✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वर्धापन दिनाच्या मिपाला लै म्हणजे लै शुभेच्छा. :)

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Fri, 08/29/2014 - 10:24  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी. मंडळी मिपा आज आठव्या वर्षात पदार्पण करीत आहे आज हे एक सदस्य म्हणुन लिहितांना मिपाच्या चांगल्या वाईट गोष्टींचा साक्षीदार म्हणुन मला मनापासून अतिशय आनंद वाटत आहे. मिपाच्या समृद्ध अशा प्रवासात मी मिपाच्यासोबत या क्षणापर्यंत सोबत आहे, त्याचाही खुप आनंद वाटत आहे. मिपाच्या सुरवातीला गणेशचतुर्थीच्या रात्रीच्या बारा वाजता निरोप आला ’मास्तर, मिपा सुरु झालंय. लवकर आयडी घ्या आणि लिहा’ मंडळी गेल्या सात वर्षात क्वचितच मी मिपापासून दूर राहीलो असेल. जमेल तसं लिहिलं आपण लोकांनी प्रतिसाद दिला कौतुक केलं. प्रसंगी टीका केल्या, भांड्लो. मिपा म्हणजे माझ्या कुटुंबातला एक भाग झाला आणि मी मिपाच्या कुटुंबाचा. मिपानं मला अनेकदा मुड व्यवस्थित नसल्यावर लेखांच्या माध्यमातुन मानसिक आधार दिला. कधी खो खो हसवलं, कधी रडवलंही, कधी विचार करायला लावला, काही गोष्टी शिकवल्या, काही विसरायला लावल्या. आज असे अनेक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभे आहेत. मिपानं एक ओळख नसलेला मोठा मित्र परिवार दिला. कधी कोणाशी खूप बोलावं वाटलं. कधी कोणाच्या लेखनातला अनुभव आपला वाटला. माझे आणि मिपापरिवाराचं एक ऋणानुबंध निर्माण झाले. आभासी जगाशी फ़ारसा संबंध ठेवू नये, विश्वास टाकु नये, नेट डिसकनेक्ट केलं की संपलं, अस समजणारा मी मिपाच्या जगात रुमुन गेलो आहे. आणि आज खुप आनंदी आहे. मिपाचे ॠण व्यक्त करता येणे शक्य नाही. मिपासाठी उत्तम लिहिता यावं, उत्त्म ते वाचता यावं, कधी कडाक्याचं भांडण व्हावं, पुन्हा चलो यार गले मिलो अशी भावना उभी राहावी, वास्तव जगाबरोबर याही जगाची उत्त्म ओळख व्हावी, विचारांची देवाण-घेवाण व्हावी आणि मिपानं हे सर्व केलं आहे. मिपानं मला आजच्या क्षणापर्यंत जो लाखमोलाचा आनंद दिला आहे, त्या मिपा व्यवस्थापनाचा, संपादकांचा आणि सर्व मिपाकरांचा, वाचकांचा मी आभारी आहे, मिपाच्या पुढच्या वाटचालीला मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो. काय आपणही असाच विचार करता ? :)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23041 वाचन

💬 प्रतिसाद (88)

प्रतिक्रिया

मिपाला ८ व्या

प्रचेतस
Fri, 08/29/2014 - 10:32 नवीन
मिपाला ८ व्या वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. मिपाने जालीय मित्रांबरोबरच खर्‍या आयुष्यातही असंख्य मित्र मिळवून दिले. मिपाकरांसोबत बर्‍याच नवनवीन ठिकाणी भटकंती करता आल्या, उत्तम लेखन वाचता आले. मिपाचे खूप खूप आभार.
  • Log in or register to post comments

आभार...

चौकटराजा
Fri, 08/29/2014 - 10:39 नवीन
एका खंग्री माणसाला जरासे " मुक्त" व्यासपीठ हवे होते. तिथे सर्वानीच मुक्तपणे व्यक्त व्हावे असे स्थापकाना वाटत होते. आजही हे व्यासपीठ मुक्तच आहे. माणूस व जनावर यातील फरक विचारानी व्यक्त होणे हा आहे.प्राणीही आपला राग, प्रेम व्यक्त करीत असतो. आपणही तो व्यक्त करावा पण माणसाच्या पातळीला येऊन.हीच अपेक्षा वर्धापन दिनाच्या निमित्ताने.
  • Log in or register to post comments

+११

विलासराव
Fri, 08/29/2014 - 11:08 नवीन
+११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

वर्धापनदिनानिमित्त,

संजय क्षीरसागर
Fri, 08/29/2014 - 11:13 नवीन
मालक, टेक्निकल टीम आणि मंडळाला हार्दिक शुभेच्छा विथ धन्यवाद! Image removed. आणि मुलानं काल पूर्ण केललं हे पेंटींग
  • Log in or register to post comments

फार सुंदर..

