आपलं टोकीज म्हणून मिरवणाऱ्या झीनं आता अक्षरशः डोक्याची मंडई करायला सुरुवात केलेली आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन हे चायनल सुरु करण्यात आले ते खूप छान वाटले होते. सुरुवातीला बरे वाटलेले सिनेमे दाखवून "ह्यांनी मराठीच्या पुनरुत्थानासाठी फार चांगली सुरुवात केली " असे म्हणणार होतोच पण तेवढ्यातच "प्रेक्षकांनी चायनलबद्दल असा काही विचार देखील मनात आणणे पाप आहे" असा ग्रह करून घेतलेल्या झीने स्वताच्या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ करायला सुरुवात केली आहे. काही ठराविक सिनेमे पुन्हा पुन्हा झळकू लागले पण एकदा चुकला तर परत लागतो म्हणून आम्ही आनंदाने ते स्वीकारले.
त्यानंतर झीनं आपल्याच झालेल्या गतवर्षीच्या पुरस्कार सोहळ्याचे पुनःप्रक्षेपण सुरु केले . पुनःप्रत्ययाचा आनंद म्हणून आम्ही सुरुवातीला ते पहिलेही पण त्याच त्याच कार्यक्रमाच्या विनोदांवर हसू ही येईना हो …मग हळूहळू ह्याच आणि अश्याच कार्यक्रमांचे रेलचेल सुरु झाली. दिवसाच्या वेळापत्रकात एक तरी पुरस्कार सोहळा नित्यनेमाने दिसू लागला. दिवसाच्या वेळापत्रकाप्रमाणे झीनं ५ मराठी सिनेमे दाखवणे अपेक्षित होते. मराठी सिनेमा हे कुबेराच्या खजिन्यासारखे आहेत. रोज कितीही पाहिले तरी संपणार नाहीत एवढे विषय आणि कलाकृती आहेत त्यात…पुरस्कार सोहळा घुसवल्यामुळे आपसूकच काही सिनेमे बाद करण्यात आले. कवटी तेव्हाच सरकली होती पण म्हटले जाऊ दे … नंतर त्यांना त्यांची चूक उमजेल. पण झाले उलटेच…. दिवसेंदिवस झीनं मनमानी सुरूच ठेवली. काही ठराविक, रटाळ आणि साचेबद्ध सिनेमे परत परत दाखवायला लागले जणू काही प्रेक्षकांनीच त्यांना तशी गळ घातली असावी. हे चित्रपट असे आहेत कि त्यांचे निर्माते, दिग्दर्शक आणि त्यात काम करणारे कलाकार हे सुद्धा परत तो चित्रपट पाहण्याचे धाडस करणार नाहीत (सूज्ञ वाचकांच्या मनात एव्हाना त्या चित्रपटांची यादी केव्हाच घोळायला लागली असेल तेव्हा नमनाला घडाभर तेल नकोच !!)
तर असे हे सिनेमे पाहून पाहून मेंदूची कल्हई निघायला लागली. रात्रंदिवस घातलेला हा रतीब पाहून मन पार विटून गेलं होतं…. तशातच सध्याचे जिथे तिथे घुसणारे आणि अभिनय करणारे "दाक्षिणात्य" नटसम्राट यांच्या नवीन कार्यक्रमाच्या प्रोमोमुळे वठलेल्या मनाला नवीन पालवी फुटली. आशेचा एक धूसर किरण दिसू लागला. वाटलं की आपली मागणी देवामार्फत झीच्या अधिकाऱ्यांच्या मेंदूपर्यंत पोचली असावी पण कसचे काय…. ह्यावेळी काय घेऊन आले तर "सौधींडीयन" भाषेतले डब म्हणजेच भाषांतरित केलेले मराठी सिनेमे जे इतर टुकार चायनल आधीच भरमसाट वेळा दाखवत आहेत तेच मराठी माणसांच्या गळ्यात मारणे सुरु झाले आहे. आता मी शब्दबंबाळ न होता एकच थेट प्रश्न विचारू इच्छितो…. इतके चांगले आणि वैविध्यपूर्ण मराठी सिनेमे जे तुम्ही अजून ही दाखवायची तसदी घेतली नाहीत ते मेले होते का जे आम्ही आता "रुद्रादेवी", "आर्य एक प्रेमवीर" असले टुकार सिनेमे पहायचे? त्यातले काही चांगले असतीलही पण आता तो विषयच नाही.विषय असा आहे की झीने ते आमच्या माथी आम्हाला न विचारता का मारावेत ? इथे राग प्रेक्षकांना गृहीत धरण्याचा आहे. मराठी चित्रपटांना कल्पनादारिद्र्य आलंय का? आजही असे कितीतरी छान मराठी चित्रपट आहेत ज्यांना पुरस्कार मिळालेला आम्ही सोहळ्यात पाहतो पण ते आमच्यापर्यंत कधी पोचतच नाहीत. झीला जर मराठीचा खरच कैवार घ्यायचा असेल तर त्यांनी असे चित्रपट मराठी माणसांपर्यंत पोचवावेत आणि आपल्या मराठीपणाचा दाखला द्यावा आणि सौधींडीयन तमाशे ताबडतोब बंद करावेत !! असले टुकार उद्योग करायला इतर चायनल आहेत…झीने तो कित्ता गिरवण्याची गरजच काय ? तेव्हा झी …. वेळीच जागे व्हा ……अन्यथा तुमची टाळेबंदी व्हायचा दिवस फार लांब नाही.
वाचने
30631
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
जाहिराती…
सिंपल लॉजिक आहे
काही कारणे
धाग्याचा धबधबा झाला
अहो लोकांना आताशा कुठल्याही
>>बायड्यांबरोबर घरोघरातल्या
In reply to अहो लोकांना आताशा कुठल्याही by प्रमोद देर्देकर
तीव्र सहमती!
In reply to >>बायड्यांबरोबर घरोघरातल्या by सूड
हाहाहा...सहमत.
In reply to >>बायड्यांबरोबर घरोघरातल्या by सूड
>>बिअर बेली वाला
In reply to हाहाहा...सहमत. by शिद
बीयरची बी तरी खाल्लीय का
In reply to >>बिअर बेली वाला by सूड
>>बीयरची बी तरी खाल्लीय का
In reply to बीयरची बी तरी खाल्लीय का by धन्या
पुरुषांचे घेर
In reply to >>बायड्यांबरोबर घरोघरातल्या by सूड
कित्ती कित्ती सुंदर...
In reply to पुरुषांचे घेर by मित्रहो
आ हा हा!