Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 08/29/2014 - 10:24
नमस्कार मंडळी. मंडळी मिपा आज आठव्या वर्षात पदार्पण करीत आहे आज हे एक सदस्य म्हणुन लिहितांना मिपाच्या चांगल्या वाईट गोष्टींचा साक्षीदार म्हणुन मला मनापासून अतिशय आनंद वाटत आहे. मिपाच्या समृद्ध अशा प्रवासात मी मिपाच्यासोबत या क्षणापर्यंत सोबत आहे, त्याचाही खुप आनंद वाटत आहे. मिपाच्या सुरवातीला गणेशचतुर्थीच्या रात्रीच्या बारा वाजता निरोप आला ’मास्तर, मिपा सुरु झालंय. लवकर आयडी घ्या आणि लिहा’ मंडळी गेल्या सात वर्षात क्वचितच मी मिपापासून दूर राहीलो असेल. जमेल तसं लिहिलं आपण लोकांनी प्रतिसाद दिला कौतुक केलं. प्रसंगी टीका केल्या, भांड्लो. मिपा म्हणजे माझ्या कुटुंबातला एक भाग झाला आणि मी मिपाच्या कुटुंबाचा. मिपानं मला अनेकदा मुड व्यवस्थित नसल्यावर लेखांच्या माध्यमातुन मानसिक आधार दिला. कधी खो खो हसवलं, कधी रडवलंही, कधी विचार करायला लावला, काही गोष्टी शिकवल्या, काही विसरायला लावल्या. आज असे अनेक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभे आहेत. मिपानं एक ओळख नसलेला मोठा मित्र परिवार दिला. कधी कोणाशी खूप बोलावं वाटलं. कधी कोणाच्या लेखनातला अनुभव आपला वाटला. माझे आणि मिपापरिवाराचं एक ऋणानुबंध निर्माण झाले. आभासी जगाशी फ़ारसा संबंध ठेवू नये, विश्वास टाकु नये, नेट डिसकनेक्ट केलं की संपलं, अस समजणारा मी मिपाच्या जगात रुमुन गेलो आहे. आणि आज खुप आनंदी आहे. मिपाचे ॠण व्यक्त करता येणे शक्य नाही. मिपासाठी उत्तम लिहिता यावं, उत्त्म ते वाचता यावं, कधी कडाक्याचं भांडण व्हावं, पुन्हा चलो यार गले मिलो अशी भावना उभी राहावी, वास्तव जगाबरोबर याही जगाची उत्त्म ओळख व्हावी, विचारांची देवाण-घेवाण व्हावी आणि मिपानं हे सर्व केलं आहे. मिपानं मला आजच्या क्षणापर्यंत जो लाखमोलाचा आनंद दिला आहे, त्या मिपा व्यवस्थापनाचा, संपादकांचा आणि सर्व मिपाकरांचा, वाचकांचा मी आभारी आहे, मिपाच्या पुढच्या वाटचालीला मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो. काय आपणही असाच विचार करता ? :)
  • Log in or register to post comments
  • 23041 views

प्रतिक्रिया

Submitted by अनुप ढेरे on Fri, 08/29/2014 - 21:15

Permalink

वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!

वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Fri, 08/29/2014 - 22:05

Permalink

ला ला ला ला...

हे मिपा गेले बरेच दिवस माझी फोटोग्राफीवरील बडबड सहन करतेय त्याबद्दल धन्स हो मालक! :-) या गराड्यात मज्जा आहे हो तुमच्या... :-)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 08/29/2014 - 23:18

Permalink

मला व्यक्त होण्यास,सर्वाधिक

मला व्यक्त होण्यास,सर्वाधिक वाव दिलेल्या मि.पा.ला __/\__ Image removed. तसेच.. येथील सर्व आय.डी आणि आय.ड्यांना(सुद्धा! :D ) अनेकानेक धन्यवाद! लहानपणचा धुडगुस Image removed.घालायची मज्जा सर्वाधिक इथेच आहे*. Image removed. ============= *आणि स्मायल्या टाकण्याचिही Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Sat, 08/30/2014 - 01:50

