच्या लिखाणाला विरोध आहे ना त्यांच्या कल्पनाशक्तिला. तेवढं स्वातंत्र्य मिपानी प्रत्येकालाचं दिलं आहे. आता उदा. आता बेबी त्या जेमीच्या पाठिवर बसुन उडुन जाते...त्यावर काहि आ़क्षेप घेतलाय का? आणि तसचं काहि आक्षेपार्ह वाटलं तर रणकंदन माजण्याआधीच संमं योग्य तो धागा योग्य त्या वेळि उडवतातच. मोजीभाउंच्या कथांचा आस्वाद याआधी मीहि घेतला आहे. फक्त जाणुनबुजुन सतत अयोग्य लिहिलेल्याचा उबग येतो आणि आता आता त्यांच्या कथेत तेच होउ लागलय एवढचं.

In reply to by प्यारे१

प्रभाकर पेठकर Fri, 09/05/2014 - 11:58
लेख, कथा आवडणं न आवडणं वेगळी गोष्ट आहे आणि सतत जाणूनबुजून अशुद्ध लेखन वाचकांच्या 'माथी मारणं' ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. न वाचण्याचा पर्याय आहे तर अश्लील, जातीवाचक, धर्मवाचक गरळ ओतण्याला बंदी (निदान तत्वतः) का असावी? असे लेखनही दुर्लक्षिता येतेच नं? >>>>फक्त जाणुनबुजुन सतत अयोग्य लिहिलेल्याचा उबग येतो. त्याहून जास्त उबग येतो जाणत्या सदस्यांचे त्यावरील प्रतिसाद/चर्चा वाचताना. असे वाटते की ही व्यक्ती (प्रतिसादक) खरोखरंच एव्हढी अभिरुची हीन आहे?

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ Sat, 09/06/2014 - 13:53
>>> त्याहून जास्त उबग येतो जाणत्या सदस्यांचे त्यावरील प्रतिसाद/चर्चा वाचताना. असे वाटते की ही व्यक्ती (प्रतिसादक) खरोखरंच एव्हढी अभिरुची हीन आहे? नेहमी हेल्दी जेवणाराला कधीतरी गाड्यावरचं कळकट खावंसं वाटतं तसं काहीसं असावं ते.

In reply to by प्यारे१

प्रभाकर पेठकर Sat, 09/06/2014 - 15:45
हे म्हणजे नेहमी व्यवस्थित कपडे घालून फिरण्यार्‍याला कधीतरी नाघडं फिरावसं वाटतं म्हणण्यासारखं आहे.

In reply to by दिपक.कुवेत

इरसाल गुरुवार, 09/04/2014 - 11:37
दि.कु मला ही कथा लिहीताना कित्ती कित्ती त्रास पडतो याची तुम्हाला काही कल्पना आहे. यात लिहीताना कुठला शब्द मागच्या कथेत अशुद्ध लिहीला होता आणी कसा लिहीला होता याचा ट्रॅक ठेवावा लागतो. हे मिपाकर चालु आहेत लगेच सगळ्या मागच्या कथा चेकुन एक्सेल शीट बनवुन मला तोंडावर पाडायला कमी करणार नाहीत.आणी तुम्ही धडधडीत दिवसाढवळ्या ठरवुन अशुद्ध लिहीतो असा आरोप लावत आहात. तुमचाँ कर्वा तेव्धा निशेध कमीचँ आँहे. अवांतर: मागील ५/६ महिन्यात कुणी एखाद्या आयडीची मजबुत "रेड" मारली होती का की त्या आयडीला (डुआयडी काढुन) असले प्रकार करायला मजबुर झाँले.

