माझे कुणा म्हणावे ...
लेखनविषय:
वैराण वाळवंटी, त्या पानही हलेना
माझे कुणा म्हणावे, काहीच आकळेना
जावे पळून कोठे, हा खेळ प्राक्तनाचा
चिरदाह वेदनेचा, मज दंश साहवेना
ज्याने हलाल केले, कित्येक काफिल्यांना
तो भास मृगजळाचा, नजरेस पाहवेना
जी रोज दाविली मी, घनतृषार्त यात्रिकांना
ती वाट मरूस्थळाची, मज कुठेच पोचवेना
सारेच मानभावी, वस्तीत दांभिकांच्या
जो तो 'मुक्या'च येथे, सच्चा कुणी मिळेना
(हरिहरन यांच्या 'गुलफाम' या संग्रहातील 'कोई पत्ता हिले हवा तो चले, कौन अपना है ये पता तो चले' या गझलचा स्वैर भावानुवाद)
वाचने
3651
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
आहा!
सुरेख!!
>>>सारेच मानभावी, वस्तीत
सुरेख...
वाह व्वा! क्या बात है!!
In reply to वाह व्वा! क्या बात है!! by आयुर्हित
ह्याची आठवण झाली
In reply to ह्याची आठवण झाली by ज्ञानोबाचे पैजार
आयुर्हेत काकांचा भावानुवाद
मूकवाचका.................
ज्याने 'हलाल' केले, कित्येक
In reply to ज्याने 'हलाल' केले, कित्येक by इनिगोय
+1
ज़फरच्या एका सुरेख ग़जलची फुल वाट लावलीये !
In reply to ज़फरच्या एका सुरेख ग़जलची फुल वाट लावलीये ! by संजय क्षीरसागर
नया हे वह
In reply to नया हे वह by स्पा
जमेल हळु हळु?
भावानुवाद सुरेख !
त्या आयुर्वेदाचार्यांनी काय अत्याचार केलायं आणि
In reply to त्या आयुर्वेदाचार्यांनी काय अत्याचार केलायं आणि by संजय क्षीरसागर
सर हे कसे वाटते बघा,
In reply to त्या आयुर्वेदाचार्यांनी काय अत्याचार केलायं आणि by संजय क्षीरसागर
सुंदर!
दिलतोड भावानुवाद !
भावानुवाद आवडला. सुंदर आहे.
In reply to भावानुवाद आवडला. सुंदर आहे. by धन्या
+१
संक्षींनी मुळ गझल दिल्यानंतर जाणवले की दोन्हींचा गाभा वेगळा आहे.+१ संक्षींची उर्दू अनुवादाची हातोटी नक्कीच उत्तम आहे, (उचकटवून सांगितलं नसतं तर गझल कळलीच नसती) पण मूकवाचक आणि आयुर्हित यांचा भावानुवादाचा प्रयत्न चांगला आहे.धन्यवाद
आवडली
छान