या भागात सुरुवातीला एकल प्रवासाविषयी थोडे... सर्वात मोठा आणि महत्वाचा फ़ायदा म्हणजे कोणावरही अवलंबित्व नाही, स्वतः सगळा आराखडा बनवा आणि तंतोतंत पालन करा. शिवाय स्वतःला ज्याची आवड आहे त्यासाठी जास्त वेळ देता येतो. एक तोटा (किंवा फ़ायदा) म्हणजे तुमच्या 'पराक्रमांचे' फ़क्त तुम्हीच साक्षीदार असता. ब-याच वेळा पुरातत्वीय महत्व असलेल्या ठिकाणी येण्यात फ़ार लोकांना रस नसतो, मग काय्, उचला बोचकं आणि चालू लागा. अजून कोणी एकल प्रवासी असतील तर त्यांच्यासाठी एक टिप, शक्य असल्यास एखाद्या मध्यमवर्गीय स्थानिकाच्या घरी निवास करावा. म्हणजे तेथील विचारसरणी, आदरातिथ्य, परंपरा, खाद्यसंस्कृती, त्यांच्या समस्या या सगळ्याची खूप जवळून आणि खरी ओळख होते. लिमा मधील माझे वास्तव्य अशाच एका कुटुंबाच्या घरी होते. पेरुविषयी माहिती मिळवत असताना लिओ, माझ्या संपर्कात आल्या. लिमामधील उच्चभ्रू वस्तीमध्ये लिओ यांचे शंभर वर्षांहून जुने घर आहे. विमानतळावरून थेट त्यांच्याच घरी मी उतरलो होतो. अशा स्थानिक लोकांकडून काही सुरक्षेच्या आणि प्रवासाच्या दृष्टिने महत्वाच्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे कळतात.
लिमा शहरातील भटकंती तशी एकदम सुरक्षित. पण पुढचा प्रवास आता शहरापासून लांब होता. पहाटे चार वाजताच निघायचं ठरवलं. मस्त चकाचक टोयोटा भाड्याने घेतली. अशा प्रवासात एकट्याने जाणे फ़ारसे सुरक्षित नाही, चोरी-लूट वगैरे नाही, तरी समजा गाडीच बंद पडली किंवा तत्सम् कुठली समस्या, तर अनोळखी प्रदेशात मदत मिळणे कठिण. आणि पुन्हा भाषेचा प्रश्न आहेच. मोठी शहरे वगळता इंग्रजी फ़ारच कमी समजते. त्यामुळे शक्यतो एखादा वाटाड्या बरोबर घ्यावा. चार पैसे जास्त जातात, पण अडचणीच्या वेळी मदत सहज उपलब्ध होते. असो. आता या भागाच्या प्रवासवर्णनाकडे.
या भागात पेरूच्या समृद्ध समुद्री अभयारण्यास भेट देऊया. लिमा पासून दक्षिणेस 250 किलोमिटरवर् पराकास् अभयारण्य आहे. हा भाग जैवविवीधतेसाठी प्रसिद्ध आहे. समुद्री पक्षी, प्राणी व जलचरांच्या अनेक प्रजाती इथे पहावयास मिळतात. पहाटे चारलाच निघाल्याने लवकरच, साधारण साडे-तीन तासात इथे पोहोचलो. पॅनअमेरिकन हायवे चा हा पट्टा अतिशय उत्कृष्ठ दर्जाचा आहे त्यामुळे गाडी चालवणे अतिशय सुकर होते. शिवाय हा भाग वर्षभर धुक्यासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे वातावरण मस्त ताजेतवाने करणारे होते. 40 सोलेस् (पेरूचे चलन, सधारण 12$ / 750₹) देऊन तिथे दोन्-अडीच तासांची समुद्री सफ़र उपलब्ध आहे. जवळच बाय्येस्टास् आयलंड्स् ला एक फ़ेरी मारून परत किना-यावर. हा संपूर्ण प्रदेष वाळवंटी असून लाल रंगाच्या रेतीमुळे मंगळावर आल्यासारखं वाटतं. प्राचीन काळी इथे पराकास् आणि लिमा संस्कृतीचे लोक रहात असत. त्यांच्या जीवनाविषयक एक छोटेसे संग्रहालय आहे. इथपासून पुढे आटाकामा वाळवंट सुरू होते. जगातील् सर्वात रूक्ष (सर्वात कमि पर्जन्यमान) व सर्वात उंच वाळुच्या टेकड्या (ड्यून्स्) असलेल्या ह्या वाळवंटाच्या सफ़रीविषयी पुढील भागात. दर भागात एकदम वेगळीच भौगोलिक संपन्नता आपल्याला पहावयास मिळणार आहे, आणि हीच पेरूची खासियत् आहे.
नकाशात अभयारण्याचे स्थानः
वाळवंटी किनारा
भूरूपेः पाणी आणि वा-याच्या कलाकृती





पेंग्विन्
बूबीज
सील
पक्ष्यांची वसाहत
बाय्येस्टास् बेटांवरील समृद्ध समुद्री जीवन
'कॅथेड्रल'
प्रसिद्ध त्रिशूळ (क्डेलाब्रो) एरिक् व्हॉन् डेनिकेन् किंवा सुरेशचंद्र नाडकर्णी सारख्यांनी ज्याचा संबंध रामायणातील पाताळाच्या सीमेशी जोडला आहे असे हे भव्य भूरेखन (जिओग्लिफ)
प्रशांत महासागर
पराकास् बंदर
वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर आमचे वाहन्
संग्रहालयाजवळील 'मंगळावरचा' रस्ता
हॉटेलमधील तरणतलाव
वाळवंटी किनारा
पेंग्विन्
वाचने
18866
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे फोटो तुम्ही स्वतः काढलेले
अतिशय उत्सुकतेने वाचतो आहे.
जबरीच फोटो. पुभाप्र!
अप्रतिम फोटो !!!
धन्यवाद
In reply to अप्रतिम फोटो !!! by धन्या
तुम्हाला ठिगळ आवडत नाही?
In reply to धन्यवाद by समर्पक
फोटो तुम्ही स्वतः काढले
In reply to अप्रतिम फोटो !!! by धन्या
पुढच्या भागांची उत्सुकतेने
अप्रतिम फोटो. उत्सुकता वाढत
मस्तच,
फोटो माझेच आहेत
तुमचेच आहेत का हा प्रश्न मी
In reply to फोटो माझेच आहेत by समर्पक
धन्यवाद.
In reply to तुमचेच आहेत का हा प्रश्न मी by प्यारे१
खटकायचं काय राव त्यात.. ती एक
In reply to फोटो माझेच आहेत by समर्पक
चांगले लिहीताय
आय्ला
In reply to चांगले लिहीताय by केदार-मिसळपाव
अप्रतिम सौंदर्यदृष्टी आणि अत्यंत नज़ाकतदार फोटो
पेरु संपूर्ण अवडला.
सुरेख
पेरु देश आणि प्रवास वर्णन आवडले.
मराठी फळाच्या नावाचा देश
In reply to पेरु देश आणि प्रवास वर्णन आवडले. by राघवेंद्र
मराठी फळाच्या नावाचा देशपेरू हे फळ मूळ मराठी / भारतीय नाही. ते मूळचे मध्य अमेरिका आणि त्याला लागून असलेल्या उत्तर व दक्षिण अमेरिकेतील भूभागातले आहे. पेरू हा देश त्या भूभागात येतो ! युरोपियन (विशेषतः स्पॅनिश) लोकांनी ते जगाच्या इतर भागात नेले.धन्यवाद एक्का साहेब !!!
In reply to मराठी फळाच्या नावाचा देश by डॉ सुहास म्हात्रे
सुंदर
ग्रेट!
अप्रतिम
निव्वळ अप्रतिम!!!!!! दक्षिण
अप्रतिम!
कोणालाच माहिती नाही
In reply to अप्रतिम! by पैसा
सगळ्या फोटोंना फक्त छान