Skip to main content

पुण्यातला गणेशोत्सव -माहिती हवी आहे

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 27/08/2014 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलंय. घराघरात आपल्या लाडक्या दैवताच्या तयारीची लगबग आणि धावपळ अगदी मनापासून सुरु आहे. ज्यांचा घरचा गणपती कोकणात आहे त्यांची तर तऱ्हाच वेगळी….गणपती म्हटला की मनात पहिल्यांदा आठवतं ते पुणं …. ह्या शहराची नाळ त्याच्या आराध्य दैवताशी ज्या प्रकारे जोडली गेली आहे ते पाहता ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असूच शकत नाहीत ह्याची खात्री पटते…. खरा पुणेकर आणि इतकंच काय ह्या पुण्यनगरीत आलेला प्रत्येक माणूस त्या दहा दिवसात भक्तिरसात नखशिखांत न्हाऊन निघतो. गेल्या कित्येक वर्षांपासून माझीही पुण्यातला गणेशोत्सव याची देही अनुभवायची इच्छा आहे परंतु आमच्याच घरी बाप्पा मुक्कामाला येत असल्यामुळे ते काही केल्या जमत नाहीये. परंतु ह्या वर्षी मात्र मी ठरवलंच आहे की कसंही करून पुण्याला यायचंच त्यामुळे घरच्या बाप्पांना जड अंतकरणान निरोप देऊन मुंबईहून पुण्यनगरीचा रस्ता धरावा असा विचार आहे !! तरी समस्त पुणेकरांना (आणि इतरांनाही ) ही नम्र विनंती की त्यांनी कृपया पुण्यातल्या गणपतींबाबत आणि दर्शनाबाबत मार्गदर्शन करावे म्हणजे कुठे आणि कसे जावे ,काय काळजी घ्यावी वगैरे वगैरे …. मानाचे गणपती एकमेकांपासून चालत जाण्याच्या अंतरावर आहेत का ही माहिती सुद्धा हवी आहे. तसेच अजून कुठचे गणपती आवर्जून पाहावेत हेही जाणून घेण्यात रस आहे .गौरींच्या विसर्जनानंतर आणि अनंत चतुर्दशीच्या आधी दर्शन घेण्याचे ठरवले आहे . ह्या निमित्ताने समस्त मिपा परिवाराला गणेशोत्सवाच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा…. गणपती बाप्पा मोरया !!

वाचने 21077
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

In reply to by स्पा

@बुवा मस्तानी/ बासुंदी दील , तो सुदिन>>> :-/ हा हल कट माणूस http://www.sherv.net/cm/emoticons/playful/making-funny-face-with-poked-out-tongue-smiley-emoticon.gif पुण्याला यील..तो(च) सगळ्या अखिल विश्वातला सूऊऊऊऊऊउदीन! :p बिन कामाचा ये एकदा(तरी!) हवी-ती मस्तानी देइन. http://www.sherv.net/cm/emoticons/playful/mocking-with-tongue-sticking-out-smiley-emoticon.gif

In reply to by प्रचेतस

@तुम्हालाही अगदी गदगदून हसू आलंय बघा की.>>> काय करणार? आंम्हाला (तुमच्या..सारखं!) मनातल्या मनात हसता नै येत ना!!!!!!!!!!!!!!!!!!!!! :p =)) :p

मानाचे गणपती काय प्रकरण आहे? बिनमानाचे गणपतीही असतात का? मानाचा गणपती ठरवण्याचे निकष काय असतात? की पाच मानाचे गणपती पूर्वीच ठरले आहेत आणि आता त्यात बदल होणार नाही?

In reply to by धन्या

मानाचे गणपती पूर्वीच ठरले आहेत. आता त्यात बदल होणे नाही. निकषच शोधायचे झाले तर: १. कसबा गणपती - पुण्याचे ग्रामदैवत २. तांबडी जोगेश्वरी - पुण्याची ग्रामदेवता ३. गुरुजी तालीम - (कारण माहीत नाही) ४. तुळशीबाग - पुण्याचे "केअरटेकर" सरदार तुळशीबागवाल्यांचा गणपती ५. केसरीवाडा - सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक लो. टि़ळकांचा गणपती आता यात शंका काढायच्याच झाल्या तर पुष्कळ आहेत. उदा. पहिला सार्वजनिक गणपती "भाऊ रंगारी" मानाचा का नाही? गुरुजी तालमीपेक्षा प्रसिद्ध असलेली साखळीपीर तालीम मानात का नाही? असो.

In reply to by आदूबाळ

सगळे टिळकांनीच सुरु केलेले आहेत , मानाचा पहिला याचा अर्थ त्या वेळी दहा दिवस पहिल्यांदा ठेवण्यात आला तो , दुसरा आणि तिसरा ही त्याच वर्षी ठेवण्यात आले होते, पण गुरुजी तालीमीमध्ये सत्यनारायण नव्हते घातले ...पुढे टिळकांनी अजुन दोन सुरू केले मण ...गणोशोत्सव सार्वजनीक झाला ...असो बासुंदीच्या कथा चालुच आहेत ...चितळे पेक्षा गणेश पेठेतील बासुंदी सदैव आवडत आलेलीच आहे ....खाण्यापिण्याची चंगळ असते डेक्कन चौपाटीला ..सध्या नदीला पाणी च पाणीच असल्याने फील ही चांगला येतो, आयडिया चेंज केल्यामुळे ..बाईक डेक्कन ला पार्क करुन लक्ष्मी रोडच्या दिशेने हल्ली दर्शन करत जातो ..स्वारगेट पर्यंत आणि म्ग येतान पुन्हा, कुंभारवाडा कॉर्पोरेशन करत परत येतो...रात्रभर डिजे जा गोंगाट ई. असतो हे ज्या गाढवाने सांगीतले त्याला आमच्या सांष्टांग दंडवत सांगा ...रात्री दहा नंतर अर्ध्या डेसिबल च्या वर आवाज जात नाही ...ज्यांनी रोषणाई केली त्यांची ती लायटिंग अगदी जवळ जावुन पहावी लागते ...यावर्षी पुर्ण आवाजात एकायची असेल तर सराफ बाजारात १० च्या आधी सराफांचाच अष्ट विनायक मित्र मंडळाचा फारिन वरुन मागविलेला संच नक्की बघुन या !! शिवाय टिंबर मार्केट ला कामगारांचा एक गणपती असतो ..तिथे रोज जेवण असते ..साधेच ..शाक , पुरी आणी मसाले भात ...उभ्या उभ्या खायला !! कसबेत शिरायच्या आधी कुभारवाडा गल्लीच्या शेवटच्या टोकाला, सात-तोटी हौद चौकातला एक नक्की बघा , दर वर्षी लांबलचक लाईन असते देखावा बघण्यासाठी ...किमा पंधरा ते वीस मिनीटे असतो आणि ठराविक संख्याच आत मध्ये सोडतात ...अजुन राहिलेतच ...घालेन भर हळु हळु ...कंसामध्ये एकदा गणेशौत्सवाविषयी लिहाव वाटत पुण्याच्या :) खायचं ठिक आहे ...पण प्यासा आणि सरगम दोन्ही एतिहासिक वास्तु रात्रभर ( पश्चिम दिशेच्या गेटवरुन ) उघड्या असते ..हेच काय ते दुर्दैव पुण्याचे !!

मानाचा गणपती म्हणजे खरेतर गणपती चा आणि मानाचा संबन्ध नाही. गणपती बसवणारी जी मंडळे आहेत त्यानी काही क्रमानुसार विसर्जन मिरवणूकीत सामिल व्हावे असे अभिप्रेत आहे. या क्रमात काही मंडळाना अगोदरचे क्रम दिले आहेत. कोत्या मनाची जनता या क्रमाला "मान" असे समजते. यात नक्की काय मान किंवा सन्मान मिळाला हे उमगत नाही. अर्थात पुण्यात कशाला काय म्हणतील हे साम्गता येत नाही. अवांतरः "नागझरी " असे सुंदर नाव ऐकुन काही पहायला जावे तर ते चक्क दारुवाला पुलाखालचे गटार निघावे अशा पुण्या ला काय म्हणावे?

In reply to by विजुभाऊ

कोत्या मनाची जनता या क्रमाला "मान" असे समजते.
यात कोतेपणा कुठे आला ते समजलं नाही.
यात नक्की काय मान किंवा सन्मान मिळाला हे उमगत नाही.
तुम्हाला समजलं नाही तर लगेच तो कोतेपणा???

In reply to by विजुभाऊ

अहो नागझरी नावाचा ओढाच होता तो काही शतका पूर्वी पर्यन्त. आता वाढत्या लोकसंख्ये च्या विळख्यामुळे नदीचेच गटार झाले आहे तिथे छोट्या नागझरी ची काय कथा. इथे पुण्यात कशाला काय म्हणतील असे म्हणायची काहीच गरज नाहॆ. हे पुण्यातच नवे तर थोड्याफार फरकाने बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये झाले आहे.

@ अनूप काका : डॉक्टरकडे जाताना अपॉईंटमेंट मिळाली याला जर एखादा मान किंवा सन्मान समजत असेल तर त्याला कोणत्या मनाचे म्हणावयचे ? केवळ विसर्जन लवकर करायला मिळणे हा मान आहे असे म्हणवत नाही. इतका क्षीण विचार करने हा कोतेपणाच झाला .त्यापेक्षा समाजकार्य केले म्हणून काही गौरव प्राप्त झाला तर त्याला "मान" म्हणणे हे योग्य ठरेल.

काय अडचण आहे ?? धाग्याला प्रतिसाद देताना अवांतर गप्पा मारू नयेत असं पत्रक छापून वाटू का सगळ्या मिपावाल्यांमध्ये ?? मै क्या बोल रहा है …तुम सब लोक क्या बोल रहा है …. पुणे के गणपती के बारे मे बोल रहा है मै…उसके दर्शन के बारे मे पुछ रहा है मै !!

In reply to by माम्लेदारचा पन्खा

धाग्याला प्रतिसाद देताना अवांतर गप्पा मारू नयेत असं पत्रक छापून वाटू का सगळ्या मिपावाल्यांमध्ये ??
पत्रकं फुकट जातील हो! :)

In reply to by किसन शिंदे

असं कसं असं कसं? कागदाचे विविध उपयोग कसे करावेत ह्याचा परामर्श (लई दिवसांनी वापरला बगा) घेतला जाईल की ह्याच्च धाग्यावर. ;)

मिपाकरांनी मनापासून केलेल्या सूचना आणि सल्ले लक्षात घेऊन आम्ही सरतेशेवटी कालच्या विकांताला पुण्यनगरीत पोहोचलोच ! शनिवारवाडा पाहून सुरुवात केली आणि कसबा पेठ , दगडूशेठ हलवाई ,गुरुजी तालीम, तुळशीबाग , तांबडी जोगेश्वरी , केसरीवाडा आणि त्याच बरोबर रस्त्यातले इतर मंडळांचे गणपती असे सगळ्या गणेशांचे दर्शन घेऊन जीवाचे पुणे केले. गर्दी अशी विशेष वाटली नाही कारण मुंबईमध्ये राहून यथायोग्य सराव झाला आहे. सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर दर्शनासाठी नसलेली कुठलीही आडकाठी मनाला सुखावून गेली. सगळ्या गणपतींचे मनसोक्त दर्शन घेऊन पुण्यनगरीत आल्याचे सार्थक झाले. पुण्याच्या ट्राफिक ने मात्र जीव नकोसा केला. सगळे गणपती झाल्यानंतर पोटपूजा ही उरकली आणि सगळ्यात शेवटी बाजीराव रस्त्यावर असलेल्या वाड्यात पुणे मनपाने आयोजित केलेलं पुनवडी ते पुण्यनगरी हे प्रदर्शनही पाहिलं आणि पुण्याचा संपूर्ण इतिहास जाणून घेतला. सगळ्या मिपाकरांचे मनापासून आभार !! आता दर वर्षी गणेशोत्सवासाठी पुण्याला फेरी मारायची ठरवलेली आहे !! गणपती बाप्पा मोरया !!