Permalink

सर्व मिपा कुटुंबियांना

सर्व मिपा कुटुंबियांना शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sat, 08/30/2014 - 02:27

Permalink

आखाती प्रदेशात मराठी बोलणं,

आखाती प्रदेशात मराठी बोलणं, वाचणं आणि लिहीणं जवळ जवळ दुरापास्त असतानाच भाचीच्या सांगण्यावरून मनोगतावर दाखल झालो. मनोगताने मराठी लिहायला, वाचायला, संवाद प्रस्थापित करायला एक व्यासपिठ उपलब्ध करून दिले. तात्यांसारखा मित्र दिला. पुढे तात्या मनोगतातून बाहेर पडले आणि त्यांनी हे, मिसळपाव, संस्थळ सुरु केले. तात्यांच्या निमंत्रणानुसारच मिसळपाववर आलो आणि इथलाच होऊन गेलो. इथेही अनेक मित्र मिळाले. चांगले विचार वाचावयास, व्यक्त करण्यास मिळाले. तात्यांच्या 'लेखन-स्वातंत्र्याच्या वेडापायी' अनेकदा मिपाचा दर्जा घसरायचा, माझे ह्यावर तात्यांशी वाद व्हायचे पण तात्यांचा स्वतंत्र्य आग्रह आणि हे संस्थळ तात्यांच्या मालकीचे आहे हा माझा विचार मला नेहमीच माघार घ्यायला लावायचा. जे कांही लेखन मी इथे केलं त्याने मला स्वतःला समाधान दिलं आणि त्यासाठी मी तात्यांचा नेहमीच ऋणी राहीन. मालक निलकान्त, मिपाकर तंत्रज्ञ मंडळी, संपादक मंडळ आणि मिपाकर सदस्य ह्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा..! उद्याउठून माणूस चंद्रावर कायम वास्तव्यासाठी जाईलही,.... मी मिपावरच असेन.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 08/30/2014 - 05:42

In reply to आखाती प्रदेशात मराठी बोलणं, by प्रभाकर पेठकर

Permalink

मस्त !

>>>>>>उद्याउठून माणूस चंद्रावर कायम वास्तव्यासाठी जाईलही,.... मी मिपावरच असेन. क्या बात है ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Sat, 08/30/2014 - 06:35

Permalink

जय मिपा!!

मिपा... मित्रा... माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि मला आपलं म्हटल्याबद्दल अनेकानेक धन्स रे. आठाव्या वर्षात पदार्पण केलस. किती कोवळं वय तुझं. पण.. पण किती भारी प्रगल्भता... आणि ति सुद्धा किती अवखळ...एखादा तुफानी निर्झर जणु. असाच नांदत रहा मित्रा. तुला उदंड आयुष्य लाभो. तृषार्तांची तहान भागवायची तुझी शक्ती उदंड वृद्धींगत होवो. हॅप्पी बड्डे मित्रा...
  • Log in or register to post comments

Submitted by गौरव जमदाडे on Sat, 08/30/2014 - 11:05

Permalink

!!! सर्व मिपा परिवारास

!!! सर्व मिपा परिवारास वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

Submitted by रुमानी on Sat, 08/30/2014 - 11:33

Permalink

मिपाला वर्धापन दिनाच्या खुप

मिपाला वर्धापन दिनाच्या खुप खुप..शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on Sat, 08/30/2014 - 12:14

Permalink

मिपाला वर्धापन दिनाच्या अनेक

मिपाला वर्धापन दिनाच्या अनेक शुभेच्छा .!!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Sat, 08/30/2014 - 12:45

