Skip to main content

बटाटेवडे आणि चिंच-खजूर आंबटगोड चटणी (फक्त फोटो...)

लेखक एस यांनी रविवार, 31/08/2014 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
थांबा, थांबा, थांबा. ही काही पाककृती नाही. एकच फोटो टाकणार आहे. पाककृतीबिती टाकायला मी काही बल्लवाचार्य नाही. बटाटेवड्यांची पाककृती Mrunalini यांनी आधीच मिपावर देऊन ठेवली आहे. उत्सुकांनी ती आवर्जून वाचा. इथे फक्त एक फोटो पहायला मिळेल. तोही अजिबात धड नाहीये. तेवढा धीर धरवला नाही आणि सर्व वडे + चटणी गट्टम केले गेले. ;-)

Batatewade&Chutney
हो, चिंच-खजुराच्या चटणीबद्दल चार ओळी निश्चितच खरडू शकेन.
साहित्य - चिंच, खजूर, गूळ, पाणी. प्रमाण - सगळंच अदमासे. (मला काय प्रमाणबिमाण विचारताय...!) कृती - हे सगळं एका जाड बुडाच्या स्टीलच्या पातेल्यात पंधरा-वीस मिनिटे उकळून घ्या. नंतर दाबून-पिळून-गाळून-बिळून घ्या. चटणी तयार...
उद्या पाणीपुरीचा बेत आहे...
बटाटेवड्यांसोबतच अर्ध्या बटाट्याचे बटाटाभजी आणि वांग्याच्या चारदोन चकत्यांची वांगीभजीपण गेलाबाजार करून पाहिली. वांग्यांच्या चकत्यांवर थोडेथोडे तिखटमीठ भुरभुरले आणि बेसनात घोळवून तळून घेतली. झाली गाड्याबरोबर नळ्याचीपण यात्रा!
पाककृती विभागात का? तर मी एवढं राबराब राबून (कुटुंबाचे एक्स्पर्ट अ‍ॅडवाइस-कम-टोमणे वैग्रे ऐकून घेत घेत हम भी कुछ कम नहीं असे म्हणत हे सगळं बनवलंय तर मग टाकूयात मिपावर. शेवटी काय आहे की मिपा आहे घरचं, होऊ द्या खर्च!
एन्जॉय माडी... चिअर्स!!! :-)

वाचने 55798
प्रतिक्रिया 105

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

२००४ पुर्वी तुमचे थोरले ठाकुर बंद झाले नसतील तिथला वडापाव खाल्ल्याची शक्यता शंभर टक्के आहे, फक्त आता आठवत नाही. बादवे कुठे होता हा वडापाव?

In reply to by किसन शिंदे

प्रश्र्नांतच उत्तर आहे... सध्या डोंबोलीला जशी मून-मून मिसळ फेमस आहे, तसे ह्या वडा-पावचे नांव होते. सुरुवातीला केळकर रोड, मानपाडा रोडला जिथे मिळायचा तिथे मिळायचा. नंतर नगरपालिकेच्या जवळ सुरु झाला. सध्या आदित्य मंगलकार्यालयाच्या समोर मिळतो, पण तो आमच्या साठी नसतो. शिंचे आजकाल चिंचेची चटणी टाकतात आणि मक्याचे पोहे देतो. आणि परत त्या मारवाडी मिरच्या. ठाकूर बुवा मस्त एक-दोन लवंगी मिरच्या टाकायचा. जावू दे, लग्न झाल्या पासून आम्हाला पण घरी रहायचे असल्याने चिंचेची चटणी आवडली, असे दाखवायला लागते.(अशावेळी बियर उपयोगी पडते.त्या कडवड पण मधूर चवी बरोबर, ती चटणी चालून जाते.) पण तो जुलुमाचा राम-राम. आता पुढच्या वेळी आलो की, झमझमीत वडे आणि लसणाच्या चटणी सोबतच कट्टा करू या. तुम भी क्या याद करोगे.

In reply to by मुक्त विहारि

डोंबिवली मध्ये ब्राह्मण सभा जेथे मुविच्या भाषणाला बक्षिस मिळाले होते त्या बाजूला त्रिमूर्ती ह्यांचा वडापावात झणझणीत हिरव्या मिरचीची चटणी असते. नुसत्या आठवणीने तोंड भरून आले.

