Skip to main content

बेबी

लेखक mohite jeevan यांनी शनिवार, 16/08/2014 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
'हँलो,कोण आहे?कोणी बोलत का नाही?कोण आहे तेथे?', कोणीतरी लपल्यासारखे तीला वाटत होते, पण ती त्या दरवाज्याजवळ जाण्याचे धाडस करु शकत नव्हती.कारण त्याची तीला भिती वाटत होती.तो येणार व लहान पणाच्या आठवणी काढुण मला त्रास देणार व मी वेड्यासारखी करणार, रात्रीची वेळ कशी तरी काढत होती. जस जसे त्या दरवाजाचा आवाज वाढत होता,तसे ती जोरात ओरडली, 'नाही....नाही.......सोड मला माझ्या डोक्यातुन दुर जा,' डोळे मिटवले......तीला त्या बंद डोळ्यामागच्या आधांराची सवय झाली होती बहुतेक....हळु हळु तीच्या कानात आवाज येऊ लागला, 'बेबी, कम बेबी, मी तुला आझाद करेन, तुला मुक्ती देईन, मी सांगतो ते तु कर,' हे एकताच तीने आपले जोरात कान ही बंद केले, सर्वत्र कशी शांतता वाटत होती तीला, कान डोळे बंद, फक्त श्वास चालु होता तो ही जोर जोरात, का नाही तो ही बंद होईल आज ना उद्या, किवा या क्षणाला? हळुवार तीने दोन डोळ्याच्या मध्ये लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला, श्वासावर नियंत्रण ठेवले, मग तीला मन शांन्त झाल्यासारखे वाटु लागले. थोड्या वेळाने तीने आपल्या कानावरील हात बाजुला केला, कोणता आवाज तर ना येत नाही ना? अचानक ऽ किर.र..र...रऽऽ असा आवाज होतो, मुख्य दरवाजावर बेल वाजली, ते ऐकुन ती एकदम दचकते, व पुन्हा आपले कान बंद करते. बहुतेक तो भास नसावा आसे तीला वाटते, व ती पुन्हा कान उघडते पुन्हा ऽकिर.र..रऽ 'हो कोणातरी आले आहे,मला दरवाजा उघडला पाहिजे,' ती स्वत: स्वत:ला म्हणते, मग ती सरळ उटुन मुख्य दरवाजाकडे जाते, दरवाजाजवळ जाऊन ती थांबते, दरवाजावर जोर जोरात थाप पडेत,व आवाज येतो, 'बेबी,ओपन द डोअर,' ती आवाज ओळखते ,तो तीची बहीन डाँलीचा आसतो. बेबी लागलीच दरवाजा उघडते,तर डाँली ती दरवाजा उघडताच बेबीला आत ढकलुन सरळ बेडरुमच्या दिशेने चालु लागते. ते पाहुन बेबी दरवाजा बंद न करता तीच्या पाठीमागे जाऊ लागते, 'काय झालं?,'बेबी विचारते, 'शांत बस,'डाँली चालतच म्हणते, 'नक्की सांगशील का? काय झालं ते?,' 'प्लिज मला काही विचारु नकोस,'आसे डाँली म्हणत त्या दोघी सरळ बेडरुममध्ये येतात, बेडरुममध्ये येताच डाँली उशी खाली व गादी खाली काहीतरी शोधत आसते,ते पाहुन बेबी तीली विचारते, 'काय हावं आहे का तुला?,' 'होय, कोठे आहे ते रत्न मला पाहिजे,' 'रत्न..?,' बेबी तीच्याकडे प्रश्नात्मक चेहर्याने बघते, 'होय तेच मला वाचवु शकते त्याच्यापासुन,' 'कोणापासुन? तु काय म्हणतेस मला काही कळत नाही?', 'तो तो मला सोडत नाही,' आसे म्हणत तीने आपले डोके दोन्ही हातानी गच्च धरले, व केस ओढु लागली, त्या राक्षसाने तीच्या डोक्यावर कब्जा केला होता, 'सोड मला......सोड मला, 'आसे म्हणत ती केस ओढत होती. * 'मला माहीत नाही,पण नक्कीच तीला भितीने ग्रासले आहे,'डाँक्टर म्हणाले, 'मला माहीत नाही,पण मला हे पहिल्यादाच दिसले,'बेबी म्हणाली, 'तीला लवकरा लवकर सायकालाँजी ट्रेंटमेट दिली पाहिजे, नाहीतर परिणाम वाईट होणार,' 'पण ती यातुन बाहेर तर येईल ना?,' 'काही सांगता येत नाही? पण मानसिक रोग बरे होतात एवढचं मी सांगु शकतो,' 'प्लिज सर लवकरालवकर तीच्यावर उपचार करा,मला खुप भिती वाटते, तीच्या शिवाय माझे कोणी नाही,' 'हो हो मी लगेत मानस तज्ञाना फोन लावतो,' * आता बेबी एकटीच घरात आसे, दररोज आकरा ते सहा या वेळेत ती हाँटेलमध्ये काम करुन येत आसे,तीला फारसे मित्र नसे, आई वडील लहानपणीच एका अपघातात गेल्याने ती मानसिक रित्या दु:खीच होती. नेहमी प्रमाणे ती आज कामावर जात होती, रस्त्यावर नेहमीप्रमाणे गर्दी खुपच वाटत होती,अचानक ती मेन रोडवरुन जाताना काही बदमाश गुंडानी अडवण्याचा प्रयत्न केला,पण तीचे मौन पाहुन त्या गुंडानीच आपली वाट बदलली. हाँटेलमध्ये ती रुम साफ करीत आसताना हाँटेल मालकाचा मुलगा जाँन तेथे आला. 'हाय बेबी, हाऊ आर यु?,' 'फाईन,' ती खाली मान घालुन काम करीत बेबी म्हणाली, 'बेबी, मी नाराज झालो, तुझे ते फाईन शब्द ऐकुण,'तो सुरात म्हणाला, 'ओके आय एम स्विट,' 'ओ माय गाँड, मला खुप बरं वाटलं, स्विट, आय लाईक ईट,....बाय द वे तुझी बहीन कशी आहे मला कळालं तीच्या बद्दल,' 'नो नाँरमल,' 'ओ सो साँरी.. बट गुड गर्ल...लाईक यु,' आसे म्हणुन तो हाँटेलच्या मुख्य केबीन मध्ये गेला. * सायंकाळी ती जाँबवरुन घरी जाताना कळाले की उद्या ख्रिस्मस आहे, म्हणुन तीने काही स्विट खरिदी केले, रस्त्यावर ख्रिस्मसचे स्टाँल लागले होते ते पाहत पाहत तील आनंद होत होता, त्या आनंदात तीला तीची मैत्रीन डायना आठवली व तीने तीला फोन लावला. फोनवर गप्पा मारता मारता कधी ती शहराच्या गोंगाटापासुन घराजवळ आली तीचे तीला कळाले नाही. आतापर्यत आंधार खुपच पडला होता, तीचं घर शहरापासुन दुरच्या आपार्टमेंट मध्ये आठव्या मजल्यावर होत,जेथे लोक कमी दिसत आसत. तीने आपार्टमेंट जवळ येताच तीने फोन बंद केला. ती चालत आसताना ती खुप आनंदीत होती, पण जस जसे ते आपार्टमेंट जवळ येत होते, तस तसे तीला भिती वाटत होती. * (प्रिय वाचक, ही कथा जास्ती जास्त चार भागात आसेल, तरी मी तीन भागामध्ये कथा पुर्ण करण्याचा प्रयत्न करेन)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7626
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

नंबर नोंदवून ठेवला आहे. बाकी सर्व इतर प्रतिक्रिया आल्यवर.

>>अचानक ती मेन रोडवरुन जाताना काही बदमाश गुंडानी अडवण्याचा प्रयत्न केला,पण तीचे मौन पाहुन त्या गुंडानीच आपली वाट बदलली कित्ती सभ्य नै आजकालचे गुंड!

कथेच्या नावात अनुस्वाराचा उपयोग न केल्याबद्दल जीवन भौंचे शतशः ऋणी आहोत. कथा चार भागातली तीन भागात करण्याच्या प्रयत्नाला 'शुंभेच्छा'!

*ROFL*

जाँन
=)) याचा उच्चार कसा करायचा?

In reply to by अनुप ढेरे

हँलो, गाँड,नाँरमल,साँरी या शब्दांसारखा!!

In reply to by स्पंदना

सवयीने फक्त एक उच्चार जमला. बाकीचे नाँरमल नाहीत. मोजींचा कथाकथनाचा एक कार्यक्रम ठेवायची कल्पना कशी वाटते?

In reply to by रामपुरी

राँर्बट राँर्बट राँर्बट राँर्बट राँर्बट

मस्त.... झक्कास... जी़व़ऩभा़ऊ़ मिपाची शान आहेंत...

>> * (प्रिय वाचक, ही कथा जास्ती जास्त चार भागात आसेल, तरी मी तीन भागामध्ये कथा पुर्ण करण्याचा प्रयत्न करेन) निर्वाण प्राप्त झाले आहे! -(जीवनभौचा पंखा) सोकाजी

ही एक जबरी रहस्यकथा आहे असे वाटते. दोन्ही बहिणींच्या वेडसरपणाची झलक दाखवल्यामुळे जयवंत दळवींच्या एका कथेची आठवण येते. कथानायिकेला साधे कान नसून, 'जोरात कान' आहेत हे वाचून वाचक संभ्रमात पडतो. तसेच तिचे मौन इतके भीतिदायक का असावे, की गुंडही घाबरतील, याचा अर्थ लावण्यात गुंग होतो. पुढे ती स्वतःला 'स्वीट' म्हणते ते गोड या अर्थी की हॉटेलातला 'स्वीट' असतो त्याअर्थी, हेही गौडबंगालच आहे. एकूण काय, नेहमीप्रमाणेच जीमोंच्या फॅन्सना मेजवानी आहे.(कोण तो नतद्रष्ट, जीमो पानशेतच्या पुरात वाहून गेले अशी अफवा उठवत होता?)

माँहीते जीवाँन. हे एकताच तीने आपले जोरात कान ही बंद केले पुन्हा आपले कान बंद करते. अजुन एक...(प्रिय वाचक, ही कथा जास्ती जास्त चार भागात आसेल, तरी मी तीन भागामध्ये कथा पुर्ण करण्याचा प्रयत्न करेन).....हे असे हवे होते का ? (प्रिय वाँचक, ही कथाँ जाँस्ती जाँस्त चाँर भाँगाँत आँसेल तरी मी तीन भाँगाँमध्ये कथाँ पुर्ण करण्याँचाँ प्रयत्न करेन) संपाँदक मंडळी वॉट्सअ‍ॅप सारख्या स्मायली द्यायची किरपा करतील काँय !

आख्या मिपाचा दावा हय जी़व़ऩभौ छावा हय... चार भागांची कथा पाच भागात आली तरी चालेल... तुमी फ़क्त यौंद्या... फकस्त येक डाव आमची रीकेस्ट माना राव... ती "अपहरण कीं खूण" तुम्ही निम्यात सोडल्यापासून राँर्बट, कैरीची खूप आठवण येते, त्यांना या कथेत चानस द्या.

In reply to by थॉर माणूस

ती "अपहरण कीं खूण" तुम्ही निम्यात सोडल्यापासून राँर्बट, कैरीची खूप आठवण येते, त्यांना या कथेत चानस द्या.
जर त्यांचा खूण झाला असेल तर त्यांना या कथेत चानस कसा मिळेल?

In reply to by धन्या

त्यांचा खूण नवता झाला... जाँनचा झाला होता (आणि एका कलकत्त्यातल्या माकडाचापण), तो या कथेत परत आलाय (जाँन) मग बाकीच्यांनी काय घोडं मारलंय?

In reply to by थॉर माणूस

गृहीणींना ज्याप्रमाणे सास-बहू मालिकांअधील कुठल्या बाईचं कुठल्या बाप्याचं लफडं आहे हे जसं माहिती असतं तसं तुम्हाला मोजीभौंच्या कथांमधील पात्रांची खडा न खडा माहिती आहे. अशीच माहिती मला एकेकाळी सुशिंच्या कादंबर्‍यांमधिल पात्रांची असायची. सनी बुलंद, दारा बुलंद, सलोनी... गेले ते दिवस. :(