आपलं टोकीज म्हणून मिरवणाऱ्या झीनं आता अक्षरशः डोक्याची मंडई करायला सुरुवात केलेली आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन हे चायनल सुरु करण्यात आले ते खूप छान वाटले होते. सुरुवातीला बरे वाटलेले सिनेमे दाखवून "ह्यांनी मराठीच्या पुनरुत्थानासाठी फार चांगली सुरुवात केली " असे म्हणणार होतोच पण तेवढ्यातच "प्रेक्षकांनी चायनलबद्दल असा काही विचार देखील मनात आणणे पाप आहे" असा ग्रह करून घेतलेल्या झीने स्वताच्या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ करायला सुरुवात केली आहे. काही ठराविक सिनेमे पुन्हा पुन्हा झळकू लागले पण एकदा चुकला तर परत लागतो म्हणून आम्ही आनंदाने ते स्वीकारले.
त्यानंतर झीनं आपल्याच झालेल्या गतवर्षीच्या पुरस्कार सोहळ्याचे पुनःप्रक्षेपण सुरु केले . पुनःप्रत्ययाचा आनंद म्हणून आम्ही सुरुवातीला ते पहिलेही पण त्याच त्याच कार्यक्रमाच्या विनोदांवर हसू ही येईना हो …मग हळूहळू ह्याच आणि अश्याच कार्यक्रमांचे रेलचेल सुरु झाली. दिवसाच्या वेळापत्रकात एक तरी पुरस्कार सोहळा नित्यनेमाने दिसू लागला. दिवसाच्या वेळापत्रकाप्रमाणे झीनं ५ मराठी सिनेमे दाखवणे अपेक्षित होते. मराठी सिनेमा हे कुबेराच्या खजिन्यासारखे आहेत. रोज कितीही पाहिले तरी संपणार नाहीत एवढे विषय आणि कलाकृती आहेत त्यात…पुरस्कार सोहळा घुसवल्यामुळे आपसूकच काही सिनेमे बाद करण्यात आले. कवटी तेव्हाच सरकली होती पण म्हटले जाऊ दे … नंतर त्यांना त्यांची चूक उमजेल. पण झाले उलटेच…. दिवसेंदिवस झीनं मनमानी सुरूच ठेवली. काही ठराविक, रटाळ आणि साचेबद्ध सिनेमे परत परत दाखवायला लागले जणू काही प्रेक्षकांनीच त्यांना तशी गळ घातली असावी. हे चित्रपट असे आहेत कि त्यांचे निर्माते, दिग्दर्शक आणि त्यात काम करणारे कलाकार हे सुद्धा परत तो चित्रपट पाहण्याचे धाडस करणार नाहीत (सूज्ञ वाचकांच्या मनात एव्हाना त्या चित्रपटांची यादी केव्हाच घोळायला लागली असेल तेव्हा नमनाला घडाभर तेल नकोच !!)
तर असे हे सिनेमे पाहून पाहून मेंदूची कल्हई निघायला लागली. रात्रंदिवस घातलेला हा रतीब पाहून मन पार विटून गेलं होतं…. तशातच सध्याचे जिथे तिथे घुसणारे आणि अभिनय करणारे "दाक्षिणात्य" नटसम्राट यांच्या नवीन कार्यक्रमाच्या प्रोमोमुळे वठलेल्या मनाला नवीन पालवी फुटली. आशेचा एक धूसर किरण दिसू लागला. वाटलं की आपली मागणी देवामार्फत झीच्या अधिकाऱ्यांच्या मेंदूपर्यंत पोचली असावी पण कसचे काय…. ह्यावेळी काय घेऊन आले तर "सौधींडीयन" भाषेतले डब म्हणजेच भाषांतरित केलेले मराठी सिनेमे जे इतर टुकार चायनल आधीच भरमसाट वेळा दाखवत आहेत तेच मराठी माणसांच्या गळ्यात मारणे सुरु झाले आहे. आता मी शब्दबंबाळ न होता एकच थेट प्रश्न विचारू इच्छितो…. इतके चांगले आणि वैविध्यपूर्ण मराठी सिनेमे जे तुम्ही अजून ही दाखवायची तसदी घेतली नाहीत ते मेले होते का जे आम्ही आता "रुद्रादेवी", "आर्य एक प्रेमवीर" असले टुकार सिनेमे पहायचे? त्यातले काही चांगले असतीलही पण आता तो विषयच नाही.विषय असा आहे की झीने ते आमच्या माथी आम्हाला न विचारता का मारावेत ? इथे राग प्रेक्षकांना गृहीत धरण्याचा आहे. मराठी चित्रपटांना कल्पनादारिद्र्य आलंय का? आजही असे कितीतरी छान मराठी चित्रपट आहेत ज्यांना पुरस्कार मिळालेला आम्ही सोहळ्यात पाहतो पण ते आमच्यापर्यंत कधी पोचतच नाहीत. झीला जर मराठीचा खरच कैवार घ्यायचा असेल तर त्यांनी असे चित्रपट मराठी माणसांपर्यंत पोचवावेत आणि आपल्या मराठीपणाचा दाखला द्यावा आणि सौधींडीयन तमाशे ताबडतोब बंद करावेत !! असले टुकार उद्योग करायला इतर चायनल आहेत…झीने तो कित्ता गिरवण्याची गरजच काय ? तेव्हा झी …. वेळीच जागे व्हा ……अन्यथा तुमची टाळेबंदी व्हायचा दिवस फार लांब नाही.
वाचने
30631
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यांचा धंदा आहे तो. त्यांनी
जळी स्थळी काष्ठी पाषाणी
In reply to त्यांचा धंदा आहे तो. त्यांनी by धन्या
हरकत नाही. फक्त मोकळ्या जागेत
In reply to जळी स्थळी काष्ठी पाषाणी by माम्लेदारचा पन्खा
"सौधींडीयन" भाषेतले डब
+१
In reply to "सौधींडीयन" भाषेतले डब by आदूबाळ
इंग्रजी सिनेमे पण डब करून
In reply to "सौधींडीयन" भाषेतले डब by आदूबाळ
मला "ओशन्स १२" मराठी पाहुन
In reply to इंग्रजी सिनेमे पण डब करून by सुहास झेले
==))
In reply to मला "ओशन्स १२" मराठी पाहुन by कैलासवासी सोन्याबापु
पंखा शेठ , सध्या प्रत्येक
In reply to "सौधींडीयन" भाषेतले डब by आदूबाळ
शेवटी आईने मला काल की परवा एक
चक्क अर्धा एपिसोड पाह्यलात
In reply to शेवटी आईने मला काल की परवा एक by रेवती
हेच ते! तुझा अंदाज असा
In reply to चक्क अर्धा एपिसोड पाह्यलात by सूड
खी: खी: खी:
In reply to शेवटी आईने मला काल की परवा एक by रेवती
अगदी हेच! त्या जानूच्या
In reply to खी: खी: खी: by नंदन
च्च....
In reply to अगदी हेच! त्या जानूच्या by रेवती
ठ्ठो अचूक पकडलेत हो
In reply to च्च.... by प्रभाकर पेठकर
उपरोधानं लिहीलं असेल हो,
In reply to च्च.... by प्रभाकर पेठकर
'झिरो' ही सुद्धा फिगरच आहे
In reply to च्च.... by प्रभाकर पेठकर
आपल्याला वर्कआऊट करायला
In reply to 'झिरो' ही सुद्धा फिगरच आहे by प्यारे१
अगदी!
In reply to आपल्याला वर्कआऊट करायला by सूड
त्यावरून तो क्वोट आठवला-
In reply to 'झिरो' ही सुद्धा फिगरच आहे by प्यारे१
अहो काका, काय हे? त्या सूडने
In reply to च्च.... by प्रभाकर पेठकर
दुर्दैवाने मी आहे.
In reply to अहो काका, काय हे? त्या सूडने by रेवती
मागणी तसा पुरवठा.
माज्याकडं टीवीच नाय !!!!!
आयला...
+१
In reply to आयला... by मुक्त विहारि
+ १
In reply to +१ by पिलीयन रायडर
बरोबर आहे तुमचं
In reply to आयला... by मुक्त विहारि
किती सिनेमे हवेत?
In reply to बरोबर आहे तुमचं by माम्लेदारचा पन्खा
मी आणेन कट्ट्याला आलो की
In reply to किती सिनेमे हवेत? by मुक्त विहारि
काय आणशील?
In reply to मी आणेन कट्ट्याला आलो की by टवाळ कार्टा
हार्ड डिस्क आणेन...व्हायरस
In reply to काय आणशील? by मुक्त विहारि
ये हुई काम की बात ।
झीचा दर्जाच खालावलाय सगळ्या
कोण
डब करणार्या आणी भाषांतर करणार्यांसाठी रोजगार हमी योजना !
>>> निर्मात्यांच्या घरी जाऊन
एकेकाळी चवळीच्या शेंगा
In reply to >>> निर्मात्यांच्या घरी जाऊन by प्यारे१
भरताड
In reply to >>> निर्मात्यांच्या घरी जाऊन by प्यारे१
कोट्याधीश नंदन. _____/\___
In reply to भरताड by नंदन
ह्म्म्म
In reply to >>> निर्मात्यांच्या घरी जाऊन by प्यारे१
ज्यायला
In reply to ह्म्म्म by इरसाल
हा रटाळ्पणा थांबवण्यासाठी दुसरे काय करावे ?
In reply to >>> निर्मात्यांच्या घरी जाऊन by प्यारे१
वा...
In reply to हा रटाळ्पणा थांबवण्यासाठी दुसरे काय करावे ? by सामान्यनागरिक
हा प्रतिसाद या धाग्यासोबत छान
In reply to वा... by धन्या
हे काय चाल्लंय समजून
In reply to हा प्रतिसाद या धाग्यासोबत छान by सूड
हिंदीतून मराठीत डब झालेल्या
In reply to हे काय चाल्लंय समजून by आदूबाळ
अशा जाहीराती पाहण्यापूर्वी
In reply to हिंदीतून मराठीत डब झालेल्या by सूड
आमच्या ऑफिसातील एका फटाकडीला
In reply to अशा जाहीराती पाहण्यापूर्वी by धन्या
येस्स!
In reply to हा रटाळ्पणा थांबवण्यासाठी दुसरे काय करावे ? by सामान्यनागरिक
झुंज मराठमोळी नावाचा टुकार शो...
In reply to हा रटाळ्पणा थांबवण्यासाठी दुसरे काय करावे ? by सामान्यनागरिक
अहो प्यारे१जी, राखलेली फिगर
In reply to >>> निर्मात्यांच्या घरी जाऊन by प्यारे१
बाळसं बाळगून असलेल्यांच्या
In reply to अहो प्यारे१जी, राखलेली फिगर by रेवती
युट्युबवर बघा
वेळीच जागे व्हा ……अन्यथा तुमची टाळेबंदी व्हायचा दिवस फार लांब ना
भोजपुरी सिनेमा डब करुन दाखवत
In reply to वेळीच जागे व्हा ……अन्यथा तुमची टाळेबंदी व्हायचा दिवस फार लांब ना by NiluMP
लूक
In reply to वेळीच जागे व्हा ……अन्यथा तुमची टाळेबंदी व्हायचा दिवस फार लांब ना by NiluMP
मराठीचे गुणगान गाण्यासाठी झी
In reply to वेळीच जागे व्हा ……अन्यथा तुमची टाळेबंदी व्हायचा दिवस फार लांब ना by NiluMP
ते म्हागुरु डोक्यात जातात...
In reply to मराठीचे गुणगान गाण्यासाठी झी by धन्या
की जेव्हा
In reply to वेळीच जागे व्हा ……अन्यथा तुमची टाळेबंदी व्हायचा दिवस फार लांब ना by NiluMP
>>ही प्रति़क्रिया एखाद्या
In reply to की जेव्हा by काळा पहाड
सूडजी, हा प्रकार इकडेही काही
In reply to >>ही प्रति़क्रिया एखाद्या by सूड
>>सूडजी, हा प्रकार इकडेही
In reply to सूडजी, हा प्रकार इकडेही काही by धन्या
काय रे
In reply to >>सूडजी, हा प्रकार इकडेही by सूड
पूर्वी मी बैटमैन चा पंखा होतो
In reply to काय रे by पैसा
निलुशेठ, सहमत आहे तुमच्याशी.
In reply to वेळीच जागे व्हा ……अन्यथा तुमची टाळेबंदी व्हायचा दिवस फार लांब ना by NiluMP
लय भारी असतात.
जुन्या आणि नवीन चित्रपटांची वानवा
हल्ली टीव्हीवर जाहिराती सगळा पडदा व्यापतात !