थांबा, थांबा, थांबा. ही काही पाककृती नाही. एकच फोटो टाकणार आहे. पाककृतीबिती टाकायला मी काही बल्लवाचार्य नाही. बटाटेवड्यांची पाककृती Mrunalini यांनी आधीच मिपावर देऊन ठेवली आहे. उत्सुकांनी ती आवर्जून वाचा. इथे फक्त एक फोटो पहायला मिळेल. तोही अजिबात धड नाहीये. तेवढा धीर धरवला नाही आणि सर्व वडे + चटणी गट्टम केले गेले. ;-)
हो, चिंच-खजुराच्या चटणीबद्दल चार ओळी निश्चितच खरडू शकेन.
साहित्य - चिंच, खजूर, गूळ, पाणी. प्रमाण - सगळंच अदमासे. (मला काय प्रमाणबिमाण विचारताय...!) कृती - हे सगळं एका जाड बुडाच्या स्टीलच्या पातेल्यात पंधरा-वीस मिनिटे उकळून घ्या. नंतर दाबून-पिळून-गाळून-बिळून घ्या. चटणी तयार...
उद्या पाणीपुरीचा बेत आहे...
बटाटेवड्यांसोबतच अर्ध्या बटाट्याचे बटाटाभजी आणि वांग्याच्या चारदोन चकत्यांची वांगीभजीपण गेलाबाजार करून पाहिली. वांग्यांच्या चकत्यांवर थोडेथोडे तिखटमीठ भुरभुरले आणि बेसनात घोळवून तळून घेतली. झाली गाड्याबरोबर नळ्याचीपण यात्रा!
पाककृती विभागात का? तर मी एवढं राबराब राबून (कुटुंबाचे एक्स्पर्ट अॅडवाइस-कम-टोमणे वैग्रे ऐकून घेत घेत हम भी कुछ कम नहीं असे म्हणत हे सगळं बनवलंय तर मग टाकूयात मिपावर. शेवटी काय आहे की मिपा आहे घरचं, होऊ द्या खर्च!
एन्जॉय माडी... चिअर्स!!! :-)

वाचने
55908
प्रतिक्रिया
105
मिसळपाव
प्रतिक्रिया
णिषेध !
In reply to हम्म् by एस
कुत्रं कशाला फिरकेल तिकडे?
In reply to हम्म् by एस
कुत्रं कशाला फिरकेल तिकडे?
In reply to कुत्रं कशाला फिरकेल तिकडे? by कवितानागेश
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!>>बाकी छायाचित्रणासारख्या
In reply to हम्म् by एस
क्लास मध्ये टीचर च टीच करणार
In reply to हम्म् by एस
@ स्वॅप्स....
In reply to हम्म् by एस
(No subject)
In reply to हम्म् by एस
धाग्याची शतकाकडे
पाकृ आवडली
फोटू मस्त...
९९ झाले रे..........
झाले १००
बिकानेर वाल्यांचा सुळसुळाट
भारीये हे !!
वडा (वडापाव सोबत मिळतो तो) हा