Skip to main content

प्रमोशन

लेखक vikramaditya यांनी बुधवार, 03/09/2014 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
आनंद आपल्या कॅबिनमध्ये शिरला आणि एसीची थंड हवा खात शांत बसुन राहिला. आज तो ऑफ़िसमध्ये जरा लवकरच आला होता. समोरच्या कागदांची त्याने चाळवाचाळव केली. पण त्यात त्याचे लक्ष नव्हते. तो एका खास फोनची वाट बघत होता. घड्याळाचा काटा जसा जसा पुढे सरकु लागला तसा तो बेचैन झाला. अखेर त्याचा फोन वाजला. अमेरिकेहुन बॉबचा फोन होता. "ॲन्डी?" " येस, बॉब, थॅंक्स बॉब. शुअर बॉब." त्याने फोन ठेवला आणि टेबलावर जोरात हाथ आपटला. "येस्स, आय मेड इट!" त्याने लगेच पुजाला फोन लावला. "पुजा, इट्स थ्रु" "कॉंग्रॅटस" पुजा जवळ जवळ ओरडलीच. "मग माझा डायमंड नेकलेस नक्की ना?" "ऑफ कोर्स" आनंद उत्तरला." "मी आयुषला कळवतो, ओके?" लगेच त्याने पांचगणीला शिकत असलेल्या त्यांच्या मुलाला फोन लावला. "आयुष, युर फादर इज अ बिग मॅन नाउ". आनंदने गुड न्युज आयुषला सांगितली. "देन डॅड, धीस टाईम डिस्नेलॅंड, राईट?" "ओह, येस" असा पिता पुत्राचा संवाद झाला. फोन ठेवताच त्याने समोरच्या मिररमध्ये स्वत:ला न्याहाळले. जेमतेम चाळीशीच्या उंबरठ्यावर असलेला आनंद आज एका प्रथितयश मल्टीनॅशनल कंपनीचा इंडिया कंट्री हेड झाला होता. बरोबरच्या सगळ्यांना मागे टाकुन आज तो एका पाठोपाठ प्रगतीच्या पाय-या चढत होता. त्याने परत पुजाला फोन लावला." पुजा, बॉब इज कमिंग टुमॉरो. उद्या डिनरला भेटु त्याला". "येस, डिअर" पुजा म्हणाली. "ओके, मी नंतर फोन करते रे, आता माझ्या सर्कल मधील सगळ्यांना पार्टीचे इन्विटेशन द्यायचेय ना". तोपर्यंत आनंदला अभिनंदनपर इमेल, कॉल्स येवु लागले. त्याच्या प्रतिस्पर्ध्यांचे कॉल रिसिव्ह करताना त्याला मनातुन प्रचंड आनंद होत होता. थोड्या वेळाने लंच झाल्यावर त्याला अचानक आठवण झाली. त्याने लगेच फोन लावला. "बाबा, आनंद बोलतोय. बाबा, मी माझ्या कंपनीचा इंडिया कंट्री हेड झालो बर का" , "अरे वा! अभिनंदन बेटा. उद्याच कुलदेवाकडे अभिषेक करु आम्ही. तुझी अशीच प्रगती होवो, या उप्पर आता या वयात मला आणि तुझ्या आईला आणखी काय पाहीजे?" "बाबा, तुम्हा दोघांना किती वेळा मी आणि पुजाने दिल्लीला बोलावले, पण तुम्ही येतच नाही." "अरे आनंदा, तुला तर माहितच आहे बाळा कि ज्या शाळेतुन मी प्रिंसिपल म्हणुन रिटायर झालो तिथेच मी गरीब मुलांना शिकवतो, शिवाय तुझ्या आईबरोबर गावातील समाजकार्य, ह्यातुन वेळ मिळत नाही रे. आता आयुषच्या सुटीत तुम्हीच या गावी." ही चर्चा ह्या पुर्वी पण झाली असल्याने आनंदने तो विषय आवरता घेतला. आपल्या आई वडीलांच्या साधेपणाची कधी त्याला चीड येई तर कधी हेवा वाटे. तीन वर्षापुर्वी गावी गेला असताना त्याने असंख्य लोकांना त्याच्या आई वडीलांच्या पाया पडताना बघीतले होते. या उलट, त्याच्या कार्यक्षेत्रात कोण त्याच्यावर कधी वार करेल आणि त्याच्या करिअरचे नुकसान करेल ह्याची खात्री नसे. रात्र रात्र जागुन तो वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीवर विचार करत बसे. आपले महत्व वाढवणे, प्रतिस्पर्ध्यांचे डाव हाणुन पाडणे ह्याचा विचार करुन त्याचे डोके ठणके. शेवटी दोन-तीन पेग मारुन मगच तो बेडरूममध्ये जात असे. तो संपूर्ण दिवस असाच गेला. संध्याकाळी ऑफीसच्या सहका-यांनी आनंदला पार्टी दिली. तो मध्यरात्री घरी पोहोचला, पुजाला यायला अजुन वेळ होता, ती तीच्या मैत्रिणींबरोबर एका कॉफी शॉप्मध्ये होती. आनंद इतका थकला होता की तो ताबडतोब झोपी गेला. दुस-या दिवशी भल्या पहाटे त्याने एयरपोर्टवरुन बॉबला पिक अप केले आणि त्याच्या हॉटेलवर घेवुन गेला. बॉब इथे असे पर्यंत त्याचे पूर्ण लक्ष आपल्याकडेच असेल ह्याची खबरदारी त्याला घ्यावीच लागणार होती. कोण कधी काय डाव खेळेल ह्याची त्याला शाश्वती नव्हती. तो पूर्ण दिवस बॉबला वेगवेगळी प्रेसेंटेशन्स देण्यात गेला. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे तो घरी पोहोचला. पुजा तयारच होती. त्याने कंपनीच्या ड्रायव्हरला जायला सांगीतले. आणि स्वत: गाडी चालवत पुजासोबत बॉबच्या हॉटेलला पोहोचला. डिनरवर गप्पा छान रंगल्या. बॉबवर आपले जास्तीतजास्त चांगले इंप्रेशन पडावे ह्या साठी आनंद नुसता धडपडत होता. त्या मानाने पुजा मात्र सफ़ाईदार ईंग्रजीत बॉबशी सहज संवाद करत होती आणि अतिशय स्मार्ट वाटत होती. अशी स्मार्ट पत्नी आपल्याला मिळाली ह्याचा त्याला फार अभिमान वाटला. एका ठरावीक वेळानंतर बॉबने घड्याळाकडे एक कटाक्ष टाकला. तोच इशारा समजुन आनंद आणि पुजाने आवरते घेतले. नंतर तीघे लिफ्टमध्ये शिरले आणि बॉबच्या रूमसमोर पोहोचले. बॉबने दार उघडले आणि तो तिथेच थांबला. त्याच्याशेजारुन पुजा आत शिरली. आनंदने बॉबशी शेकहॅंड करुन गुड नाईट विश केले आणि म्हणाला "बॉब, सी यु इन द ऑफिस टुमॉरो. "पुजा, आय विल पिक यु अप टुमॉरो मॉर्निंग." असे सांगुन आनंद निघाला. लिफ़्ट खाली आली आणि आनंद पार्किंग लॉट कडे चालु लागला. सगळे मनासारखे झाल्याने तो खुशीत शीळ वाजवत होता. आता लवकरच न्युयॉर्क पोस्टिंग साठी बॉबशी बोलायचे असे स्वत:ला बजावत त्याने कार स्टार्ट केली......
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23641
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