In reply to by दिपक.कुवेत

शिद गुरुवार, 09/04/2014 - 15:17
पण आता आताशी तुमच्या लिखाणाची किव येउ लागली आहे.
पहिला लेख वाचल्यापासूनच जाणवलं होतं की कोणीतरी जाणूनबुजून हे असलं अशुद्धलेखन करून टुकार लेख लिहीत आहेत म्हणून.
एका ठरावीक भागानंतर पुढिल कथा वाचलीच नाहि.
मी तर म्हणेन पहील्या लेखापासून पुढील लेख कधी वाचलेच नाही. आवरा... पण सगळ्या प्रतिक्रिया मात्र आवर्जुन वाचल्या. ;)

तिमा गुरुवार, 09/04/2014 - 14:03
हे काय हो जीमो, कथा आणखी एखादा भाग चालेल असं वाटलं होतं. पण तुम्ही तर या भागातच बेबीला उडवून, कथा समाप्त केलीत. हा आम्हा वाचकांवर अन्याय आहे. एक शंका: साँडविच म्हणजे सांडाचं म्हणजे बीफ सँडविच का हो भाऊ ?

जयंत कुलकर्णी गुरुवार, 09/04/2014 - 19:10
एखाद्याने मिपा उघडले व सर्वात जास्त प्रातिसाद असलेला धागा उघडला तर त्याचे मिपाबद्दल काय मत होईल याबद्दल संपादक मंडळाने जरुर विचार करावा.....

In reply to by जयंत कुलकर्णी

असंका Fri, 09/05/2014 - 11:19
रँडम क्रायटेरियाने एक धागा निवडून सगळ्या धाग्यांबाबत मत बनवणार्‍या लोकांचा आपण एवढा का विचार करावा?

मुक्त विहारि गुरुवार, 09/04/2014 - 22:33
मिपाबद्दल कुणाचा काही गैर समज होत असेल तर.... होवू द्या... बिंधास्त र्‍हावा हो.... सुज्ञ माणसे मिपा सोडून जात नाहीत आणि ज्यांना सोडून जायचे आहे त्यांना मिपा अडवत नाही. भाऊंचे लेख आणि प्रतिसाद हे एक टाइमपास म्हणून घ्यायचे. आपला मिपाचा हास्य क्लब समजायचा आणि वेगळे व्हायचे. निदान मी तरी भाऊंच्या लेखांचा फॅन आहे. अर्थात जोपर्यंत ते अतिचावट लिहीत नाहीत, तोपर्यंत तरी त्यांना लिहू द्यावे अशी विनंती.

मराठे गुरुवार, 09/04/2014 - 23:42
बेबी वर अनुस्वार द्यायचा राहिलाय. निदान माडीवरचा राहिलेला तरी द्यायचा. हरकत नाही. अनुस्वार दिला आहे असं समजूनच वाचली गोष्ट.. लग्गेच कळली.

आयुर्हित गुरुवार, 09/04/2014 - 23:55
बेबी जाँनच्या पाठीवर बसते , क्षणर्धात बाल्कनीचा दरवाजा उघडतो, व ते दोघे आकाशात झेप घेतात. आत्महत्येचे असेही एक कारण असते तर..... किती सहजगत्या मो़जीभाऊ आत्महत्या होण्याचे एक कारण आपल्यासमोर मांडत आहेत! त्यासाठी भरमसाठ वाचन किंवा सुक्ष्म अवलोकन असलेच पाहीजे, त्याशिवाय हे लिहिणे शक्य नाही. मान गये मो़जीभाऊ!! काही मिपाकरांना या लेखाचा आनंद घेता येत नाही याचे मात्र दु:खच वाटते.

In reply to by आयुर्हित

दिपक.कुवेत Fri, 09/05/2014 - 11:08
तो तुमच्या लेखातुनहि कुठे मिळतो??? सगळ्या प्रश्नांची कधी पुर्ण उत्तरं पण मिळत नाहित :)

नेत्रेश Sat, 09/06/2014 - 06:33
अपल्याला भरमसाठ आवडली तुमची बेबी. अजुन चार पाच बेब्या येउद्यात. वात्रट कॉमेंटनी नाउमेद न होता, टीकाकारांना ..वर मारुन तुम्ही आपली साहीत्य सेवा अशीच चालु ठेवाल अशी आशा आहे.