Skip to main content

(कुंतलांचा पसारा)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 21/10/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - मिपाची कवयित्री प्राजू हिची 'आठवांचा पसारा' ही सुंदर कविता! 'चतुरंगप्रयातात' हे विडंबन करण्याचा प्रयास केलेला आहे.. उवा जाहल्या, कुंतलांचा पसारा रिठ्याने कशा आज डोळ्यांत धारा सुगंधीच मेंदी असावी उशाशी उडू लागला रंग हा आज सारा कसा आणला 'वीगही' मी लपूनी गळू लागला केशसंभार सारा उडाली पहा रातची झोप माझी कुणा वैद्यकाचा मिळे ना सहारा जरी टाळतो मी तुझ्या आलयांना तुला नापिता पाहु येतो शहारा चला संपला भार या डोसक्याचा मिळाला वयाने मला हा इशारा चतुरंग
लेखनविषय:

वाचने 3398
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

=)) अजून अशी दोन-चार विडंबनं येऊदेत आज (भारतातल्या) रात्रीत! काम तरी होईल माझं!

रंगा भाई आज एकदम पेटेले है... उवा जाहल्या, कुंतलांचा पसारा रिठ्याने कशा आज डोळ्यांत धारा हे लै डेंजर. मधनं मधनं शिकाकाई वापरायला सांगा.... ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हे लै डेंजर. मधनं मधनं शिकाकाई वापरायला सांगा.... =)) मला भलतीच जाहिरात आठवली, 'डोक्याला डोकं भिडतं जिथे ...." पण अमेरिकेत लायसिल नाहीतर मेडिकर मिळतं का हो?? :?

फार आवडले. (केसाळ)बेसनलाडू

कधी लिहिलं हे?? आताच पहाते आहे... मस्त झालंय.. कसा आणला 'वीगही' मी लपूनी गळू लागला केशसंभार सारा चतुरंग भाय... सह्हीच आहे हे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

कसा आणला 'वीगही' मी लपूनी गळू लागला केशसंभार सारा हा हा हा! विगची कल्पना मस्तच... :) आपला, (टकल्या) तात्या.

आणि न देणार्‍या सर्व रसिकांचे आभार! (खुद के साथ बातां : रंग्या, केसूगुर्जी दिसत नाहीत हल्ली, वाचनमात्र आहेत की काय? :W :? ) चतुरंग

चतुरंगजी, विडंबन लै भारी केले :) हसुन हसुन दमले. :)

http://vipravani.wordpress.com/ आई ग वैतागले मी ह्या केसाना अग पण ,,,, चे माक्याचे तेल का नाही लावत म्हणजे सर्व केस गळुन टक्कल तर पडेलच खूप डोके दुखुन कायमची झोप लागेल छान विडंबन चतुरंगजी. आजकल अपुन भी कविता वाचताय बर का

'चतुरंगप्रयातात'ले विडंबन आवडले. सुगंधीच मेंदी असावी उशाशी उडू लागला रंग हा आज सारा या ओळींवर जीव जडला. -दिलीप बिरुटे

....काय !!!! "देवाच्या कात्रीचा आवाज येत नाही"