मिपावर मचाक विभाग सुरु करा. ते पीडन वाले ई.ई. ना खुशाल गोंधळ घालू द्या

कथा आवडली. भाषणबाजी टाळणे, कथेच्या शेवटी आनंदच्या डोळ्यात खंत उतरवून वाचकाला बाटलीत उतरवण्याचा टिपिकलपणा टाळून कथेतील पात्राशी प्रामाणिकता साधल्याने कथा अधिकच आवडली. बाकी असे खरेच घडते का याचा संशय असणार्‍यांनी तरूण तेजपाल आठवावा. === अन यश आणि यशस्वीतेची परिमाणे प्रत्येकाची वेगळी असल्याने, यशस्वी कोणास म्हणावे हे स्थल-काल-व्यक्ती सापेक्ष असणारच

कथा जमलीये ! लिहित रहा. वाचकांनी ती कथा म्हणूनच वाचावी. प्रत्यक्ष जीवनात असे घडते की नाही याचा विचार करु नये. कधीकधी सत्य हे कल्पनेपेक्षा भयंकर असू शकते.

बाकी असे खरेच घडते का याचा संशय असणार्‍यांनी तरूण तेजपाल आठवावा. पुर्वी असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता. पण माझ्याच कंपनीत एक अशी केस आहे. ती केस ८ वर्षापुर्वी माझ्या दोन लेवल जुनिअर होती. आज केवळ बॉब म्हणतो म्हणून ही केस परदेशात आहे आणि माझा परफॉरमन्स (म्हणजे ऑफिसमधील कामातला) ह्या केस पेक्षा दहा पटीने उत्तम असून सुद्धा ही मुलगी आज मला एक लेवल सिनिअर आहे.

In reply to by योगी९००

तुलना बरोबर नाही हो ही. स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतः खपणं वेगळं आणि जोडीदाराला खपायला लावणं वेगळं. मॅडमच्या नवर्‍यानं तर नाही ना काही तडजोड केलेली?

In reply to by असंका

मॅडमच्या नवर्‍यानं तर नाही ना काही तडजोड केलेली? मॅडमच्या नवर्‍याने घटस्फोट घेऊन तडजोड दिली... स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतः खपणं वेगळं आम्ही स्वतः आमच्या प्रगतीसाठी खपतोच की...पण अशातर्हेने नव्हे.

या पृथ्वीवर काहीही शक्य आहे. लिहीत रहा. जास्त सफाईदार लिहाल हळूहळू.

आणि प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

पुढे रेटला जाऊ शकतो याची कल्पना आली. आता याचा सिक्वेल येऊ द्या! पूजा जॉब करतीये, तिला कंट्री हेड व्हायचंय. सिग्रेट फुंकत आणि दोन पेग चढवून ती जेनीला फोन करते. जेनी `डन' म्हणते आणि दुसर्‍या दिवशी घरी हजर होते. तिला पुरणपोळीचं जेवण घालून पूजा तिची खणा-नारळानं ओटी भरते (सवाष्णच घरी आलीये ना!). मग गाडीतून दोघांना हॉटेलवर सोडते आणि म्हणते अजिबात संकोच करु नकोस, आमच्या संस्कृतीत अतिथी देव समजला जातो, तुम्ही यथेच्छ बागडा. आणि रुमचं दार स्वहस्ते बंद करुन शांतपणे घरी येते. _______________________ या पृथ्वीवर काहीही शक्य आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

या संकेतस्थळावर वैचारिक प्रतिवाद तरी शक्य आहे असं म्हणता येईल!

In reply to by इरसाल

आनंदला आता वर्ल्ड हेड व्हायचंय. पूजा तर काय कशालाही तयार आहे. सध्या टॉम कंपनीचा वर्ल्ड हेड आहे. आनंद सहा पेग लावतो आणि तिसर्‍या सिग्रेटचा दुसरा झुरका मारत, टॉमला न्यूयॉर्क ऑफिसमधे फोन लावतो. असली भारी ऑफर म्हटल्यावर टॉम वेळात वेळ काढून यांच्या घरी येतो. पूजानं तिच्या आणखी चार सख्या स्वागताला बोलावलेल्या असतात. सगळ्या सुरेख नऊवारी नेसून आणि नथी वगैरे घालून टॉमची पंचारती करतात. मग सगळे यथेच्छ खाऊन पिऊन हॉटेलवर जातात. टॉम कावराबावरा होतो (कारण मूळ ऑफर दोनची असते), तेव्हा आनंद म्हणतो, अरे तुम भी क्या याद करोगे, ऐष करो. या स्वागतानं टॉम इतका गहिवरून जातो की आनंदला मिठी मारुन म्हणतो, `आय रिझाईन!'. आनंदला वाटतं असा एनवेळी का माघार घेतोयं हा टॉम? जरा जास्तच स्वागत झालेलं दिसतंय. पण तेवढ्यात टॉम पुढे म्हणतो...नॉट फ्रॉम धिस लवली सिश्युएशन माय डिअर, बट फ्रॉम द कंपनी; यू आर द नेक्स्ट वर्ल्ड हेड नाऊ! यावर आनंद म्हणतो आता दार तरी कशाला लावतोस ? मी आहे ना पाहार्‍याला उभा! _______________________ या पृथ्वीवर काहीही शक्य आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

या पृथ्वीवर काहीही शक्य आहे.
सर, डोळ्यासमोर अंधारी आली हसून हसून! शेवटचा पंच ब्येश्ट!

कै च्या कै गोष्ट आणि अशा कै च्या कै लिखाणाला भरपूर ट्यार्पी देऊन कै च्या कै लेखन वरती ठेवण्याची परंपरा पाळली जात असल्याचे पाहून एक मिपाकर म्हणून संतोष जाहला.

इथल्या स्वयंघोषित सर्वज्ञांनी कॉर्पोरेट जगातल्या भानगडी कधी ऐकल्या नाहीत काय? का स्वतःच्या मुलींवर बलात्कार करणारे बाप आणि मुलींना वेश्या बनवणारे बाप यांच्या बातम्या कधी पेपरात वाचल्या नाहीत? तुम्ही लिहा विक्रमादित्य साहेब. आणि तुमच्या लिखाणाला शिव्याशाप देणार्‍यांचे आभार मानायला विसरू नका. त्यांच्यामुळेच तुमच्या कथेला एवढा ट्यार्पी मिळालाय! :D

In reply to by दिनेश सायगल

"स्वयंघोषित सर्वज्ञ" हे विशेषण भलतंच आवडलं. फालतू फालतू म्हणत दहा दहा वेळा प्रतिसाद द्यायला धाग्यावर हजर... :) :) :)

तरी बरं , हा लेख पलिकडच्या संस्थळावर असता तर लेखकाकडे विदा मागुन फेफरं आणला असता ;)

"बॉब, सी यु इन द ऑफिस टुमॉरो. "पुजा, आय विल पिक यु अप टुमॉरो मॉर्निंग. उच्चभ्रू समाजातील सत्य आहे.....आवडलं.

In reply to by संजय क्षीरसागर

@मुनिवर दोन सुज्ञ रावण एकमेकांच्या शेपट्यावर पाय द्यायच्या फंदात पडत नसल्याने काही प्रॉब्लम निर्माण होणार नाही. @ संजय क्षीरसागर ऑफिसबॉय अन्मॅरिड असला तर तो वेळेचे अस्तित्व गमावल्याने वा बेक ट्रेकिङ्ग्चे फंदात दुर्लक्षित झालेल्या ऑफिस मधील कर्मचार्यान्च्या गरजू संबंधिताना बोबकडे पाठ्वेल.

एकदम मचाक कथा आहे !! अजुन काही वेगळे शेवट सुचवतो --- १) नंतर तीघे लिफ्टमध्ये शिरले आणि बॉबच्या रूमसमोर पोहोचले. बॉबच्या बायकोने दार उघडले आणि बॉब व ती तिथेच थांबले. त्याच्याशेजारुन आनंद आत शिरला. पुजाने बॉबशी शेकहॅंड करुन गुड नाईट विश केले आणि म्हणाली "बॉब, सी यु इन द ऑफिस टुमॉरो. " आनंद, आय विल पिक यु अप टुमॉरो मॉर्निंग." असे सांगुन पुजा निघाली. २) नंतर तीघे लिफ्टमध्ये शिरले आणि बॉबच्या रूमसमोर पोहोचले. बॉबने दार उघडले आणि तो तिथेच थांबला. त्याच्याशेजारुन आनंद आत शिरला. पुजाने बॉबशी शेकहॅंड करुन गुड नाईट विश केले आणि म्हणाली "बॉब, सी यु टुमॉरो. " आनंद, आय विल पिक यु अप टुमॉरो मॉर्निंग." असे सांगुन पुजा निघाली. ३) नंतर तीघे लिफ्टमध्ये शिरले आणि बॉबच्या रूमसमोर पोहोचले. बॉबच्या बायकोने दार उघडले आणि बॉब व ती तिथेच थांबले. त्याच्याशेजारुन आनंद आणि पुजा दोघेही आत शिरले. पुजाने बॉबशी शेकहॅंड करुन गुड नाईट किस केले आणि म्हणाली " फरगेट द ऑफीस & प्रमोशन ... लेट्स रॉक टू नाईट " असे सांगुन दरवाजा ओढुन घेतला. ४) नंतर तीघे लिफ्टमध्ये शिरले आणि बॉबच्या रूमसमोर पोहोचले. बॉबच्या बायकोने दार उघडले आणि बॉब व ती तिथेच थांबले. त्याच्याशेजारुन आनंद आणि पुजा दोघेही आत शिरले. आत बॉबची सेक्रेटरी , आनंदची सेक्रेटरी , २-४ न्युजॉईनी कॉलेजपासाऊट पोरं पोरी , तयारीतच बसली होती .... " इनफ ऑफ दिस गुडी गुडी डिस्कशन , लेट्स गेट ब्यॅक टू रियल वर्क " असे सांगुन बॉबने दरवाजा ओढुन घेतला. तसे अजुन बरेच शेवट सुचवता येतील , पण हे सारे मी माझ्या नीलचित्रपटदिग्दर्शनातील करीयर च्या स्वप्नासाठी राखुन ठेवत आहे . *biggrin* *biggrin* *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

मी चुकून 'बालचित्रपट्दिग्दर्शनातील' असं वाचलं.

कथा जमली आहे. एकीकडे संस्कार कमी पडलेत आणि दुसरीकडे प्रमोशनसाठी स्वीकारलेला मार्ग हा गुंता असलेला विषय चांगला हाताळला आहे. मी अशी काही माणसं पाहिलेली आहेत जी मोठी झाली आहेत. असो....! -दिलीप बिरुटे