Skip to main content

नाही देखिले पंचानना

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 03/09/2014 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
हि गोष्ट मी गोव्यात असतानाची आहे. गोव्याच्या वास्को येथील नौदलाच्या रुग्णालयात काम करीत होतो. मी तेथील अधिकाऱ्यांच्या वसाहतीत राहत असे. दाबोळी विमानतळाच्या अगदी जवळ असलेली हि वसाहत अतिशय सुंदर आहे. दोन मजली इमारतीत चार घरे. खालच्या घरांना पुढे आणि मागे अंगण आहे. बाजूला मोटारीसाठी गैरेज आणि वरच्या मजल्यावर राहणार्यांना गैरेजच्यावर एक गच्ची. घरे सुद्धा सुटी सुटी आहेत. वसाहतीत रहदारी अशी नाहीच. त्यामुळे मुले फार सुखात आपल्या छोट्या सायकलींवर फिरत असत. त्यांची शाळा पण त्याच वसाहतीत आहे. त्यामुळे मुले दोन मिनिटात शाळेत पोहोचत. संध्याकाळी तेथिल रस्त्यांवर बायकोसह चालण्याचा व्यायाम करणे हा एक रोजच उद्योग असे. गोव्यात दाबोळी येथे नौदलाचा सर्वात मोठा वैमानिक तळ आहे. त्यामुळे आमच्या वसाहतीत अनेक वैमानिक आपल्या कुटुंबासह राहत असत. त्यातुं मी विक्रांतवर दोन वर्षे असल्याने माझ्या बर्याच वैमानिकांशी ओळखी होत्या. या वसाहतीतील साडे चार वर्षाचे माझे वास्तव्य हा माझ्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा काळ होता. या वसाहतीत एक वैमानिक आपल्या कुटुंबासह राहत असे. त्याची चार वर्षाची मुलगी सिमरन अतिशय छान होती. मोठे गाल, मोठे डोळे, इतक्या लहान मुलीची छान कमरेपर्यंत वेणी यामुळे ती मुलगी फारच छान दिसत असे. या मुलीची आई निर्मल( नाव बदललेले आहे) तेथे आपल्या वैमानिक नवर्याबरोबर चालताना संध्याकाळी दिसली. मी तिच्या नवर्याला विक्रांत पासून ओळखत होतोच. त्यामुळे ओळखही झाली यानंतर बर्याच वेळेस तिला आम्ही वसाहतीत पाहत होतो. एक दिवस निर्मल आमच्या रुग्णालयात माझ्या विभागात मुलीला घेऊन आली. सिमरनच्या पोटात दुखत असल्याने तिला बाल रोग तज्ञाने सोनोग्राफीसाठी पाठविले होते. पण आता निर्मलला पाहून लामा धक्काच बसला. कारण तिने घातलेला पोशाख एखाद्या नटी सारखा होता. अर्धी अधिक छाती उघडी होती. मला जर आश्चर्यच वाटले. पण मी तिच्याकडे दुर्लक्ष करून तिच्या मुलीकडे लक्ष पुरवले. तिची सोनोग्राफी झाल्यावर मी रिपोर्ट लिहित होतो. तेंव्हा ती माझ्या टेबल समोर बसली होती. आपले उरोज टेबलावर टेकवून ती माझ्याशी रिपोर्ट बद्दल बोलू लागली. टेबलवर ठेवल्यामुळे उरोज तिच्या बळूज्मधून अधिकच बाहेर आले होते. मला फारच विचित्र वाटत होते. मी तिच्या मुलीकडेच पाहत तिला सर्व गोष्टी सांगितल्या आणि रिपोर्ट घेऊन बालरोग तज्ञाकडे पाठविले. असाच अनुभव परत एकदा तिचा पाय मुरगळला होता तेंव्हा ती एक्स रे काढायला आली असताना मला आला. दोन दिवसांनी मी त्या बाल रोग्ताज्ञाकडे सहज फिरत फिरत गेलो तेंव्हा हि निर्मल परत मुलीला दाखवायला आलेली होती. परत कपडे तोकडे आणी अर्धी छाती उघडी असा वेष. मी परत एक चक्कर मारून आलो. तोवर ती गेलेली होती. मी त्या बालरोग तज्ञाला विचारले कि हि बाई तुला विचित्र वाटत नाही काय? मी हिला जेंव्हा जेंव्हा रुग्णालयात पाहतो तेंव्हा हिचे कपडे तोकडे असतात. यावर तो मला तेच म्हणाला. कि सर हि बाई आपण चालायला जातो तेंव्हा अगदी सती सावित्रीसारखी कपडे घातलेली असते. आणी रुग्णालयात हे असे कपडे काय घालते. काहीतरी विचित्रच आहे. हाच अनुभव आमच्या आणखी एका मित्राला (कान नाक घसा तज्ञाला) आला होता. अर्थात या गोष्टी आम्ही चहापानाच्या खोलीत बोलताना आम्हाला कळले. तिथे सर्वांचे म्हणणे हेच पडले कि सर्व साधारणपणे बायका फिरायला जाताना झकपक कपडे घालतात आणी रुग्णालयात मात्र सोज्ज्वळ कपड्यात असतात. हि मनोवृत्ती काय ते कोणालाच विश्लेषण करता येत नव्हते. पुढे जेंव्हा जेंव्हा आम्ही निर्मलला रुग्णालयात पहिले तेंव्हा ती तोकड्या कपड्यात होती. आणी गंमत म्हणजे यातील एकही डॉक्टर लघळ किंवा अशा स्त्रीला प्रोत्साहन देणारा नव्हता.( म्हणजे संशयाचा फायदा निर्मलला देता यावा). काही महिन्यानंतर मी तातडीच्या कामावर( इमर्जन्सी ड्युटी) संध्यकाळी कैज्यूअल्टी मध्ये बसलो होतो आणी येणारे रुग्ण पाहत होतो. एवढ्यात नवर्याबरोबर निर्मल आली. यावेळेस तिचे कपडे पूर्ण होते. आणी तिच्या पोटात प्रचंड दुखत होते. तिला मी तपासले तेंव्हा तिच्या ओटीपोटात डावीकडे खूप दुखत होते आणी तिचा चेहरा पांढरा पडला होता. तिची परिस्थिती पाहून मी तिला कैज्यूअल्टी सोडून सरळ तिला सोनोग्राफीसाठी घेऊन गेलो. सोनोग्राफी करताच मला लक्षात आले कि तिला टयूबल एकटोपिक प्रेग्नन्सी ( म्हणजे गर्भ गर्भाशयात असण्या ऐवजी स्त्रीबिजवाहक नलिकेत आहे) आणी ती स्त्रीबिजवाहक नलिका फुटली आहे आणी त्यातून रक्तस्त्राव होत आहे. तच्या पोटात जवळ जवळ एक लिटर रक्त साठले होते. मी तेथूनच आमच्या स्त्रीरोग तज्ञाला फोन केला आणी सांगितले कि मी गाडी पाठवतो आहे तुम्ही ताबडतोब य़ा. त्यावर त्यांनी मला उलटे शस्त्रक्रिया गृह तयार कर आणी भूल तज्ञाला सुद्धा बोलावून घे म्हणून सांगितले. मी त्यांना म्हटले सर तुम्ही रुग्णाला बघून तर घ्या. त्यावर ते म्हणाले कि माझा तुझ्या सोनोग्राफीवर पूर्ण विश्वास आहे. तेंव्हा वेळ घालवू नको. आता निर्मल आणी तिच्या नवर्याला तिची ताबडतोब शल्यक्रिया करणे आवश्यक आहे असे समजावून सांगण्याची जबाबदारी माझीच आली. मी त्यांना समजावून सांगितले आणी तिच्या नवर्याला सांगितले कि चार ते पाच बाटल्या रक्त लागेल तर त्याची सोय कर. मी आमच्या रक्तपेढीला तसे सुचित ही केले. शिवाय तेथल्या नौदलाच्या मुख्यालयात तसा बिनतारी संदेशही पाठविला. अर्ध्या तासात सर्व तयारी पूर्ण करून तिला शस्त्रक्रियेसाठी घेतले. सुमारे एक तासाने तिची शस्त्रक्रिया पूर्ण झाली. तिला तीन बाटल्या रक्त चढवावे लागले होते. ती शस्त्रक्रिया गृहाच्या बेहर आली आणी तिला अधिकारी कुटुंबाच्या कक्षात हलवले. मी थोड्यावेळाने जाऊन तिला पाहून आलो. तिने अर्धवट झोपेत कृतज्ञतापूर्वक स्मित केले. तिचा नवरा मला धन्यवाद देत होता. तीन दिवस ती रुग्णालयात होती. जातांना परत एकदा भेटून ती मला आणी स्त्रीरोग तज्ञाला धन्यवाद देऊन गेली. पुढे मी दोन वर्षे ए एफ एम सी पुणे येथे बदली होईपर्यंत त्या रुग्णालयात होतो. त्या दोन वर्षात मी तीला सात आठ वेळा रुग्णालयात कुणाला भेटायला किंवा स्वतःला आणी मुलीला दाखवायला आलेले पाहिले. पण आता तिने कधीही रुग्णालयात तोकडे कपडे घातलेले आमच्यापैकी कोणीहि पाहिले नाही. ती परत मला चार वर्षांनी मी नौदल सोडल्यावर केरळ च्या सहलीला गेलो असताना मुन्नारला कानन देवन चहाच्या कारखान्यात भेटली. ती आणी तिच्या नवर्याने आमची आस्थेने विचारपूस केली. ती आधी तसे का वागत होती याबद्दल आमच्या डॉक्टर मित्रांमध्ये चर्चा झाली होती परंतु नक्की असे काही कुणाला सांगता येत नव्हते. exhibitionism चा एक भाग असावा असे वाटले. मात्र खरे कारण कधीच कोणाला कळले नाही. तिचे तिलाच माहिती. नंतर कदाचित मृत्यू फार जवळून पहिल्याने तिची डॉक्टरांकडे पाहण्याची नजर बदलली असावी. म्हणूनच म्हणतात ना नाही देखिले पंचानना( सिंह) तोवरी जंबुक( कोल्हा) करी गर्जना.

वाचने 132621
प्रतिक्रिया 121

प्रतिक्रिया

लेख आवडला. काय बोलावे कळत नाही.

सारांश : काही डॉक्टर लोकांचं मनावर चांगलं कंट्रोल असतं आणि ते फक्त रुग्णाच्या व्याधिकडेच लक्ष देतात अन्यत्र नाही. गणेश लेख मालेसाठी डॉक्टर साहेबांनी काही वेगळ प्रासंगिक लिहायला पाहिजे होतं असंही वाटलं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गणेश लेख मालेसाठी डॉक्टर साहेबांनी काही वेगळ प्रासंगिक लिहायला पाहिजे होतं असंही वाटलं.
सहमत.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नेहमी प्रमाणेच मानवी मनाचा वेध घेणारी कथा. पण
गणेश लेख मालेसाठी डॉक्टर साहेबांनी काही वेगळ प्रासंगिक लिहायला पाहिजे होतं असंही वाटलं.

ही मनोविकार तज्ञाची केस असावी. असा कोणी तज्ञच वागण्यामागील गूढ उकलू शकेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

जोश ए जवानी हाये रे हाये..... दुनिया का मेला, मै हू अकेला, कितना अकेला हू मै? (हे तिच्या आवाजात, बरंका) अशीच एक घटना वात्स्यायन ॠषींसमोर घडली होती, त्यावर त्यांना "कामसुत्र" लिहिवेसे वाटले होते. पोटाच्या भुके सारखीच शरिराची भुक भागणे ही तेव्हढेच गरजेचे आहे. ते नैसर्गिक रित्या झाले नाही म्हणुन असे वागणे असते. तिच्या नवर्‍याला कामसुत्र वाचायला सांगणे गरजेचे होते.

In reply to by आयुर्हित

पोटाच्या भुके सारखीच शरिराची भुक भागणे ही तेव्हढेच गरजेचे आहे.
पण बाहेरचे खाल्ल्यावर अपचन होते, ते या केस मध्ये झाले आहे.

In reply to by चैदजा

बाहेरचे खाल्ल्यावर अपचन होते, ते या केस मध्ये झाले आहे व एकदा बरे झाल्यावर, जसे बाहेरचे खाण्याची इच्छा उडते, तसे झाले असावे.
+१००...सहमत.

स्त्री/व्यक्ती स्वारंत्र्याच्या नावाने आणि सनातनी पुरुषी मानसीकतेच्या नावाने अजुन एकही शंख वाजला नाहि या धाग्यावर??? तुमची पुण्याई थोर हो डॉक्टर साहेब.

In reply to by अर्धवटराव

असेच म्हणतो. असे निराश केल्यामुळे आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

In reply to by बॅटमॅन

मला वाटत नाही की हा काही मानसिक आजार असावा ! निदात हल्ली आजुबाजुच्या वातावराण झालेला बदल पाहुन तरी असे वाटत नाही.स्त्रीमुक्ती आणि समानतेच्या नावाखाली शरीराचे प्रदर्शन करणार्‍या स्त्रीयांची कमतरता नाही.एक काळ होता जेव्हा सॅटेलाईट चॅनलचे पर्व नुकतेच सुरु झाले होते, त्यावेळी एमटीव्ही,चॅनल व्ही इं वर बोल्डगाणी लागली तरी ती पहाताना त्यातल्या नग्नतेची जाणीव व्ह्यायची, पण आता डोळे निर्ढावले की मन निर्ढावलय तेच कळत नाही !"लज्जा" हा स्त्रीयांचा अलंकार असतो.. छाप वाक्ये / सुविचार कधीच काळाच्या पडध्याआड गेले आहेत.पुरुष ६ पॅक्स दाखवतात ना ? मग आम्ही उरोज दाखवु. आयटी क्षेत्रात अशा नमुन्यांची कमतराता नाही, २ दिवसांपूर्वीच मी माझ्या सहकार्‍यांना माझा एक किस्सा सांगितला, कॅंटिन मधुन परत येत होतो,शुक्रवारचा दिवस... हव्या त्या पद्धतीचे कपडे घालायची मुभा. माझ्या समोरुन नुकतीच जॉइन झालेली मुलगी येत होती,माझी नजर माझ्या हातातल्या घडाळ्याकडे गेली... लवकर डेस्कवर पोहचुन कामाला सुरुवात करायला हवी असा विचार मनात सुरु होता... तो पर्यंत ती मुलगी माझ्या बर्‍यापैकी समोर आली... तिने बहुतेक सॅटिन {नक्की कुठले कापड असावे ते ठाकुन नाही... एक अंदाज} चा टी-शर्ट घातला होता, त्यातुन तीची स्तनाग्रे स्पष्ट दिसत होती,मलाच कसेतरी वाटले आणि नजर परत घडाळ्याकडे वळवुन मी चालण्याचा वेग वाढवला ! हल्ली लोकांच्या मनाच्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत काय असा प्रश्न अनेकदा पडतो... असो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 8 Reasons Why A New Global Financial Crisis Could Be On The Way {We are now in a post-crisis period.}:- NASDAQ.com

In reply to by मदनबाण

>>>> त्यातुन तीची स्तनाग्रे स्पष्ट दिसत होती असे होऊ नये पण, कधी तिच्यावर कुठे बलात्कार झालाच तर ती मात्र बुरसटलेली पुरुषी मानसिकता असेल. विचार स्वातंत्र्यापेक्षा देह प्रदर्शन स्वातंत्र्यालाच 'व्यक्ती स्वातंत्र्याचा' सन्मान मिळायला लागला आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

विचार स्वातंत्र्यापेक्षा देह प्रदर्शन स्वातंत्र्यालाच 'व्यक्ती स्वातंत्र्याचा' सन्मान मिळायला लागला आहे.
लिबरल लोक तुटून पडणार बगा यावर.

In reply to by प्रभाकर पेठकर

कधी तिच्यावर कुठे बलात्कार झालाच तर ती मात्र बुरसटलेली पुरुषी मानसिकता असेल.
"असं कसं...असं कसं, काका? दुधाचं पातेलं उघडं दिसलं म्हणून बोक्याला लगेच दुध पिण्याचा हक्क कुणी दिला?" यावर अश्या प्रतिक्रिया आल्या तर नवल वाटून घेऊ नका. :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

च्च च्च... वाईट नाही, रोचक. हा शब्द अलीकडं फ्याषनमध्ये आहे म्हंटात. ;)

In reply to by मदनबाण

ग्रो अप बेब्ज..!! आठवला. असे बरेच नमुने हल्ली दिसतात. मी बघुनही न बघितल्यासारखे करुन अवघडुन मान दुसरीकडे फिरवतो.

माणसाचं मन कोणाला वाचता आलंय? कधी कधी अगदी जवळची माणसे सुद्धा एखादा माणूस असा का वागतो हे सांगू शकत नाहीत. त्या बाईंना कदाचित त्या काळात काही प्रॉब्लेम असावेत आणि त्या डॉक्टरांपर्यंत कशातरी पोचायचा प्रयत्न करत असाव्यात. मात्र ऑपरेशन झाल्यानंतर या लोकांनी आपला जीव वाचवला एवढीच भावना शिल्लक राहिली असावी. तुमचे अनुभव मात्र खूप वेगवेगळे आणि कधी कधी अनाकलनीय असे आहेत!

In reply to by पैसा

>>माणसाचं मन कोणाला वाचता आलंय? कधी कधी अगदी जवळची माणसे सुद्धा एखादा माणूस असा का वागतो हे सांगू शकत नाहीत. लाख बोललात!! त्याहीपेक्षा एखादा माणूस असाही वागू शकतो हे एखादा तसाच प्रसंग आला की मगच कळतं. कोण कोणत्या वेळी कसं रिअ‍ॅक्ट करेल हे कितीही जवळचं नातं, मैत्री असली तरी सांगणं कठीण.

In reply to by सूड

लाख बोललात!! त्याहीपेक्षा एखादा माणूस असाही वागू शकतो हे एखादा तसाच प्रसंग आला की मगच कळतं. कोण कोणत्या वेळी कसं रिअ‍ॅक्ट करेल हे कितीही जवळचं नातं, मैत्री असली तरी सांगणं कठीण.
सूड आणि पैसाताईंशी बाडिस. आत्ता काही महिन्यांपुर्वी याचा वाईट अनुभवही आलाय.

In reply to by पैसा

कुठल्याही प्रश्नाला दोन बाजू असतात. त्यातील दुसरी बाजू निदान असू शकते हेही मान्य करणं एरवीच्या रापलेल्या मनांना मान्य करणे अवघड जाते. पैताईंनी निदान तिचाही विचार केलाय आणि त्यामागील शक्य असलेल्या गुंतागुंतीचाही, हे फार आवडले.

आसल एक करेक्टर आजकाल रोज दिसत. काही लोक स्वातंत्राच्या अर्थ स्वैराचार असाही घेतात.बाकी एक्सबिशन मानसिकतेचा चा प्रकार ही असु शकतो

'श्री गणेश लेखमाले'च्या निमित्ताने आलेला अत्यंत औचित्यपूर्ण धागा आणि त्यावरची उद्बोधक चर्चा आवडली. चालू द्या.

कथा छान. पण या बदलामध्ये आजारपण या येवढ्याच एका गोष्टीने इतका बदल घडला असेल?

निर्मल अगोदर तसे का वागली याचे कोणतेही स्पष्टीकरण माझ्याकडे नाही. आम्ही इतर डॉक्टरनि तिचे असे वागणे का होते याची नंतर चर्चा सुद्धा केली परंतु नक्की असा कोणताच निष्कर्ष निघू शकला नाही. कदाचित मनोविकार तज्ञ यावर प्रकाश टाकू शकला असता. पण तेंव्हा रुग्णाच्या व्यक्तिगत आयुष्याची चर्चा आम्हाला इतर कोणाबरोबरही करायची नव्हती. नाव न घेत जरी बोललो असतो तरी ते वैमानिकाची बायको आणि तातडीची शस्त्रक्रिया इ मुळे उघड झाले असते. नंतरचे वागणे हे थोडेफार कृतज्ञतेचे होते. कारण जेंव्हा ती माझ्याकडे आली होती तेंव्हा पोटात प्रचंड दुखत होते आणि ती अंतर्गत रक्तस्त्रावाने पांढरी पडली होती. शिवाय आपल्याला काही तरी गंभीर आजार झाला आहे हे तिला आतून समजले असावे. त्यामुळे भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. शल्यक्रियेनंतर मी तिला जेंव्हा पहिले तेंव्हा तिचा चेहरा शान्त होता. मृत्यू जवळून पाहिलेल्या माणसांच्या विचारसरणीत आमुलाग्र बदल होतो हे मी कित्येक कर्करोगातून बर्या झालेल्या रुग्णात पाहिलेले आहे. असो. यात मला एवढेच सुचवायचे होते कि माणसाच्या वागणुकीचे वेगवेगळे नमुने आपल्याला पहावयास मिळतात. त्या त्या परिस्थितीत ती व्यक्ती तसे का वागते याचे कोणतेही स्पष्टीकरण आपल्याला मिळत नाही. असंगत आचरण म्हणून ( संशयाचा फायदा देऊन) आपण ते सोडून द्यावे असे माझे सुचवणे आहे. कारण तेवधी परीस्थिती/ वागणूक सोडली तर ती व्यक्ती व्यवस्थित वागताना आढळते हा लेख इथे(गणेश लेख मालेसाठी) अप्रस्तुत आहे असे काही मित्रांचे म्हणणे आहे. मी त्यांच्या मताचा आदर करतो.पण यात कोणताही सेक्स किंवा तत्सम भाग आणणे हा त्यातील हेतू नसून माणसाचे वर्तन याचा एक पैलू पुढे आणणे हा होता. exhibitionism (http://en.wikipedia.org/wiki/Exhibitionism) दाखवणे हा हेतू नाही कारण असे बरेच रुग्ण मी पाहिले आहेत/ पाहतो आहे. पण त्याबद्दल पुन्हा केंव्हा तरी.

In reply to by सुबोध खरे

>>>> कदाचित मनोविकार तज्ञ यावर प्रकाश टाकू शकला असता. माझ्या प्रतिसादात मी हेच मत मांडले आहे. >>>>मृत्यू जवळून पाहिलेल्या माणसांच्या विचारसरणीत आमुलाग्र बदल होतो मृत्यूची चाहूलही माणसात बदल घडविते. क्षणैक लोभापेक्षा सुखाच्या कल्पना बदलतात.

मृत्यू जवळून पाहिलेल्या माणसांच्या विचारसरणीत आमुलाग्र बदल होतो>> हे अगदी खरं आहे. आधी नव्हती ती maturity नंतर आली, असं फारतर म्हणता येइल.

या लेखावरची पैसा ताईची प्रतिक्रीयाच फक्त औचित्यपुर्ण आहे...बाकी सगळ्या लिहिणार्‍यांना सो कॉल्ड सर्कास्टीक ई.ई. वाटत असल्या तरी संधीसाधू प्रतिक्रीया आहेत. स्त्रिचा चेहेरापण पुरुषांसारखाच खांद्याच्या वर असतो. पण एका नजरेत मापं काढणार्‍यांना काय म्हणावं..? बाकी exhibitionism बद्दल सहमत. याचं एक भयंकर उदाहरण अगदी शालेय वयात पाहिलय आणि खोल आघात करुन गेलय त्या तसल्या नकळत्या वयात. एक पुरुष साधुचे कपडे घालून, पाय पोटाशी घेऊन लेडिज डब्ब्याच्या अगदी पुढे बसायचा आणि दारात कोणी मुलगी आली की हळूच दोन्ही गूढगे विलग करायचा. त्त्याविषयी आणि मग भगव्या कपड्यातल्या कोणाहीविषयी तिडिकच बसली. (अर्थात तो पुरुष असल्यामुळे बलात्कारातून सुटला असावा... :) ) (हा माझा प्रतिसाद पण अनाउचित्यपुर्णच..) डॉ. साहेबांची माफी मागून....तसा हा लेखही या मालिकेसाठी औचित्यपुर्ण नाहीये...(गंडलाय असं म्हणायची फ्याशन आहे.. :) )

अर्थात तो पुरुष असल्यामुळे बलात्कारातून सुटला असावा
'लग्नाच्या अमिषाने बलात्कार' असा गुन्हा दाखल करुन तरुंगात खितपत पडलेल्या पुरुषांबद्दल काय? दोन्ही बाजुने (स्त्री, पुरुष) असे संधीसाधु लोक असतातच. पण स्त्रीया पुरुषांबद्द्ल आणि पुरुष स्त्रीयांबद्दल बोलणार. असो

In reply to by स्वप्नांची राणी

खितपत नसले तरी पोलिस केस झाली, म्हणुन नोकरी गेली. समाजात तोंड दाखवता येत नाही. अश्या हजारो केसेस असतील. दर दिवसा आड पेपर ला एक बातमी असते. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार म्हणे. तेंव्हाच सांगायचे ना, "आधी लग्न कर, मग काय करायचे ते कर" म्हणुन.

हा लेख आणि अत्यंत रोचक चर्चा श्रीगणेश लेखमालेत नसावा असं मनापासुन वाटलं.. ह्यावर उद्या धागा पेटलाच तर लेखमालेला गालबोट लागु नये अशी इच्छा... बाकी एरवी डॉक्टरांचे लेख आवडतात्च, पण ह्या लेखात नक्की काय म्हणायचे आहे ते नीटसे कळाले नाही.. अगदी लेख लिहून सांगण्यासारखा प्रसंग मला तरी वाटला नाही.. आणि उरली सुरली बलात्कार.. बुरसटलेले पुरुष आणि संधीसाधु स्त्रिया (Vice Versa) ह्याला कितीही प्रतिवाद केला तरी त्याचा काडीमात्र फायदा नाही.. एक दोन उदाहरणांवरुन समाजाबाबत निष्कर्ष काढता येत नसतो हे एक कारण.. आणि काहीही झालं.. अगदी एखादी स्त्री एकही कपडा न घालता रस्त्यावरुन चालत असेल तरी तिच्यावर बल्त्कार करण्याचा अधिकार कुणालाच नसतो, त्यामुळे तोकडे कपडे, त्यातुन दिसणारे अवयव नी अजुन काय काय मुद्दे मांडलेत तरी बल्त्काराचे समर्थन होऊ शकत नाही... त्यामुळे "बलात्कारी पुरुषांची मानसिकता" कशीच जस्टिफाय होत नसते.. ती बुरसटलेलीच असते... असो... गणेसोत्सवात अशा चर्चा होऊ नयेत असं वाटतं... मंगल प्रसंगी रक्त खवळवणार्‍या चर्चा न वाचलेल्या बर्‍या...

आणि या लेखाचा काय संबंध असे वाटले. असो. कदाचित दिवाळी अंकात फक्त दिवाळीच्याच गोष्टी नसतात तसे गणेशलेखमालेत गणेशोत्सवासंबंधी काही असावे असे नाही अशी इथे समजूत असावी. ता क- अगदी गणेशचतुर्थीच्या दिवशी माझ्याकडे एक एक्टॉपिक प्रेग्नन्सी आली तीही शॉकमध्ये आणि २.५ एच बि घेऊन. तिच्या गडबडीत आमच्या हॉस्पिटलची गणेशस्थापना यावर्षी रात्री आठला झाली कारण प्रत्येकजण बिझी होता. मला आता या लेखाने आणि यावर्षीच्या आमच्या पेशंटमुळे गणेशोत्सव म्हटले की एक्टॉपिक प्रेग्नन्सी आठवेल.

दीपिका पदुकोणबद्दल आत्तापर्यंत फार प्रेम वाटलं नव्हतं; पण इथले काही प्रतिसाद वाचून तिच्याबद्दल अंमळ जास्तच प्रेम निर्माण झालं - I have breasts, you got a problem? Deepika Padukone tweets reaction to ‘news’ post

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असो मी एखाद्या स्त्रीच्या स्माइल वर जितके मन्मोकळे प्रशंसोदगार काढेन तितके कोम्प्लिमेंट एखादी स्त्री/ दीपिका तिच्या ब्रेस्ट व क्लीवेज बद्दल ऐकून घेइल काय हां प्रश्न मात्र तिने उभा केला आहे. आहे का कोणी समोर येउन अशी स्तुति ऐकायला तयार ? @डोक्टर साब लेखात उल्लेख केलेल्या स्त्रीच्या इतिहासात नक्कीच उत्तर उपलब्ध आहे. मानसोपचार तज्ञ गाठायची घाई तर नकोच

स्त्रिचा चेहेरापण पुरुषांसारखाच खांद्याच्या वर असतो. पण एका नजरेत मापं काढणार्‍यांना काय म्हणावं..? अगदी असेच वाटते,पण स्त्री देह हा पुरुष देहा पेक्षा रचनेमधे वेगळा आहे हे अमान्य देखील करता येणार नाही. याचं एक भयंकर उदाहरण अगदी शालेय वयात पाहिलय आणि खोल आघात करुन गेलय त्या तसल्या नकळत्या वयात. एक पुरुष साधुचे कपडे घालून, पाय पोटाशी घेऊन लेडिज डब्ब्याच्या अगदी पुढे बसायचा आणि दारात कोणी मुलगी आली की हळूच दोन्ही गूढगे विलग करायचा. त्त्याविषयी आणि मग भगव्या कपड्यातल्या कोणाहीविषयी तिडिकच बसली. (अर्थात तो पुरुष असल्यामुळे बलात्कारातून सुटला असावा... ) (हा माझा प्रतिसाद पण अनाउचित्यपुर्णच..) अगदी मुलांनाही / पुरुषांनाही असा अनुभव स्त्रीयांकडुन येउ शकतो / येतो. अगदी एखादी स्त्री एकही कपडा न घालता रस्त्यावरुन चालत असेल तरी तिच्यावर बल्त्कार करण्याचा अधिकार कुणालाच नसतो, त्यामुळे तोकडे कपडे, त्यातुन दिसणारे अवयव नी अजुन काय काय मुद्दे मांडलेत तरी बल्त्काराचे समर्थन होऊ शकत नाही... त्यामुळे "बलात्कारी पुरुषांची मानसिकता" कशीच जस्टिफाय होत नसते.. ती बुरसटलेलीच असते... सहमत. मनुष्य प्राण्याचा एकंदर इतिहास पाहिला तर त्यात सर्वात स्त्रीयां बलात्कारांचा बळी होउन जाताना आपल्याला अनेक ठिकाणी दिसेल, मग ते मुघलांचे आक्रमण असो, फाळणी असो वा सध्या गाजणारा लव्ह जिहाद असो... या ठिकाणी कोणत्याही देशातली, कोणतीही भाषा बोलणारी,कोणत्याही धर्मातली अथवा जातीतली असो, बळी स्त्रीचा जातो. स्त्री-पुरुष समानता असा कितीही टाहो फोडला तरी सुद्धा निसर्गाने जो भेद ठेवला आहे त्यावर मनुष्य प्राण्याला मात करता येणे शक्य नाही.बलात्कार करण्यासाठी लागणारी जी शारिरीक आणि मानसिक ताकद पुरुषांमधे आहे ती स्त्रीयांमधे नाही,पुरुष स्त्रीवर बलात्कार करु शकतो पण स्त्री पुरुषावर बलात्कार करु शकत नाही. आता पुरषी मानसिकतेचा विचार केला तर पुरुषांच्या मेंदुचा देखील विचार केला पाहिजे.जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला आकर्षक,सुंदर वाटते तेव्हा त्याचा मेंदु रिअ‍ॅक्ट होत असतो.त्याच प्रमाणे एखादी स्त्री त्याला कामुक वाटणे किंवा हवीहवीशी वाटते ते का ? आणि त्यावेळी त्याचा ब्रेन नक्की कसा रिअ‍ॅक्ट होतो याचा देखील विचार करुन पाहिला पाहिजे. शाळेमधे शिकवले जाते की माणसाच्या मूलभुत गरजा या अन्न-वस्त्र आणि निवारा या होत. यातल्या वस्त्रांचा उपयोग हवामानापासुन रक्षण तसे लज्जा रक्षण हा होता. आता काळानुरुप वस्त्रे लज्जा झाकण्यासाठी होत नसुन ती दाखवण्यासाठी केला जात आहे हे वावगे ठरु नये !नैसर्गिक दॄष्ट्या स्त्री आणि पुरुष यांचे शरीरभाव वेगवेगळे आहेत आणि त्यांच्या भावना देखील.सलमान खान स्टेजवर उभा राहुन समोर उभ्या असलेल्या लोकांसमोर स्वतःचा शर्ट काढुन दाखवु शकतो पण तीच कॄती त्याच्या बाजुला उभी असलेली कुठल्याही वेषभुषा परिधान केलेली स्त्री करु शकते का ? अर्थातच नाही, कारण तीचा देहभाव आणि स्त्रीसुलभ लज्जा असे करण्यास धजावणार नाहीत. आता दुसरे उदाहरण देतो. पुरुषांसाठी थोडीका होइना निदान शहारात तरी मुत्रालये आहेत पण स्त्रीयांसाठी ही गरज गॄहीतच घेतली गेलेली नाही त्यामुळे त्यांची कुंचबणा होते,आता पुरुष मुत्रालय नसेल तर तो ताण असह्य झाल्याने पुरुष सार्वजनिक ठिकाणी कुठेही लघुशंका करताना आढळतील पण तीच कॄती स्त्रीया करु शकतात का ? अर्थातच नाही. कारण अर्थातच तीचा देहभाव आणि स्त्रीसुलभ लज्जा.म्हणजे कितीही स्त्री-पुरुष समानतेचा टाहो फोडला तरी ज्या कॄती पुरुषांकडुन सहज केल्या जाउ शकतात त्या स्त्रीयांकडुन होणे शक्य नाही. पुरुषांचा मेंदु नक्की कसा रिअ‍ॅक्ट होते त्या बद्धल काही दुवे :- Bikinis Make Men See Women as Objects, Scans Confirm men can't read female feelings Inside ‘The Male Brain’ Women And Objectification: Brain Sees Men As Whole, Women In Parts (STUDY) I have breasts, you got a problem? Deepika Padukone tweets reaction to ‘news’ post देशातील एका नामवंत वॄत्तपत्रात ही बातमी आली होती त्यात दिलेल्या एका वृत्तपत्रानं एका व्हिडिओमध्ये गाऊनमध्ये असलेल्या दीपिकाचे स्तन आणि त्यातील 'क्लीवेज' दाखवलंय. त्यामुळे ती आनंदीत झाली नसुन ती उद्विग्न झाली आणि तीने हे ट्वीट केले आहे, या ट्वीट वरुन मी कसेही कपडे घातले तरी मला फरक पडत नाही,स्त्रीयांनी बिनधास्त उत्तन कपडे घालावेत,मी एक पुढारलेली स्त्री आहे अशा प्रकारचा कुठलाही अर्थ काढता येत नाही, उलट स्त्रीयांचे { इथे सेलिब्रीटी / अभिनेत्री }'क्लीवेज' चे फोटो व्हिडीयो नेटवर किती सहज उपलबध होउ शकतात आणि व्हायरल होउ शकतात याचे उदा. दिसते तेव्हा आपण काय तो बोध घेण्यास सक्षम असावे. या विषयावर अधिक वाद घालण्याची माझी इच्छा नाही, स्त्री-पुरुष यांनी त्यांच्या मर्यादांचे भान ठेवुन सार्वजनिक आयुष्यात वावरावे या मताचा मी आहे. ही मर्यादा आपल्या संस्कॄतीतुन आणि संस्कारातुनच आपल्याला कळते असे मला वाटते. मर्यादा ओलांडली की त्याच्या होणार्‍या परिणामांचा देखील विचार केला पाहिजे. *बलात्कार करणार्‍यास फाशी दिली जावी किंवा ठार मारले हे माझे व्यक्तिगत ठाम मत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

In reply to by मदनबाण

देशातील एका नामवंत वॄत्तपत्रात ही बातमी आली होती त्यात दिलेल्या एका वृत्तपत्रानं एका व्हिडिओमध्ये गाऊनमध्ये असलेल्या दीपिकाचे स्तन आणि त्यातील 'क्लीवेज' दाखवलंय. त्यामुळे ती आनंदीत झाली नसुन ती उद्विग्न झाली आणि तीने हे ट्वीट केले आहे
थ्यँक्यू. इथे ज्या कोणा स्त्रियांच्या कपड्यांबद्दल गप्पा सुरू आहेत, (वर पुन्हा बलात्काराचं नागवं समर्थन सुरू आहे), ते वाचून हेच म्हणायचं होतं. त्या स्त्रियांनी कोणत्या हेतूने असे कपडे घातलेले आहेत हे माहीत आहे का? कोणाकोणाची स्तनाग्रं दिसतात म्हणून एवढ्या गप्पा सुरू आहेत. अॅथलीट्स, रस्त्यावर धावणाऱ्या सामान्य स्त्रिया, टेनिसपटू यांची स्तनाग्रं दिसतात हे माहीत नाही का? कष्टाचं काम न करूनही हॉर्मोन्स आणि विचारांमुळे स्तनाग्रं दिसू शकतात हे कोणाला माहीत्ये? तसंही "त्या बाईने अमुक एक गोष्ट केली ती माझं लक्ष वेधून घेण्यासाठीच केली", असा पुरुषांचा गैरसमज होणं हे नॉर्मलच आहे, पण ते तसं असतंच असं नाही. आणि हो, स्त्रीसुलभ लज्जा ही फक्त संस्कृतीजन्य आहे. ते डोक्यावर आदळलं जातं म्हणून आत्मसात केलं जातं. अनेक संस्कृतींमध्ये स्त्रिया आणि पुरुष फक्त कमरेला वस्त्रं गुंडाळतात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

इथे ज्या कोणा स्त्रियांच्या कपड्यांबद्दल गप्पा सुरू आहेत, (वर पुन्हा बलात्काराचं नागवं समर्थन सुरू आहे), बलात्काराचे समर्थन केल्याचे मला कोणत्याही प्रतिसादात आढळुन आलेले नाही ! ते वाचून हेच म्हणायचं होतं. त्या स्त्रियांनी कोणत्या हेतूने असे कपडे घातलेले आहेत हे माहीत आहे का? हॅहॅहॅ... बाई त्यांनी तुम्हाला त्यांचा हेतू कळवला असेल तर कळवा बरं का इकडेच. ;) आम्हाला तरी कळु द्या उत्तान कपडे आणि स्तनाग्रे दिसणारे कपडे , लो वेस्ट जीन्स घालणार्‍यांचा उद्दात हेतू. ;) तेव्हढीच आमच्या ज्ञानात भर पडेल ! ;) कोणाकोणाची स्तनाग्रं दिसतात म्हणून एवढ्या गप्पा सुरू आहेत. कोणाकोणाची ? मी तर माझ्या अनुभवातले एकच उदाहरण सांगितले ! बाकीचे कुठे दिसले तुम्हाला ? अॅथलीट्स, रस्त्यावर धावणाऱ्या सामान्य स्त्रिया, टेनिसपटू यांची स्तनाग्रं दिसतात हे माहीत नाही का? कष्टाचं काम न करूनही हॉर्मोन्स आणि विचारांमुळे स्तनाग्रं दिसू शकतात हे कोणाला माहीत्ये? हो का ? आम्हाला नाही माहित बॉ... तुम्हाला बरीच माहिती दिसतेय.बाकी आपण हेच मोजकाम करता का ? ;) कारण आम्ही तर दुर्लक्ष करतो हे आमच्या पहिल्या प्रतिसादातुन स्पष्ट केलेले आहे. तसंही "त्या बाईने अमुक एक गोष्ट केली ती माझं लक्ष वेधून घेण्यासाठीच केली", असा पुरुषांचा गैरसमज होणं हे नॉर्मलच आहे, पण ते तसं असतंच असं नाही. हो का ? तसं म्हंटल स्त्रीयांकडे नुसत पाहिल तरी हिरव्या नजरेने पाहतो म्हणुन कांगावा करणार्‍या स्त्रीयांची मानसिकता काय असावी बरं ? आणि हो, स्त्रीसुलभ लज्जा ही फक्त संस्कृतीजन्य आहे. ते डोक्यावर आदळलं जातं म्हणून आत्मसात केलं जातं. हॅहॅहॅ... तुमच्या डोक्यावर काही आदळलय का ? तुम्हाला लज्जा या भावनेचा कधी अनुभव झाला नाही का ? मला वाटतं ज्याला मन आहे त्याला कधी तरी लज्जा या भावनेचा अनुभव होतोच ! त्यासाठी आदळ-आपट नाही हो करायला लागत. ;) अनेक संस्कृतींमध्ये स्त्रिया आणि पुरुष फक्त कमरेला वस्त्रं गुंडाळतात. हॅहॅहॅ... आपले पुर्वज म्हणे निर्वस्त्र संचार करायचे ! आपण आजच्या घडीला करतो का ? नाही ते सुद्धा जरा नीट स्पष्ट करा बरं का... म्हणजे विषयाचे नीट आकलन करता येइल असे म्हणतो. काय ? ;) जाता जाता :- बोला पुंडलिक वरदे हरी विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ! ;) आजची स्वाक्षरी :- सा रे ग म प... { अभिनेत्री }

In reply to by मदनबाण

मी बरंच मोजकाम करते आणि बरंच करतही नाही. इतर शास्त्रज्ञ वगैरे लोक मोजकामं करतात, मी त्यांचं लेखन फक्त वाचते. स्तनाग्रांच्या बाबतीत आरसा असला तरीही मला पुरतं ... मी चिक्कार व्यायामबियाम करते आणि आरसेबिरसे वापरते. त्याशिवाय मी ज्या ज्या शहरांमध्ये राहिले आहे तिथल्या स्त्रिया व्यायाम करताना, खेळायला जाताना बुरखे वगैरे घालून जात नाहीत. उदा: दळणवळणाची साधनं फार प्रगत नसताना जपानमध्ये (होय, पुरुषप्रधान संस्कृती असणारा, आपल्यासारखाच आशियाई देश) स्त्रियांच्या स्तनांचा आकार, स्तनांकडे पाहून चाळवणे हा संस्कृतीजन्य भाग नव्हता. जपान कशाला, आपल्याच देशात स्त्रियांचे स्तन, स्तनाग्रं आणि क्लीव्हेजकडे बघण्याचा निकोप दृष्टीकोन होता. जुनी शिल्पं वगैरे पाहिलीत तर त्यातूनही हे दिसेल. त्या शिल्पांमधल्या स्त्रिया व्यवस्थित आनंदी वगैरे दिसतात. माझ्यासकट अनेक मुली, स्त्रिया फक्त स्वतःला आनंद व्हावा म्हणून ठराविक प्रकारचे कपडे घालतात, नटतात, मुरडतात, केस कापतात, इ. त्यातून स्त्रिया आकर्षक दिसत असतील, पुरुषांना आकर्षक दिसाव्या म्हणूनही हे सगळं करत असतील तरीही त्यांना संभोग नाकारण्याचा अधिकार असतो. काही पुरुष तिच्या नकार-होकाराला किंमत देत नाहीत कारण त्यांची "बुरसटलेली पुरुषी मानसिकता". त्याबद्दल किमान सहानुभूती बाळगणं सोडाच उलट पीडीत व्यक्तीबद्दलच खवचटपणे बोलणं, जिवंत स्त्रीची तुलना दूध वगैरे वस्तूंशी करणं हे बलात्काराचं नागवं समर्थन आहे; खाप पंचायतींच्या बातम्यांपेक्षा हे काहीही निराळं नाही.
आपले पुर्वज म्हणे निर्वस्त्र संचार करायचे ! आपण आजच्या घडीला करतो का ? नाही ते सुद्धा जरा नीट स्पष्ट करा बरं का..
याचा इथे काय संबंध? वस्त्रं गुंडाळणं, स्त्रीसुलभ लज्जा ही (थोर्थोर?) संस्कृतीची देणगी आहे, त्यात नैसर्गिक काहीही नाही एवढाच मुद्दा आहे.
तुमच्या डोक्यावर काही आदळलय का ? तुम्हाला लज्जा या भावनेचा कधी अनुभव झाला नाही का ?
व्यक्तिगत रोखाचा असला तरीही या प्रश्नाबद्दलही थँक्यू. दुर्दैवाने होय. लज्जा या (लो-ग्रेड) भावनेची लागण मला एकेकाळी झाली होती; ती बऱ्यापैकी काळ टिकलीसुद्धा. सुदैवाने त्यातून बाहेर पडायला मदत करणारे असंख्य लोक, अगदी मिसळपाववरही भेटले. त्यातून मनुष्य हा स्खलनशील प्राणी असतो याची कल्पना असल्यामुळे मी स्वतःला माफही केलं. आणि ही भावना आता नगण्य प्रमाणातच उरल्यामुळे स्वतःचा, एकेकाळचा बावळटपणा असा जाहीर करायलाही मला लाजबिज वाटत नाही. या जाहीर कन्फेशनची संधी दिल्याबद्दल सदस्य मदनबाण यांचे मनःपूर्वक आभार.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्रियांच्या स्तनांचा आकार, स्तनांकडे पाहून चाळवणे हा संस्कृतीजन्य भाग नव्हता. जपान कशाला, आपल्याच देशात स्त्रियांचे स्तन, स्तनाग्रं आणि क्लीव्हेजकडे बघण्याचा निकोप दृष्टीकोन होता. जुनी शिल्पं वगैरे पाहिलीत तर त्यातूनही हे दिसेल. त्या शिल्पांमधल्या स्त्रिया व्यवस्थित आनंदी वगैरे दिसतात. >>> हे बरोबरच आहे. पण.... ते पूर्वी होतं... आज नाहीये. काळ बदलतोय. पण तो बदल घडवणं हे प्रत्येक समजूतदार व्यक्तीनी स्वतःला सांभाळून करावं लागतं. दुर्दैवानी, अजून तरी मला हवं ते मी घालेन, असं प्रत्येक ठिकाणी म्हणून चालत नाही.आजूबाजूला अनेक लोक, जर स्त्रिया, मुलं यांच्याकडे vulnerable objects म्हणून बघत असतील, तर स्वतःला सांभाळणं अपरिहार्य आहे. अम्ग सम्पूर्न नीट झाकूनही काही वेळेस कितीतरी ठिकाणी सुरक्षित वाटत नाही. मला वाटतं की लज्जेपेक्षा सुरक्षितता हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे.

In reply to by अजया

तीव्र सहमती बराच हिट गेलाय आमचा नवीन शब्दप्रयोग ;)

In reply to by कवितानागेश

>>>> सुरक्षितता हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे. १०० टक्के सहमत. स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही इतर पुरुषांपासून धोका असतो. (स्त्रियांना जास्त असतो). १९७९ साली कांजूरमार्ग-दादर मार्गावर रेल्वेने प्रवास करताना पुरुषांच्या डब्यात दूसर्‍या पुरुषाकडून मला स्वतःला त्रास झालेला आहे. सर्र्कन वळलो आणि त्याच्या अशी कानफटात हाणली की पुढचं स्थानक येईपर्यंत माझ्या हाताच्या झिणझिण्या गेल्या नाहीत. (तो बहिराच झाला असावा) पुढच्या स्थानकावर तो उतरून गेला. आजूबाजूच्या लोकांना काहीच कळलं नाही. ते, 'पाकिट मारायचा प्रयत्न करीत होता का?' असे मला विचारू लागले. पण सत्यपरिस्थिती समजल्यावर तिथे अत्यंत संताप पसरला. 'कानाखाली एकच आवाज काढून सोडून का दिला? चांगला खाली पाडून तुडवला असता साल्याला.' अशी त्यांची प्रतिक्रिया होती. अशा वेळी, गर्दीत स्त्रियांना काय त्रास होत असेल ह्याची कल्पनाही करवत नाही. ह्याचीच दुसरी बाजू, जेंव्हा अत्यंत गर्दीच्या वेळीही स्त्रिया आपल्या प्रियकरासोबत (कदाचित तेव्हढाही दुरावा सहन होत नसल्याने) पुरुषांच्या डब्यात येतात आणि जरा धक्का लागला तर आजूबाजूच्या लोकांकडे असे काही बघतात की जणू त्याने बलात्कारच केला आहे. अशा बायकांचाही अत्यंत संताप येतो. असो. गेली ३५ वर्षे लोकल प्रवासाचा त्रास वाचल्याने स्वतःला नशिबवान समजतो आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही इतर पुरुषांपासून धोका असतो. (स्त्रियांना जास्त असतो). १९७९ साली कांजूरमार्ग-दादर मार्गावर रेल्वेने प्रवास करताना पुरुषांच्या डब्यात दूसर्‍या पुरुषाकडून मला स्वतःला त्रास झालेला आहे. हा अनुभव मी सुद्धा ट्रेन मधे घेतला आहे,मी माझ्या उजव्या हाताच्या ढोपराने जोरात त्याच्या मागे फाईट मारली, एक वयस्क दिसणारा माणुस होता, त्याच्याकडे वळालो... आता जर अजुन जवळ आलास तर या चालत्या ट्रेन मधुन तुला खाली फेकुन देइन असे जोरात त्याच्या आंगावर ओरडलो. असाच एक अनुभव एका स्त्रीकडुन देखील आला आहे, मी ऑनसाईटला क्लायंटकडे होतो, तिथे अ‍ॅना नावाची मुलगी होती {नाव मुद्दामुन बदलले आहे}ती आमच्या कामात आम्हाला मदत करत असे,नॉलेज ट्रान्सफरसाठी केल्या जाणार्‍या कामाच्या भागात तिची मदत होत होती, अनेकदा आम्हाला काही गोष्टी तिच्याकडुन समजुन घ्याव्या लागत होत्या. ती बर्‍यापैकी दणकट होती,दिसायला देखील ठीक ठाक होती... परंतु काही दिवसांनी तिच्या वागण्याचे तंत्र अचानक बदलले, ती जवळ येउन बोलु लागली,कामाचे विषय सोडुन इतर गोष्टींवर मोकळेपणाने बोलु लागली,इतपर्यंत ठीक आहे, पण मग हळु हळु ती व्यक्तीगत गोष्टी सांगु लागली. माझा बॉयफ्रंड सोल्जर आहे, तो सध्या इराक मधे आहे. मला फार कंटाळा येतो... मला हॉर्स रायडिंग करायला फार आवडतं इ. पण या काळात तीचा स्वतःचे उरोज दाखवण्याचा प्रयत्न लक्षात आला होता, लॅपटॉप वगरै हाताळताना स्पर्ष करण्याचा तिचा प्रयत्न कळुन येत होता... पण मग रोज माझ्या बसण्याच्या जागी मुद्दामुन {तिथे एक खिडकी होती ज्यातुन माझी बसण्याची जागा दिसायची} वाकुन जितके उरोज दाखवता येतील तितका ती प्रयत्न करायची... एकदा मिटींगला बसलो असताना समोर बसुन तीने माझ्या पायांना तीचे पाय लावुन चाळा करायला सुरुवात केली... मला वाटले की चुकुन पाय लागत असेल्...पण तिचा हा चाळा काही थांबेना ! शेवटी थोडे खाली वाकुन नीट तिचा पाय कुठे आहे ते पाहिले आणि योग्य वेळी माझ्या बुटांनी जमिनीवर तिचा पाय चांगला दाबला आणि तिच्याकडे रागाने बघत डोळे वटारले ! त्या दिवसा नंतर ती कधीही माझ्या नादी लागली नाही. पुरुष असो वा स्त्री वासना सगळ्यांनाच असतात... आणि त्याचा राग आणि किळस दोघांनाही वाटते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारले

In reply to by मदनबाण

तुम्ही तर 'मदनबाण'. पण आमच्या सारख्यांनाही स्त्रियांकडून वाईट अनुभव आले आहेत. सर्व मिपावर देता येत नाहीत. एक खाजगी कट्टा करावा लागेल नाहीतर 'अनाहूत' असा एक स्वतंत्र विभाग पुरुषांसाठी सुरू करावा लागेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

@नाहीतर 'अनाहूत' असा एक स्वतंत्र विभाग पुरुषांसाठी सुरू करावा लागेल.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif य्याय्याय्याय्या...ह्हाह्हाह्हाह्हाह्ह्हा! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif

In reply to by मदनबाण

तंग कपडे घालून गेला होतात का हपिसात? किंवा लो नेक शर्ट वगैरे? नाही, "असले कपडे घातल्याने वासना उद्दिपित होतात आणि समोरचे चाळावले जातात" असं काही लोकं म्हणतात म्हणून विचारलं?

In reply to by अनुप ढेरे

वन्स ब्लॅक नेव्हर कम बॅक... अशी काहीशी म्हण आहे, गोर्‍या मुलींना काळ्या मुलांचे आकर्षण असते.आणि आम्ही त्यांच्यासाठी काळेच !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारले

In reply to by मदनबाण

ती म्हण कशासंदर्भात आहे ते इथे सांगण्यासारखे नाही.