फेर्यात अडकलेला...
लेखनविषय (Tags)
माझा एक मित्र कामावरुन परतताना माझ्या घरी आला. नेहमीच्या स्कुटरऐवजी नवीन स्प्लेंडरवरुन तो उतरला. मी विचारले स्कुटर कुठे? स्कुटर विकली व ही नवीन स्प्लेंडर घेतली. मित्राचे अभिनंदन केले व आम्ही घरात आलो. पेट्रोल महागल्यामुळे कदाचीत जास्त अॅवरेज देणारी स्प्लेंडर बाइक मित्राने घेतली असेल असे मला वाटले. मित्राला तसे विचारले तसा तो म्हणाला, नाही नाही तसे अजिबात नाही, त्याने जे काही कारण सांगितले ते ऐकून मी चक्रावूनच गेलो.
मित्राची कंपनी त्याच्या घरापासून अंदाजे तीसएक कि.मी.वर आहे. हायवेने ३०-४० मिनिटात कंपनीत पोहोचतो. नव्या स्प्लेंडरमुळे चक्क २० मि. कंपनीत पोहोचतो असे तो खुशीत येऊन सांगत होता. हायवेवर खड्डेही नव्हते व फ्लायओव्हरमुळे सिग्नल व ट्राफिकचाही अडथळा नव्हता. तरीही बाईक वेगाने चालवू नको असा मी त्याला सल्ला दिला. अरे आपन स्टार्ट टू फिनिश ६० च्या वरती गाडी चालवतच नाही, मग ती स्कुटर असो वा स्प्लेंडर. ६० च्याच वेगाने स्प्लेडर चालवत असशील तर कंपनीत पोहोचण्याच्या वेळेत फरक पडायला नको, मी म्हणालो. असं काय करतोस, वेग जरी सारखा असला तरी स्प्लेंडरचे चाक स्कुटरपेक्षा मोठे असते, म्हणजे एका फेर्यात ते जास्त अंतर कापते, आपण अकरावी सायन्सला जे शिकलो ते चांगले माझ्या लक्षात आहे, नाहीतर स्प्लेंडर घ्यायला मी मुर्ख आहे का ? मित्र म्हणाला.
मी माझे तुटपुंजे तांत्रिक ज्ञान मित्रासमोर मांडले. अरे मित्रा छोटे चाक, मोठे चाक हे अर्धसत्य आहे, छोट्या चाकाचा परिघ २ फूट असेल व मोठ्या चाकाचा परिघ ४ फूट असेल तर एका फेर्यात मोठे चाक छोत्या चाकापेक्षा दुप्पट अंतर कापेल. परंतू, कोणतेही वाहन मग ते चारचाकी असो वा दुचाकी ते जेव्हा एकाच वेगाने उदा. ६० कि.मी./तास धावते तेव्हा ते एक तासाला ६० कि.मी. अंतर कापते, भाले त्यांच्या चाकाचा परिघ लहान असो वा मोठा. हां चाकाच्या आकारमानामुळे इंजिनची जडणघडण्वेगळी असू शकते, गाडिच्या टायरचे आयुष्य कमीजास्त होऊ शकते, गाडीच्या अॅवरेजमध्ये फरक पडू शकतो, परंतू तू म्हणतो त्याप्रमाणे चाकाच्या आकारमानामूळे वेळेची बचत होत नाही. मित्र जरा नाराज वाटला, तो उठला व तडक घराबाहेर आला, बाईक चालू केली व हायवेने धूमटाईप त्याच्या घराकडे निघाला. गाडीने नक्कीच ६० पेक्षा अधीक वेग गाठला होता.
मी मित्राचे समाधान करू शकलो नाही ही खंत मनात आहेच. कृपया मिपाकरांनी हि तांत्रिक माहीती सोप्या शब्दात कशी सांगता येईल ह्याचे मार्गदर्शन करावे
प्रतिक्रिया
कोणतेही वाहन मग ते चारचाकी
आपण अकरावी सायन्सला जे शिकलो
साधे आहे
शीर्षक आवडले.
त्या मित्राला हा video दाखवा!
त्याला एक प्रश्न विचारा,
+ १
ह्म्म्म
हॅ हॅ हॅ .. बंड्याला म्हणावे
व्वा!! क्या खूब कही!!!
वाह ताज
शर्यत लावा
बाय द वे -
चाकांची साईज
१ डझन
आंगाशी....
४५ ग्रॅम वजन असेल तर १२, ३० ग्रॅम वजन असेल तर १३.......
भारी!!!
हा हा हा!!
चाकाचा परीघ जितका मोठा तितकं
बाब्बौ!
मित्र म्हणतो ते शास्त्रिय
हायवेवर खड्डेही
मग विवेचन लागू नाही .आवड आपली
कुठेतरी
तुमच्या मित्राला दहावित पास
त्याच्या मोटार मॅकेनिकने