गवि
Fri, 08/29/2014 - 11:39 नवीन
फार सुंदर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

छान पेंटिंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/29/2014 - 11:45 नवीन
व्वा ! क्या बात है. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मस्तच आहे चित्र. एक नंबर.

शिद
Fri, 08/29/2014 - 14:15 नवीन
मस्तच आहे चित्र. एक नंबर. *good*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अतिशय सुरेख पेंटींग. खूपच

यशोधरा
Fri, 08/29/2014 - 18:47 नवीन
अतिशय सुरेख पेंटींग. खूपच आवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सुंदर!

सुधीर
Fri, 08/29/2014 - 21:27 नवीन
लै शुभेच्छा. :) माझ्याही... माझ्यासारख्या वाचनमात्र मिपाकराला मिपानेच चार शब्द लिवायला, अभिव्यक्त व्हायला शिकीवलं. त्यामुळे मिपाचे आणि मिपाकरांचे ऋण कधीही न फिटणारे आहेत. मिपा उत्तरोत्तर प्रगती करो आणि मिपा परिवार वृद्धिंगत होहो ही मनापासूनची सदिच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अभिनंदन, धन्यवाद आणि पुढील

आतिवास
Fri, 08/29/2014 - 12:00 नवीन
अभिनंदन, धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

खरे म्हणजे..

धर्मराजमुटके
Fri, 08/29/2014 - 12:14 नवीन
खरे म्हणजे शुभेच्छा द्यायला किंवा एकूणच जास्त औपचारीक वागायला आवडत नाही. स्वतःच्या वाढदिवसाला कोणी शुभेच्छा दिल्या तरी अवघडायला होतं. ( काय करणार शिव्या खाल्ल्याशिवाय आम्हाला जमतच नाही ! ) मिपावर एवढी वर्ष पडीक आहे म्हणजे शुभेच्छा बाय डिफॉल्ट इन्क्लूड आहेतच. तरी पण लोकलाजेस्तव शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

शुभेच्छा..

चिगो
Fri, 08/29/2014 - 12:21 नवीन
मिपाला अनेकानेक शुभेच्छा आणि धन्यवाद.. लगे रहो, मिपा आणि मिपाकर्स.. संक्षींनी टाकलेलं चित्रही अत्यंत सुंदर आहे.. :-)
  • Log in or register to post comments

समस्त मिपाकरांना शुभेच्छा..

सुहास झेले
Fri, 08/29/2014 - 12:23 नवीन
समस्त मिपाकरांना शुभेच्छा...मिपा असेच बहरत राहो अशी श्री गजानना चरणी प्रार्थना :)
  • Log in or register to post comments

मिपा वर धागे काढण्या मजा काहि

अविनाशकुलकर्णी
Fri, 08/29/2014 - 12:35 नवीन
मिपा वर धागे काढण्या मजा काहि औरच आहे.. मी २०० धागे गुंफले मी. पा. वर.. फुल २ धमाल..किति उडाले ते आठवत नाहि..२०० मात्र राहिले
  • Log in or register to post comments

मिपा वर धागे काढण्या मजा काहि

अविनाशकुलकर्णी
Fri, 08/29/2014 - 12:36 नवीन
मिपा वर धागे काढण्या मजा काहि औरच आहे.. मी २०० धागे गुंफले मी. पा. वर.. फुल २ धमाल..किति उडाले ते आठवत नाहि..२०० मात्र राहिले....समस्त मिपाकरांना शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

हाहा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/29/2014 - 13:21 नवीन
काका, तब्यतीला सांभाळा किती दगदग कराल :) धागे किती उडाले पेक्षा राहिले किती...हा धागे राहिल्याचा ,जो आनंद आपल्या चेह-यावर दिसतो त्याचा शप्पथ मला हेवा वाटतो. -दिलीप बिरुटे (अविकाकांच्या मिपावारिल शिल्लक लेखनाचा फ्यान) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

धन्यवाद..बिरुटे साहेब

अविनाशकुलकर्णी
Fri, 08/29/2014 - 13:24 नवीन
धन्यवाद..बिरुटे साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपाला अनेकानेक शुभेच्छा आणि

विवेकपटाईत
Fri, 08/29/2014 - 12:36 नवीन
मिपाला अनेकानेक शुभेच्छा आणि धन्यवाद.. आमच्या सारख्या शेंकडो अज्ञानी लोकांना लेखकू बनविण्याचे मह्त्त कार्य मिपा असेच करत राहो ही अशा.
  • Log in or register to post comments

सहमत.

बबन ताम्बे
Fri, 08/29/2014 - 13:02 नवीन
मिपाला वर्धापन दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

अनेक शुभेच्छा

मधुरा देशपांडे
Fri, 08/29/2014 - 13:29 नवीन
अनेक शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

मिपाला ८ व्या

शिद
Fri, 08/29/2014 - 14:10 नवीन
मिपाला ८ व्या वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच श्री चरणी प्रार्थना. समस्त मिपाकरांना व त्यांच्या कुटूंबियांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. || गणपती बाप्पा मोरया ||
  • Log in or register to post comments

लक्षावधी शुभेच्छा

सस्नेह
Fri, 08/29/2014 - 15:02 नवीन
हे मुक्त माध्यम आम्हासारख्या कुणीच नसलेल्याना कुणीतरी बनवण्यासाठी असेच हजार वर्षे बहरत राहो !
  • Log in or register to post comments

मिपाला शुभेच्छा!!! तर्री अजून

बॅटमॅन
Fri, 08/29/2014 - 15:06 नवीन
मिपाला शुभेच्छा!!! तर्री अजून खंग्री होवो आणि मिपा कायमच राहो. आमीन!!!!
  • Log in or register to post comments

मिपाला,

मनीषा
Fri, 08/29/2014 - 15:10 नवीन
मनःपूर्वक शुभेच्छा ! ....आणि धन्यवाद
  • Log in or register to post comments

इथे डुंबण्यात मजा येते .

कंजूस
Fri, 08/29/2014 - 15:19 नवीन
इथे डुंबण्यात मजा येते .
  • Log in or register to post comments

सर्व मिपाकर तंत्रज्ञ,संपादक

मदनबाण
Fri, 08/29/2014 - 15:52 नवीन
सर्व मिपाकर तंत्रज्ञ,संपादक मंडळ आणि मिपाकर मंडळी यांचे अभिनंदन ! एका मराठी मंचावर इतक्या विविध क्षेत्रातली मंडळी एकत्र येउन सातत्याने विविध विषयांवर लिखाण करत आहेत,आणि सर्वांना आनंद देत आहेत. :) माझ्या पाहण्यात तरी इतका मुक्त-मोकळा आणि सुरेख मंच जालावर कुठेही उपलब्ध नाही. हा धागा पाहिल्यावर मी माझा सदस्य कालावधी पाहिला, ६ वर्ष ६ महिने... या काळात मिपा आणि मिपाकरांनी मला भरभरुन दिले, आणि त्या बद्धल मी मिपा आणि मिपाकरांचा मनःपूर्वक आभारी आहे. हा मंच असाच बहरलेला राहो आणि त्यात अनेक उत्तम मंडळींची भर पडो हीच सदिच्छा व्यक्त करतो. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Vigneshwara Ashtotra Shatanama
  • Log in or register to post comments

मि पा ला वर्धापनदिनाच्या

प्यारे१
Fri, 08/29/2014 - 16:14 नवीन
मि पा ला वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आज या ठिकानी मी सगळ्या मंडळांचे आभार ह्याठिकानी माणतो. मंडळांमध्ये संस्थापक मंडळ, सल्लागार मंडळ, संपादक मंडळ, कंपू मंडळ, अ‍ॅण्टीकंपू मंडळ, आण्टी मंडळ, मिपा मित्र मंडळ, मि पा डूख धरु मंडळ, माचिसमित्र मंडळ, तेल, तूप मित्रमंडळ, अवांतर मित्र मंडळ, भ्रमण मित्र मंडळ, खादाडी मित्रमंडळ, व्हॉट्सॅप, चेपु मित्र मंडळ, उगाच्च खवट्पणा मित्रमंडळ, उगाच्च विरोधक मित्र मंडळ, शुद्ध्लेखन (हे असंच ल्ह्यायचंय) आग्रहधरु मित्रमंडळ मिपाशेफ मित्र मंडळ, ह्या आनि अशाच अणेक मंडळांचा समावेश आहे. पुण्हा एकदा आभार्स. आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

शुद्ध्लेखन लेखाच्या

प्यारे१
Fri, 08/29/2014 - 16:39 नवीन
शुद्ध्लेखन लेखाच्या शीशर्काणुसार आहे ह्याची कृपया णोंद बिरुटे सरांनी घ्यावी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

+१...

मुक्त विहारि
Fri, 08/29/2014 - 21:09 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आणखी एक राहिलं

तुषार काळभोर
Sat, 08/30/2014 - 10:50 नवीन
अनाहिता मंडळ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आण्टी मंडळ लिहीलंय.

प्यारे१
Sat, 08/30/2014 - 14:57 नवीन
आण्टी मंडळ लिहीलंय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

मिपाला शुभेच्छा.. मिपाने

पिंगू
Fri, 08/29/2014 - 16:17 नवीन
मिपाला शुभेच्छा.. मिपाने कितीतरी मित्र दिले आणि मिपा माझ्या जालीय आयुष्यातील मोलाची गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments

मिपाला वर्धापनदिनानिमित्त

गोरख कालेकर
Fri, 08/29/2014 - 16:56 नवीन
मिपाला वर्धापनदिनानिमित्त हर्दिक शुभेच्छा...
  • Log in or register to post comments

सात वर्ष झाली मिपा चालु होऊन

एसमाळी
Fri, 08/29/2014 - 17:08 नवीन
सात वर्ष झाली मिपा चालु होऊन ? बराच उशीर केला मी येण्यास.असो मिपा परिवाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

मिपाला वर्धापनदिनाच्या भरपूर

किसन शिंदे
Fri, 08/29/2014 - 17:31 नवीन
मिपाला वर्धापनदिनाच्या भरपूर शुभेच्छा!! गेल्या चार वर्षात मिपाने असंख्य मित्र दिले, त्यातले काही अगदी सुख-दु:खाच्या गोष्टी वाटून घेण्याइतपत जीवाभावाचे झाले. त्याचबरोबर बर्‍याच वर्षांची गडकोट भटकंतीची मनातली सुप्त इच्छाही याच मित्रांच्या सोबतीने करायला मिळाली. थोडं काही गमावलं असेनही कदाचित पण खुप काही कमावलं आहे मिपाच्या सानिध्यात.
  • Log in or register to post comments

मिपाला वाढदिवसाच्या अनेकानेक

अजया
Fri, 08/29/2014 - 17:33 नवीन
मिपाला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.नुसतेच जालीय नाही तर जीवलग बनुन गेेलेल्या सख्या ही मिपाचीच देणगी.आपल्या माणसाचे आभार मानत नाहीत ,म्हणून आमचे वाचन विचार पाकृंसह जगणेच समृृध्द करणार्या मिपासाठी काय पन!!
  • Log in or register to post comments

मिपाला वर्धापनदिनाच्या भरपूर शुभेच्छा!!

दिपक.कुवेत
Fri, 08/29/2014 - 17:37 नवीन
खर्‍या अर्थाने ईथे बहरता येतं आणि लाख मोलाचं म्हणजे शाळा सुटल्यावर जी मराठि लिहायची सवय सुटलेली असते ती ईथे नुसतीच पुर्ण होत नाहि तर अवर्णनीय असा आनंद देउन जाते. मिपा असचं उत्तओरोत्तर बहरत राहो हिच सदिच्छा.
  • Log in or register to post comments

काथ्याकुटे रचिला पाया कट्टा झालासे कळस

कापूसकोन्ड्या
Fri, 08/29/2014 - 17:48 नवीन
मिपा एक मित्र आणि मी उपकृत आहे. काथ्याकुटे रचिला पाया कट्टा झालासे कळस मी २०१०/१०१२ मध्ये रियाध सौदी अरेबिया इथे नोकरीनिमित्त होतो. एकटा असताना त्या वाळवंटात मिपा साथीला होता. थोडेफार लेखन केले. पण वाचनच जास्त. झपाटून टाकणारे जयंतराव कुलकर्णी यांचे युद्ध पट पुन्हा पुन्हा वाचले. गवी चे ''मृत्यु लेख आणि भयकथा" अप्रतिम. गवीनी केलेले घुबडाचे बाळंतपण तर खूप एन्जॉय केले. यकूचे लेख पण 'सर्किट आणि सर्कॅस्टिक वाटायचे (सादात माँटो विषयी,आणि परिक्रमा. विश्वास ठेवा, यकु ची बातमी वाचून मी एकटा रियाध मध्ये खुप रडलो. कुणाचा कोण पण फक्त दोन चार वेळा चॅटिंग काय केले, तो आपला होउन गेला. अजुनही लिहिताना डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. असो पाककृती उल्लेखा करावाच लागेल.सोत्रीचे पेयप्रशन धरून पाककृती जर विदाउट फोतो असेल तर पहीले कल्ला 'फोटू' चा आणि शाहाकारी लोकांनी विचारलेले यात बटाटा...... घालू का? प्रावासवर्णन तर उत्तमच. (कित्येक प्रवासवर्णनातले फोटो माझ्या डेस्कटॉपवर विराजमान झाले.) आणि उत्कर्षबिंदू म्हणजे कट्टा. आणि त्यांचे फोटो. सर्वात अर्क म्हणजे चरच्ररीत मिसळीवरच 'कट किंवा तर्री' म्हणजे प्रतिसाद. तो कटकारस्थानातला कट पण आणि तर्री तला पण. अत्यंत आवश्यक. एक खोड अशी जडली की, सेलेब्रिटि लेखकांचे अपवाद वगळता मी तर प्रथम प्रतिसाद पाहतो. मिपा असेच दिवसेंदिवस प्रगती करो अशी त्या जगनियंत्याला प्रार्थना. सर्व संस्थापकांचे, सम्पादकांचे टेक्निशियन लोकांनी या लश्करच्या भाकरी भाजल्या बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अनेक शुभेच्छा

