अण्णा सुपरींटेन्डन्ट ऑफ एक्साईझ ह्या प्रमोशनवर मुंबईला जाण्यापुर्वी,अख्या रतनागिरीचे हेड होते.पुर्वी सरकारी नोकरांच्या घरी शिपाई नोकर घरकामाला रहायचे. त्याना घरात आईला मदत करण्या पलिकडे मला आणि माझ्या धाकट्या भावाला
संभाळायचं काम पण करावं लागायचं.ब्रिटीश लोकानी ती पद्धत घालून दिली होती.
आमचे आजोबा आमच्याकडे रहायचे.
एकदा काय झालं,एका शिपायाची बदली झाल्यावर त्याच्या जागी दुसरा शिपाई आला होता.तो जरा पायाने अधू होता.म्हणून अण्णांनी त्याल घरचीच हलकी हलकी कामं करायला घरीच ठेवला होता. तो जरा कायदेबाज होता. नेहमीच्या सवंयी प्रमाणे
आजोबानी त्यांची सुपारी कुटून ठेवायाला त्याला सांगितलं.तोंडात दांत नसल्याने आजोबा कुटून ठेवलेली सुपारी खात असत.
त्या शिपायाने सांगितलं,
"आजोबानू,मी सरकारी नोकर आसयं,माझां सुपारी कुटूचां काम नाय,"
संध्याकाळी अण्णा घरी आल्यावर आजोबानी त्यांना तो शिपाई काय म्हणाला ते सांगितलं.
त्यावर अण्णा आजोबाना म्हणाले,
"उद्या पासून तुम्ही त्याला तुमचं काही काम सांगू नका."
दुसर्या दिवशी तो शिपाई घरी आल्यावर अण्णानी त्याला एक जड फाईलचं बोचकं दहा मैलावर असलेल्या त्यांच्याच एका ब्रॅन्च ऑफिसला देऊन तिकडच्या माणसाची पोहचल्याची पावती आणून आजोबाकडे द्यायला सांगितलं.त्यावेळी पायी जाण्याशिवाय दुसरं साधने नव्हतं.
दुसर्या दिवशी आण्णा दोन दिवसाच्या फिरतीवर -टूरवर- गेले.दुसर्या दिवशी त्या शिपायाने संध्याकाळी पावती आणून आजोबांच्या स्वाधीन केली.आणि त्याना म्हणाला,
"आजोबानूं,जरा उशीर झालो माकां,पाय पण वाईंच दुखतंत.मी तुमची सुपारी कुटून देवूं काय?"
दोन दिवसानी अण्णा घरी आल्यावर त्यांनी आजोबाना विचारलं,
"शिपायाने पावती दिली काय?"
त्यावर आजोबा म्हणाले,
"हो दिली आणि वर तो मला म्हणाला",
"सायबानी माकां सरकारी नोकरी म्हणजे काय तां पण समजावलां"
हे ऐकून आजोबा आणि अण्णा खो,खो हंसले.
त्यानंतर तो शिपाई न चुकता आजोबांची सुपारी कुटून देत असे.
श्रीकृष्ण सामंत
वाचने
3508
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाही आवडले....!!!
आभार
मग बरोमग..
In reply to आभार by श्रीकृष्ण सामंत
आणि तसंच झालं
In reply to मग बरोमग.. by योगी९००
सरकारी काम
फार छान
In reply to सरकारी काम by प्रकाश घाटपांडे
माझं थोडं चूकलं
In reply to फार छान by लिखाळ
उदबोधक माहिती
In reply to सरकारी काम by प्रकाश घाटपांडे
प्रतिक्रिया
In reply to सरकारी काम by प्रकाश घाटपांडे
अतिशय उत्तम प्रतिसाद....