Permalink

वरीजनल पोस्ट करणार्‍याचे शब्द चोप्य पस्ते

मिपाचे ॠण व्यक्त करता येणे शक्य नाही. मिपासाठी उत्तम लिहिता यावं, उत्त्म ते वाचता यावं, कधी कडाक्याचं भांडण व्हावं, पुन्हा चलो यार गले मिलो अशी भावना उभी राहावी, वास्तव जगाबरोबर याही जगाची उत्त्म ओळख व्हावी, विचारांची देवाण-घेवाण व्हावी आणि मिपानं हे सर्व केलं आहे. मिपानं मला आजच्या क्षणापर्यंत जो लाखमोलाचा आनंद दिला आहे, त्या मिपा व्यवस्थापनाचा, संपादकांचा आणि सर्व मिपाकरांचा, वाचकांचा मी आभारी आहे, मिपाच्या पुढच्या वाटचालीला मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 08/30/2014 - 17:36

Permalink

+१+

उपरोक्त सर्वच धन्यवाद आणि शुभेच्छांना आमचा +१ + मिपाच्या अद्याप लिहीत्या न झालेल्या वाचकांकडूनही त्यांच्या आवडीच्या विषयाय लेख्न व्हावे हि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 08/30/2014 - 17:38

In reply to +१+ by माहितगार

Permalink

असे वाचावे

उपरोक्त सर्वच धन्यवाद आणि शुभेच्छांना आमचा +१ + मिपाच्या अद्याप लिहीत्या न झालेल्या वाचकांकडूनही त्यांच्या आवडीच्या विषयानुसार मिपावर उत्तरोत्तर अधीकाधीक लेखन व्हावे हि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिता ठाकूर on Sat, 08/30/2014 - 19:05

Permalink

मिपाला वर्धापन दिनानिमित्त

मिपाला वर्धापन दिनानिमित्त अनेकानेक शुभेछा!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 08/31/2014 - 01:17

Permalink

मिपाला ८ व्या

मिपाला ८ व्या वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा~! रोज मराठीत (व्हर्च्युअल) गफ्फा वाचायला आणि हाणायला यासारखे दुसरे मराठी संस्थळ नाही !!
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Sun, 08/31/2014 - 14:18

Permalink

जीवेत शरदः शतम

या निमित्ताने मिपाच्या जन्माचा आणि वाढीचा एक तक्ता नवीन मेम्ब्रांसाठी कोणी प्रकाशित करू शकेल काय? सं मं इकडे लक्ष देईल काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Sun, 08/31/2014 - 14:25

Permalink

वरच्या सगळ्यांशी सहमत.

वरच्या सगळ्यांशी सहमत. :) 'शुभेच्छा' हा इतका एकच शब्द मिसळपावबद्दलच्या भावना व्यक्त करायला पुरेसा नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पोटे on Sun, 08/31/2014 - 16:54

Permalink

.

छान
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on Mon, 09/01/2014 - 08:43

Permalink

!मि. पा. ला हार्दिक शुभेच्छा

!मि. पा. ला हार्दिक शुभेच्छा!

  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 09/01/2014 - 09:34

Permalink

मनःपूर्वक शुभेच्छा!!

मिपाबद्दलच्या भावना शब्दांत मांडणे कठीण आहे. हा वृक्ष असाच बहरत राहो व माझ्यासारख्या अनेकांना त्याची छत्रछाया मिळत राहो.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Mon, 09/01/2014 - 09:45

In reply to मनःपूर्वक शुभेच्छा!! by श्रीरंग_जोशी

Permalink

+१

मि.पा. ला हार्दिक शुभेच्छा. खरच... मिपाबद्दलच्या भावना शब्दांत मांडणे कठीण आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Mon, 09/01/2014 - 18:23

In reply to +१ by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

बुवांशी सहमत !!