जुइ
Fri, 08/29/2014 - 18:12 नवीन
मिपाला अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments

सर्वप्रथम मिपाला वाढदिवसाच्या

क्रेझी
Fri, 08/29/2014 - 18:22 नवीन
सर्वप्रथम मिपाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुम जिओ हजारो साल..साल के दिन हो पचास हजार हीच गणपती बाप्पाकडे प्रार्थना. आजचा मिपाचा लोगो खुपच सुंदर आहे, अष्टविनायक आणि मिपाचे आठ विभाग ह्यांची कल्पक मांडणी आवडली.
  • Log in or register to post comments

आमच्या समस्त लातुरकडाकडन

जेपी
Fri, 08/29/2014 - 18:28 नवीन
आमच्या समस्त लातुरकडाकडन शुभेच्छा. जेपी फ्राम लातुर
  • Log in or register to post comments

मित्रा....

मुक्त विहारि
Fri, 08/29/2014 - 21:08 नवीन
आहेस कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

मिपाला अनेकानेक शुभेच्छा!

यशोधरा
Fri, 08/29/2014 - 18:47 नवीन
मिपाला अनेकानेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

मिपाला वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

बाबा पाटील
Fri, 08/29/2014 - 18:48 नवीन
पण मिपा मुळ मालक विसोबा खेचर उर्फ तात्या अभ्यंकर यांनाही कुणीतरी बोलवा रे.सध्या ते थोबाड पुस्तकावरील ओसरीमध्ये व्यस्त आहे.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

विकास
Fri, 08/29/2014 - 19:32 नवीन
मिपा आणि मिपाकरांना वर्धापनदिना निमित्त शुभेच्छा. मराठी मधे एक अतिशय सक्रीय सोशल मेडीयम तयार करून आणि त्यावर सातत्याने (न कंटाळता + वेळ काढून) काम करण्याबद्दल मालकांचे आभार!
  • Log in or register to post comments

धन्यवाद अन शुभेच्छा

पैसा
Fri, 08/29/2014 - 19:59 नवीन
मिपा अन मिपा परिवाराला धन्यवाद अन हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा ...

मूकवाचक
Fri, 08/29/2014 - 20:31 नवीन
मिपाला वर्धापन दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

हार्दिक शुभेच्छा

आयुर्हित
Fri, 08/29/2014 - 20:42 नवीन
मिपा आणि मिपाकरांना वर्धापनदिना निमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि समस्त मिपाकरांना व त्यांच्या कुटूंबियांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. || गणपती बाप्पा मोरया ||
  • Log in or register to post comments

मिपाला अनेकानेक शुभेच्छा!

मुक्त विहारि
Fri, 08/29/2014 - 21:09 नवीन
मिपा अन मिपा परिवाराला धन्यवाद अन हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

मिपाला वाढदिवसाच्या अनेकानेक

दशानन
Fri, 08/29/2014 - 21:13 नवीन
मिपाला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! माझ्या जालिय व व्यक्तिगत जीवनामध्ये मिपाबद्दल माझ्या मनात नेहमीच एक आदराचे स्थान होते व आहे. आज मी जो पण काही आहे, त्यात फार मोठा वाटा मिपाचा व मिपावरील सृह्द मित्रांचा आहे. अशीच प्रगती होत राहो!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा