✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मर्जी

आ
आतिवास यांनी
Wed, 07/23/2014 - 08:55  ·  लेख
लेख
माझी झोप उडालीय, मन:शांती लयाला गेलीय; कशातच आनंद नाही; काही सुचत नाहीये. स्वप्न आहे हे? का खरोखर घडतंय? त्यांचा सतत आरडाओरडा चालू आहे, अगदी क्षणभरही खंड नाही. प्रत्येकाला विजयी व्हायचंय, इतरांपेक्षा जास्त जगायचंय, जास्त चमकायचंय. प्रत्येकाला हवं आहे यश, प्रेम, सुरक्षितता, पैसा आणि प्रसिद्धी. प्रत्येकाला हवी आहे महत्त्वाची भूमिका. इतरांना झाकोळून टाकण्याची त्यांची किती लगबग. मार्ग काढला असता मी; पण त्यांची संख्या खूप जास्त आहे. भीती वाटतेय मला.; जो तो धमकी देतोय. असं किती काळ चालेल? कधीतरी हे पान उलटेल. मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन. पात्रं थोडीच लिहितात कादंबरी? मी लिहितेय. माझ्या मर्जीने लिहीन, त्यांच्या मर्जीने नाही! * शतशब्दकथा
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
अनुभव

प्रतिक्रिया द्या
8459 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

थोडी वेगळीच. आवडली कथा.

प्रचेतस
Wed, 07/23/2014 - 09:16 नवीन
थोडी वेगळीच. आवडली कथा.
  • Log in or register to post comments

कुल

स्पा
Wed, 07/23/2014 - 09:19 नवीन
कुल :-)
  • Log in or register to post comments

कधीतरी हे पान उलटेल.

एसमाळी
Wed, 07/23/2014 - 10:05 नवीन
कधीतरी हे पान उलटेल. मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन. हे जास्त आवडल.
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/23/2014 - 10:45 नवीन
*good*
  • Log in or register to post comments

छान मनोगत ! आवडले.

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 07/23/2014 - 10:57 नवीन
छान मनोगत ! आवडले. फक्त कादंबरी लिहीणेच नाही तर खरं आयुष्यही असंच असतं... धमक असलेला/ली आपल्या मर्जीनुसार आपलं साम्राज्य स्थापतो/ते.
  • Log in or register to post comments

मर्जी

हरकाम्या
Wed, 07/23/2014 - 11:16 नवीन
टूकार.
  • Log in or register to post comments

गोष्ट आवडली. पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 07/23/2014 - 11:36 नवीन
गोष्ट आवडली. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

आवडलं!

किसन शिंदे
Wed, 07/23/2014 - 12:02 नवीन
कथेपेक्षाही तुम्ही करत असलेल्या कामासंदर्भातले तुमचे मनोगत अधिक वाटले.
  • Log in or register to post comments

चोक्कस

सस्नेह
Wed, 07/23/2014 - 12:10 नवीन
यावरून तुमची त्या कार्यातली खोल इन्वॉल्व्हमेंट दिसून आली !
  • Log in or register to post comments

किसन आणि स्नेहांकिता शी सहमत.

प्यारे१
Wed, 07/23/2014 - 12:26 नवीन
किसन आणि स्नेहांकिता शी सहमत. आवडलं. पण हे कथेपेक्षा स्वगतामध्ये गणलं जावं की काय अशा शंकेत.
  • Log in or register to post comments

"कधीतरी हे पान उलटेल.

शैलेन्द्र
Wed, 07/23/2014 - 12:52 नवीन
"कधीतरी हे पान उलटेल. मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन. " गुंतुनी गुंत्यात या, गाठ गहन छेडली, आज मी म्रूगजळाची, सावली का खोडली?
  • Log in or register to post comments

कोणाच्या ओळी आहेत या?

आतिवास
Wed, 07/23/2014 - 14:52 नवीन
कोणाच्या ओळी आहेत या? (की तुमच्याच?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

माझ्याचं, एका अपुर्ण

शैलेन्द्र
Wed, 07/23/2014 - 22:55 नवीन
माझ्याचं, एका अपुर्ण कवितेतल्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

सॉरी, कथेला दाद द्यायची राहुन

शैलेन्द्र
Wed, 07/23/2014 - 12:53 नवीन
सॉरी, कथेला दाद द्यायची राहुन गेली.. मस्त जमलीये.. आवडली..
  • Log in or register to post comments

