Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मुक्त विहारि on Sun, 08/24/2014 - 14:51
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
चौकशी
मदत
प्रिय मिपाकरांनो, मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की, माझ्या मुलाला इंजिनियरिंग साठी आकुर्डी इथल्या इंजिनियरिंग कॉलेजला प्रवेश मिळाला. सध्या तो जागेच्या शोधात आहे. आपल्या मिपाकरांपैकी कुणाकडे आकुर्डीला भाड्याने जागा उपलब्ध असेल तर फार उत्तम. बादवे, जमल्यास आकुर्डीतल्या घरगूती खानावळीची माहिती दिलीत तर फार उत्तम. आणि इंजिनीरिंगच्या क्लासेसची माहिती मिळाली तर फार उत्तम. कळावे लोभ आहेच, तो वाढावा... मुवि (सध्या मुक्काम पोस्ट यानबू उर्फ यानबिवली.)
  • Log in or register to post comments
  • 5143 views

प्रतिक्रिया

Submitted by विनोद१८ on Sun, 08/24/2014 - 16:02

Permalink

....अभिनंदन.....!!!

....अभिनंदन.....!!! तुमच्या चिरंजीवाचे.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 08/24/2014 - 17:39

Permalink

अभिनंदन ! चिरंजीवांचे व

अभिनंदन ! चिरंजीवांचे व त्याला पाठबळ देणार्‍या मातपित्यांचेही !!
  • Log in or register to post comments

Submitted by पोटे on Sun, 08/24/2014 - 20:36

Permalink

.

गुगलवर सर्च करा.. गावाचे नाव पेइंग गेस्ट रेंट असे शब्द टाकुन सर्च करा
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 08/24/2014 - 21:26

In reply to . by पोटे

Permalink

मान्य..

परंतू, आमच्या साठी मिपाकरांची मदत, गुगलपेक्षा जास्त विश्र्वासार्ह आहे. आम्हाला जिथे जावू तिथे उत्तम मिपाकर भेटतात आणि कुठल्याही परत-फेडीची अपेक्षा न ठेवता मदत पण करतात.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Sun, 08/24/2014 - 21:20

Permalink

म्ह्ण्जे आता ...

म्हण्जे आता चिंचवडला एक कट्टा होणार. मी भो,, मुवि साहेब " किंवा मुवि साहेबांची स्वारी येणार असे स्वागतपद्य गाणार ! जोक जाउ द्या ! आमच्या कडे एकदा पोराला पाठवा . बोलणे तरी होईल. पत्ता व्यनीत देतो.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Sun, 08/24/2014 - 21:48

In reply to म्ह्ण्जे आता ... by चौकटराजा

Permalink

हेच म्हणणार होतो!

चौरा = पिसीएमसी!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 08/24/2014 - 21:55

In reply to म्ह्ण्जे आता ... by चौकटराजा

Permalink

आमच्या सौ. तुम्हाला फोन करतीलच...

अणि तसेही आता पुढील कट्टे, चिचवड, आकुर्डी, ठाणे आणि डोंबिवली ह्या भागात नक्की होतील. तसाही ह्यावेळी ठाण्यातला कट्टा उरकून पुण्यात कट्टा करायचा बेत होताच. चिरंजीवाच्या अ‍ॅडमिशनमुळे, एकदम शिक्कामोर्तबच झाले. फक्त आता पुण्यातले मध्यवर्ती ठिकाण शोधा म्हणजे झाले. (पुण्यातले नक्की मध्यवर्ती ठिकाण कुठले? असा एखादा काथ्या-कुट करावा म्हणतो.) इतर पुणेकर ते नक्की करेपर्यंत आपण दोघे चिंचवड कट्टा नक्की करू या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sun, 08/24/2014 - 22:13

In reply to आमच्या सौ. तुम्हाला फोन करतीलच... by मुक्त विहारि

Permalink

स्वागत असो.

स्वागत असो. एडमिशन डी वाय आकुर्डी का? क्लासेसची माहिती मित्रांना विचारून सांगतोच.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sun, 08/24/2014 - 22:17

In reply to स्वागत असो. by प्रचेतस

Permalink

येस...

डी. वाय. पाटील
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Sun, 08/24/2014 - 21:48

Permalink

राहुल कुंभार 99219 71516

राहुल कुंभार 99219 71516 यांच्याशी सम्पर्क साधा. कदचित नामिनल कमिशन द्यावे लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Sun, 08/24/2014 - 22:17

Permalink

मु. वि. तुमचे आणि तुमच्या

मु. वि. तुमचे आणि तुमच्या चिरंजीवाचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 08/25/2014 - 07:38

Permalink

हाबिणंदन

हाबिणंदन :)
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 08/25/2014 - 08:50

Permalink

व्य नी करा.

आणि अभिनंदन
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Mon, 08/25/2014 - 09:44

Permalink

अभिनंदन !

आपले व आपल्या पाल्याचेही अभिनंदन! नशिबाने शेवटची एक कॉट शिल्लक आहे. व्यनि केला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 08/25/2014 - 10:22

In reply to अभिनंदन ! by आयुर्हित

Permalink

मुवि, काम झालं!

*i-m_so_happy*
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Mon, 08/25/2014 - 14:03

Permalink

माझ्या भावाने लावलेले क्लासेस

माझ्या भावाने लावलेले क्लासेस : मॅथ्स् (१,२,३)-मनोज चौधरी ग्राफिक्स- अरुणोदयकुमार मेकॅनिक्स- मनिष पासी हे सगळे क्लासेस पिंपरी चिंचवड इंजीनियरींग कॉलेजच्या जवळ ज्या ईमारती आहेत त्यांच्या दुकांनाच्या गाळ्यात होतात. त्या परिसरात विचारले तर कोणीही सांगेल. अ‍ॅडमिशन घ्यायची असेल तर आताच घाई करा म्हणजे पाहीजे त्या बॅचेस मिळतील. ग्राफिक्स- अरुणोदयकुमार उत्तम शिकवतो मेकॅनिक्स- मनिष पासी (स्टॅटिक्स उत्तम शिकवतो, डायनॅमिक्स नीट नाही, रादर डायनॅमिक्सचा अभ्यासक्रम संपवतच नाही पुर्ण फक्त प्रोजेक्टाइल मोशन शिकवतो): मेकॅनिक्सची इतकी भीती निर्माण केलेली आहे लोकांनी की बास. पासी लावला की मेकॅनिक्समधे पास होता येते अशी जाहीरात करतात. मॅथ्स् (१,२,३)-मनोज चौधरी, कसा शिकवतो माहीत नाही पण क्लास जोरात चालतो. वरील सर्व माहीती ४ वर्षापुर्वीची (माझ्या चुलत भावाच्या वेळची) आहे पण अजुनही तसेच असावे कारण ईकडुन तिकडुन हीच नावे कानावर येत असतात. पहिल्या वर्षाला शक्यतो हे तीन क्लासेसच लावतात बरेच जण खानावळी आणि राहण्याच्या जागेबद्दल माहीती नाही. अजुन काही माहीती हवी असेल तर जरुर कळवा.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 08/25/2014 - 14:10

Permalink

अभिनंदन सिनीयर आणि ज्युनियर

अभिनंदन सिनीयर आणि ज्युनियर मुवि दोघांचेही!! जागेबद्दल माहिती मिळाल्यास तसं कळवेनच..
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 08/26/2014 - 21:38

Permalink

सर्व मिपाकरांना मनापासून धन्यवाद...

"मदत मागा, मदत मिळेल" असे ऐकले होते. पण अनुभवले मात्र मिपावरच. संयुक्त अरब अमिरातीला, असतांना एक उत्तम मिपाकर मिळाला. यानबूला मिपाकर कोण आहेत का? हे शोधत होतो, तर डोंबोलीत असतांनाच एक मिपाकर मिळाला.आणि नंतर आम्ही दोघेही एकदम जिवलग मित्र झालो. त्या अनुभवामुळे, जेंव्हा मला समजले की, मुलाला आकुर्डीतल्या डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे.तेंव्हा इतर कुठेही मदत न मागता, मिपाकरांनाच मदत मागावी असा विचार मनामध्ये आला. आणि माझा हा मिपाकरांवरील विश्र्वास सार्थ ठरला. आकुर्डीतही काही मिपाकर आहेत हे ज्ञान पण झाले. मी इकडे माहिती आणि मदत मिळवत असतांना आमच्या मुलाने, परस्परच, जागा आणि खानावळ दोन्ही शोधून काढले.(आयला, ही नविन पिढी भलतीच स्मार्ट आहे.) असो, थोडक्यात काय? तर मुलगा आता आकुर्डीकर झाला आहे.माझ्या वर जसे प्रेम करता, मला जसे समजून घेता, तसेच प्रेम आणि विश्र्वास राहू द्या. जाता जाता, मध्यवर्ती ठिकाणाचा माझा शोध संपला आहे. खरा मिपाकर जिथे असतो तिथेच मध्यवर्ती ठिकाण सुरु होते.मग तो मिपाकर यानबूत असू दे किंवा झुमरीतलैय्याला असू दे. इतके लिहून मी आता, इतर लेखांचा आस्वाद घ्यायला जातो. बादवे, क्रुपया माझे अभिनंदन करू नका.मुलाने स्वतःचे मार्क्स स्वतः मिळवले आणि स्वतःची खाण्याची व राहण्याची सोय स्वतःची स्वतःच केली.एक पालक म्ह्णून, मला माझ्या मुलाचा अभिमान वाटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय मिपा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 08/26/2014 - 21:47

In reply to सर्व मिपाकरांना मनापासून धन्यवाद... by मुक्त विहारि

Permalink

तुमच्या चिरंजीवांचे अभिनंदन

शैक्षणिक यशासाठी या सर्व कामगिरीसाठी तुमच्या चिरंजीवांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com