In reply to by निनाद मुक्काम …

आज-काल तिथे पण ह्या गुज्जू मंडळींच्या नादाने खजूर-चिंचेची चटणी असते. जावुदे, फडके रोड जिथे प्रधान डॉ.च्या बंगल्याच्या रोडला मिळतो, तिथले कुळकर्णी जरा बरे वडे विकतो.पण तो त्याच बरोबर इतरही बरेच पदार्थ विकत असल्याने, त्याच्या कडे पण चिंचेची चटणी आणि वडे खाणारे आहेतच. हा हंत हंत... ते थोरले ठाकूर गेले आणि डोंबोलीतल्या वडा-पावाची मज्जाच गेली.निदान ठाकुरांनी तरी चिंचेची चटणी आणि वडे हे काँबिनेशन ठेवायला नको होते. मी ती चिंचेची चटणी पुरण-पोळी बरोबर खाइन कदाचित श्रीखंडा बरोबर पण खाईन.पण बटाटेवडे आणि चिंचेची चटणी एकत्र अजिबात खाणार नाही. लसणाची चटणी आणि बटाटे वडे हेच खरे. ते मद्राशी तर बटाटे वडे आणि सांभार पण खातात. आणि लोकं पण त्या वडा-सांभारा बरोबर पाव खातात.त्या मद्राशांचे एक ठीक आहे, पण आपलीच, रांगडी मराठी पुरुष मंडळी, चिंचेची चटणी खातांना बघून कसेसेच होते. वाघाने गवत खाल्ले तरी चालेल, पण मराठी पुरुषांनी चिंचेची चटणी वड्यांच्या बरोबर खाणे, हे महाराष्ट्र धर्माला शोभत नाही. एकूणच, आमचा राग चिंचेच्या चटणीवर आहे, हे सुज्ञ माणसांच्या लक्षांत आलेच असेल.

In reply to by मुक्त विहारि

येथे उशिरा लक्ष गेले त्रिमूर्ती च्या बाजूला सुभाष डेअरी आहे तेथे पूर्वी मातोश्रींचा वाडा होता , खानदानी डोंबिवलीकर असल्याचा सार्थ अभिमान बाळगून सांगतो , त्रीमृती मध्ये वडापाव खायला जाणार असे सांगताच माझ्या डोंबिवलीकर मामे बहिणींनी लगेच ओरिजनल वडा पाव बनवणार्याने चवीशी इमान राखता यावे म्हणून सर्वेश जवळ नवीन दुकान थाटले असल्याचे कळले आहे , पावसळ्यात गाड्यांचा गोंधळ असायचा तेव्हा आईची ७ पर्यंत वाट पहायची नाहीतर त्रिमूर्ती मध्ये जाऊन घरगुती जेवण आणावे. असा रिवाज होता , त्रिमूर्ती आमची दुसरी आई होत्या , गुज्जू लोकांसाठी चवीसाठी प्रतारणा पाहून वाईट वाटले.

एवढा टेम्टींग फोटो टाकून जळवल्याबद्दल. मित्रा पाकृ रेडिमेड असली तरी फोटो तरी स्टेप बाय स्टेप टाकत जा...उदा. बाहेरुन वडे आणल्यास त्यांचा पुडितच ठेवुन काढलेला फोटो, प्लेट स्वच्छ पुसतानाचा, कोथींबीर धुतानाचा :D मग वडे प्लेट मधे ठेवुन चटणीची वाटि मधे ठेवतानाचा आणि मग शेवटि अर्धवट खाल्ल्याचा....बघ विचार कर.

"कुटुंबाला" तरी दिले का नाही? वडे खायची घाई फोटोवरून जाणवते आहे. वड्यांच्या फार जवळून काढलेला फोटो आहे अशी एक शंका आली. का चटणी आपण केल्यामुळे तिचा फोटो फोकस करून द्यायचा असं ठरवलं होतं? असो. कुटुंबाला सांगा, वडे छान दिसताहेत. :-/

In reply to by पैसा

वड्यांपासून चटणीपर्यंत सगळं काही आम्हीच केलंय. तरीपण 'कुटुंबा'पर्यंत तुमची दाद पोहोचवण्यात येईल.