बुवांशी सहमत !!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 09/01/2014 - 17:50

Permalink

बालिशपणा करायला, भांडायला,

बालिशपणा करायला, भांडायला, मनमोकळं बोलायला, भटकायला, माहित असलेलं सांगायला आणि नसलेलं माहित करुन घ्यायला...अशा अनेक गोष्टींसाठी मित्रमंडळ मिळालं ते इथंच. काळे आणि पांढरे येवढंच स्वभावविशेष समजणार्‍या माझ्यासारख्याला ग्रे शेड्स बघायला शिकता आलं ते इथंच!! कचाकचा भांडलो, धुडगूस घातला, देव जाणे काय काय केलं चार वर्षात...लिहायला बरंच आहे पण सुचतही नाही आणि थांबवतही नाहीये. असो, मिपा आणि त्यामुळे मिळालेल्या मित्रपरिवाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा आणि आभार!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार दिलीप जोशी on Mon, 09/01/2014 - 18:24

Permalink

खूप खुप शुभेच्छा

खूप खुप शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Tue, 09/02/2014 - 22:02

Permalink

आपल्या मिपा ला बहरत

आपल्या मिपा ला बहरत रहाण्यासाठी खूप शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

Submitted by केदार-मिसळपाव on Fri, 09/05/2014 - 19:33

Permalink

आमचे लाडके मिसळपाव

शुभेच्छा..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 09/05/2014 - 19:55

Permalink

खरे आभार तर नीलकांतचे....

मिपा अगदी व्यवस्थित चाललं पाहिजे यासाठी आपली व्यस्त नोकरी सांभाळून हा नसता उपद्याप मिपाचे मालक नीलकांतला सांभाळावा लागतो. आणि तेही हौस म्हणुन. अनेकदा मिपावर काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या की आम्ही नीलकांतला तो कोणत्या अवस्थेत आहे म्हणजे नोकरीच्या ठिकाणी व्यस्त आहे की आराम करतोय की वैयक्तिक कामात व्यस्त आहे ते सर्व विसरुन फोन करुन एसेमेस करुन परेशान करतो. मिपावर येरर आला आहे प्लीज पाहा आणि मिपा लवकर व्यवस्थित सुरु करा. मालकही न कंटाळता रिप्लाय करतात 'एका तासात करतो, काम सुरु आहे, स्प्याम आयडी, व्हायरस, दृपल येरर, ब्याकप, वेगवेगळ्या सुविधा अशा कितीतरी गोष्टी मालक सांगत असतात. खरं तर कारणं काहीही असोत आणि त्या अडचणी कितीही मोठ्या असोत मिपा सतत चालु असलं पाहिजे, असं आपल्याप्रमाणे मलाही वाटत असतं, तेव्हा आमचा हा त्रास सहन करुन वाचकांसाठी मिपा उपलब्ध करुन दिल्याबद्दल नीलकांतसेठचे मनापासून आभार. अरे हो, किरकोळ कामासाठी प्रशांतलाही आम्ही त्रास देतो. 'हे परिचयाचे आहेत यांचा आयडी अप्रुव्ह करा, अमुक करा आणि धमुक करा, असे म्हणुन प्रशांतलाही त्रास देत असतो तेव्हा प्रशांतसेठचेही मनःपूर्वक आभार. सदस्य येतील आणि जातीलही मिपा मात्र अव्याहत सर्वांसाठी सतत असेच बहरत असले पाहिजे. पुन्हा एकदा मिपाच्या दमदार वाटचालीला भरभरुन शुभेच्छा....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Sat, 09/06/2014 - 08:06

In reply to खरे आभार तर नीलकांतचे.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

आभार....

मालक, सर्व टेक्निकल सपोर्ट टीम, संपादक मंडळ, सर्व जुणे-जाणते आणि नवे-नेणते सदस्य, या सर्वांचे आभार... तुम्हा सर्वांमुळे या जीवाचा हापिसातला वेळ (आणि बॅण्डविड्थ) सार्थकी लागते... मिपा उत्तरोत्तर बहरत जावो.....
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 08/27/2025 - 22:43

Permalink

१९ वर्ष झाली...

मिपा मालक नीलकांत तंत्रज्ञ प्रशांत, संपादक, साहित्य संपादक, मिपाकर वाचक यांना मिपा वर्धापन दिनाच्या खुप खुप शुभेच्छा...! च्यायला म्हणता म्हणता मिपाबरोबर इथे आयुष्याची वीस वर्षाचा प्रवास. माय गॉड... मोठा काळ. लब यू & Thanks all मिपा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 08/28/2025 - 15:33

In reply to १९ वर्ष झाली... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on गुरुवार, 08/28/2025 - 23:10

In reply to १९ वर्ष झाली... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

कडक सॅल्यूट

मिपा हे एक चांगलं म्हणजे जिवंत संकेतस्थळ म्हणून खूप आवडते. माझेही सदस्यत्व जुने आहे. सर्व चमूला खूप धन्यवाद आणि शुभेच्छाही!
  • Log in or register to post comments

Submitted by उपाशी बोका on Fri, 08/29/2025 - 08:58

In reply to १९ वर्ष झाली... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

हॅप्पी बर्थडे मिपा...

'मिपा'ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणि हॉटेलात येणाऱ्या मिपा परिवारातील सर्व सदस्यांचे आभार.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 08/28/2025 - 20:01

Permalink

जियो...

हायला, इतकी वर्षे झाली? ह्याप्पी बर्डे मिपा. बघता बघता १३-१४ वर्षे झाली राव सदस्यत्त्वाला. मिपावर्धापन दिन आठवला की आठवतं तसं सुरुवातीला गणपती म्हणजे मिपावर मी केलेलं बॅनर असायचंच. किती बॅनर्स केली वर्धापनदिनाची कुणास ठाउक. नेमकी गणपतीत मला कामं असायची आणि हे बॅनर प्लस गणेश लेखमाला आणि लगेच दिवाळी अंकाचे कव्हर ही कामे नीलकांत कसे करुन घ्यायचा माझ्याकडून ही एक कथाच आहे. ऐन वेळेपर्यंत माझे काम तयार नसायचे. झाले के ते मेल कर मग नीलकांत,प्रशान्त जो कुणी असायचा उपलब्ध तो बिचारा पब्लिश करायचा. बिरुटे मास्तरांना मात्र काहीही केले मी त्याचे कौतुक असायचे. बाकी इतर कोणही असु दे, योग्य जागी दुर्लक्ष्याने मारणारा हा खमक्या माणूस कायम माझ्यामागे उभा असायचा. नीलकांताने तर कीती सांभाळून घेतलं त्याची मोजणीच नाही. असो. ते दिवस गेले. तेंव्हाचे मित्र संसार, नोकर्‍या, मुलेबाळे ह्यात गुंतली. आमचेही तसेच झाले. सोलापूरहून वेळ काढुन पुणे कट्ट्याला येणारा मी पुण्यात आल्यावर एकही कट्टा अटेंड करु शकलो नाही. बिका, वल्य्या, किसना, गणा, धन्या, वप्या, बॅट्या, सुडक्या, गुरुजी, पन्नास, गिर्जा, अन्या, गणेशा, मिका, पशा, नाखुकाका, बाप्या, नितीन, प्रसाद, प्रशांत गाढवे, (चौराकाका, तात्या, मोडक, यक्क्या आणि मोहिते कसं विसरायचं तुम्हाला :( )एकसे बढकर एक नग राव. कालपरवापर्यंत भेटायचे, बोलायचे, भांडायचे, चिडायचे, खायचे प्यायच्जे, निदान व्हाटसापवर तरी तोंड दाखवायचे. असो.... लै माणसे दिली राव मिपाने. मित्र पण दिले. काही कारण नसताना शत्रुत्व बाळगणारे दिले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही गोष्टीची एकच बाजू न बघता बाकी पैलू बघायचा दृष्टीकोन दिला. थ्यान्क्स अ लॉट मिपा आणि नीलकांता. जिओ....
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 08/28/2025 - 21:34

In reply to जियो... by अभ्या..

