एखादी गोष्ट आपण अनेकदा केलेली असते, पण अशीच कधीतरी एकदा ती करताना विशेष भावते, त्यातून काहीतरी वेगळी अनुभूती होते. तसंच काहीसं त्या दिवशी झालं. एसटीतून इतके वेळा प्रवास केलेला आहे, पण काही प्रवास खास लक्षात राहिलेत त्यापैकी तो होता. बरेच दिवसांनी असं झालं की बसायला जागा नव्हती. त्यामुळे नेहमीच आवडती ठरलेली चालकाच्या बरोब्बर मागची स्टँडिंग सीट मी पकडली. वाहनाच्या समोरच्या काचेतून पुढचा रस्ता बघत बसायला मला प्रचंड आवडतं. त्यामुळे त्या वेळी बसायला न मिळाल्याचा मला आनंद झाला होता.
तिथे उभं राहून त्या अजस्त्रयंत्राला मी न्याहाळायला लागलो. चालकासमोरची बाजूची एकंदरीत परिस्थिती बघून ती बस चालते, यावरच एखाद्याचा विश्वास बसायचा नाही. धुळीचे थरच्या थर त्या डॅशबोर्ड नामक भागावर साचलेले होते. त्यातच ग्रीस इत्यादी पदार्थाची पुटं पडलेली होती. जणू काही तिथे कधीही साध्या फडक्याचाही स्पर्श झाला नसावा. मी जेलसारख्या भासणा-या त्या उभ्या गजांच्या फटींमधून चालकाकडे बघत होतो. खुद्द आरपार जाऊ शकेल इतक्या मोठया आकाराच्या स्टिअिरग व्हीलला दोन्ही हातांनी पकडून तो बस हाकत होता, जीव काढून ते व्हील वळवत होता. तिथल्या पॅनेलवर अनेक नॉब्ज होते, हा भूतकाळ झाला, कारण त्यातले तीनच शाबूत होते. बाकी कशाचे होते, त्यांनी काय व्हायचं, आता ते कसं होतं किंवा होत नसेल तर कसं चालतं, हे सगळं तो चालकच जाणे.
दर मिनिटभराच्या वेळाने एक खाडकन् आवाज व्हायचा. तो गीअर टाकण्याचा आवाज असे. गीअरचा दांडा साधारण चार साडेचार फुटी होता. तो टाकायला विलक्षण ताकद लागत होती. ड्रायव्हरची सीट म्हणजे इंजिनीअरिंगचा एक नमुनाच म्हणायला लागेल अशी होती की, जिला उपटून काढण्याव्यतिरिक्ततिच्या स्थितीत कुठलाही बदल करणं हे मानवाला अशक्य होतं. त्यात तो चालक खुजा होता. त्यामुळे त्याचे पाय खाली ब्रेक, अॅक्सिलरेटर, क्लचपर्यंत जेमतेम पोहोचत होते, पण जमिनीला टेकत नव्हते. मग त्याने त्यावर उपाय म्हणून रस्त्यावरचा एक पेव्हर ब्लॉक पायाखाली ठेवला होता. त्या प्रतिकूल परिस्थितीतही ही कल्पना सुचल्याबद्दल मला त्याचं विशेष कौतुक वाटलं.
माझ्या चेह-यावर थंडगार वारा येत होता. बस नक्कीच भरधाव असणार, असा समज करून मी स्पीडोमीटरकडे नजर टाकली. ते बंद होतं. तेच नव्हे, त्याच्या आसपास वसलेल्या सर्व डायल्स बंद होत्या. मला मोठा प्रश्न पडला की, स्पीड, डिझेलची पातळी, इंजिनचं तापमान आणि इतर काही गोष्टी या चालकांना कळतात तरी कशा?
चालक एका हाताने आपलीच पाठ चोळत असल्याचं नजरेस पडलं तेव्हा मात्र खूप वाईट वाटलं. त्या काटकोनी सीटला ना धड मऊपणा होता की, पाठीला कसला आधार. केवळ एखाद्या खाटेची जशी रचना असते तशी त्या सीटच्या पाठीची रचना होती. त्या बिचा-या चालकाने घरातलीच एक जुनी उशी आणून पाठीच्या मागे ठेवली होती. तेवढाच काय तो आराम.
एकंदरीतच जितक्या कठीण परिस्थितीत ही मंडळी काम करतात, त्याचा त्यांना काम करत असतानाच नव्हे, त्याव्यतिरिक्तही त्रास होतो हे उघड आहे. त्याबद्दल त्यांना वंदन करावं की त्यांचं कौतुक करावं, हे मला कळेनासं होतं. इतका त्रास असूनही तितक्याच नेमाने, प्रामाणिकपणाने ते आपली जबाबदारी असल्यागत हे काम करतात. त्यांची तुलना एखाद्या सनिकाशीच व्हायला हवी. त्यांच्या बस चालवण्याच्या कौशल्याबद्दल बोलण्यास खरं तर मी पात्रच नाही. इतकं मोठं धूड गर्दीच्या रस्त्यांवरून इतक्या अचूकपणे, तरीही वेळेवर या ठिकाणाहून त्या ठिकाणी नेणं, हे करायला दैवी देणगीच लागते.
इतक्यात माझा बस स्टॉप आला. माझी बॅग उचलून मी दाराकडे सरसावलो. कुठल्याही विचारांती नाही, पण मी त्या चालकाकडे बघून हसलो आणि त्याला हात उंचावून ‘बरंय’ म्हटलं. कदाचित इतकं सौजन्यही त्यांना दुर्लभ असेल.
हा लेख ९ ऑगस्टच्या प्रहार च्या पुरवणीत छापून आला होता त्याचा हा दुवा : http://prahaar.in/collag/238155
वाचने
11038
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी खरं आहे
एस्.टी ची अवस्था इतकी वाईट
एवढं लांब नाही इथे मुंबईतल्या
In reply to एस्.टी ची अवस्था इतकी वाईट by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अच्छा,
In reply to एवढं लांब नाही इथे मुंबईतल्या by वेल्लाभट
हि लोकल बस नोहे !!!
In reply to अच्छा, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
लेखातल्या भावनेशी सहमत.
मला ST आणि City Bus च्या
तेच ना !
In reply to मला ST आणि City Bus च्या by प्रसाद१९७१
स्थानकांची अवस्था सुधारण्या आधी
In reply to तेच ना ! by वेल्लाभट
>>हा लेख ९ ऑगस्टच्या प्रहार
थँक्स
In reply to >>हा लेख ९ ऑगस्टच्या प्रहार by सूड
आता प्रहार 'विकत' घेणे आले.
In reply to थँक्स by वेल्लाभट
अहो आर्थिक प्रहार कशाला तुमच्यावर उगाच ? :)
In reply to आता प्रहार 'विकत' घेणे आले. by सूड
खरय...
बरोबर..
In reply to खरय... by ब़जरबट्टू
बरोब्बर
In reply to बरोबर.. by चिगो
अगदी असेच नाही ...
In reply to बरोब्बर by वेल्लाभट
भयानक आहे हे सारं.
In reply to अगदी असेच नाही ... by विटेकर
धन्यवाद...
In reply to अगदी असेच नाही ... by विटेकर
जवळजवळ सर्वच खाजगी बसेस बेकायदा प्रवासी वाहतूक करतात का?
In reply to अगदी असेच नाही ... by विटेकर
ह्म्म
In reply to जवळजवळ सर्वच खाजगी बसेस बेकायदा प्रवासी वाहतूक करतात का? by बहुगुणी
काय म्हणता?
In reply to ह्म्म by विटेकर
दादर-पुणे-दादर मार्गावर महामंडळाची वाहतूक सेवा १९८१ पासून चालू आहे. जसजशी ही वाहतूक लोकप्रिय होत गेली तसतसे या मार्गावर फेऱ्या वाढविण्यात आल्या दिनांक १६/७/१९९४ पासून डिलक्स बस सेवा व में १९९६ पासून वातानुकूलित बस सेवा चालू करण्यात आलेली आहे. डिलक्स बस सेवेसाठी रुपये १५५/- प्रमाणे भाडे आकारणी करण्यात येत आहे. दिनांक २८/१२/२००२ पासून या मार्गावर ५ वातानुकूलित व्होल्वो बसेसची वाहतूक चालू करण्यात आलेली असून प्रत्येक बसच्या प्रत्येकी दोन परतीच्या फे-या चालू करण्यात आल्या आहेत. या बसचे कमी हंगामातील कालावधी तिकीट (प्रवास भाडे) रुपये २००/- (दिनांक १/१२/२००५ पासून) ठेवण्यात आले होते. सदरचे बस भाडे गर्दीच्या हंगामात ( १ एप्रिल २००६ ते ३० जून या कालावधीसाठी) रुपये २३५/- करण्यात आले होते. शासनाने हंगामानुसार भाडे दर ठरविण्यास दिलेल्या परवानगीनुसार हे भाडे दर ठरविण्यात आले आहेत. बसची आसन क्षमता ४५ आहे. या गाडीच्या वाहतूकीस प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सदर मार्गावर आणखी १० नवीन वातानुकूलित बसेस चालनात आणण्यात आल्या आहेत, तसेच ठाणे-पुणे मार्गावर ३ व्होल्वो बसेस व बोरिवली-पुणे मार्गावर २ व्होल्वो बसेस प्रवाश्यांची निकड पाहून चालनात आणण्यात आल्या होत्या. परंतु बोरीवली-पुणे मार्गावर अपेक्षित भारमान मिळत नसल्याने त्या दादर-पुणे या मार्गावर चालविण्यात येत आहेत. या सेवेचे नामकरण ‘‘शिवनेरी’’ असे करण्यात आले आहेही जर खाजगी (किंवा contracted) सेवा असेल तर तसा स्पष्ट उल्लेख आधिकृत सरकारी संस्थळावर न करणं हे न्यायालयात खटला दाखल करण्याला आमंत्रणच आहे!खरे आहे
In reply to काय म्हणता? by बहुगुणी
असाच प्रयोग
In reply to खरे आहे by विटेकर
बाकीचं माहिती नाही पण
In reply to असाच प्रयोग by विटेकर
होय
In reply to जवळजवळ सर्वच खाजगी बसेस बेकायदा प्रवासी वाहतूक करतात का? by बहुगुणी
जवळजवळ सर्वच खाजगी बसेस बेकायदा प्रवासी वाहतूक करतात का?दुर्दैवाने स्टेज क्यारीयर चा नियम पाळला जात नाही. गेल्या ३ वर्षात गोव्यात ४-५ वेळा बंदी आणली पण राजकीय आशीर्वादाने सारे सुरळीत आहे. महाराष्ट्रात खासगी च्या सोयीसाठी स्टेज क्यारीयर काहीतरी पळवाट काढली आहे.धन्यवाद, विटेकर साहेब,
In reply to होय by विटेकर
बेस्ट
नाही, हा एसटीचाच प्रवास होता
In reply to बेस्ट by सह्यमित्र
लाल डब्याने जाणं बंद करा, असे
In reply to नाही, हा एसटीचाच प्रवास होता by वेल्लाभट
ब........रं !
In reply to लाल डब्याने जाणं बंद करा, असे by सूड
बर बर
In reply to नाही, हा एसटीचाच प्रवास होता by वेल्लाभट
बेस्ट एवढ्या भंगार कधीच नाहीत
In reply to बेस्ट by सह्यमित्र
हे बाकी खरं आहे. वाद नाही
In reply to बेस्ट एवढ्या भंगार कधीच नाहीत by प्यारे१
हे देखिल वाचा
आभार
In reply to हे देखिल वाचा by रघुपती.राज
अहो मी तो लेख येथे चिकट्वला
In reply to आभार by वेल्लाभट
बर बर बर !
In reply to अहो मी तो लेख येथे चिकट्वला by रघुपती.राज
छान लेख
_/\_ अगदी !
In reply to छान लेख by पैसा
.
एसटी बेस्टच
सहमत ! +१
In reply to एसटी बेस्टच by मार्मिक गोडसे
एस.टी. ला लाल डबा म्हणणं मला
In reply to एसटी बेस्टच by मार्मिक गोडसे
आवडला लेख.
+१
एस टी अन त्यातील कर्मचारी हे
एसटी, बेस्ट बस चे चालक हे
In reply to एस टी अन त्यातील कर्मचारी हे by पाषाणभेद
...
लेख आवडला.
गणपतीला घरी चाललो होतो. २२.३०
__/\__
In reply to गणपतीला घरी चाललो होतो. २२.३० by यसवायजी
सहमत.
In reply to __/\__ by असंका
मला एस.टी. वाल्यांविषयी
एस टी आपली आवडती आहे.भरपूर