कोसळत्या पावसात सर्वाँच्या तोंडाला पाणी सुटेल, काहींचे डोळे पाणावतील, असा विषय काढल्याबद्दल धन्यवाद. एक शंका. नाशिक जळगाव वर्धा नागपूरची वेगळी शाखा आहे का मिपाची? तिथून काही पोच येत नाहीत. आमच्याकडे असं असतं वगैरे.

फोटोग्राफी उत्तम. पण वडे थोडे करपल्यासारखे का वाटत आहेत? थोडा मूड गेला त्यामुळे. :(

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पण वडे थोडे करपल्यासारखे का वाटत आहेत?
मी केलेत हो! ;-) सांभाळून घ्या थोडं! :-P बादवे, मस्त टेस्टी झाले होते!

माझ्या पहिल्यावहिल्या पाककृतीचं पुणे Vs इतर सर्व असं यशस्वी रूपांतर आणि शतकोत्तर कामगिरीकडे ढकलणे या अजोड कामगिरीबद्दल मुवि आणि स्नेहांकिता या दोन्ही आयडींचे हाभिनंदण. घाईगडबडीत केलेल्या पाककृतीच्या त्याच दर्जाच्या धाग्यावर पहिल्याच दिवशी प्रतिक्रियांचा पाऊस. अरेरे! बाकी छायाचित्रणासारख्या विषयावर जीव तोडून लिहिलेल्या धाग्यांवर कुत्रेही फिरकत नाही हेही मिपाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. :-) धन्य! चलो बायबाय! :-)

In reply to by एस

आम्ही कोणताही प्रादेशिक वाद सुरु केलेला नाही. अर्थात मध्य महाराष्ट्रीय लोकांना कोणताही वाद स्वत:वर ओढवून घेण्याची सवय आहे त्याला आम्ही बॉर्डरवाल्यांनी काय करावे ? बाकी, वड्याचा स्वाद कसाही असला तरी वाद भारी खमंग आहे !

In reply to by एस

कुत्रं कशाला फिरकेल तिकडे? त्याच्याकडे कॅमेरा नसतो. :P पण लिहिण्यासारख्म काही नसतं त्यामुळे प्रतिक्रिया येत नाहीत. पण वाचनसंख्या नॉर्मल असते. इथे 'चर्चा' करायला भरपूर वाव असतो.... एकदा भेळ करा आता वरचीच चटणी वापरुन ;)

In reply to by कवितानागेश

कुत्रं कशाला फिरकेल तिकडे? त्याच्याकडे कॅमेरा नसतो. *lol*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

In reply to by एस

>>बाकी छायाचित्रणासारख्या विषयावर जीव तोडून लिहिलेल्या जीव तोडून लिहीताय हे माहित असतं म्हणून नसत्या पिंका टाकून सत्यानाश करत नाही.

In reply to by एस

क्लास मध्ये टीचर च टीच करणार ना सर? पण तेच सर बाहेर थ्री फोर्थ टीशर्ट मध्ये पाणीपुरी खायला उभं असताना भेटले की गप्पा होतात ना? तसंच आहे हे! ;)

हल्ली उपनगरीय स्थानकाबाहेर या बिकानेर वाल्या हलवयांची गर्दी झाली आहे. सामोस्यांचे सारण वड्या मधे घालून हिरव्या लाल चाटन्यंबरोबर देतात. असा राग येतो म्हणून सांगू. वरुन सुखी चटणी ठेवत नाही म्हणून तोंड वर करून सांगतात.

अरे एस भाऊ हे पण करतात का? बाकी वडा आणि चटणीचा रंग यावर काही लिहीले असते पण नको, छानच आहे हो, गंमत करते ;)

वडा (वडापाव सोबत मिळतो तो) हा आलुबोंडा/आलुगोंडा यापेक्षा वेगळा पदार्थ आहे. (अर्थात आलुगोंडा चवीला उजवा असतो) याचा आकार साधारणपणे टेनीस बॉल इतका असतो, अर्थात पुण्यात मिळणे अवघड आहे . मराडवाड्यातील/ विदर्भातील गावात किंवा शहरात मिळू शकेल.