Permalink

मन की बाते अभ्याशेठ....

बिरुटे मास्तरांना मात्र काहीही केले मी त्याचे कौतुक असायचे.
अभ्याशेठ, कलाकाराच्या कलेवर आपलं पहिलं प्रेम. मीपाची लै चित्र तुम्ही काढली. लंबर एक कलाकारी त्यात होती. अक्षर कलाकारी, रंगसंगती, लै भारी. कलाकार ज्या आवडीने हे सगळं करतो ते आपल्याला लै आवडतं. कलेसाठी कला की जीवनासाठी कला हा फडके खांडेकरांनी घातलेला वाद निरर्थक नव्हता, हे मला कायम पटतं. एखादा कलाकार ज्या सौंदर्याला, विचाराला, अभिव्यक्त करतो त्या सर्व कलेचं आपल्याला लै कौतुक. आपली कलाकारी आवडायची. म्हणून ते कौतुक. मिपा संस्थापक म्हणायचे आपलं प्रेम जिल्बीवर आचा-याशी भांडण असले तरी चालतं. आपलं कधी भांडण झालं नाही, हे बरं झालं. 'अरे, घरोटा घरोटा, तुझ्यातून पडे पीठी. तसं तसं माझं गानं पोटातून येतं व्होटी' कसं येतं यार हे सगळं कलाकारांच्या ओठी त्याचं कायम कौतुक वाटतं. आपल्या दैनंदिन आयुष्यात ही सगळी कलाकार मंडळी रंग भरते, आपले दोन क्षण सुखाचे जातात. कोणी कविता करतं, त्यातल्या ओळी आपल्याला आवडतात. आपण त्याचे चाहते होतो. कोणी शायरी केली की त्या ओळी आपल्याला आवडतात. कोणी सुंदर कथा सांगितली की वाह असे सहजोद्गार बाहेर पडतात. सुंदर मैफिल असली की हात आपोआप दाद द्यायला वर येतात. कोणी महिलेनं अंगणात सुंदर रांगोळी काढलेली दिसली की चाललो आपण मागे मागे सॉरी म्हणजे त्या रांगोळीचं कौतुक वाटतं असं. तर, हल्ली अशा कलाकारांच्या प्रेमात पडायचं नाही असं मनोमन ठरवले आहे. आपण पडलो असे हे भोळेभाबडे. कलेचे रसिक. आपल्याला लोक हर्ट करतात. अर्थात आपले स्वभावही आता नीट राहिले नाहीत. आपण एखाद्या लेखकाचे चाहते असतो व्यक्तीगत त्याची विचारांची दुनियादारी आपले सुर जुळत नाहीत. आपण कोणाचे तरी फॅन असतो तो काही तरी वेगळा वाटायला लागतो. आपलं वय, आपली आवड-निवड वाढती वयपरत्वे इकडे-तिकडे व्हायला लागली आहे. जमत नै ये आता हे सगळं. अभ्याशेठ बसू एकदा गप्पा मारायला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Fri, 08/29/2025 - 11:55

Permalink

वर्धापन दिनाच्या मिपाला लै म्हणजे लैच शुभेच्छा...

यंदा गलेमा नसल्याने मिपाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा द्यायला आपले नेहमीचे धागारूपी हक्काचे ठिकाण उपलब्ध नव्हते पण ती कमतरता बिरुटे मास्तरांनी हा धागा वर आणून भरून काढली ह्यासाठी त्यांना विशेष धन्यवाद! अभ्या शेठनी सविस्तर प्रतिसाद लिहून ज्या प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यावर प्राडॉंनी दिलेल्या प्रतिसादातुन जवळपास माझ्याही मनातल्या सर्व भावना तंतोतंत व्यक्त झाल्याने मी अजून काय वेगळे लिहिणार म्हणा? काही बाबतीत ह्या दोघांशी माझे अगदी टोकाचे वैचारिक मतभेद असले तरी त्याचा आमच्यातल्या वैयक्तिक संबंधांवर काडीचाही परिणाम झाला नाही हे विशेष. वर अभ्याने म्हंटल्याप्रमाणे मी दिवाळी अंकांसाठी केलेल्या कामाचे इथे जाहीररीत्या आणि खाजगीत भरभरून कौतुक करण्यात प्राडॉंनी कधीच हात आखडता घेतला नाही आणि जेव्हा नवा नवा सदस्य बनलो होतो तेव्हा आणि नंतर मिपाच्या संपादकीय कामांत खारीचा वाटा उचलायला लागलो होतो तेव्हा कित्येक बाबतीत अभ्याने मला खूप मोलाचे मार्गदर्शन केले होते. गेली काही वर्षे अज्ञातवासात गेलेला अभ्या काही दिवसांपूर्वी पुन्हा सक्रिय झालेला पाहिल्यावर मनापासून आनंद झाला होता आणि लगेच त्याला व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेजही पाठवून दिला होता. तसा मी पण गेल्या सात-आठ महिन्यांपासून पुन्हा एक ब्रेक घेतलेला आहेच, आणि अधून मधून असे ब्रेक घेणे हे मिपा चालक, मालक, सदस्य, वाचक आणि मुख्य म्हणजे आपले स्वतःचे मनस्वास्थ्य सुदृढ राखण्यासाठी आत्यावश्यक असते अशी माझी आता ठाम धारणा झालेली आहे 😀 मिपावरचा सर्वात पहिला लेख लिहिणारे बिरुटे गुरुजी आणि अभ्या इतका जुना सदस्य नसलो तरी सुरुवातीला केवळ एक वाचक म्हणून वावरत असताना बरे-वाईट कसे का असेना पण लिहिते होण्याची प्रेरणा देणाऱ्या मिपाचे ऋण फेडणे मला ह्या जन्मात तरी शक्य होईल असे वाटत नाही 🙏 असो, पुन्हा एकदा मिपाला आणि मिपा चालक, मालक, सदस्य आणि वाचकांना वर्धापन दिनाच्या (काहीश्या विलंबाने) कोटी कोटी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 08/29/2025 - 12:46

Permalink

सुरुवातीची पावले

श्रीगणेशा ! संस्कृती.. पहिला लेख
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Fri, 08/29/2025 - 15:34

Permalink

मिपा चालक, मालक, वाहक, सदस्य

मिपा चालक, मालक, वाहक, सदस्य आणि वाचकांना वर्धापन दिनाच्या अनेकोत्तम शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 08/29/2025 - 19:17

Permalink

मिपावर मी साधारण, २०१७ नंतर

मिपावर मी साधारण, २०१७ नंतर आलो. काहीही गुगुलवर शोधले की त्याची चर्चा झालेली मिपावर मिळे! नी बंडखोर लेखन खूप होते. ही लोक आहेत कोण अशी चित्र विचित्र नावाची असा प्रश्न पडायचा! कॅप्टन जैक स्पॅरो, कैलासवासी सोन्याबापू, श्रीगुरुजी वगैरे अशी नावे दिसायची, एके दिवशी सहज बसल्या बसल्या सदस्य व्हा ह्यावर टिचकी दिली, नी मीपचा मेल आला सदस्यत्व मिळाल्याचा! तेव्हा पासून मिपा जगतात प्रवेश झाला नी मग काय भयंकर कुस्त्या, हाणामाऱ्या ह्याचा आनंद उपभोगला. :) ज्या मंडळाने स्वागत केले होते त्यांनीच दोन चार वेळा बाहेर काढले. :) पण परत आला नाही तो मिपाकर कसला? ;)
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com