तत्त्वे

एस
Wed, 07/23/2014 - 13:17 नवीन
माझीही झोप उडालीय. अंधारलेल्या रणाक्रंदनातून चालतोय. कशाचाच आनंद नाही. ना कशाची खंत. ही वस्तुस्थिती आहे? की स्वप्न? मला जाणून घ्यायचे नाही. त्यांच्या कोलाहलातही मी शांत आहे. त्यांचे घाव सोसूनही जिवंत आहे. मीही परतवतोय त्यांचे जीवघेणे हल्ले. नि:शब्दपणे भोवतालचे हलाहल रिचवतोय. जगण्याच्या दुर्दम्य आशेने माझी पावले चालत राहतात. मी अजिंक्य. अजेय. सामदामदंडभेद. त्यांचीच शस्त्रे मलाही अवगत झालीयेत. त्यांच्या डोळ्यांत रोखून पाहतो. भीती आणि आश्चर्य. त्यांच्या न संपणार्‍या भाऊगर्दीतून पुढे जात राहतोय. स्थितप्रज्ञाच्या अविचलतेने. असं किती काळ चालेल? कधीतरी हे पर्व संपेल. मग माझ्या नियमांनुसार मी या सगळ्यांना झुंजायला लावेन. तत्त्ववेत्ते कुठे लढतात युद्धे? मी लढतोय. माझ्या तत्त्वांनी लढेन. त्यांच्या तत्त्वशून्यतेने नाही. * शतशब्दप्रतिसाद
  • Log in or register to post comments

शतशब्दप्रतिसाद उत्तम आहे;

आतिवास
Wed, 07/23/2014 - 14:50 नवीन
शतशब्दप्रतिसाद उत्तम आहे; आवडला. लढाईच्या अशा अनेक बाजू असतात हे खरं आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मूळ शतशब्दकथा आणि स्वॅप्स

सखी
Wed, 07/23/2014 - 17:37 नवीन
मूळ शतशब्दकथा आणि स्वॅप्स यांचा हा प्रतिसादही आवडला. प्रतिसादावरुन उषःकाल होता होता..हे ही आठवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

+१

मधुरा देशपांडे
Wed, 07/23/2014 - 19:48 नवीन
मूळ शतशब्दकथा आणि स्वॅप्स यांचा हा प्रतिसादही आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

+२

बहुगुणी
Wed, 07/23/2014 - 23:20 नवीन
दोन्हीही ताकदवान आहेत. (बाकी मूळ शतशब्दकथा ही कथेपेक्षा आत्मप्रकटन वाटलं हेही खरंच.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

याचा वेगळा धागा व्हायला

खटपट्या
गुरुवार, 07/24/2014 - 02:08 नवीन
याचा वेगळा धागा व्हायला पायजेलाय !! बाकि मुळ शतशब्दकथाही अप्रतीम !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

आपली नि अतिवासतैंची कथा

arunjoshi123
Wed, 07/30/2014 - 20:45 नवीन
आपली नि अतिवासतैंची कथा एकामागे एक वाचणे म्हणजे पर्वणी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

आमेन!

आयुर्हित
Wed, 07/23/2014 - 13:28 नवीन
कधीतरी हे पान उलटेल. मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन. आमेन!
  • Log in or register to post comments

जबरदस्त

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 07/23/2014 - 13:50 नवीन
कथा आवडलीच
  • Log in or register to post comments

मूळ लेखन सुंदर. प्रतिसादही

कवितानागेश
Wed, 07/23/2014 - 17:08 नवीन
मूळ लेखन सुंदर. प्रतिसादही आवडला.
  • Log in or register to post comments

मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन!

पहाटवारा
गुरुवार, 07/24/2014 - 05:02 नवीन
""मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन!"" मिळेल मग सुटका या कोलाहलातून ..?? मिळेल मग हवी ती मन:शांती ?? कथा आवडली हेवेसांनल.. -पहाटवारा
  • Log in or register to post comments

नाही.

आतिवास
गुरुवार, 07/24/2014 - 11:28 नवीन
नाही. कोलाहलातून सुटका होणं ही फार अवघड गोष्ट आहे. कारण आपल्या मनाला काय पाहिजे ते वारंवार बदलत असतं - ते स्थिर नसतं. त्यामुळे पूर्ण मनःशांती हे सर्वसाधारणपणे (याला अपवाद होते, आहेत, असतील) एक मृगजळ आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पहाटवारा

आभार

आतिवास
Wed, 07/30/2014 - 11:15 नवीन
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
  • Log in or register to post comments

''''''''''कारण आपल्या मनाला

जयनीत
Wed, 07/30/2014 - 20:37 नवीन
''''''''''कारण आपल्या मनाला काय पाहिजे ते वारंवार बदलत असतं - ते स्थिर नसतं. '''''''' मनुष्याची वागणूक पण बदलत असते कालांतराने.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा