(तमाशा)
लेखनविषय:
प्रेरणा: गोंधळ
साल्या तू बेवडा मारताना
तुझे डोळे फार तांबारुन जातात
सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो
-----
गोठलेल्या पाण्यासारखी ती चिल्ड बीयर
आणि जळमटं पकडलेल्या
गंजलेल्या खिडकीतून दिसणारा
तो बर्ड व्हॅलीचा तलाव...
अरबी समुद्राचा आभास निर्माण करतो
आणि सगळा लफडा होतो...
सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो
-----
साल्या तू बेवडा मारताना
बघता बघता बसल्या जागी तरंगू लागतोस
भरभर शिव्या बाहेर येतात
बाजूचे बेवडे तुझ्याकडे पाहायला लागतात
तुझ्या हेलकावे खाणार्या शरीराकडे पाहतात
मग त्यांचाही डोलकर होतो, आणि
सगळाच शिमगा आणि मग
सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो
-----
साल्या तू बेवडा मारताना
माझा सगळाच नाईलाज असतो
कधी अचानक एखादा काचेचा ग्लास
हातातून सटकन निसटतो
तर कधी टेबलावरच कलंडतो
अशा रिकाम्या झालेल्या अवस्थेत
चुकून बाजूला लक्ष गेले
तर बाजूचे साले बेवडे...
आपल्याकडे पाहून क्षद्मी हसत असतात
तेव्हा तर माझी ब्याटरीच डाऊन होते
मला लवकर बारमधून बाहेर पडायचे असते
पण तू साल्या उठत नाहीस
असा सगळा लोच्या होऊन बसतो...
अन् मग
सगळ्याचा कसा उगाचंच तमाशा होतो
|- विसळलेला द्रवप्रेमी -|
(एक ताजीच रचना, भंगार आहे जे जाणवल्यास मंडळ जबावदार नाही )
वाचने
3706
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
ताडी
In reply to ताडी by अन्या दातार
हे कच्ची ताडी काय प्रकर्ण आहे
In reply to हे कच्ची ताडी काय प्रकर्ण आहे by प्रचेतस
आत्मुस बुवांची अजरामर रचना
__/\__!!
In reply to __/\__!! by मिसळलेला काव्यप्रेमी
अवांतरः कवितेचे विडंबन हे
In reply to अवांतरः कवितेचे विडंबन हे by गवि
(No subject)
बाब्बौ
In reply to बाब्बौ by एस
बाब्बौ!
In reply to बाब्बौ! by पैसा
असं सगळंच कसं एकदम सोप्पं
In reply to बाब्बौ by एस
(No subject)
In reply to बाब्बौ by एस
मिपावर लिहिलेलं सारंच तुम्ही
In reply to मिपावर लिहिलेलं सारंच तुम्ही by धन्या
का भ्या घालतोस?
In reply to मिपावर लिहिलेलं सारंच तुम्ही by धन्या
स्वॉरी
फोन, मुरलीधर आणि एका मद्यपीचा
In reply to फोन, मुरलीधर आणि एका मद्यपीचा by प्रचेतस
हो, पुराणकाळात चतुर असणारा
In reply to हो, पुराणकाळात चतुर असणारा by सूड
कलीयुग हो कलीयुग.
In reply to फोन, मुरलीधर आणि एका मद्यपीचा by प्रचेतस
काय त्या दिव्य आठौणी!
अरेरे! वल्ली मुरलीधर कोण रे?
In reply to अरेरे! वल्ली मुरलीधर कोण रे? by प्यारे१
>> वल्ली मुरलीधर कोण रे?
In reply to अरेरे! वल्ली मुरलीधर कोण रे? by प्यारे१
खुन्या मुरलीधर !!
आपण त्यातले नाही, काहीच
काव्यातले