✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रेल्वे भरती ची माहिती हवी.

क
कलंत्री यांनी
Wed, 10/22/2008 - 20:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14029 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

जाहिराती

कोलबेर
Wed, 10/22/2008 - 20:38 नवीन
जाहिराती मराठी वर्तमानपत्रात कधीच येत नाही
सकाळ मधील ह्या बातमी मध्ये रेल्वे बोर्डाने मुंबई आणि नागपुर मधुन दोन प्रसिद्ध मराठी वर्तमानपत्रात जाहिरात दिल्याचे समजते.
याबद्दल हे मुले अतिशय जागृत असतात आणि वर्षभर फक्त त्याचीच तयारी करत असतात. समजा या स्पर्धात्मक परीक्षेत त्यांना यश आले नाही तर ते दुसर्‍यावर्षीही त्याचीच तयारी करत असतात. इतर प्रांताच्या मुलांना त्यात गुजरातीही आले अथवा मराठीही आले अशी माहिती नसते, गम्यही नसते आणि स्वारस्यही नसते.
सहमत!
  • Log in or register to post comments

५४४ जागा आणि ७५००० उमेदवार.

कलंत्री
Wed, 10/22/2008 - 20:46 नवीन
लेखाचा सारांश ५४४ जागा आणि ७५००० उमेदवार. भारताची खरी समस्या हीच आहे. माझ्या एका मित्राने स्वताचा व्यवसाय सुरु केला होता. त्याच्या वडिलांच्या आजोबापासून त्याच्यापर्यंत सर्वच जण रेल्वेत नौकरी करीत होते ( ४ पीढी). त्याला मात्र रेल्वेची नौकरी आवडत नव्हती. जेंव्हा त्याने नौकरी सोडुन व्यवसाय करण्याचा मनोदय व्यक्त केला तेंव्हा घरात हाहाकार झाला. ( स्मृतीरंजन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर

सारांश

कोलबेर
Wed, 10/22/2008 - 21:04 नवीन
सारांशाशी सहमत आहे..
माझ्या सहकार्‍याने दिलेली ही माहिती खरी आहे का?
ह्या तुमच्या प्रश्नावर वाचीव माहिती पुरवली इतकेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

स्पर्धा परिक्षा

लिखाळ
Wed, 10/22/2008 - 21:00 नवीन
स्पर्धा परिक्षात भाग घेण्याचा ओढा आपल्याकडे थोडा कमीच दिसतो हे खरे असले तरी अनेकानेक मुले या ना त्या वेळी स्पर्धा परिक्षेसाठी उत्सुक असतात. म्हणजे एकदम आय ए एस सारख्या नव्हेत पण नेट-सेट सारख्या परिक्षा, बँक आणि इतर क्षेत्रातल्या परिक्षा, बहुधा आय आय टी च्या परिक्षा, वगैरे. तर एंप्लॉयमेंट न्युज हे वृत्तपत्र आठवड्यातून एकदा जेव्हा बाजारात येते तेव्हा भराभर खपते. पण तरी हे मान्यच आहे की मराठी मुले या परिक्षा द्यायला कमीच उत्सुक असतात. --लिखाळ.
  • Log in or register to post comments

मराठी जाहिराती..

प्रभाकर पेठकर
Wed, 10/22/2008 - 21:10 नवीन
१९७०-७१ पर्यंत मराठी पेपरात (लोकसत्ता) रेल्वेच्या जाहिराती येत. अशी जाहिरात पाहूनच 'असिस्टंट स्टेशनमास्तर' जागे साठी अर्ज आणि परीक्षा दिली होती. (बालमोहन की कुठल्याशा शाळेत घेतली होती). वडिलांच्या आग्रहाने गेलो होतो. मलाही रेल्वेत स्वारस्य नव्हते. पुढे रेल्वे खात्याकडून काहीच टपाल आले नाही. मी समजलो काय ते. पुढच्याच वर्षी माझा एक मराठी मित्र वरील प्रकारची परिक्षा पास होऊन रेल्वेत 'असिस्टंट स्टेशनमास्तर' पदावर नोकरीस लागला. जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
  • Log in or register to post comments

हो हे असेच आहे....

चटोरी वैशू
गुरुवार, 10/23/2008 - 12:12 नवीन
हो हे असेच आहे.... मराठी माणूस बाहेरच्या प्रातांत नोकरी साठी (ते ही सरकारी नोकरी )जाण्यास तयार नसतो... त्यांना सगळे इथल्या इथे हवे असते.... आइ टी क्षेत्रा तले तेवढे ... बैगलोर, हैद्रबाद, गुरगांव, चैनई , दिल्ली, कलकत्ता अशा मोजक्या ठीकाणी जाणे पसंत करतात.... पण परप्रांतीय हे भारताच्या कुठल्याहि कोपर्‍यात जाण्यास तयार असतात ...म्हणून आज अशी परिस्थिती आहे कि आपल्या महाराष्ट्रात सरकारी असो कि खासगी नोकरी असो .... बाकि लोकांचे वर्चस्व जास्त आहे... जर आपण प्रयत्न नाही करत तर बाकी लोकांना दोष देण्यात काही अर्थ नाही.... आणि राजकरणी मंडळी ह्याचा फायदा घेतात.... मग जाळपोळ ...दंगे.... नुकसान कुणाचे जनतेचे.... त्यापेक्षा आपण जाग्रुत राहून .... सगळी कडे जाण्याची तयारी ठेवावी... दाखवुन द्यायचे सगळ्यांना..... इथे कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफि असावी.... पण मला जे वाटले ते मे व्यक्त केले....
  • Log in or register to post comments

जागृत

कुंदन
गुरुवार, 10/23/2008 - 13:05 नवीन
>>याबद्दल हे मुले अतिशय जागृत असतात आणि वर्षभर फक्त त्याचीच तयारी करत असतात. समजा या स्पर्धात्मक परीक्षेत त्यांना यश आले नाही तर ते दुसर्‍यावर्षीही त्याचीच तयारी करत असतात. सहमत , एक उदा . मी पुर्वी अधुन मधुन ज्या टपरी वर पान घायचो , त्या भैया चा तरुण बेरोजगार मुलगा ( भैया मुलुख ला गेल्यावर ) टपरी वर बसुन पान बनवता बनवता मिळणार्‍या मोकळ्या वेळात या परिक्षा साठी अभ्यास करताना मी पाहिलाय. अवांतर : एम्पॉलमेंट न्युज इथे वाचा http://www.employmentnews.gov.in/
  • Log in or register to post comments

त्यांना

मराठी_माणूस
गुरुवार, 10/23/2008 - 13:16 नवीन
त्यांना सगळे इथल्या इथे हवे असते ही तर मानवी प्रवृत्ती आहे. नाईलाजच झाला तरच स्थलांतर होते. ज्या ज्या प्रांतातुन लोक इथे आले तीथे रोजगार नाही आणि हे कित्तेक वर्षा पासुन चालु आहे म्हणुन त्यांच्या साठी पर प्रांतात जाणे हे काहे विशेष नाही, त्यांची तशी मानसीक तयारी झालेली असते. आताची काही वर्षे सोडली तर मराठी माणूस रोजगारा साठी बाहेर जाणे सर्रास नव्हते. त्या मुळे मानसीकता पण तशीच होती. आपण आपल्या साठी इथेच रोजगार निर्माण केला हा दोष आहे का गुण.
  • Log in or register to post comments

रेल्वे भर्ति प्रक्रिया फार

देव मासा
Tue, 12/10/2013 - 01:46 नवीन
रेल्वे भर्ति प्रक्रिया फार लांबलचक चालते, कमित कमि ५ वर्ष, मग एक पद आसो किंवा शंभर,फेब २०१० मधे सुरु ज्हालेलि टीसी/लिपिक भर्ति प्रक्रिया आजुन सुरु आहे, आताशि प्राथमिक लेखि परिक्षा झालि , त्याचे निकाल अजुन जाहिर झाले नाहि, आजुन ३ वर्ष, संपुण प्रक्रिया संपायला लागेल, तोपर्यन्त २२ वर्षचा उमेदवार ३० वर्षचा होईल, तेव्हा त्यचि शारिरीक चाचणी होईल २०१०च्या जाहिरातिचे निकष लाउन......ररबि मुंबईचे संकेत स्थ्ळ पहा, तिथे लोक आजुन २००७ सालि झालेल्या परिक्षाचे निकालाचि वाट पहात आहेत, रेल्वे्च्या लेखि परिक्षा फार कठिण आसतात,तुब- नाळी वर रवि हांडाचे काहि विडीओ ऊपयोगि येऊ शकतात.
  • Log in or register to post comments

इतक डीफेन्सीव होउ नका, काहीही

लॉरी टांगटूंगकर
Tue, 12/10/2013 - 07:17 नवीन
इतक डीफेन्सीव होउ नका, काहीही चुकीचं लिहीत नाहीये तुम्ही. रेल्वेची कोणतीतरी एक परिक्षा गेल्या रविवारीच झाली. एका मित्राचा चेपु अपडेट होता. रेल्वेचं एक संपूर्ण फुल टाइम इंजिनिअरिंग कोर्स देणारं कॉलेज पण आहे. बहुदा हे असावं. www.irimee.indianrailways.gov.in
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा