माझी झोप उडालीय, मन:शांती लयाला गेलीय;
कशातच आनंद नाही; काही सुचत नाहीये.
स्वप्न आहे हे? का खरोखर घडतंय?
त्यांचा सतत आरडाओरडा चालू आहे, अगदी क्षणभरही खंड नाही.
प्रत्येकाला विजयी व्हायचंय, इतरांपेक्षा जास्त जगायचंय, जास्त चमकायचंय.
प्रत्येकाला हवं आहे यश, प्रेम, सुरक्षितता, पैसा आणि प्रसिद्धी.
प्रत्येकाला हवी आहे महत्त्वाची भूमिका.
इतरांना झाकोळून टाकण्याची त्यांची किती लगबग.
मार्ग काढला असता मी; पण त्यांची संख्या खूप जास्त आहे.
भीती वाटतेय मला.; जो तो धमकी देतोय.
असं किती काळ चालेल?
कधीतरी हे पान उलटेल.
मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन.
पात्रं थोडीच लिहितात कादंबरी? मी लिहितेय.
माझ्या मर्जीने लिहीन, त्यांच्या मर्जीने नाही!
* शतशब्दकथा
वाचने
8534
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
थोडी वेगळीच. आवडली कथा.
कुल
कधीतरी हे पान उलटेल.
कधीतरी हे पान उलटेल. मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन.हे जास्त आवडल.(No subject)
छान मनोगत ! आवडले.
मर्जी
गोष्ट आवडली. पैजारबुवा,
आवडलं!
चोक्कस
किसन आणि स्नेहांकिता शी सहमत.
"कधीतरी हे पान उलटेल.
कोणाच्या ओळी आहेत या?
In reply to "कधीतरी हे पान उलटेल. by शैलेन्द्र
माझ्याचं, एका अपुर्ण
In reply to कोणाच्या ओळी आहेत या? by आतिवास
सॉरी, कथेला दाद द्यायची राहुन
तत्त्वे
शतशब्दप्रतिसाद उत्तम आहे;
In reply to तत्त्वे by एस
मूळ शतशब्दकथा आणि स्वॅप्स
In reply to तत्त्वे by एस
+१
In reply to मूळ शतशब्दकथा आणि स्वॅप्स by सखी
+२
In reply to +१ by मधुरा देशपांडे
याचा वेगळा धागा व्हायला
In reply to तत्त्वे by एस
आपली नि अतिवासतैंची कथा
In reply to तत्त्वे by एस
आमेन!
जबरदस्त
मूळ लेखन सुंदर. प्रतिसादही
मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन!
नाही.
In reply to मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन! by पहाटवारा
आभार
''''''''''कारण आपल्या मनाला