मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(तमाशा)

धन्या · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रेरणा: गोंधळ साल्या तू बेवडा मारताना तुझे डोळे फार तांबारुन जातात सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो ----- गोठलेल्या पाण्यासारखी ती चिल्ड बीयर आणि जळमटं पकडलेल्या गंजलेल्या खिडकीतून दिसणारा तो बर्ड व्हॅलीचा तलाव... अरबी समुद्राचा आभास निर्माण करतो आणि सगळा लफडा होतो... सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो ----- साल्या तू बेवडा मारताना बघता बघता बसल्या जागी तरंगू लागतोस भरभर शिव्या बाहेर येतात बाजूचे बेवडे तुझ्याकडे पाहायला लागतात तुझ्या हेलकावे खाणार्‍या शरीराकडे पाहतात मग त्यांचाही डोलकर होतो, आणि सगळाच शिमगा आणि मग सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो ----- साल्या तू बेवडा मारताना माझा सगळाच नाईलाज असतो कधी अचानक एखादा काचेचा ग्लास हातातून सटकन निसटतो तर कधी टेबलावरच कलंडतो अशा रिकाम्या झालेल्या अवस्थेत चुकून बाजूला लक्ष गेले तर बाजूचे साले बेवडे... आपल्याकडे पाहून क्षद्मी हसत असतात तेव्हा तर माझी ब्याटरीच डाऊन होते मला लवकर बारमधून बाहेर पडायचे असते पण तू साल्या उठत नाहीस असा सगळा लोच्या होऊन बसतो... अन् मग सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो |- विसळलेला द्रवप्रेमी -| (एक ताजीच रचना, भंगार आहे जे जाणवल्यास मंडळ जबावदार नाही )

वाचने 3706 वाचनखूण प्रतिक्रिया 22

बाबो.. आरे धन्या काय रे हे!!
तो बर्ड व्हॅलीचा तलाव... अरबी समुद्राचा आभास निर्माण करतो आणि सगळा लफडा होतो... सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो
=)) खल्लास!! म्हणून मला मिपा आवडतं... अवांतरः कवितेचे विडंबन हे दारु आणि बेवड्यांचा उल्लेख झाल्याबिगर होऊच शकत नाही कां? आज एक मिपाकर असल्याची शरम वाटली. ;)

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

गवि Wed, 08/27/2014 - 14:38
अवांतरः कवितेचे विडंबन हे दारु आणि बेवड्यांचा उल्लेख झाल्याबिगर होऊच शकत नाही कां?
हो.. होऊ शकतं की. दारु नसेल तर वारा सरणे, अतिसार, एरंडेल इत्यादि चालतात. किंवा दारुमधे हे सर्व मिसळूनही चालतं.

एस Tue, 08/26/2014 - 16:59
इतका तमाशा होत असेल तर आपलं लिमिटमध्येच ठेवावं ना नेहमी !

In reply to by एस

धन्या Wed, 08/27/2014 - 12:50
मिपावर लिहिलेलं सारंच तुम्ही खरं मानता काय? तसं असेल तर जपून र्‍हावा. नाही तर एक दिवस आम्हाला कळायचं की तुम्हाला "स्व" गवसला आहे. ;)

In reply to by धन्या

एस Wed, 08/27/2014 - 15:19
कृपया बाब्बौ हे (का भौ?) असं (कंसांसकट) वाचावं. प्रतिसादाचं विडंबन करताना शीर्षकाचंही करायचं असतं हे घाईघाईत लक्षात आलं नव्हतं.

In reply to by प्रचेतस

सूड Tue, 08/26/2014 - 17:22
हो, पुराणकाळात चतुर असणारा मुरलीधर सद्यकाळी अंमळ भोळा झालाय म्हणा. त्यात त्याला काही महाभाग भेटले की मग काय कथा !! ;) पुण्यात 'खुन्या' मुरलीधराचं' देऊळही आहे, असं जाता जाता नमूद करतो.

कवितानागेश Wed, 08/27/2014 - 16:08
हे प्रकार नवीनच आहेत. dhabdhaba kaichyaakai Khuni panja .......... आजपर्यंत भूछत्री आणि कोडाईकॅनल हे प्रकार माहित होते.