मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नेहमी असंच का होतं ?

माम्लेदारचा पन्खा · · काथ्याकूट
१) आपण एखादे काम चांगल्या इच्छेने करायला जातो आणि ते फसल्यावर खापर आपल्या माथी मारण्यात येतं ? २) आपण ट्रेन पकडायला जिथे उभे असतो त्यापेक्षा समोरच्याच फलाटावर गाड्या जास्त येतात? ३) आपण एखाद्या गोष्टीसाठी जीव काढून ठेवतो तरी ती होत नाही पण तीच कोणी दुसऱ्याने केली की सहज होते? ४) आपण एखाद्या कल्पनेला जितके घाबरतो आणि लांब ठेवायचा प्रयत्न करतो तेवढीच ती कल्पना आपल्या बोकांडी बसते ? ५) जगातल्या प्रत्येक माणसाला जरी लॉटरी लागली तरी त्यातही आपला नंबर शेवटचा का असतो ? ६) एखादी संकल्पना आपल्यापुढे कोणीतरी मांड्ल्यावर आणि ती आपल्याला बेहद्द आवडल्यावर ही आपल्याला सुद्धा सुचली असती असं का वाटतं ? ७) आपण मरमरून दूध आटवतो आणि मलई कोणीतरी दुसराच सोम्या गोम्या खाउन जातो? ८) आपण कॉलेजच्या दिवसात ज्या कुणा मुलाच्या/मुलीच्या एका नजरेसाठी तडफडायचो तीच /तोच पुढे कधीतरी अत्यंत सुमार दिसणाऱ्या माणसाशी लग्न झाल्या नंतर आपल्याला का दिसतो/दिसते ? ९) आपण अति विचार करणे आपल्या मनाला घातक आहे हे माहित असूनही पुन्हा पुन्हा आपण विचार का करतो? १०) हा प्रश्न खास मिपासाठी आणि मेम्ब्रांसाठी : इतर धागे पाहून आणि वाचून आपण उत्साहाने धागा काढल्यावर त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याऐवजी धागाकर्त्याची टोपी बऱ्याचदा का उडवली जाते?

वाचने 21495 वाचनखूण प्रतिक्रिया 29

सूड गुरुवार, 07/31/2014 - 16:32
>>इतर धागे पाहून आणि वाचून आपण उत्साहाने धागा काढल्यावर त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याऐवजी धागाकर्त्याची टोपी बऱ्याचदा का उडवली जाते? ब्रह्माऽपि अंतं न गच्छति टाईप प्रश्न आहे हा!!

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/31/2014 - 16:56
याला मर्फीज् लॉ असे म्हणतात.'s_law गंमतीचा भाग म्हणजे लौकिक अर्थाने वैज्ञानिक नियम नसुनही 'नासा 'सारख्या संस्थाही त्यांच्या एक्स्पीडीशन्सच्या वेळी मर्फीचा आधार घेतात.

In reply to by नानासाहेब नेफळे

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/31/2014 - 16:59
(उपरोक्त लिंक मिसटाइप झाली.) याला मर्फीज् लॉ असे म्हणतात. गंमतीचा भाग म्हणजे लौकिक अर्थाने वैज्ञानिक नियम नसुनही 'नासा 'सारख्या संस्थाही त्यांच्या एक्स्पीडीशन्सच्या वेळी मर्फीचा आधार घेतात.

तिमा गुरुवार, 07/31/2014 - 17:00
हे भोट असल्याचे लक्षण आहे.

विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 07/31/2014 - 22:23
१०) हा प्रश्न खास मिपासाठी आणि मेम्ब्रांसाठी : इतर धागे पाहून आणि वाचून आपण उत्साहाने धागा काढल्यावर त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याऐवजी धागाकर्त्याची टोपी बऱ्याचदा का उडवली जाते?
You are not in the traffic, you are the traffic :-)

योगी९०० Fri, 08/01/2014 - 12:02
आपण एखादे काम चांगल्या इच्छेने करायला जातो आणि ते फसल्यावर खापर आपल्या माथी मारण्यात येतं ? हे बर्‍याचदा अनुभवलेय... आता कोणालाही मदत करत नाही.

रमेश आठवले Sun, 08/03/2014 - 01:33
http://www.chemteam.info/Humor/Gumpersons-Law.html आपण दिलेली उदाहरण बहुधा या भौतिक शास्त्रात मांडलेल्या सिद्धांतात मोडतात असे वाटते.

असंका Mon, 08/04/2014 - 00:08
2.चे उत्तर- कारण आपल्या फलाटावर आलेली पहिली गाडी आपण पकडतो. मागून कितीही गाड्या आल्या तरी आपल्याला त्या मोजता येत नाहीत.

भिंगरी Mon, 08/04/2014 - 07:09
प्रश्न क्र १०..साठी. नुसती टोपी नाही उडवत तर टोपीचाही एक नी एक धागा काढतात. (स्वानुभव) *lol*