प्रेरणा - मिपाची कवयित्री प्राजू हिची 'आठवांचा पसारा' ही सुंदर कविता!
'चतुरंगप्रयातात' हे विडंबन करण्याचा प्रयास केलेला आहे..
उवा जाहल्या, कुंतलांचा पसारा
रिठ्याने कशा आज डोळ्यांत धारा
सुगंधीच मेंदी असावी उशाशी
उडू लागला रंग हा आज सारा
कसा आणला 'वीगही' मी लपूनी
गळू लागला केशसंभार सारा
उडाली पहा रातची झोप माझी
कुणा वैद्यकाचा मिळे ना सहारा
जरी टाळतो मी तुझ्या आलयांना
तुला नापिता पाहु येतो शहारा
चला संपला भार या डोसक्याचा
मिळाला वयाने मला हा इशारा
चतुरंग
वाचने
3398
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
जहबहर्या :)
झोप उडली माझी हे वाचून!
रंगा भाई
मेडिकर नायतर ...
In reply to रंगा भाई by बिपिन कार्यकर्ते
सुंदर
आई शपथ..
कसा आणला
कुंतलांच्या पसार्याला दाद देणार्या
लै भारी
माक्याचे तेल
ओहो, क्या बात है !!!
थोडक्यात...